सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms
उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे. त्यांना कायदा कळतो की नाही, असाच प्रश्न पडतो. शिवसेनेत हुकूमशाही आहे म्हणून देशात किंवा राज्यातही हुकूमशाही आहे, असा उद्धव यांचा समज झालेला दिसतो. परंतु देशात अजूनही लोकशाही व्यवस्था चांगल्या पद्धतीने नांदते आहे, हे कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. इथे हजारेंच्या खूनाची सुपारी देणाऱ्याची बाजू घेत नाही. परंतु आमचे सरकार आले म्हणजे एखाद्याला फाशी दिली जाईल, हे विधान निश्चित कायद्याला धरून नाही. फाशीचा निर्णय हा न्यायालयाचा अधिकार आहे. तो अधिकार न्यायालयाने अजून तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही. त्यामुळे असे विधान करणे अर्धवटपणाचे तर आहेच; परंतु ते जनतेची दिशाभूल करणारेही आहे. उद्धव ठाकरे उद्या उठतील आणि युती शासन सत्तेवर आल्यास नारायण राणे आणि राज ठाकरे यांना फाशी देण्यात येईल, असेही म्हणतील! कारण जे विरोधात बोलतात, ते शिवसेनेला जगाचे शत्रू वाटतात...
लाज बाळगा!
भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या या महात्म्याचा आता शिवसेनेला पुळका आला आहे. पण 1998 मध्ये याच शिवसेना-भाजप सरकारने हजारेंना तुरुंगात टाकले होते. त्यावेळी अण्णांचे मोल त्यांना कळले नव्हते का? आता निवडणुकीसाठी मुद्दा मिळाला शिवसेना तो "कॅश' करीत आहे. याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते. त्यांनी बाळासाहेबांच्या तोंडाला हात का लावला नाही? आता पोकळ बाता मारून काय उपयोग?...
वाचने
4247
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
शम्भर टक्के सहमत
असो.
In reply to शम्भर टक्के सहमत by उनाड
बाळासाहेब राजच्या घरी
In reply to असो. by अनंता
एका
In reply to बाळासाहेब राजच्या घरी by घोडीवाले वैद्य
टीका
In reply to असो. by अनंता
चुकिचि
नाही नाही.
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
आता
In reply to नाही नाही. by नितिन थत्ते
मागचे काही
In reply to आता by टारझन
वाकड्या 'तोंडा'चा
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
बबनराव घोलप
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
मी जर
मी जर,
In reply to मी जर by टारझन
फाशीचा
शिवसेना,
या असल्या
बेजबाबदारपणा
इतका
चर्चा हीच आंदोलनाची नांदी
In reply to इतका by सँडी
"बाल"बुद्धी
राजकिय व्यवहार कुशलता असावी
च्यायला
In reply to राजकिय व्यवहार कुशलता असावी by आम्हाघरीधन
बालिश बहु