कला

काय पाठवू पोस्ट?

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 Mar 2021 - 2:30 am

(WA ग्रुपस वर incompatible ठरलेला
हताश उत्साही)

काय पाठवू पोस्ट?
काय आठवू गोष्ट?

राजकारण, तुम्हाला सोसत नाही
कविता ...तुम्हाला पोचत नाही
स्पोर्टस् न्यूज, तुम्हाला सवडच नाही
सायंस न्यूज, तुम्हाला आवडत नाही

गाणी, तुम्हाला भावत नाही
इतिहास, तुम्हाला मावत नाही
आरोग्य dieting, पायी चुरडता
रेसीपी नवी,तुम्ही नाकं मुरडता

प्रवास व्लाॅग, तुम्ही थांबू या नेता
प्रेरणादायी कथा, तुम्ही जांभया देता
गार्डनींग, तुम्हा कंटाळा येतो
शेती,म्हणता का शाळा घेतो

कला

ट्राईब्स ऑफ युरोपा : नेटफ्लिक्स

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 3:12 pm

गेम ऑफ थ्रोन्स, वॉकिंग डेड इत्यादींच्या अभूतपूर्व यशानंतर अनेकांनी ह्या प्रकारचा मसाला टाकून विविध सिरीस निर्माण केल्या. १०० काय, बेडलँड्स काय, एक्सपांस अनेक ठराविक साच्यातील साय फाय किंवा फँटसी सिरीयल ची चलती आहे.

कलासमीक्षा

सकरपंच : रिव्यू

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
5 Feb 2021 - 2:27 pm

एक काळ असा होता जेंव्हा स्त्रियांची भूमिका चित्रपटांत फक्त रडकी माँ नाहीतर अबला स्त्री हीच होती. चुकून कधी चांगली स्त्रीभूमिका यायची. माझ्या मते हॉलिवूड मध्ये स्त्रीभूमिका जास्त मूर्खपणाच्या असायच्या. मग काळ बदलला आणि स्त्री ला मध्यभागी ठेवून चित्रपट बनू लागले. पण माझ्या मते ह्या चित्रपटांत सुद्धा एक महत्वाचा दोष होता. ह्या चित्रपटांत सुद्धा स्त्री तोटके कपडे घालून त्याच गोष्टी करायची ज्या एक पुरुष साधे कपडे घालून करायचा. म्हणजे वॉरियर प्रिन्सेस झीना प्रमाणे युद्ध, उड्या मारणे गोळ्या झाडणे आणि ते सुद्धा स्टिलेटो घालून इत्यादी.

कलाआस्वाद

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
31 Jan 2021 - 4:38 pm

aa

श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर.

मांडणीकलाइतिहासस्थिरचित्रप्रतिसादसमीक्षाविरंगुळा

कलापंढरी फ्लॉरेन्स

Rahul Hande's picture
Rahul Hande in जनातलं, मनातलं
26 Dec 2020 - 9:21 pm

७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.

कलालेख

"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in जनातलं, मनातलं
19 Dec 2020 - 10:16 pm

साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता.

कलालेख

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
18 Dec 2020 - 5:41 am

सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल.

YouTube: https://panipat-signup.web.app/live
Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE
Twitter: https://twitter.com/BhandarkarI

संस्कृतीकलाइतिहासप्रकटन

रॉकस्टार

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 10:06 pm

मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

संस्कृतीकलानाट्यसंगीतजीवनमानआस्वादविरंगुळा