मागच्या वर्षी याच दिवशी रात्री ८ वाजता एका तेज:पुंज व्यक्तिमत्वाकडून एक सुप्रसिद्ध घोषणा झाली..."आज रात १२ बजहसे......."
पाहता पाहता एक वर्ष उलटून गेलं ह्या घोषणेला, २२ तारखेच्या थाळीबजाव जनता कर्फ्युनंतर दोनच दिवसांनी मा. पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला जो आजही जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन समजला जातो. सुरुवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर कितीवेळा त्याची मुदत वाढवली गेली हे आता सांगता येणे कठीण आहे. आजही तेव्हाचे दिवस अगदी लख्खपणे आठवतात. वर्क फ्रॉम होम, मोकळेढाकळे रस्ते, चित्रविचित्र पक्षी दिसणे आणि त्यांची वाढलेली किलबिल, घरातच वेगवेगळे पदार्थ स्वतः बनवून खाणे, डालगोना कॉफी, ऑनलाईन बुद्धिबळं, ग्रुप व्हिडिओ कॉल्स आणि अजून कित्येक. ह्या सगळ्या दिवसांचा लेखाजोगा मिपावर आला नसता तर नवलच.
सुरुवातीला केवळ लॉकडाउनच्या दिवसांत तुम्ही काय काय केलंत इतक्या साध्याश्या लेखाने सुरु झालेली हे लेखन एका विस्तृत लेखमालिकेचे स्वरुप धारण करेल असं कुणाला वाटलेलंही नव्हतं. नोकरदार, डॉक्टर, प्राध्यापक, कारखानदार, व्यावसायिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिपाकरांनी आपली लॉकडाऊन विषयक मनोगतं मिपावर मांडली. अनेक उत्तमोत्तम लेख आले. कुठलेही नियोजन न करता सुरु झालेली ही लेखमालिका मिपाकरांनी उत्स्फूर्तपणे पुढे नेली. जवळपास चाळीस दिवस ही लेखमालिका मिपावर रोज सुरु होती. अनेक नव्या, जुन्या मिपाकरांनी ह्या लेखमालिकेत सहभाग घेतला.
लॉकडाऊनच्या दिवसातील मिपावर झालेले हे दस्तऐवजीकरण हे अमूल्य आहे. कालौघात हे लेख कुठे विरुन जाऊ नयेत, म्हणून त्यांचे एकाच धाग्यात संकलन असावे असे वाटल्यामुळे हे सर्व धागे मी संकलित करुन आपल्यासमोर मांडत आहे.
१.
लॉकडाऊन : पहिला दिवस-----प्रशांत
२.
लॉकडाउनः दुसरा दिवस -----प्रचेतस
३.
लॉकडाऊन: तिसरा दिवस----गवि
४.
लाॅकडाऊन : चाैथा दिवस----गणपा
५.
लॉकडाऊन: पाचवा दिवस-----किसन शिंदे
६.
लॉकडाऊन: सहावा दिवस----मोदक
७.
लॉकडाऊन : सातवा दिवस----सस्नेह
८.
लॉकडाऊन : आठवा दिवस----दाते प्रसाद
९.
लॉकडाऊन: नववा दिवस-----सतिश गावडे
१०.
लॉकडाऊन : दहावा दिवस----प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
११.
लॉकडाऊन : अकरावा दिवस-----चौकटराजा
१२.
लॉकडाऊन:- बारावा दिवस----अत्रुप्त आत्मा
१३.
लॉकडाऊन : तेरावा दिवस-----गुल्लू दादा
१४.
लॉकडाऊन : चौदावा दिवस-----ज्याक ऑफ ऑल
१५.
लॉकडाऊन : पंधरावा दिवस-----कुमार१
१६.
लॉकडाऊन : सोळावा दिवस-----मी-दिपाली
१७.
लॉकडाऊन: सतरावा दिवस लॉकडाऊन: अठरावा दिवस----अमोल गवळी
१९.
लॉकडाऊन: एकोणीसावा दिवस-----कंजूस
२०.
लॉकडाऊन : विसावा दिवस-----सौंदाळा
२१.
लॉकडाऊन: एकविसावा दिवस-----श्रीरंग_जोशी
२२.
लॉकडाऊन: बाविसावा दिवस-----जोजो
२३.
लॉकडाऊन: तेविसावा दिवस -----वामन देशमुख
२४.
लॉकडाऊन: चोविसावा दिवस-----चौकस२१२
२५.
लॉकडाऊन: पंचविसावा दिवस-----इरसाल कार्टं
२६.
लॉकडाऊन: सव्वीसावा दिवस------ज्योति अळवणी
२७.
लॉकडाऊन: सत्ताविसावा दिवस----अजित पाटील
२८.
लॉकडाऊन: अठ्ठाविसावा दिवस---- चिमी
२९.
लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस-----माझीही शॅम्पेन
३०.
लॉकडाऊन: तिसावा दिवस----सान्वी
३१.
लॉकडाऊन: एकतिसावा दिवस-----ज्ञानोबाचे पैजार
३२.
लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस------टर्मीनेटर
३३.
लॉकडाऊनः तेहेतिसावा दिवस----गणेशा
३४.
लॉकडाऊनः चौतिसावा दिवस----पिंगू
३५.
लॉकडाऊनः पस्तिसावा दिवस-----गणामास्तर
३६.
लॉकडाऊन : छत्तीसावा दिवस----गवि
३७.
लाॅकडाऊन: सदतिसावा दिवस-----मी-दिपाली
३८.
लाॅकडाऊन: अडतिसावा दिवस-----किसन शिंदे
३९.
लॉकडाऊन : एकोणचाळीसावा दिवस-----आजी
४०.
लॉकडाऊन: चाळीसावा दिवस------नीलकांत
उत्तम केले. धन्यवाद..