मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी व १५० लेख !

दशानन · · जनातलं, मनातलं
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन.... माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द.. हिंदी शब्दाची भरमार असलेले सर्व लेख वाचले गेले व एकदोन काका मंडळींनी व कधी कधी काही मित्रांनी एक दोनदा च त्याबदल सुचना केलेली आठवते... पण मिपावर शुध्द लेखन ह्या प्रकाराचा जास्त बाऊ नव्हता शक्यतो ह्या मुळे मी लेखन करायला तयार झालो.. व लिहता झालो... व लिहता लिहता आज जरा मागे वळून पाहीले तर १५० लेख ! असे नाही की माझे सर्वच लेखन मिपाकरांना आवडले काही आवडले ही नाही... तर काही लेखन एवढे आवडले की लोकांच्या फॉरवर्ड मधून फिरु लागले व फिरता फिरता कधी कधी माझ्याच इमेल वर मला भेटले... ;) मिपाकरांच्या स्वभावाचा अनुभव मला माझी सफर चे वीस भाग लिहताना झाला... जेव्हा मी लेखामध्ये सुखावलो तेव्हा... मिपावर प्रतिसादामध्ये सुखावले... जेव्हा मी दुखी वाटलो.. तर मिपाकर दुखःवर फुंकर घालण्यासाठी हजर... तो अनुभवच वेगळा होता... जे जगलो ते वीस भागात लिहणे मला जवळ जवळ अशक्य होते पण हळुहळु लिहीत गेलो व कधी लेखन पुर्ण झालं कळालेच नाही... मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो... माझे काही लेखन पुर्ण पणे लाताडले गेले तर कधी अक्षरशः प्रतिसादांचा ढिग.... महाजालावर काही खरं नसतं... हे माझं ठाम मत होते.. पण मराठी महाजालावर तो नियम लागू होत नाही.. हे पाहून आनंद झाला.. येथे मराठी भाषेपासून दुर राहून व दुर देशी राहून मराठी बोलायला ही ज्याकाळात मी व्याकुळ होत होतो तेव्हा मला हा प्लेटफॉर्म सापडला लिहण्याचा.... लिहीत गेलो... त्यातुनच एवढे मित्र गोळा झाले व मराठीचा वापर एवढा वाढला की मी माझ्याच ऑफिस मध्ये कळत न कळत मराठी बोलून जातो... व समोरचा माझे तोंड बघत उभा राहतो.. :D मी लिहलेले काही असेच.... अनुभववर्णन ! पाप येवढे आहेत डोक्यावर... माझी सफर.. भाग -१ माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२
माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३
माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४
माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५
माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६
माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७
माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - ८
माझी सफर... निर्णय भाग - ९
माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०
माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग - ११
माझी सफर.... मैत्री !!! --- भाग - १२
मागील भाग भाग - १३
मागील भाग....भाग -१४.
माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५
माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६
मागील भाग -१७
मागील भाग - १८
माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९ माझी सफर भाग -२० बाहूबली हॉस्टेलचे दिवस- भाग ७ बाहूबली हॉस्टेलचे दिवस -भाग -१ दिल्ली ते दिल्ली -भाग १ दिल्ली ते दिल्ली ! भाग - २ दिल्ली ते दिल्ली - भाग ३ नातं... माझी भटकंती भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव) भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश) भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६ भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल बेंगलुरु ट्रिप - बाणेरघट्टा नॅशनल पार्क शेयर मार्केट विषयी असेच काहीतरी शेयर मार्केट - एक अंदाज रात्र वैर्‍याची... दिवस शैतानाचा ;) आवशीचा घो ह्या बजटच्या ;) शेयर मार्केट (बेसिक) भाग -१ शेयर मार्केट (बेसिक) भाग -२ फाइनांशियल क्राइसिस ७०० बिलियन डॉलर ! आमचे प्रेम-विषयक लेखन ;) माय व्हॅलंटाईन तो व मी - लफडा अनलिमिटेड. वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां अस्तित्व जगणं ! ए-दिले-नादान तु ! तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!! लफडा काही क्षण... ती व मी ! ती व मी ! - २ ती व मी ! - ३ तु राजा की राजदुलारी मै.... स्टोरीज ! अंत... अंत... भाग-२ अंत... भाग-३ अंत... भाग- ४ हत्या !!! टाईमपास आम्ही जातो हिमालया.... पार्ट-१ आम्ही जातो हिमालया.... पार्ट-२ माझं थोबाड... भाग- ० माझे महान प्रयोग - १ माझे महान प्रयोग - २ कृष्ण दुनियादारी - माझ्या नजरेने ! (आज तुझा वाढदिवस ) यालाकमो हिदा श्यादि मुंबई - गोवा आमची देखील फोटोग्राफी भाग - १ कॉकटेल - सोमरस संबधी... ! वाव क्या बात है राज ! हे माझे काही लेखन जे मिपाकरांना ही आवडले व मला स्वतःला ही.... ;) धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या... तुमच्यामुळे / तुम्हा सर्वांमुळे मला येवढं लेखन करता आले व मी लिहता झालो.... व राज जैन हे नाव मराठी महाजालावर कमीत कमी लोकांना माहीत तरी झाले ;) आता राहिला क्रमशः लेखना बद्द्ल.... तर मित्रों हो थोडा टाईम द्या... रोज कामातून वेळ काढून काढून लिहतो... लॅपटॉप जरा खराब आहे... त्यामुळे ऑफिसमधून जेवढा वेळ मिळेल त्या मध्ये मी माझे क्रमशः लेखन पुर्ण करतो... ! मंगलमुर्ती मोरया !!!!

वाचने 10744 वाचनखूण प्रतिक्रिया 42

सूहास Wed, 08/19/2009 - 14:25
सर्वात खाली क्रमश लिहीलेले नाही हे पाहुन अतिशय देव आनंद झाला.... सू हा स...

In reply to by नंदन

टारझन Wed, 08/19/2009 - 18:32
राजेंच्या खरडवहीत आल्यासारखेच वाटले ! बाकी सामंतांकाका आणि कोदाकाकांनतर णंबर राजेंचाच :) - (काय अन् किती लिहीलंय ह्याचा हिशेब नसलेला) अचानक नातलग

छोटा डॉन Wed, 08/19/2009 - 14:32
राज्या, लिहीत रहा बे. आम्ही वाचतो आहोत, फक्त मायला ते क्रमशःचे भुत डोक्यावरुन काढुन टाक आता ... बाकी तुझ्या १५१ व्या लेखाला शुभेच्छा ...!!! :) ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

दशानन Wed, 08/19/2009 - 14:45
क्रमशः लिहणे माझा जन्मसिध्द अधिकार आहे व तो मी वापरणारच :D *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

प्रभो Wed, 08/19/2009 - 14:36
राजे.... तुमचे विचार वाचून ......चांगलं वाटलं.... मी तसा गेले ५-६ महीने मिपा वाचत होतो.....तुमचं लिखाण वाचायला जाम मजा आली.... -(नव्याचे नऊ दिवस) प्रभो -

च्यायला काय काय सहन केलय मिपाकरांनी ! आणी अजुन करावे लागणार आहे .... राजेचा अहितचिंतक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

सहज Wed, 08/19/2009 - 15:07
>मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो. आशा आहे की आपले जास्त लेखन येणार नाही कारण आता आपण सुखी असाल. पण धन्यवाद काही लोक इतके का लिहतात ते कळले, दु:खी असणार बिचारे :-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया Wed, 08/19/2009 - 16:22
परंतु, सहजरावांनी स्पष्ट नाव घेवुन बोलावे कुणी लेखन करु नये ते... उगाचच वैचारिक बुरखे घेवुन सुखी दु:खी अशा मानीव कल्पनांवर आधारीत वर्गीकरण करुन फार मोठा तीर मारल्याचा आव आणु नये. --अवलिया

In reply to by सहज

ऋषिकेश Wed, 08/19/2009 - 15:15
हे फारसे खरे नसावे.. आता तुम्ही कुठे लिहिता ? .. ;) बाकी राजे तुमचे अभिनंदन ऋषिकेश ------------------ दुपारचे ३ वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया संतवाणी "जगी सर्वसुखी असा कोण आहे...."

समंजस Wed, 08/19/2009 - 15:11
अभिनंदन राजे!तुमच्या लिखाणा बद्दल माझ्या सारख्या वाचकांना भरपूर आनंद मिळाला!! लिहीने सुरुच ठेवा. :) (राजे! तुम्ही न मोजता लिहावे, आम्ही न मोजता वाचावे! काय? :D )

अवलिया Wed, 08/19/2009 - 15:38
अभिनंदन राजे :) बाकी तुमचा वाचकवर्ग कसा आहे? तुमच्या कोणत्या लेखाला किती प्रतिसाद मिळाले, वाचने किती वगैरे विदा आला असता तर तुलना करायला बरे झाले असते. --अवलिया

दिपक Wed, 08/19/2009 - 16:32
राजे आत्ता फक्त १५० झाले आहेत. लिवत रावा. तुम्ही १५००००००० लेख होतील हो... तोपर्यंत पळून पळून मंगळ ग्रहावर पोचला असाल. आहात कुठे? ;)

सूहास Wed, 08/19/2009 - 16:57
ते तात्या बघुन घेतील तु बघ्...१५००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००कसे पुर्ण करायचे ते ..... सू हा स...

मदनबाण Wed, 08/19/2009 - 17:44
अभिनंदन राजे !!! :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

'माझे शब्द' च्या माजी संस्थळचालकाच्या लेखाच्या लेखनाचे अज्याबात आश्चर्य नाही. खरं तर ! विविध अनुभवांचे लेखन राजेंकडून व्हायला पाहिजे. वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे, (म्हणजे तो आहेच) तेव्हा भरभरुन लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा...!!! अवांतर : आपल्या मराठी लेखनात हिंदी शब्दाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. :) -दिलीप बिरुटे (उंटावरुन शेळ्या हाकणारा राज जैन यांचा मित्र)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया Wed, 08/19/2009 - 19:02
वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे, सहमत आहे. हाच सल्ला आमच्या वयोवृद्ध ज्ञानतपस्वी रिडर मित्राला दिला होता, त्याने दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या लेखनात संस्कृत शब्दांचा वापर वाढवला. --अवलिया (रिमोटवरुन चॅनेल बदलणारा प्रा डॉ यांचा मित्र)

विकास Wed, 08/19/2009 - 19:08
१५० लेख? एक पुस्तक करून टाका. फायदा: त्यात कुणाला प्रतिसाद देता येणार नाही, अर्थात one way communication आणि "संभाव्य" तोटा: जर कोणी विकत घेतले नाही तर? :? संभाव्य तोटा जर "क्रमशः" लिहीले तर नक्की होईल ;) धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या... वरील शब्द वाचले आणि मला क्षणभर वाटले तुम्ही मिपाचा निरोप घेता की काय? :)

पाषाणभेद गुरुवार, 08/20/2009 - 02:41
अभिनंदन. लवकरच १००० व लेख पहायला मिळो. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/20/2009 - 02:43
हार्दीक अभिनंदन पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

टुकुल गुरुवार, 08/20/2009 - 03:31
सही हे भिडु !! अभिणंदन... अजुन येवु द्या --टुकुल.

काळा डॉन गुरुवार, 08/20/2009 - 06:52
राजा, तरी मधे एकदोनदा सरपंचावर रुसून पळून गेलास...नाहीतर २०० नक्की होते!! ह्या यादीत 'जैनाचं कार्ट not vefied' ह्या आयडीतले लेखही धरले आहेस ना?

झकासराव गुरुवार, 08/20/2009 - 11:23
मग राजे द्वीशतक लावा लवकरच. :) ते शेअर मार्केट प्रायारिटीवर घ्या. आणि ते क्रमशः आधी संपवा बघु.

अभिज्ञ गुरुवार, 08/20/2009 - 17:26
अभिनंदन राजे, अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

लिखाळ गुरुवार, 08/20/2009 - 19:18
वा .. अभिनंदन आणि शुभेच्छा ! माझी सफर आणि बाहुबली या लेखमाला छान होत्या. :) -- लिखाळ. 'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळांवरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

प्राजु Fri, 08/21/2009 - 07:57
अरे व्वा! सह्ही!! कोल्हापूरकरांचा वि़जय असो...! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कोल्हापूरकरांचा वि़जय असो...! प्रादेशिक मतभेद करणार्‍या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ Fri, 08/21/2009 - 17:45
प्रादेशिक मतभेद करणार्‍या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे) -दिलीप बिरुटे प्राजू लक्षात घे हा मराठवाडा/विदर्भातील लेखकांचा आपल्या पश्चीम महाराष्ट्रावर नेहमीच असा आकस असतो ;) ( चला सुरु झाली आणखी एका सनातन मुद्द्यावर मारामारी) पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे