Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ). २. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ). ३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित) ४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री) ५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ). ६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी) ७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ). ८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा). ९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित). …………………………………. नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 61434
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

एक गंमत खेळ. प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे एखादे वाक्य तयार करायचे आहे. या वाक्याचे वैशिष्ट्य असे आहे: वाक्यातील पहिला शब्द हा एकाक्षरी असेल. यानंतरचा प्रत्येक पुढचा शब्द फक्त एकेक अक्षराने वाढत जाईल. उदाहरणार्थ, ‘मी तुला पाहिले(१,२, ३) अशा प्रकारचे जास्तीत जास्त लांबीचे अर्थपूर्ण वाक्य तयार करा. केव्हाही तुमच्या सवडीने लिहा. जेव्हा आपले वाक्य लिहायला याल, तेव्हा ते त्याआधी कुणी लिहिलेल्या वाक्याइतके तरी लांब असावे किंवा किमान एका शब्दाने अधिक. आपापले वाक्य स्वतंत्रपणे करा. तुम्ही करा सुरवात ४ शब्दांच्या ((१, २, ३, ४) अशा तुमच्या स्वतंत्र वाक्याने.... प्रत्येकाचे वाक्य वेगळे चालेल. आधीचे पुढे खेचायची गरज नाही.

In reply to by हेमंतकुमार

तू आज जास्तच जेवलास मी त्याला इप्सीत जागेवर पोहोचवले ई! किती गलिच्छ बोलतोस अक्कलशुन्य गाढवाच्यालेका पैजारबुवा,

ज्ञा पै . छान. आता पुढेचे येउद्या ६ शब्दी .

छान ! आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे. वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.

छान ! आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे. वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम व प्रश्नचिन्ह सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.

हे घ्या ७ वाले : ही तर तुमच्या मनातली आनंददायी समाधानयुक्त आत्मसंतुष्टताच !

एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे. किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो. मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा. १. शेवटाकडेचा (४) २. धान्यावरची विशेष जागा (२) ३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२) ४. स्वामी (३) ५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४) ६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४) ७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) .......................

सहा अक्षरी आंब्याची जात ओळखा . शोधसूत्र : गुरु मध्ये निवडलेला मिळवा !

गूढकोडे पाच अक्षरी शब्द ओळखा : सूत्र : प्राण्याच्या बारशाची तयारी करणे फारच कंटाळा आणणारे बुवा !