टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९
मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!
आईच्या ईच्छेप्रमाणे गाव जेवण घातलं .. ! पण टिकीटे बुक असल्यामुळे मी परत निघालो होतो दिल्ली साठी.
कारण संजना बरोबर जे काम हाती घेतले ते पुर्ण करणे देखील गरजेचे होते... मी तेथे पोहचल्यावर कंपनीचे नाव ते प्रवास सर्व तयारी करुन झालेली होती.. फक्त नजर मारणे इतकेच काम राहीले होते.. ते देखील पुर्ण करुन मी आपल्या पहील्या परदेस वारी साठी तयार झालो, Guangdong China, येथे काही सप्लायर होते त्यांच्या जवळून आम्हाला सामान खरेदी करणे व शिपींग ईत्यादीची व्यवस्था करुन परत येणे हेच कार्य होते. २० दिवसामध्ये आम्ही परत आलो व लोकल मार्केट मध्ये जाहीरात चालू केली.... दोन एक महीन्यात सर्व माल पोहचणार होता तो पर्यंत कमीत कमी ७५% माल संपवणे ह्यातच आमचा फायदा होता.... त्यामुळे मी दिवस रात्र एक करुन काहीजणांना हाती घेऊन मार्केट पर्यंत जम बसवला व जशी ईच्छा होती तसाच खफ देखील झाला, प्रथम फेरी मध्येच आमचा झालेला नफा पाहून आमचा उत्साह डब्बल झाला... आम्ही पुन्हा जाणे नक्की केले !
क्रिसमस च्या आदल्या रात्री आम्ही पार्टीची योजना तयार केली होती त्या नूसार सर्वांना बोलवलं ! संजना च्या घरची मंडळी व माझे काही मित्र व विभा ! ... सर्वांच्या समोर संजनाने ठरलेल्या रक्कमेचा चेक माझ्या हाती दिला व म्हणाली.... " देव करो... आपण असेच अनेकानेक चेक आपापसात वाटून घेऊ जिवन भर... " मी हसत... तीला म्हणालो.. "आमिन!" सगळेच हसले. पार्टी व्यवस्थीत झाली व मी, संजना विभा वर टेरेस वर जाऊन बसलो ... सर्व कामाच्या धावपळीमध्ये मी व विभा व्यवस्थीत पणे भेटू देखील शकलो नव्हतो तेव्हा तीच्याशी काही बोलावं काही काळ तीच्या संगे देखील व्यतीत करावा हा विचार करुन मी एक छोट्या ट्रीप ची योजना तीच्या समोर मांडली , ती ,मी संजना व तीची फॅमेली गाडी घेऊन मनालीला जाणे ठरले.
मस्त पैकी रविवार होता.... सकाळ सकाळीच निघालो होतो आम्ही.. तीच्या घरी आईला सांगून आम्ही चार दिवसासाठी चाललो होतो... खात-पीत मजे मध्ये प्रवास चालू होता... मध्येच बोलता बोलता विभा म्हणाली... " तु आपल्या आईला विचारले का ? लग्ना बद्दल? " मी म्हणालो " नाही यार... अजून योग्य अशी वेळ भेटली नाही... तशी माझी आई नाही म्हणले असे तुला का वाटले ?" मी म्हणाली " तुझ्या कडील समाज धर्मजात वैगरा जास्तच पाहतो रे म्हणून विचारलं " मी हसलो व म्हणालो " मी मानत नाही ह्यातच सर्व काही आहे.. माझ्या कडील व्यक्तींची चिंता सोड... तु आपल्या वडीलांना विचारलं का ? " म्हणाली " एकदाच.. विचारलं होतं... तेव्हा म्हणाले होते... बघेन .. भेटेन तुला बस !" मी म्हणालो " चल. मी देखील लवकरच भेटेन त्यांना" , संजना मध्येच म्हणाली... " अरे कोणी तयार नाही झालं की सरळ कोर्ट मॅरेज करणे हाच उपाय त्यात काय नवीन " दोन एक तासाचा प्रवास करुन आम्ही एके जागी जेवण करण्यासाठी थांबलो. तीने नॉनव्हेज तर मी व्हेज ऑर्डर दिली.... फुसनॉनव्हेज.. कधीतरी ट्राय करुन बघ.. कसे मस्त लागते चिकन" मी म्हणालो " नको यार.. मला नाही आवडत.. असे नाही की मी कधीच खालं नाही.. पण मला पसंद नाही ते... गरज म्हणून खाईन पण टेस्ट साठी.. नो वे ! " तीने आपले नाक मुरडले व गप्प खाऊ लागली... तेव्हा मीच एक पीस तीच्या प्लेट मधून घेतला.... तेव्हा कुठे हसली.. ! आम्ही.. कुलू मनाली मध्ये पोहचलो... हॉटेल बुक करुन फिरण्यासाटी बाहेर जावे म्हणून बाहेर आलो तर बाहेर बर्फ पडू लागला होता.. मी म्हणालो...""चलो रुम में "
रुम मध्ये टिव्ही बघत असताना मी फोन वरुन एक रमचा पॅग व काही सिगरेट मागवली.... ती देखील समोर बसून चिप्स खात खात मला म्हणाली... " राज, यार तुम्ही पुरुष लोक ही कडू दारु का पिता ? " मी हसलो व म्हणलो " येथे बाहेर बर्फ पडत आहे.... व मी बाहेर फिरण्याचा मुड तयार करत आहे.. तु येथेच बसून टीव्ही पहा.... " ती म्हणाली " अरे मी ह्या पॅग बद्दल विचारतं आहे..." मी" ह्म्म... माझ्या कडे कारण नाही... हा एक मात्र गोष्ट आहे मला हे पेय शरीराला आवश्यक ती उर्जा व गरमी देते म्हणून सध्या मी घेत आहे " ती म्हणाली..." मी पण एक ट्राय करु ? " मला एकदम ठस्सका लागला व हातातला पॅग सांडता सांडता वाचला.... मी हसलो व म्हणालो..." नको डीयर... संभाळणे अवघड होऊन जाईल मला " मी संजना ला आवाज दिला व म्हणालो... " अरे , हिला घेऊन जा यार... कुठे एखादा पॅग घेऊन मस्त झाली तर मला अवघड होऊन बसेल
" आमची गडबड पाहून संजनाचा नवरा देखील माझ्या रुम मध्ये आला व म्हणाला " अरे , एकटाच बसून का पितो आहेस... मी आहे ना सोबतीला " संजना म्हणाली.. चलो विभा.... आता ह्यांना कोणाची गरज नाही... दोन एक तास तरी " दरवाजा जरा जोरातच बंद झाला... मी डोळे मिचकावत म्हणालो " जिजाजी... तुफान की भारी आशंका है " व आम्ही जोर जोरात हसलो..... व फोन वरुन पुन्हा पॅगची ऑर्डर दिली व थोडी ट्टर होऊन आमची जोडी हॉटेल च्या बाहेर आली... पण बाहेर बर्फ अजून पडतच होता... आम्ही खाली बार मध्ये बसूनच एक एक पॅग घेऊन पुन्हा वर आलो ! 
विभा ही आपली वैतागून टिव्हीवर चॅनेल बदलत बसली होती.... मी टिव्ही बंद केला व तीच्या समोर जाऊन बसलो व म्हणालो " विभा... टिव्ही तेरे घर पें भी है... तु व मी काही बोलू शकत नाही का ?... ईतक्या दुर आपण टिव्ही पाहण्यासाठी तर आलो नाही आहोत ना... मला तुझ्याशी बोलायचं आहे... खुप काही " ती म्हणाली... " ठीक आहे.... बोल..." " मी म्हणत आहे आपण लग्न करणार आहोत... आज ना उद्या ... म्हणजेच लवकरच... पण त्या आधी तुला माझा स्वभाव, माझे राहणे वागणे... खाणे पीणे... हे सर्व माहीत असावे ... माझ्या जिवनाचा पुर्वार्ध देखील ! " मी सर्व राम कहानी पुन्हा तीला संमजावून सांगितली... व म्हणालो " जो आहे तो मी असाच तुझ्या समोर आहे.... उद्या कसा असेन हे माहीत नाही... पण आज संपर्ण आहे... स्वतःच घर नाही आहे... लवकरच होईल ही आशा... तु जे शिक्षण खुप जास्त आहे माझ्या पेक्षा... मी आठवी नववी... पास... फक्त बुध्दीच्या जोरावर येथे आहे.... " विभा माझा हात हाती घेऊन म्हणाली... " अरे, विसर सगळं.... मला सर्व माहीत आहे... नवीन काही नाही ह्यात... तु जसा आहेस तसाच आवडतोस मला... तुझे स्पष्ट बोलणे पसंद आहे मला.... फक्त आपल्या कामालाच तु जास्त वेळ देतोस हेच खटकतं पण सध्या तुला तेच महत्वाचे आहे हे देखील मी जानून आहे तेव्हा काही काळजी करु नकोस... काम करत रहा... देव पाहतच आहे... चल आता झोपी जा मी पण संजनाच्या रुम मध्ये जात आहे ठीक आहे... " व ती संजनाच्या रुम मध्ये जाऊन झोपी गेली... !
माझी सकाळ जरा जास्त वेळाने झाली... ही सर्व मंडळी तयार होऊन बसलेली होती... मी आपला फटाफट तयार होऊन त्यांच्या बरोबर फिरण्यासाठी निघालो.... मनु मंदीर... अर्जुन गुफा... धबदबा.. पाहून आम्ही.. सलोंग घाटी वर येऊन तेथील मस्त निसर्गाचा आनंद घेऊन परत हॉटेल वर आलो... एक दिवस आधीच बर्फ पडल्यामुळे थंडी जास्त जाणवत होती व लहान मुलींना त्रास होत होता तेव्हा आम्ही परत निघण्याचा निर्णय घेतला... !
दोन तास मी... दोन तास जिजाजी... आधी मधे संजना असे गाडी चालवत आम्ही प्रवास करत होतो... दिल्ली तासात पोहचणार होतो आम्ही...... संजना गाडी चालवत होती... जिजाजी तीच्या बरोबरच्या सिट वर व मी विभा व मुली मागे बसलो होतो... विभा मला म्हणाली... "राज "तु ड्राव्हींग कर आता... ती थकली असेल.... दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला... तीला... " मी हो म्हणालो... तेव्हा संजना म्हणाली... " आगे, रिमझिम पें.... चेंज करेंगे " टेप वर मस्त पैकी...." मैया मोरी... " चालू होतं... व मागे मी विभा व मुली ह्यांचे पत्याचे खेळ बघत होतो.... संध्याकाळचा वेळ... पण पुर्ण अंधार झालेला नव्हता... संधी प्रकाश असावा... अचानक गाडी वळली... जिजाजी.. जोरात ओरडले...."" संजना ब्रेक " पण तो पर्यंत रोडच्या मधल्या डिवाडर ला जाऊन भीडली... व त्याच वेगाने पलटली.... !... विभाने मुलींना गच्च पकडले आहे हेच दृष्य मला दिसले व अचानक डोके बाजूच्या खिडकीवर आपटले ....डोळ्या समोर अंधेरी आली... काही कळालेच नाही... !
कोणीतरी हात घेचून मला बाहेर काढत होते... पोलिस गाडीचा सायरन कानावर आदळत होता... अचानक पायातून प्रचंड कळ आली व पुन्हा मी बेहोष झालो... ! दिल्ली मधील गंगाराम हॉस्पीटल मध्ये आम्हाला भरती केले होते... माझ्या पायावर फॅक्चर व हातावर देखील... डोक्याच्या मध्ये भागी.. जख्म... !
मी बाजूला असलेल्या नर्सला विचारले.. " मेरे साथी ?" .. ती माझ्या कडे पाहत म्हणाली.. " सब ठीक है... तुम आराम करो"
माझे मित्र काही बाहेर बसले होते.. एक एक करुन आत आले व मला म्हणाले " ठीक है तू " मी त्यांना विचारलं " अरे यार.. संजना.. विभा..बच्चे ? सारे ठीक है ना..." विनोद म्हणाला.. " अरे सब ठीक है.... तु आराम कर" पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळचं सांगून गेलं...... मी पाणावलेल्या डोळ्याने दरवाज्याकडे हताश पाहात काय झालं असे ह्याची कल्पना करत पडून राहीली होतो.....
क्रमशः
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


आमच्या
कपाळात ठेवून लेखक क्रमशा झाले.
राजे, मला
राजे, मला वाअले होते की चला आता या गृहस्थाची गाडी नीट चालली आहे, आणि हे काय भलतेच वळण आले हो? तुम्ही ते क्रमशः पण असे मोक्याच्या ठिकाणी टाकले आहे... पुढे काय झाले?
पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळचं सांगून गेलं...... मी पाणावलेल्या डोळ्याने दरवाज्याकडे हताश पाहात काय झालं असे ह्याची कल्पना करत पडून राहीली होतो.....
सगळं काही ठीक असेल अशी अपेक्षा करतो.
बिपिन.
राजे
राजे.....
भाग २० आल्याशिवाय यावर प्रतिसाद देण्याची माझी हिम्मत नाही.
विद्याधर
काय हो...
सगळे नीट आहे ना? देव करो आणि सगळे सुखरूप असुदेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुम्ही ही
राजे
तुम्ही आता पिडा काका सारखे करत आहात बर.
सफर मस्तच झाली आहे.
पण पुढे काय वाचायला मिळेल या विचाराने मन चितांतुर झाले आहे.
भीतीयुक्त उत्सुकता.
पुढच्या भागात काय होणार याची चिंता आहे.
रेवती
टेन्शन दिलत हो...........
राजे ....तुम्ही टेन्शन दिलत हो...आता पुढ्चा भाग वाचल्या शिवाय काही जाणार नाही...
(टेन्शनमध्ये) राजा...
आईग्गं!
आईग्गं!
पुढचं लवकर लिहा प्लीज..
राजे, काय हा छळवाद?
आता डायरेक्ट शेवटच्या भागात प्रतिसाद देईन!
चतुरंग
" अरे सब ठीक
" अरे सब ठीक है.... तु आराम कर" पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळचं सांगून गेलं...... मी पाणावलेल्या डोळ्याने दरवाज्याकडे हताश पाहात काय झालं असे ह्याची कल्पना करत पडून राहीली होतो.....
अरे देवा! पुढे?
तात्या.
असेच..
" अरे सब ठीक है.... तु आराम कर" पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळचं सांगून गेलं...... मी पाणावलेल्या डोळ्याने दरवाज्याकडे हताश पाहात काय झालं असे ह्याची कल्पना करत पडून राहीली होतो.....
अरे देवा! पुढे? असंच तात्यासारखंच माझ्याही मनात आलं..राजे लवकर लिहा पुढे काय झालं ते..
स्वाती
राजे!
सगळे बरे आहेत हे वाचून जीव भांड्यात पडला.
पुढचा भाग लवकर येउ द्या.
राजे
पुढचा भाग लवकर टाका.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
जाम टेंशन
जाम टेंशन दिले आहेत तुम्ही..पुढचा भाग लवकर टाका..
(चिंताग्रस्त)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
टेंशन
पुढचा भाग लवकर टाका.
रत्नागिरीकर
राजे
सगळे काही ठीक असेल अशी आशा. पुढचा भाग लवकर टाका.
-सूर्य
सगळं काही
सगळं काही ठीक आहे अशी आशा करते. पुढचा भाग लवकर वाचण्याची इच्छा आहे. विभा, संजना कशा आहेत?
ईश्वरी
अरे सब ठीक
राजे.........
????
म्हणजे???????
शिट्!!! नाही ते विचार येताहेत माझ्या डोक्यात!!!
पुढचा भाग लिहिल्यावर सगळं नीट झालं असेल तरच मला खरड टाका...माझी हिंमत नाही वाचायची.....
सर्वांचे
सर्वांचे आभार !!
पुढील भाग लवकरच लिहीत आहे, शक्यतो रवीवारीच !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
धत तेरे की........
राजे,
पुढे काय होणार याची उत्कंठा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
अरे बापरे
राज भाय पुढे काय ?
राजे
राजे
तुम्ही शेअर बाजारा पेक्षा जास्त ताण देत आहात; काळ्जी वाटते
नाना