तुमच्या देशात....
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
https://mariawirthblog
धन्यवाद टका
धन्यवाद टका
मीडिया चा रोल
मिडिया, एनजीओ, राजकारण , नित्य नवे डाव !!
काही तरी चुकतंय असं वाटत
सगळे कोर्टात जातात, परत
हे तर आहेच, पण सुरुवातीचा...
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(Police deployed in UP village
हा 'सेक्युलर' रेप असल्याने
'सेक्युलर' रेप .. आणि
खरंच कि, जम्मूच्या