Skip to main content

कला

अवती भवती तरंगे.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 25/10/2022 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ. रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ. संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे? उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल. छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.

अनिरुध रविचंदर - वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 17/10/2022 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
तरुणाईला भुरळ घालणारे संगीत देणार्‍या संगीतकार अनिरुध रविचंदर उर्फ 'अनिरुध' याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. कोण हा अनिरुध? ते इथं वाचा.

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/09/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

लेखक Trump यांनी गुरुवार, 22/09/2022 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 30/08/2022 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता.

कला - चित्रकला प्रदर्शने

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 29/08/2022 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की ! अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे. सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.

लाल सिंग चढ्ढा

लेखक सोत्रि यांनी रविवार, 14/08/2022 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.

अतिरंजित Sarcasm उर्फ Asterix: The Mansions of the Gods

लेखक शेर भाई यांनी मंगळवार, 19/07/2022 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मा‍झ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर मा‍झ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे. याच स्टार मुव्हीज वर मला पहिल्यांदा ते दोघ भेटले.

रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा

लेखक साहना यांनी रविवार, 01/05/2022 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा काहींना पर्वत आवडतात, तर काहींना नदीकिनारा, काहींना फेसाळणार्या अथांग सागराचे प्रेम असते तर विलक्षण भव्य मानवनिर्मित गोष्टींचे. मला मात्र लहानपणापासून वाळवंट खूपच आवडत आले आहे. आणि ते सुद्धा सौदी अरेबियन किंवा आपल्या राजस्थानी पद्धतीचे वाळूचे नाही तर कोलोरॅडो किंवा मोहावे वाळवंटाचे प्रेम. डोंगर, नदी, समुद्र ह्यांत सजीवता असते, एक गतिशीलता असते. इथे जीव आहे, इथे काळ ह्या प्रकाराला महत्व आहे. समुद्राची प्रत्येक लाट आपल्यासोबत काळ कसा निघून जात आहे ह्याची जाणीव घेऊन येते. पण वाळवंटाचे तसे नाही. इथे काळ जणू थांबलेला असतो. ह्यांत एक गूढ आहे.