Skip to main content

तुमच्या देशात....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 13/04/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 60520
प्रतिक्रिया 212

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

खरंच कि, जम्मूच्या प्रकरणाबद्दल दाब्बून भावना उचंबळून आलेली मंडळी तीन दिवसांपासून गप्प आहेत. ================================== कालची मध्य प्रदेशातली ४ महीन्यांची (टाईप करायला सुद्धा शहारे येतात हे वय) केस आहे. आणि सन्नाटा आहे.