यू सेड इट!
अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! Smile तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे..
विरोधकांना अशाच प्रकारे संदीप देवकुळे गप्प करतो. त्याच ब्रीदच आहे "खोट्याने होत आहे रे .....". त्याच्या पाताळयंत्रीपणाची कमाल आहे. असो.
मंडळाच्या संकेतस्थळाच मराठीकरण करायच ही कल्पना २००१ सालीच मांडली गेली होती. आम्ही त्यावर कामही करत होतो. पण ज्यांना मराठीतले ओ की ठो ही कळत नाही त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून ते काम बंद पाडले. त्या नंतर २००६ साली देखील त्या वेळेच्या अध्यक्षांनी त्यावेळेस स्वतः त्यावर काम करायला सुरूवात केली होती परंतू त्यानंतर मंडळात चार लोकांनी जे काही राजकारण केले आणि अध्यक्षांनाच अवैधरितीने रातोरात बाजूला केले.
निलकांत रावांना त्यांच्या कौशल्यामुळे हे काम मिळाले असते तर त्याचा मलाही खुप आनंद झाला असता, पण दुर्दैवाने तसे नसून हे एक गाजर दाखवले आहे. तेव्हा "जागा हो राजा..."
बाकी कुलकर्णींच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया मी लवकरच टाकीन.
मुक्ता
अरेरे. त्यात्या तुम्हाला कोणीतरी बनवले वा तुम्ही इथल्या लोकांना बनवत आहात. :)
http://www.sfsahityasammelan.org/mr/ ही साहीत्य संमेलनाची साईट आहे. आणि ती गेल्या ६ महिन्यांपासून व्यवस्तिथ कार्यरत आहे.
आता अदुगरच काही लोकांनी "संकेत" देउन नीलकांतच "स्थळ" पक्क केल्याचा संशय मला येतोय. सावध रे ! अंगाव त्येच बील टाकून तुझा बीलकांत व्हायचा.
प्रकाश घाटपांडे
मला वाटते तात्याला मराठी संकेतस्थळाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे आमिष दाखवून देवकुळे साहेब तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते. पण तात्या संकेतस्थळे स्वतः तयार करत नाही हे बघून देवकुळे साहेबानी पळ काढला. आता साहेब दुसरा कुठला तरी मार्ग शोधत असतील तात्याला पटवायचा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते.
तात्या असल्या आमिषाने सूर बदलणार होय?? @)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
तात्या
जरा सांभाळुन म्हणतो मी. हे लेखक , वगैरे मंडळी सगळं काम करुन घेतिल अन पैसे मात्र स्वतहा ठेवुन घेतिल ..
फुकटे तर आहेतच, आणि मध्यंतरी मटा ला पण आलं होतं रेसिशन मुळे जरा जड जातंय हे सगळं संभाळणं,अशी प्रतिक्रिया दिली होती देवकुळँनी..
मित्रहो,
वेब साईट तर आधिचीच तयार आहे.
http://www.sfsahityasammelan.org/mr/
तात्यांनी सर्वान्ची फिरकी घेतली. सहिच आहे वेबसाईट आणि फिरकी सुद्धा. :)
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
तात्यानू, वायच शंका इली...
कांताशेट बनवतले ती नवीन, तं मं ह्या कोंचा?
http://www.sfsahityasammelan.org/mr/
काय ह्याच कांताशेटनी बनवलिला हा?
माका काय? वाटला काय चल!
प्रतिक्रिया
जाग हो राजा ...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अरे वा!
अरे
हार्दिक अभिनंदन
बनवाबनवी
परंतु
इतरत्र दखल.
बीलकांत
मला वाटते
आमिष?
तात्या जरा
http://www.sfsahityasammelan.org/mr/
तात्यानू,
हाँ...