लॉक---डाऊन!
खरंच आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल अस म्हटलं तर अभूतपूर्व म्हटलं तर चिंताजनक जीवन सध्या आपण जगत आहोत. अर्थात मला ह्यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण पौरोहित्यात चांगले एक एक दोन दोन महिने मोकळे दरवर्षी येतात. पण तरीही इतर गोष्टींसाठी मेंदू मोकळा असतो,तो आता नाही हे मात्र खरं ! रोजचं आयुष्य घरात परिपूर्ण वेळ देता येत नसे,तो आता देता यायला लागला(च) आहे. त्यातूनही माझ्या मुलाला (वय वर्षे 3) माझ्याबरोबर धुडगूस घालायला भारी आवडतो तो त्याला आता पूर्ण मिळतो आहे,म्हणून तो मेंदूने होम क्वॉरनटाईन होण्यापासून बराचसा बचावलेला आहे. नाही म्हणायला त्याला एकट्याला खेळून खेळून कंटाळा आला की मग मला येऊन ढुश्या मारत खेळण्यासाठी उकसावतो.
शिवाय ब्याचलर लाईफ जगताना स्वयंपाक व घरकामादी हरकाम करत होतो त्याचा सौला आत्ता फायदा होतो आहे. म्हणजे कांदा टोमॅटो भाज्या इत्यादी (तिला हव्या तश्या!) चिरून देणे.धान्य निवडकाम,शेंगदाणे ,रवा इत्यादी भाजणे. स्वच्छता करत राहणे. बालकास अं-घोळ-घालणे. खायला देणे, गाई गाई करवणे. ह्यात दिवस सहज निघून जातो. तिच्यावरचा ताण कमी झाल्यानी ती बहुशः सुखावली असावी असा माझा आपला (एक) अंदाज!
पौरोहित्याची पुढील बरीचशी कामं रद्द झालेली असली तरी काही ऑन लाईन चालू आहेत पण अगदी कमी.
मला मुख्य अनुभव लिहायचाय तो माझ्या आपोआप (म्हणजे मी कुठलेच कष्ट न घेता!) बदललेल्या सवयींचा! पहिली गोष्ट म्हणजे पान, सुपारी इत्यादी गोष्टी मिळत नसल्यामुळे बंद झाल्या. गायछाप काल रात्रीपासून बंद राहिली आहे.. ते हळूच मिळणाऱ्या दुकानवाल्याकडला माल काल सकाळीच संपला आहे. व आता आमच्या अखिल परिसरात अन्यत्र तो कुठेही मिळत नाही. पान सुपारी बंद झाल्याने मला होत असलेले शाररीक व मानसिक त्रास सम्पले. अर्धी लढाई शत्रू नसल्याने जिंकलीं. अर्धी किंवा पुढे शिल्लक असलेली मलाच प्रयत्न पूर्वक जिंकावि लागणार आहे. अर्थात स्वतःच्या व्यसनी मनासमोर शरणागती देऊन ! त्यासाठी समुपदेशनाची मदत दिनांक 24 पासून सुरू ठेवली आहे. मला आता या अपघातानी थांबलेल्या व्यसनामुळे स्वतःतला नाकर्तेपणा जाणवू लागलेला आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे. आणि मुख्य म्हणजे जगलो वाचलो (या कोरोनारूपी संकटातून) तर पुन्हा या तंबाखू पान कुळातील एकाही गोष्टीला मन बळी न पडू द्यायची तयारी करत रहायची आहे.
दुसरा अनुभव आहे साखर थांबल्याचा. डायबेटीसची अंधुक शक्यता 4महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्याचा तेंव्हापासून परिणाम इतकाच झाला होता की गोड पदार्थ खाण कमी झालं होतं. पण लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी एक निमित्त घडलं. मी एकदम किराणा उचलायचा म्हणून जवळच्या दुकानात गेलो. वेटिंग होतं म्हणून बसलो पण लोक जवळ जवळ येऊ लागले म्हणून बाहेर उन्हात खुर्ची टाकली व चांगला 15/20 मिनिट बसून राहिलो.. 12ची वेळ होती. चटका बसत होता,पण मनात येत होतं, एक जण चिकटलाय मगाशी असलाच कोरोनावाला तर आत्ता उन्हात-बसल्यानी आपल्याला फायद्यात जाईल. (कोरोनाविषयक तयार झालेल्या दिव्य ज्ञानाचा परिणाम! ;) ) झालं इतकंच की मला घरी आल्यावर दुपारहुन ताप सुरू झाल्याची जाणीव झाली.तो उन्हात बसल्यानीच आलेला आहे हे कळत होतं,पण तरीही मन घाबरल. दुसऱ्याच दिवशी सरकारी दवाखान्यात औषध घेतलं. त्या डॉक्टरांनी मला 'हे नॉर्मल आहे' वगैरे समजावलं. पण आम्हा एडीक्ट व्यक्तींचे शंकासूर साधे नसतात. मी पुढे 3 दिवस घरात बाजूला बसलो. मुलाला जवळ येऊ देईना . मन खिन्न करवून घेतलेलं. ताप खोकला वगैरे दुसर्याच दिवशी गायब झालं, पण मन मात्र 105 डिग्री धरून बसलेलं. त्यात मग तरतरी यायला ors घे. सरबत पी. असले प्रकार सुरू झाले .. व टेन्शन आणि ors , सरबत यांनी पोटात गेलेली जादा साखर यांनी खेळ केला. चक्कर येते ,हलकं वाटतय.. अस बोलू लागलो. ही तर वैतागली,थोडी घाबरलीही! मग मी पुढे 2 दिवस अजिबात गोड काहीही पोटात जाऊ दिल नाही. व शरीर एकदम रिफ्रेश झालं. त्यानन्तर आज आत्ता पर्यंत एकदम नॉर्मल आहे.
भय आणि नकारात्मकता एकत्र आली तर काय घडू शकतं? हे या कोरोना टेंशनीच शिकवलंय.
म्हणूनच मन आता म्हणतंय, "झालाच कोरोना तर को? रोना? अब सर्फ डरो ना... फिर जरूर भाग जाएगा कोरोना!
-----------------------------------------------------------------
वाचने
33166
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरुजी नमस्ते।
मीपण घाबल्ले !
In reply to गुरुजी नमस्ते। by कंजूस
बुवा.. छान लेख. आपत्तीतूनही
hydroxychloroquine हे औषध
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye@ मदनबाण,
@Hydroxychloroquine चा
In reply to @ मदनबाण, by हेमंतकुमार
१. सध्या जवळपास एक डझन
In reply to @ मदनबाण, by हेमंतकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liyeगुरुजी
छान.
मन शंकासुर असतेच...
सही लिहिलंत अतृप्त आत्मा !
काळजी घ्या भो बुवा, मुख्य
ठीक आहे.
In reply to काळजी घ्या भो बुवा, मुख्य by प्रचेतस
दिवेलागणीला :)
In reply to ठीक आहे. by शाम भागवत
सहमत सुद्धा म्हणनार नै.
In reply to काळजी घ्या भो बुवा, मुख्य by प्रचेतस
मोबाईल चा लाईट लावा सर तुम्ही
In reply to सहमत सुद्धा म्हणनार नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to मोबाईल चा लाईट लावा सर तुम्ही by सस्नेह
जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर
In reply to काळजी घ्या भो बुवा, मुख्य by प्रचेतस
नाही हो, आम्ही लोकसत्ता फक्त
In reply to जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर by मोदक
असे वाटले की तुम्ही लोकसत्ता
In reply to जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर by मोदक
मिसळचुकलो गुर्जींची आवडती शाबुदाणा खिचडी देण्यात येईल.कंजूस काका... पत्ता द्या. :D
In reply to असे वाटले की तुम्ही लोकसत्ता by कंजूस
पाहिजे तर..
In reply to काळजी घ्या भो बुवा, मुख्य by प्रचेतस
Antigravity Exercises
वाह्यात प्रतिसाद
In reply to Antigravity Exercises by बबु
गुरुजी आजचा दिवस तुमच्या
(No subject)
In reply to गुरुजी आजचा दिवस तुमच्या by कंजूस
करुणाला हसून स्वागत?!!
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
व्यसन मुक्ती
अंधकार
चौकसजी,
In reply to अंधकार by चौकस२१२
तुम्ही आम्हाला मोदी विरोधक
In reply to चौकसजी, by शाम भागवत
म्हणा की.
In reply to तुम्ही आम्हाला मोदी विरोधक by प्रचेतस
इथे कोण कोणाचा भक्त
खिल्ली कुठं उडवली गेली? जे
In reply to इथे कोण कोणाचा भक्त by चौकस२१२
बचावासाठी नाही
In reply to खिल्ली कुठं उडवली गेली? जे by प्रचेतस
ओक्के, हरकत नाही.
In reply to बचावासाठी नाही by चौकस२१२
+१
In reply to खिल्ली कुठं उडवली गेली? जे by प्रचेतस
याच कारणासाठी मी मोदींवर
खरं आहे.
In reply to याच कारणासाठी मी मोदींवर by कंजूस
असं नै करायचं.
In reply to खरं आहे. by शाम भागवत
हेच म्हणतो.
In reply to असं नै करायचं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण आपण बोलणे आणि प्रसिद्ध
In reply to असं नै करायचं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही बोललो की वाईट वाटतं.
In reply to पण आपण बोलणे आणि प्रसिद्ध by कंजूस
आपलं बोलणं आवडत नाही लोकांना.
In reply to आम्ही बोललो की वाईट वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच्या धाग्यानिमित्त....
अभिनंद्न.
In reply to आजच्या धाग्यानिमित्त.... by चांदणे संदीप
गेम मस्त झाला. सुरुवातीच्या
In reply to आजच्या धाग्यानिमित्त.... by चांदणे संदीप
सरांबरोबर एक मॅच झाली, सर
लैच वाईट वाटतंय.
In reply to सरांबरोबर एक मॅच झाली, सर by प्रचेतस
अगदी अगदी. तासभर विश्रांती २४
In reply to लैच वाईट वाटतंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटलं की, फक्त ९
In reply to लैच वाईट वाटतंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तंबाखू सुटतो
बाकी संध्याकाळी टेरेसवर
१२ दिवस संपले. ०९ राहीले.
आज
(No subject)
In reply to आज by चौकटराजा
अरे, हळू. खिचडी दूध सांडेल ना
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
हे आलंय कायप्पावर.
चांगली आहे माहिती, घरात
In reply to हे आलंय कायप्पावर. by शाम भागवत
दिवे बंद करायच्या प्रकरणाला
पाकिस्तान व चीन घरातले
In reply to दिवे बंद करायच्या प्रकरणाला by शाम भागवत
चीन ने त्यांच्या परम प्रिय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liyeत्यात काही प्रॉब्लेम
In reply to चीन ने त्यांच्या परम प्रिय by मदनबाण
मध्यमवर्गीय माणसाच्या मनाची
__/\__
In reply to मध्यमवर्गीय माणसाच्या मनाची by गणेशा