सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ
...पुढची सफरीत आपण अल् कतीफ नावाच्या दुसऱ्या एका वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधरंगी मरुवनात जाणार आहोत.
अल् कतीफ
अल् कतीफ हे पूर्व प्रांतातले अजून एक मोठे मरुवन आहे. कतीफ नावाच्या शहरासह आजूबाजूची छोटी शहरे आणि गावे मिळून कतीफ प्रभाग (गव्हर्नरेट) बनला आहे. कतीफ पूर्व अरबस्तानातील एक फार जुनी वसाहत आहे. इथे सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून तिचा इतिहास अगदी इ स पूर्वी ३५०० वर्षांपर्यंत मागे जातो. पूर्वी या जागेचे नाव "खत्त" असे होते. येथील कारागीर उत्तम भाले बनवण्यात वाकबगार होते. या जागेच्या नावावरून त्यांच्या भाल्यांना "खत्ती" असे ब्रँडनेम होते. इथल्या पारंपरिक कथा-कवितांमध्ये या खत्ती भाल्यांचा उल्लेख आहे. इथल्या काही जमातींचे आडनाव (फॅमिली नेम) खत्ती असे आहे. प्राचीन काळात कतीफ हे अरबी आखातातले महत्त्वाचे शहर आणि बंदर होते. ग्रीक त्याचा उल्लेख कॅटिअस (Cateus) असा करत. काही जुन्या युरोपियन नकाश्यात अरबी आखाताचे नाव कतीफचा समुद्र (Sea of El Catif or Katif) असे लिहिलेले आहे. यावरून त्या काळातले कतीफचे महत्व अधोरेखीत होते. कतीफ प्राचीन अल् बहरेन या सौदी अरेबियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांताचा भाग होता. त्यामुळे त्याचा इतिहास आपण मागच्या भागात अल् अहसाच्या इतिहासाबरोबर पाहिला आहेच. कतीफ हे एक मोठे मरुवन असल्याने, अर्थातच, येथे मोठ्या प्रमाणात खजुराची झाडे आणि हिरवळ आहे. पूर्वी येथे व्यापार, शेती आणि मासेमारी हे मुख्य उद्योगधंदे होते. मात्र जुबेल या तेल उद्योगासाठी खास वसवलेल्या आधुनीक शहराच्या जवळ असल्याने आता तेथील लोक मोठ्या प्रमाणात तेल उद्योग, सरकारी नोकरी, शिक्षणसंस्था आणि आरोग्यसेवा या व्यवसायांत काम करतात. कतीफला या ना त्या निमित्ताने चार पाच फेर्या झाल्या आणि या मरूवनाची अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळाली. चला त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी एक एक करत बघूया...आठवड्याचा बाजार
कतीफला दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरतो. आजूबाजूच्या गावांतूनच नव्हे तर दम्माम-खोबार-दाहरान मधूनही लोक तेथे जातात. स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी जाणार्या लोकांबरोबरच त्या गर्दीत आमच्यासारखे बाजाराची मजा बघायला जाणारे पर्यटकही असतात. चला तर या बाजाराची वैशिष्ट्ये त्यात फेरफटका मारत बघूया... आठवड्याचा बाजार म्हटले म्हणजे भाजीपाला, फळे हे नेहमीचेच आहे. यात कतीफ आणि आजूबाजूच्या भागांत तयार होणार्या भाजीपाल्याबरोबरच परदेशातून आयात केलेला भाजीपाला आणि फळेही असतात...
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०१
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०२
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०३
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०४
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०५
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०६
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०७
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०८
कतीफचा आठवड्याचा बाजार : ०९
कतीफचा आठवड्याचा बाजार : १०
कतीफचा आठवड्याचा बाजार : ११
कतीफचा आठवड्याचा बाजार : १२
कतीफचा आठवड्याचा बाजार : १३
मासळी बाजार
कतीफ त्याच्या मासळीबाजारासाठीही प्रसिद्ध आहे. येथील कोळी आजही पारंपरिक डोव्ह (मध्यम आकाराच्या मासेमारी बोटी) वापरून मासेमारी करतात व ते मासे घेऊन रोज पहाटे परततात. पहाटे ४ ते ६ या काळात कतीफ मधल्या एका राखीव जागेवर त्या माश्यांचा लिलाव होतो. हा लिलाव येथे गेल्या १५० वर्षांपासून भरतो आहे. मासेमारी व्यवसायात येथील ४,५०० लोक काम करतात आणि दररोज १००० ते १२०० टन मासे विकले जातात. या बाजाराची दरवर्षीची उलाढाल साधारण US$ १० कोटीची ( साधारणपणे रु ६०० कोटी) आहे. या लिलावातले मासे केवळ सौदी अरेबियातच नव्हे तर सर्व आखाती देशात जातात. सद्याची जागा कमी पडत असल्याने लवकरच या लिलावाची जागा किनार्याजवळ US$ २० लाख खर्चून बनविलेल्या एका कृत्रिम बेटावरच्या १,१०,६०० चौ मीटर आकाराच्या खास संकुलात हलविण्यात येणार आहे. आठवड्याच्या सुट्टीच्या आणि इतर सुट्टीच्या दिवसांना स्वस्त दरात ताजे मासे खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतल्या नोकरदार लोकांची आणि पर्यट्कांची येथे झुंबड उडालेली असते...
कतीफचा मासळी बाजार : ०१ (जालावरून साभार)
कतीफचा मासळी बाजार : ०२
कतीफ शहराचा फेरफटका
कतीफ प्राचीन काळापासून अरबी आखातातले महत्त्वाचे बंदर राहिले आहे. या बंदरात एका वेळेस ५०० पारंपरिक बोटी (डोव्ह) उभा राहू शकतात. यातल्या बहुतेक पारंपरिक बोटी कतीफ येथेच बांधल्या जातात. कतीफच्या समुद्रकिनार्यावर ३५,००० चौ मीटरवर हिरवळ आणि मुलांना खेळायची व्यवस्था केली आहे (कतीफ कॉर्निश)...
कतीफचा फेरफटका : ०१ : कतीफ कॉर्निश
कतीफचा फेरफटका : ०२
कतीफचा फेरफटका : ०३
कतीफचा फेरफटका : ०४
कतीफचा फेरफटका : ०५
कतीफचा फेरफटका : ०६
कतीफचा फेरफटका : ०७ : कतीफ सिटी मॉल
कतीफचा फेरफटका : ०७
कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०१
कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०२
कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०३
कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०४
कतीफ फेस्टिवल
कतीफ प्रभाग दरवर्षी "कतीफ फेस्टिवल" साजरी करतो. या समारंभात फक्त पेहराव वगळता भारतातील एखाद्या जत्रेचे वातावरण असते...
कतीफ फेस्टिवल : ०१ (जालावरून साभार)
कतीफ फेस्टिवल : ०२ (जालावरून साभार)
कतीफ फेस्टिवल : ०३
कतीफ फेस्टिवल : ०४
कतीफ फेस्टिवल : ०५
कतीफ फेस्टिवल : ०६
कतीफ फेस्टिवल : ०७
कतीफ फेस्टिवल : ०८ : भेटवस्तूंचे दुकान
कतीफ फेस्टिवल : ०९ : कपड्यांचे दुकान
कतीफ फेस्टिवल : १० : मसाल्यांचे दुकान
ही पूर्ण बंद असताना केवळ कलाकुसर असलेली तबकडी वाटते. पण हँडल पकडून उघडली की होते...
टेबलावर फुले, फळे अथवा तत्सम वस्तू ठेवण्यासाठीची शैलीदार कोरीव परडी
.
...
.
आपली पुढची सफर आहे सौदी अरेबियातील आधुनिक औद्योगिक शहर जुबेलची.
क्रमशः
.
(अंधुक प्रकाशामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे काही प्रकाशचित्रे खराब आली आहेत. क्षमस्व)
===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
हा पण भाग मस्त....
@कतीफ फेस्टिवल : ०५ >>>
डॉक्टर साहेब,
In reply to डॉक्टर साहेब, by सुबोध खरे
धन्यवाद !
मस्त भाग झालाय हा. अगदी
In reply to मस्त भाग झालाय हा. अगदी by प्रचेतस
हो ना !
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण
In reply to वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण by प्रचेतस
तो अनुभव सौदी अरेबियाचा नाही,
मी जुबैलकर...
In reply to मी जुबैलकर... by बारक्या_पहीलवान
धन्यवाद !
मस्तच!
In reply to मस्तच! by भाते
धन्यवाद !
सुंदर सफर सुरु आहे.. आज सगळे
शेवटचा पारंपारीक पोशाखातील
In reply to शेवटचा पारंपारीक पोशाखातील by तुमचा अभिषेक
+१
हा फेरफटकाही आवडला......
In reply to हा फेरफटकाही आवडला...... by रेवती
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
त्यामुळे बहुतेक स्त्रियांना
In reply to त्यामुळे बहुतेक स्त्रियांना by रेवती
मग काय ! आरामात मागच्या सिटवर
धन्यवाद !
मस्त फोटो
हाही भाग मस्तच!!! बाकी त्या
In reply to हाही भाग मस्तच!!! बाकी त्या by बॅटमॅन
धन्यावाद !
नेहमीप्रमाणेच
हा ही भाग मस्तच... पु. भा.
धन्यवाद !