मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १३: माझ्या घरचा बाप्पा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस ****************************************** नमस्कार मंडळी! पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर नवी स्पर्धा घेऊन आलो आहोत! यावेळचा विषय अर्थातच, "माझ्या घरचा बाप्पा! बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, पूजा होऊन आजच्या आरत्या नैवेद्य सगळे यथासांग पार पडले असेल. सजावटही आता पुरी झाली असेलच. तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. हे सगळे कसे काय केले आहे याबद्दलही थोडक्यात जरूर लिहा! स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच. तुमच्या घरच्या बाप्पाची छायाचित्रे इथे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत द्या. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!

वाचने 30420 वाचनखूण प्रतिक्रिया 66

वेल्लाभट Fri, 09/18/2015 - 11:31
तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे
हे थोडं विस्ताराने सांगता येईल का? म्हणजे... केवळ मूर्ती अपेक्षित आहे, की सजावटीला प्राधान्य आहे? छायाचित्रणकार म्हणून इथे तुम्हाला क्रिएटिव्ह होण्याची मुभा आहे ना?

In reply to by वेल्लाभट

पैसा Fri, 09/18/2015 - 12:05
सुंदर परिणामकारक चित्र पाहिजे. फक्त मूर्तीचे चित्र अपेक्षित नाही. कारण त्यात त्या मूर्ती घडवणार्‍याचे कौशल्य फक्त दिसेल. फक्त सजावट पाहिजे असेही नाही. माझ्या घरचा बाप्पा, यात तुमच्या नजरेला काय दिसेल त्याचे आपले कौशल्य वापरून सुंदर चित्र तयार करा. बस.

In reply to by संजय पाटिल

फोटो दिसत नाही हे ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! आता दिसतोय का पहा. अजूनही न दिसल्यास जीमेल / गुगल+ ला लॉगईन करून पहा, नक्की दिसेल (गुगल फोटोतले फोटो पहाण्यासाठी जीमेल / गुगल+ चे लॉगईन आवश्यक असण्याचा प्रकार गुगल फोटोने हल्लीच सुरू केलाय... त्यांच्या अंतर्गत रिस्ट्रक्चरिंगमुळे असे ऐकून आहे.)

In reply to by माझीच मी

तुमच्या फोटोचा दुवा गडबडला आहे. दुवा (URL) कॉपी करण्याआधी पुर्ण फोटो डिस्प्ले करून त्याच्यावर राईट क्लिक करून URL कॉपी करावी व ती इथे वापरावी.

सौन्दर्य Fri, 09/25/2015 - 23:42
नैवेद्य गणपती म्हंटले की हमखास आठवतात ते मोदक आणि तेही उकडीचे. घरोघरी उकडीचे मोदक गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. हा आमचा नैवेद्य बाप्पासाठी. जरी फोटोत बाप्पा नसले तरी मोदकांच्या रुपात ते आहेतच म्हणून हा प्रतीकात्मक फोटो पोस्ट केला.

In reply to by सौन्दर्य

मोदक एकदम रेखीव आहेत. साच्याने केले आहेत असे दिसते. पटकन उचलून गट्टम करावे इतके छान झाले आहेत ! त्यांची रचनाही सुंदर आहे !

In reply to by सिद्धी

पैसा Wed, 09/30/2015 - 22:11
इथे फक्त नेटवरचे फोटो देता येतात. http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पिकासा, फ्लिकर, फेसबुक कुठेतरी फोटो अपलोड करा. तो पब्लिक शेअर करा. आणि मग सहज इथे देता येईल.

मोहन Wed, 09/30/2015 - 16:18
माझा फोटो काही दिवस दिसत होता आता का दिसत नाही ?

अजिंक्य विश्वास गुरुवार, 10/01/2015 - 12:39
हा फोटो चालेल का? कारण... माझ्या घरी गणपती बसत नाही. म्हणून आम्ही मामा आणि मावशीच्या घरी गणपती बसवायला जातो. तिथले डेकोरेशन आम्हीच मिळून करतो. डिटेल्स कॅमेरा -६००डी लेन्स- कॅनन ५० एम्‌.एम्‌ १.८ प्राईम लेन्स आय्‌.एस्‌. ओ. - २०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ २.५ एक्स्पोजर टाईम- १/१० सेकंद एक्स्पोजर बायस- -०.३ स्टेप मोड- अपार्चर प्रायोरीटी मोड .

इशा हेडाउ Fri, 10/02/2015 - 03:59
ganesh6 ganesh2 ganesh_3 ganesh3 ganesh7 ganesh4 ganesh5 आमचा घरचा गणपती या वषॅी गणपतीची तीन गोष्टीची theme करायचा प्रयत्न कैला आहे १. गणपतीची जन्म कथा २. गणेश आणी कार्तिकेय मधे शर्यत ३. महाभारताच्या लेखन

संपादक मंडळ Tue, 10/06/2015 - 22:15
नमस्कार! सर्व चित्रे सुंदर आहेत. आणि कोणाचेही परीक्षण करणे किंवा कमी जास्त ठरवणे हे सर्वच चित्रात गणपती बाप्पा असल्याने जरा अवघड वाटत आहे. यावेळी आपण नेहमीसारखे क्रमांक न काढता पुढच्या स्पर्धेची वेळ येईपर्यंत आपापल्या घरचे बाप्पा इथे प्रकाशित करूयात का? तुमची मते सांगा! सर्वांना जर स्पर्धा घ्यायला हवी असेल तर स्पर्धा घेऊ.

तर्राट जोकर Tue, 10/06/2015 - 23:11
१. इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच. २. कोणाचेही परीक्षण करणे किंवा कमी जास्त ठरवणे हे सर्वच चित्रात गणपती बाप्पा असल्याने जरा अवघड वाटत आहे. ----संपादकांनी आमच्यावर रागवतील काय? - TJ (तर्राट जोकर)---