ही रेसिपी जरा सवडीनंच टाकायचा विचार होता, पण एकेक अनवट ब्याचलर्स रेशिप्या येताना बघितल्या आणि म्हटलं आपली साधीशी रेशिपी ह्यात डकवून टाकावी.
कोणाही ब्याचलराला/ ब्याचलरणीला ही रेशिपी सहज जमायला काहीच हरकत नसावी असं माझं मत, कारण याची सुरुवातच बिघडवण्याने होते. साधलीच नाही तर यद्वा तद्वा भविष्यति ( सु'संस्कृत' मंडळींनी जरा सांभाळून घ्या ) असा प्रकार आहे, कसं ते पुढे सांगतोच आहे. त्यामुळे काही वाया जाईल असा प्रश्नच नाही.
तर साहित्य पुढील प्रमाणे,
दूध २ लिटर,
साखर मध्यम आकाराचा दीड पेला ( चमच्यांच्या भाषेत सांगायचं तर २०-२५ चहाचे चमचे)
वेलची-जायफळाची पूड,
थोडं केशर,
बदाम पिस्त्याचे काप,
दीड चमचे तुरटी बारीक कुटलेली.
आता करायचं काय...तर दूध उकळत ठेवायचं, दूधाला छान उकळी आली म्हणजे तुरटीची पावडर चिमुट-चिमूटभर टाकून ढवळत रहायचं. चिमूट-चिमूट एवढ्यासाठीच टाकायचं, कारण त्यामुळे पनीर रवाळ येतं. एकदाच टाकली तुरटी तर ते तितकंसं रवाळ येत नाही. आता पनीर बनवण्यासाठी यात तुरटीऐवजी लिंबूही पिळता येतं, पण ते जर जास्त पडलं तर लिंबाचा विशिष्ट वास पनीरला येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुरटीच वापरणं बरं !! आता ती इकडे मिळते म्हणून, नाहीतर लिंबावाचून पर्याय नाही. पनीर आणि पाणी वेगळं होईपर्यंत उकळी आणावी . हे असं दिसलं म्हणजे, पनीर (छेना) तयार झालं.
आता हे एका पातळ सुती कापडात ओतावं आणि त्या फडक्याला गाठ मारुन ती पुरचुंडी साधारण तासभर टांगून ठेवावी जेणेकरुन पाणी निथळून जाईल. थोडंसं पाणी पनीरमध्ये राहू द्यावं अगदीच कोरडं होऊ देऊ नये.
आता एका जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत हे पनीर व दीड पेला साखर ओतून मंद आचेवर परतत राहावं (साखरेचं प्रमाणही अर्थात पनीर किती निघतंय यावर ठरवावं). साखर विरघळून साधारण घट्टपणा आला की वेलची-जायफळाची पूड, केशर घालून परतावे. आता हे बर्फीसाठी तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठीची एक खूण म्हणजे, पातेल्यातच एका बाजूला ते चमच्याने थापून बघावं तसंच राह्यलं तर बर्फीसाठी मिश्रण तयार आहे.
एका ताटात/ परातीत हे गरम असतानाच थापत न्यावं, नीट थापलं की वर बदाम पिस्त्याचे काप पेरुन परत एकदा वरचेवर हात फिरवावा. तासभर सेट होऊ द्यावं, नंतर पातळशा सुरीने वड्या पाडाव्यात. वडी उचलतानाही शक्यतो, सुरी वडीच्या खाली सरकवून वडी उचलावी. उगाच हाताने उचलायला जाऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडायचेच चान्सेस जास्त. मग पनीर बर्फी खायला तयार आहे.
आता टीपा:
१) एखादवेळेस साखर आणि पनीर परतून झाल्यावर ताटात पसरवताना पाणी अजूनही राह्यल्यासारखं वाटत असेल तर ते ताटभर न पसरवता ताटात थोडी जागा मोकळी ठेवावी. थापून झालं ताट थोडं मोकळ्या बाजूकडे कलथं करुन ठेवावं. म्हणजे झालंच असेल पाणी जास्त तर ते तिथे जमा होईल.
२) एवढा उपद्व्याप केला पण एकही बर्फीचा तुकडा ताटातून धडपणे बाहेर येत नसेल तर सरळ लहान लहान गोळे करुन कागदी द्रोणात भरुन फ्रिजमध्ये सेट करा, पनीर पेढे/ पनीर बॉल म्हणून खपतील सहज.
जाता जाता: ही रेशिपी अंडं घालून, चिकन घालून, पनीरशिवाय, दूधाशिवाय, मीठ घालून, साखरेशिवाय अशा कोणत्याही प्रकारे मी बनवून पाह्यलेली नाही. कोणी तशी बनवली असल्यास आणि कशी बनवावी याची कुणाला उत्सुकता असल्यास त्याची पाकृ जरुर द्या.

वाचने
14101
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच
पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
पाककला निपुण पती कोणाला
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by इंटरनेटस्नेही
@ रेवती काकु..
In reply to पाककला निपुण पती कोणाला by रेवती
रेवती आजी बघ... जरा... इथे
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
यशोदा, रुक्मिणी आजींच्या
In reply to रेवती आजी बघ... जरा... इथे by स्पा
>>अश्शी झायरात करायला सांगत
In reply to पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच by रेवती
व्वा व्वा सुधांशु... मस्तंच
मस्त!!!
मस्तच रे
बेष्ट! आवडली आहे.
काय उपयोग? तू ब्याचलर आहेस
In reply to बेष्ट! आवडली आहे. by बिपिन कार्यकर्ते
अगं काकू, हे ब्याचलर /
In reply to काय उपयोग? तू ब्याचलर आहेस by रेवती
हीच ना रे? त्या दिवशी दीड
झ्याक
हो गं लीमा..
याच संवादाची पार्श्वभूमी
In reply to हो गं लीमा.. by मस्त कलंदर
वा वा.. हीच ती आम्ही
छान
मस्त
पनीर बर्फी १ नंबर रे सुड.
सुरेख
विकतची पनीर / मलई बर्फी
कोरडी वाटू नये म्हणूनच मी
In reply to विकतची पनीर / मलई बर्फी by गवि
पनीर
In reply to कोरडी वाटू नये म्हणूनच मी by सूड
पनीर जास्त रवाळ होण्यासाठी
In reply to पनीर by प्रचेतस
नाही
In reply to पनीर जास्त रवाळ होण्यासाठी by स्पा
अरेरे! काय दिवस आलेत...
In reply to नाही by प्रचेतस
पातेल्यात की पातेल्यातुन...
In reply to अरेरे! काय दिवस आलेत... by बिपिन कार्यकर्ते
तयार पनीर
बाजारातले पनीर बरेच कोरडे
In reply to तयार पनीर by सुनील
छान ............
सदर बर्फी ही सदर लेखकाने केली
__/\__
In reply to सदर बर्फी ही सदर लेखकाने केली by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त रे सु
हॅ हॅ हॅ..
In reply to मस्त रे सु by गणपा
सहज
आवडली
ही बॅचलर्स पनीर बर्फी
In reply to आवडली by स्मिता.
आयला!
जबर्या
बर्फी..
मस्त रे सुधांशु, गेट वेल सुन
गेट वेल सुन सुन. खी खी खी
In reply to मस्त रे सुधांशु, गेट वेल सुन by ५० फक्त
मस्त रे!!
अगदी अगदी दिवस भरत आलेल्या
रेवतीताई वधू शोधण्यापूर्वी
In reply to अगदी अगदी दिवस भरत आलेल्या by रामदास
बर्फी तीही पनीरची !!!
>>पनीर इतके लुसलुशीत कसे
In reply to बर्फी तीही पनीरची !!! by मदनबाण
वा सुड,
कालाय तस्मै नमः
In reply to वा सुड, by पैसा
मग!
In reply to कालाय तस्मै नमः by पंगा
अगदी!
In reply to मग! by पैसा
अगदी बरोबर!
In reply to अगदी! by पंगा
खुप छान रेसिपी आहे.