लॉकडाऊनचा सहावा दिवस.. (मुद्दाम करोनाबद्दल कांहीही लिहिणार नाहीये - सगळीकडून माहितीचा ओघ सुरू आहेच.)
वर्क फ्रॉम होम हे नित्याचेच असल्याने सध्या घरी असल्याने निवांत आहे.. रिकामा वेळ आहे.. वेळ जातच नाहीये असे प्रश्न सुदैवाने पडलेले नाहीयेत आणि हे प्रश्न पडू नयेत याची काळजी ऑफिसवाले घेत आहेतच. तरीही प्रवासाचा वेळ वाचत असल्याने जो रिकामा वेळ मिळतो आहे त्याचा सदुपयोग करूया आणि नवीन कांहीतरी शिकूया म्हणून किचनमध्ये लुडबूड करून नेहमी न बनवल्या जाणार्या पाककृतींवर हात साफ करायला सुरूवात केली आहे.
लॉकडाऊन मध्ये शिकलेल्या पाककृती.
भाजीचे लोणचे..
सर्वात महत्वाचे - जर ४ लोकांसाठी लोणचे बनवणार असलात तर फोडणी सोडून इतर सर्व साहित्य ५ लोकंच्या प्रमाणात घ्या.
साहित्य -
फ्लॉवर आणि गाजर - लहान चौकोनी आकारात कापून
बेडेकर / केप्रं कैरी लोणचे मसाला
दोन - तीन लिंबू
तिखट
हिंग, जिरे, हळद आणि मोहरीची फोडणी - गार करून
..और नमक स्वादानुसार.
१) फ्लॉवर आणि गाजर लहान लहान कापून घ्या - हे कंटाळावाणे काम असू शकते.. पण स्टेटस अपडेटवाले ऑफिस कॉल्स आणि मिटींग्ज वगैरे आणखी कंटाळवाण्या गोष्टी सुरू असताना हे काम करा. (रिमेंबर.. लोहा लोहे को काटता है..!)
२) त्यात मटार मिसळा - व्यवस्थीत मिसळून घ्या.
३) त्यात प्रमाणानुसार कैरी लोणचे मसाला, मीठ आणि तिखट घाला, लिंबू पिळा व पुन्हा व्यवस्थीत मिसळून घ्या.
४) थोडा वेळ हे मिश्रण तसेच ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि लिंबाच्या रसामुळे सगळे मिश्रण छान रसरशीत होईल.
(असे रॉ फ्लेवरचे लोणचे चव बघण्यातच थोडे संपेल - काळजी करू नका, त्यासाठी सुरूवातीला प्रमाण जास्ती दिले आहे.)
सर्वात शेवटी गार केलेली फोडणी मिसळा व फ्रिजमध्ये रात्रभर ठेऊन द्या. सकाळी पोहे, चिवडा, शिरा, उपीट असे जे असतील त्या पदार्थांसोबत लोणच्याचा डबा रिकामा होण्यास सुरूवात होईल.
(शेफ केडीने मी काढलेल्या फोटोंवर अप्रतीम संस्करण केले आहे)
*********************************
१) तुम्ही या लॉकडाऊन मध्ये नवीन काय शिकणार आहात..? पाककृती.. एखादे नवीन अॅप्लिकेशन.. काहीही असेल ते इथे द्या. बाकीच्यांना कळूद्या म्हणजे स्वतःवरती एक बंधन येते.
२) सिनीयर सिटीझन आणि लहान मुले यांना शक्यतो घरातच थांबूद्या. आपल्या आजूबाजूला कोणी सिनीयर सिटीझन असतील तर त्यांना काय हवे नको ते आवर्जून विचारा. आपल्या घराजवळ कोणी मित्रमंडळ असेल तर त्यांनाही न विसरता फोन करा.. आपण २ लिटर दूध घेत असताना त्याच्यासाठी एखादा लिटर दूध आपल्या पिशवीला नक्कीच जड होणार नाही.
३) सिनीयर सिटीझननी मार्केट / बँकेत बाहेर कुठेही फालतू कामाकरता जाणे टाळा.. वेळ आहे म्हणून पासबुक प्रिंट करणार्यासाठी बँकेत फिरायला गेलेल्या आणि तिथे वचावचा भांडणार्या वयस्कर काकांचा व्हिडीओ बघितला असेलच. ३ दिवसांपूर्वी मी रिलायन्सच्या फ्रेशच्या लाईन मध्ये उभा होतो तेंव्हा एक असेच आजोबा नंबर लवकर येत नाही म्हणून सिक्युरिटी गार्डसोबत वाद घालत होते - या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का याचा विचार करा.
४) करोना या एकाच विषयावर सतत चर्चा करणार्या ग्रुपमध्ये स्पष्ट सांगा की "आता विषय बदला" सगळीकडून तीच ती माहिती आपल्याकडे येत असल्याने आधीच आलेल्या तणावामध्ये अधिक भर नको.
स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या.. सुरक्षित रहा.. आणि छान वेळ जाईल असे कांहीतरी नवीन शोधून त्यात मन रमवा..!!
धन्यवाद - मोदक.
वाचने
17751
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त पाकृ...
छान झाले असावे भाजांचे लोणचे.
अजून एक.. वल्ली किंवा प्राडॉ सांगु शकतात...
या विषयातले तज्ञ
In reply to अजून एक.. वल्ली किंवा प्राडॉ सांगु शकतात... by ज्ञानोबाचे पैजार
खेळत राहा भो.
In reply to या विषयातले तज्ञ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं तर व्हायला नको. झालंच तर
In reply to अजून एक.. वल्ली किंवा प्राडॉ सांगु शकतात... by ज्ञानोबाचे पैजार
*भाज्यांचे**
पहिल्या छूट सांगतो की...
आता बघा हो डीबी... लिंका
In reply to पहिल्या छूट सांगतो की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Yes
In reply to आता बघा हो डीबी... लिंका by मोदक
व्वा...!
धन्यवाद वल्ली.!!
In reply to व्वा...! by प्रचेतस
घरून ..... ?
In reply to व्वा...! by प्रचेतस
ते गंडवतेत लोकांना
In reply to घरून ..... ? by चौकटराजा
=))
In reply to ते गंडवतेत लोकांना by सतिश गावडे
दिसले. कलर भारी आलाय त्याचे
साडे अकरा पर्यन्त
रव्याचा चीक?????
In reply to साडे अकरा पर्यन्त by चौकटराजा
रेसिपी
In reply to रव्याचा चीक????? by विजुभाऊ
चिकवड्याचा कच्चा माल म्हणजे
In reply to रेसिपी by चौकटराजा
लोणचं
उत्तम विषय काढलास मोदका.
खालील प्रमाणे
मस्तच !
In reply to खालील प्रमाणे by चौकटराजा
कोरोनाची सुट्टी करणी लावायची
माझे आवडते लोणचे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारण भेषजात्। नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।ऑं ?
पुण्याई कामास येते हो.. ;)
In reply to ऑं ? by सस्नेह
लाॅक डाउन असून पुर्ण वेळ
पावनं.. तुम्ही पोलीस, फायर
In reply to लाॅक डाउन असून पुर्ण वेळ by mahayog
महसूल
In reply to पावनं.. तुम्ही पोलीस, फायर by मोदक
लोणचं....
हे करोनाचे संकट संपूदे...
In reply to लोणचं.... by Nitin Palkar
वाह!
मुद्दाम करोनाबद्दल कांहीही