✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 07/20/2020 - 11:32  ·  लेख
लेख
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ). २. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ). ३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित) ४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री) ५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ). ६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी) ७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ). ८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा). ९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित). …………………………………. नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
60675 वाचन

💬 प्रतिसाद (150)

प्रतिक्रिया

होय,

हेमंतकुमार
गुरुवार, 08/13/2020 - 19:23 नवीन
बघतो ! धन्यवाद
  • Log in or register to post comments

?

हेमंतकुमार
Fri, 08/14/2020 - 10:02 नवीन
ज्ञा पै गायब ?
  • Log in or register to post comments

छ्या..

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 08/14/2020 - 12:19 नवीन
दोनच शब्द झाले अन पुढे काही जमले नाही. आज काही आपले डोके चालत नाहीये. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ठीक

हेमंतकुमार
Fri, 08/14/2020 - 12:33 नवीन
गणेशा यांचे शब्द: मानस, इमारत, , बारस, सरमाडी, बारडी, इतबार,, तरस, इतर, , इमान, तरडी, नरडी, समान, इमानइतबार ... भर घालू शकता
  • Log in or register to post comments

९ अक्षरं ....?

गामा पैलवान
Fri, 08/14/2020 - 17:25 नवीन
इ दोनदा आल्याने ८ च अक्षरं आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments

एकूण

हेमंतकुमार
Fri, 08/14/2020 - 17:58 नवीन
९ दिलेली अक्षरे असा अर्थ घ्यावा. प्रकार नव्हे
  • Log in or register to post comments

प्रकार म्हणजे कळलं नाही

गामा पैलवान
Sat, 08/15/2020 - 13:06 नवीन
कुमारेक, अक्षरांचा प्रकार हे काय आहे? तुम्ही केवळ ८ भिन्न अक्षरं दिलेली आहेत. इ हे अक्षर दोनदा दिलंय. म्हणजे दोन इ वापरता येतील, असं काही आहे का? उदा. : इमानेइतबारे धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बरोबर.

हेमंतकुमार
Sat, 08/15/2020 - 13:28 नवीन
बरोबर. १ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

+

हेमंतकुमार
Sat, 08/15/2020 - 13:29 नवीन
इ दोनदा असल्या ने एका शब्दातही दोनदा चालेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

शुभेच्छा !

हेमंतकुमार
Sat, 08/15/2020 - 09:43 नवीन
सर्व शब्दप्रेमींना स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sun, 08/16/2020 - 10:53 नवीन
अन्य काही शब्द : तनसडी रतन बासन बासर रसन रसडी तसर
  • Log in or register to post comments

रतन सोडल्यास इतर शब्द कधीच

गणेशा
Tue, 08/18/2020 - 21:33 नवीन
रतन सोडल्यास इतर शब्द कधीच ऐकलेले नाहीत मी. रतन हे विशेषनाम आहे असे वाटल्याने मी दिलेले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

रतन = रत्न म्हणून चालेल

हेमंतकुमार
Tue, 08/18/2020 - 21:43 नवीन
रतन = रत्न म्हणून चालेल
  • Log in or register to post comments

एक सोपे देतो.

हेमंतकुमार
Wed, 08/19/2020 - 14:40 नवीन
एक सोपे देतो. खाली दिलेल्या अक्षरांत मिळून एका शब्दाचे ६ समानार्थी दडलेले आहेत. कारकुन पुडी देशवरी हयात ते ओळखा. एक अक्षर फक्त एकदाच घ्या. सर्व ६ शब्द एकदम लिहा. तेव्हा उत्तर उघडच असेल !
  • Log in or register to post comments

उत्तर-

सत्यजित...
Fri, 10/09/2020 - 07:45 नवीन
देह,काया,शरीर,तन,वपु,कुडी!
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Fri, 10/09/2020 - 09:25 नवीन
छान ! बरेच दिवसांनी भेट !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

हेमंतकुमार
Sat, 01/02/2021 - 10:12 नवीन
येथील जुन्या सहकारी बंधूभगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा ! पुन्हा खेळ सुरु करावेत काय ? जरूर कळवा.
  • Log in or register to post comments

तुम्हास ही नववर्षाच्या

मराठी_माणूस
Sat, 01/02/2021 - 11:42 नवीन
तुम्हास ही नववर्षाच्या शुभेच्छा !
पुन्हा खेळ सुरु करावेत काय ?
हो !!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ठीक आहे,

हेमंतकुमार
Sat, 01/02/2021 - 12:08 नवीन
एका छोट्याने प्रारंभ : ६ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी : (अंक =अक्षरक्रम) १२ - हगवण ३४ - नळकांडे ५६ - मेंढपाळास हाक मारली संपूर्ण शब्द - वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन
  • Log in or register to post comments

कोडे समजण्यास अवघड वाटत आहे.

मराठी_माणूस
Sun, 01/03/2021 - 09:33 नवीन
कोडे समजण्यास अवघड वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

...

हेमंतकुमार
Sun, 01/03/2021 - 09:55 नवीन
शब्द असा आहे : १२३४५६ १२ हाही छोटा शब्द तसेच ३४ व ५६ . हे सर्व ओळखायचे. शेवटी पूर्ण शब्द तयार होईल.
  • Log in or register to post comments

हरलो :)

मराठी_माणूस
Wed, 01/06/2021 - 16:37 नवीन
हरलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जरा थांबा..

हेमंतकुमार
Wed, 01/06/2021 - 18:10 नवीन
इथे न सुटल्याने हेच कोडे अन्यत्रही दिले आहे. तिकडचा निकाल लागला की इथे उत्तर लिहितो धन्यवाद
  • Log in or register to post comments

उत्तर

हेमंतकुमार
गुरुवार, 01/07/2021 - 14:58 नवीन
उत्तर १२ - हगवण = फोक ३४ - नळकांडे = नाड ५६ - मेंढपाळास हाक मारली = बाजी संपूर्ण- वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन = फोकनाडबाजी ................................... इथून घेतला : माध्यमांची फोकनाडबाजी! प्रवीण बर्दापूरकर https://www.aksharnama.com/client/trending_detail/4787
  • Log in or register to post comments

अरारा

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/07/2021 - 16:47 नवीन
आता फोकडान्स पहाताना सुध्दा बेक्कार हसायला येणार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ज्ञा पै ,

हेमंतकुमार
गुरुवार, 01/07/2021 - 17:10 नवीन
😀 😀 😀 .....
  • Log in or register to post comments

अक्षरमिसळ

हेमंतकुमार
Wed, 01/13/2021 - 15:27 नवीन
अक्षरमिसळ एक ८ अक्षरी शब्द ओळखायचा आहे. हा खेळ २ टप्प्यात आहे. टप्पा १: दोन गटांत मिळून ८ अक्षरमिसळ दिल्या आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येक मिसळीतून (फक्त) एकेक अक्षर निवडा. त्या ४ अक्षरांतून (योग्य तो क्रम लवून ) प्रत्येक गटाचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यासाठी शोधसूत्र दिले आहे. गट १: अधूसरपणामूळचाच सकातकरीचाचाला वावरतानाचहालात्या विसरमिसळीतूनह्या ४ अक्षरी शब्दाचे सूत्र : धातूची अवजड वस्तू ......................... गट २ : धुरंधरच्यापायाशी विशहाजोगपणाने तोदबण्यासाठीच सरकारदादताना ४ अक्षरी शब्दाचे सूत्र : व्यक्तीविशेषण ..................... टप्पा २: आता पहिल्या गटाच्या शब्दाला दुसऱ्या गटाचा शब्द जोडा. = अर्थपूर्ण शब्द. (हा अर्थपूर्ण झाल्यासच खेळ पूर्ण).
  • Log in or register to post comments

अजुन काही क्लु देऊ शकता का ?

मराठी_माणूस
Sun, 01/17/2021 - 11:54 नवीन
अजुन काही क्लु देऊ शकता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धातूची अवजड वस्तू>>> चांगलीच

हेमंतकुमार
Sun, 01/17/2021 - 12:11 नवीन
धातूची अवजड वस्तू>>> चांगलीच जड. ती उचलणे पांढरपेशा चे काम नाही ! ही आली की २ समजेल
  • Log in or register to post comments

सोपे करू. योग्य क्रम लावला

हेमंतकुमार
गुरुवार, 01/21/2021 - 16:54 नवीन
सोपे करू. योग्य क्रम लावला आहे. आता एकेक अक्षर निवडा. गट १ सकातकरीचाचाला अधूसरपणामूळचाच वावरतानाचहालात्या विसरमिसळीतूनह्या गट २ : तोदबण्यासाठीच विशहाजोगपणाने सरकारदादताना धुरंधरच्यापायाशी
  • Log in or register to post comments

अजुनही जमत नाही

मराठी_माणूस
Fri, 01/22/2021 - 16:04 नवीन
अजुनही जमत नाही
  • Log in or register to post comments

बर,

हेमंतकुमार
Fri, 01/22/2021 - 16:34 नवीन
गट १ मध्ये शस्त्र आहे !
  • Log in or register to post comments

तरवार बहादर ?

गोरगावलेकर
Fri, 01/22/2021 - 22:42 नवीन
तरवार बहादर ?
  • Log in or register to post comments

अरे नवा शब्द कळला

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/23/2021 - 19:39 नवीन
तरवार म्हणजे काय? आम्हाला फक्त तलवार माहिती होती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

दोन्हींचा

हेमंतकुमार
Sat, 01/23/2021 - 19:43 नवीन
अर्थ एकच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

या गाण्यात ऐकायला मिळतो हा शब्द

गोरगावलेकर
Sat, 01/23/2021 - 23:41 नवीन
म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

होय ,

हेमंतकुमार
Sat, 01/23/2021 - 06:41 नवीन
बरोबर !
  • Log in or register to post comments

तरवार -> धातुची अवजड वस्तु हे

मराठी_माणूस
Sat, 01/23/2021 - 11:15 नवीन
तरवार -> धातुची अवजड वस्तु हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ती

हेमंतकुमार
Sat, 01/23/2021 - 11:21 नवीन
वजनदार असते ना.
  • Log in or register to post comments

शिवकालीन तलवार जड नसायची ....

गामा पैलवान
Sat, 01/23/2021 - 15:44 नवीन
शिवकालीन तलवार जड नसायची म्हणे. हलकी व मजबूत असायची. यासंबंधी मिपावर एक लेख आलेला यापूर्वी. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद

हेमंतकुमार
Sat, 01/23/2021 - 15:55 नवीन
दखल घेतली आहे.
  • Log in or register to post comments

शब्द-लगोरी

हेमंतकुमार
गुरुवार, 02/04/2021 - 13:06 नवीन
एक गंमत खेळ. प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे एखादे वाक्य तयार करायचे आहे. या वाक्याचे वैशिष्ट्य असे आहे: वाक्यातील पहिला शब्द हा एकाक्षरी असेल. यानंतरचा प्रत्येक पुढचा शब्द फक्त एकेक अक्षराने वाढत जाईल. उदाहरणार्थ, ‘मी तुला पाहिले’ (१,२, ३) अशा प्रकारचे जास्तीत जास्त लांबीचे अर्थपूर्ण वाक्य तयार करा. केव्हाही तुमच्या सवडीने लिहा. जेव्हा आपले वाक्य लिहायला याल, तेव्हा ते त्याआधी कुणी लिहिलेल्या वाक्याइतके तरी लांब असावे किंवा किमान एका शब्दाने अधिक. आपापले वाक्य स्वतंत्रपणे करा. तुम्ही करा सुरवात ४ शब्दांच्या ((१, २, ३, ४) अशा तुमच्या स्वतंत्र वाक्याने.... प्रत्येकाचे वाक्य वेगळे चालेल. आधीचे पुढे खेचायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

हे चालतय का बघा सर..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 02/04/2021 - 13:47 नवीन
तू आज जास्तच जेवलास मी त्याला इप्सीत जागेवर पोहोचवले ई! किती गलिच्छ बोलतोस अक्कलशुन्य गाढवाच्यालेका पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 02/04/2021 - 13:41 नवीन
ज्ञा पै . छान. आता पुढेचे येउद्या ६ शब्दी .
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
गुरुवार, 02/04/2021 - 13:58 नवीन
छान ! आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे. वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
गुरुवार, 02/04/2021 - 13:59 नवीन
छान ! आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे. वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम व प्रश्नचिन्ह सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.
  • Log in or register to post comments

७...

हेमंतकुमार
गुरुवार, 02/04/2021 - 15:43 नवीन
हे घ्या ७ वाले : ही तर तुमच्या मनातली आनंददायी समाधानयुक्त आत्मसंतुष्टताच !
  • Log in or register to post comments

नवीन

हेमंतकुमार
Mon, 02/08/2021 - 18:56 नवीन
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे. किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो. मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा. १. शेवटाकडेचा (४) २. धान्यावरची विशेष जागा (२) ३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२) ४. स्वामी (३) ५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४) ६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४) ७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) .......................
  • Log in or register to post comments

एक छोटेसे ..

हेमंतकुमार
गुरुवार, 04/22/2021 - 17:38 नवीन
सहा अक्षरी आंब्याची जात ओळखा . शोधसूत्र : गुरु मध्ये निवडलेला मिळवा !
  • Log in or register to post comments

गूढकोडे

हेमंतकुमार
Wed, 12/29/2021 - 08:44 नवीन
गूढकोडे पाच अक्षरी शब्द ओळखा : सूत्र : प्राण्याच्या बारशाची तयारी करणे फारच कंटाळा आणणारे बुवा !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा