मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला - चित्रकला प्रदर्शने

चौथा कोनाडा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की ! अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे. सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे. गणेशोत्सव २०२२ निमित्त "माझा बाप्पा" हे कलाकृतींचे प्रदर्शन आयोजक : संस्कार भारती, पिंपरी चिंचवड कालावधी : ३० ऑगस्ट २०२२ (मंगळवार) ते ११ सप्टेंबर २०२२ (रविवार) साप्ताहिक सुट्टी - सोमवार वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ पर्यन्त स्थळ : पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव (कलादालन गाडगीळ शोरूमच्या आतल्या बाजूसच आहे, काउंटरवर चौकशी करणे) प्रदर्शनात सुंदर सुंदर कलाकृती असणार आहेत, तरी रसिकांनी प्रदर्शनाचा जरुर आस्वाद घ्यावा ! PNGAE2354 या धाग्यावर इतर सांस्कृतिक कार्यक्रम उदा: नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, हस्त-शिल्प-चित्र अशा विविध कलांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके, मैफिली, बैठकी इ संबधी कार्यक्रम यांची माहिती मिपाकरांनी जरूर द्यावी म्हणजे कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल. (मिपाकरांच्या सुचवणी नुसार धाग्याचे योग्य ते नाव बदण्याचा मानस आहे)

वाचन 6992 प्रतिक्रिया 0