बॅचलर्स पनीर बर्फी
आता हे एका पातळ सुती कापडात ओतावं आणि त्या फडक्याला गाठ मारुन ती पुरचुंडी साधारण तासभर टांगून ठेवावी जेणेकरुन पाणी निथळून जाईल. थोडंसं पाणी पनीरमध्ये राहू द्यावं अगदीच कोरडं होऊ देऊ नये.
आता एका जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत हे पनीर व दीड पेला साखर ओतून मंद आचेवर परतत राहावं (साखरेचं प्रमाणही अर्थात पनीर किती निघतंय यावर ठरवावं). साखर विरघळून साधारण घट्टपणा आला की वेलची-जायफळाची पूड, केशर घालून परतावे. आता हे बर्फीसाठी तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठीची एक खूण म्हणजे, पातेल्यातच एका बाजूला ते चमच्याने थापून बघावं तसंच राह्यलं तर बर्फीसाठी मिश्रण तयार आहे.
एका ताटात/ परातीत हे गरम असतानाच थापत न्यावं, नीट थापलं की वर बदाम पिस्त्याचे काप पेरुन परत एकदा वरचेवर हात फिरवावा. तासभर सेट होऊ द्यावं, नंतर पातळशा सुरीने वड्या पाडाव्यात. वडी उचलतानाही शक्यतो, सुरी वडीच्या खाली सरकवून वडी उचलावी. उगाच हाताने उचलायला जाऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडायचेच चान्सेस जास्त. मग पनीर बर्फी खायला तयार आहे.
आता टीपा:
१) एखादवेळेस साखर आणि पनीर परतून झाल्यावर ताटात पसरवताना पाणी अजूनही राह्यल्यासारखं वाटत असेल तर ते ताटभर न पसरवता ताटात थोडी जागा मोकळी ठेवावी. थापून झालं ताट थोडं मोकळ्या बाजूकडे कलथं करुन ठेवावं. म्हणजे झालंच असेल पाणी जास्त तर ते तिथे जमा होईल.
२) एवढा उपद्व्याप केला पण एकही बर्फीचा तुकडा ताटातून धडपणे बाहेर येत नसेल तर सरळ लहान लहान गोळे करुन कागदी द्रोणात भरुन फ्रिजमध्ये सेट करा, पनीर पेढे/ पनीर बॉल म्हणून खपतील सहज.
जाता जाता: ही रेशिपी अंडं घालून, चिकन घालून, पनीरशिवाय, दूधाशिवाय, मीठ घालून, साखरेशिवाय अशा कोणत्याही प्रकारे मी बनवून पाह्यलेली नाही. कोणी तशी बनवली असल्यास आणि कशी बनवावी याची कुणाला उत्सुकता असल्यास त्याची पाकृ जरुर द्या.In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by इंटरनेटस्नेही
In reply to पाककला निपुण पती कोणाला by रेवती
इंटेश, तूही आता बर्या बोलानं पदार्थ शिकायला लाग बघू.हो.. शिकायला लागणारे खरं.. आमच्या मातोश्रींनी आम्हाला कधी संधीच दिली नाही किचन मध्ये जाण्याची.. पण आता बस्स! उद्या न जाणो कोणी 'आयटी तज्ज्ञ' गळ्यात पडली तर उपासमार नको व्हायला! ;)
किती अटी असतात आजकाल मुलींच्याही!हो तर.. मीही ऐकुन आहे याबद्दल.. तीनचार वर्षात प्रत्यक्ष अनुभव देखील येईल.. :O
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
In reply to रेवती आजी बघ... जरा... इथे by स्पा
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
In reply to बेष्ट! आवडली आहे. by बिपिन कार्यकर्ते
In reply to काय उपयोग? तू ब्याचलर आहेस by रेवती

In reply to हो गं लीमा.. by मस्त कलंदर
In reply to विकतची पनीर / मलई बर्फी by गवि
In reply to कोरडी वाटू नये म्हणूनच मी by सूड
In reply to पनीर by प्रचेतस
In reply to पनीर जास्त रवाळ होण्यासाठी by स्पा
In reply to नाही by प्रचेतस
In reply to अरेरे! काय दिवस आलेत... by बिपिन कार्यकर्ते
In reply to तयार पनीर by सुनील
In reply to सदर बर्फी ही सदर लेखकाने केली by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मस्त रे सु by गणपा
In reply to आवडली by स्मिता.
In reply to मस्त रे सुधांशु, गेट वेल सुन by ५० फक्त
In reply to अगदी अगदी दिवस भरत आलेल्या by रामदास
रेवतीताई वधू शोधण्यापूर्वी जरा विचार करा.)काकांशी असहमत होण्यासारख काही कारण दिसत नाही :) सूड - बर्फी खल्लास होती रे (ती अति जेवणं मुले कशी बशी खल्लास करावी लागली हा भाग वेगळा :) )
In reply to बर्फी तीही पनीरची !!! by मदनबाण
In reply to वा सुड, by पैसा
In reply to कालाय तस्मै नमः by पंगा
In reply to मग! by पैसा
त्याच्या पाककौशल्याची झाईरात करायची तर आधी काहीतरी मिळायला पाहिजे ना!जरूर.
या जगात फुकट काही मिळत नाही बरं!!अगदी! बादवे ते अवमूल्यनाचे जरासे चुकलेच. इफेक्टिविटी कमी झाली असे म्हणता येईलही कदाचित. पण पूर्वी प्रसादाच्या बदल्यात देणार्याला काहीच मिळत नसे, हल्ली एखादी बायको मिळण्याची शक्यता तरी आहे म्हटले तर उलट प्रसादाची पर्चेसिंग पावर वाढली असे म्हणता येईल काय?
In reply to अगदी! by पंगा
पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच