Skip to main content

दिवाळी २०११

परत दिवाळी येणार...

लेखक दादा कोंडके यांनी बुधवार, 26/10/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
परत दिवाळी येणार. लोकं "महागाई किती वाढली आहे!" म्हणणार आणि लक्ष्मीरोडवर खरेदीसाठी झुंबड उडवणार. परत "हॅप्पी डिवाली" वगैरेचे मेसेजेस मिळणार, मी मग ह्याचे त्याला, त्याचे ह्याला असं करून ते परत करणार. आयटी मधलं पब्लिक चितळे मधुन तयार फराळ आणणार आणि चॅटींग करताना किल्ला, घरकुल, न-उडलेल्या फटाक्यातली दारु काढुन उडवण्याचा आठवणींबद्द्ल भरभरुन बोलणार. "बाहेर" असलेले जास्तच नॉस्टॅल्जीक होणार. मी पण, ह्यावेळी घरापासुन लांब आहोत पण 'आकाशदिवा तरी घरीच करुन लावायचा' असं ठरवणार पण परत न-करायला काहितरी निमित्त सापडणार. मागच्या वर्षीपेक्षा एक्-दोन ऑनलाईन दिवाळीअंक जास्त निघणार.

दिपावली २०११ : आवाहन.

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो! दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्‍यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्‍या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल.

दिपावली विशेष !!!

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता.