Skip to main content

अनुवाद मदत हवी आहे.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 25/09/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे. यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्‍या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे. त्यासाठी मिसळपाव वरील मित्रांना / वरिष्ठांना या परवाण्याचं मराठी भाषांतर करून देण्याची विनंती करीत आहे. मुक्तस्रोत आणि त्या मागचा विचार जाणण्यासाठी ह्या परवाण्याचा उपयोग होईल असं वाटतं. मुक्तस्रोता मागची भूमीका सुध्दा लक्षात येईल. अनेक लोकांना या लेखाद्वारे लिनक्सची ओळख होईल. ओळख होतानाच त्या लोकांपर्यंत मुक्तस्रोतामागची भूमीका पोहोचली तर कदाचित मुक्तस्रोतात योगदान देणार्‍या मराठी संख्येत वाढ होईल आणि मराठीला त्याचा लाभ होईल. अनुवाद खुप साचेबंद असावा का नसावा ते तुम्ही ठरवा. मात्र मुख्य हेतू आहे की त्या परवाण्यातील गाभा या अनुवादात असावा. त्या अनुवादासोबत मुळ परवाण्याचा दूवा देण्यात येईलच. त्यामुळे खुप कसरती कराव्या लागणार नाहीत. मात्र या दस्तऐवजाला संदर्भमुल्य लाभू शकतं त्यामुळे ते अधीक आखीव असावं अशी कुणाची भूमिका असेल तर त्यावर सुध्दा विचार होऊ शकतो. हे परवाणे जरा लांब आहेत. लिनक्स जीएनयु लायसन्स : ३००० शब्द जीपीएल : ५६६० शब्द त्यामुळे एकट्याने हे काम न करता काही लोक एकत्र येऊन केल्यास लवकर होईल आणि या विषयावर चर्चा सुध्दा करता येईल. परवाण्याचे दूवे देत आहे. जीएनयु लायसन्स येथे आहे. http://www.linux.org/info/gnu.html जीपीएल येथे आहे. http://www.gnu.org/copyleft/gpl.html नीलकांत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7648
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मी मदत करू शकते (अनुवाद करायला जमतं का नाही माहित नाही). पण गेली चार वर्षं माझं आयुष्य "विण्डोजविरहीत" ठेवल्याबद्दल मी लिनक्ससाठी काहीतरी करू शकले तर बरं वाटेल. अदिती

नीलकांत, मदत करायला आवडेल.

मी पण मदत करेन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)

मला पण मदत करायला अवडेल.

मी ही मदत करु शकेन डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)

मी भाषांतर करू शकेन नव्हे आवडेल.. पण संकलन आणि व्यवस्थापन(कोणी काय करायचं इ.) कोणीतरी करावे -('मिसळ'लेला) ऋषिकेश

फार चांगली गोष्ट. आता तुम्ही लेखाचे ~१० भाग करा, आणि आम्हाला एक-एक वाटप करा. कोणाला उत्तम पारिभाषिक शब्द सुचला की ते या धाग्यावर देतील. सध्या अनुवादक आहेत : १. नीलकांत २. १_६ ३. यशोधरा ४. जैन ५. अमिगो ६. नंदन ७. विजुभाऊ ८. बेसनलाडू ९. ऋषिकेश १०. धनंजय

मी स्वतः अजुन लिनक्स चा फारसा वापर केलेला नाही. पण त्याविषयी थोडीफार माहिती आहे. जर माझी काही मदत होऊ शकत असेल, तर मी या उपक्रमात सहभागी होऊ ईच्छितो. मुशाफिर.

तुम्हा सर्वांच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. सध्या ग्नू लायसन्सचा अनुवाद करायचे ठरले आहे. शक्य तेवढ्या लोकांना व्य. नि. पाठवले आहेत. अनुवादाचा कमाल कालावधी एका आठवड्याचा ठरवलेला आहे. जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा प्रयत्न करू या. या दरम्यान काही अडचणी आल्यास येथे लिहा किंवा मला व्य. नि. पाठवा. नीलकांत

"प्रोग्रॅम" आणि "सॉफ्टवेअर" दोन्ही शब्दांच्या जागी मी "प्रणाली" शब्द वापरत आहे. लोकायत-डॉट-कॉम वरील काही लेखांमध्ये असाच वापर झालेला दिसतो, आणि संदर्भामुळे कुठलाच घोटाळा होत नाही. GNU शब्द "ग्नू" असा लिहिला आहे. वर नीलकांत यांनी तसाच लिहिला आहे. ग्नू फाउंडेशनच्या संकेतस्थळावर तसाच उच्चार सांगितला आहे. GNU शब्दाची फोड "GNUझ नॉट युनिक्स" अशी स्वयंचक्री (रिकर्सिव्ह) केल्यामुळे त्या शब्दाचे/फोड केलेल्या वाक्याचे भाषांतर दुरापरस्त आहे. ग्न्यू = ग्-न्-यू = "ग्न्यू नसे यूनिक्स" अशी फोड शक्य आहे, पण मग कोणाला ओळखू येणार नाही असे ग्न्यू ('य' घातलेले) नाव उत्पन्न होईल. त्यापेक्षा "ग्नू" असेच बरे.

In reply to by धनंजय

अरेच्या हे मी वाचलेच नाहि. मी प्रोग्रॅमला आज्ञावली आणि सॉफ्टवेअरला प्रणाली वापरला आहे. GNU मी जीएनयु असा लिहिला आहे. चालेल का बदलून परत पाठवू? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नमस्कार, आता पर्यंत धनंजय आणि ऋषिकेश यांनी अनुवाद करून पाठवलेला आहे. त्यांचे मनापासून आभार. नीलकांत

प्रोग्रॅमला आज्ञावली हे समर्पक वाटते...

आपण जे काही मराठी प्रतिशब्द वापरणार आहोत त्याची सूची आणि त्याचा इंग्रजी समानार्थी शब्द खाली संदर्भासाठी देऊया. म्हणजे अडचण जाणार नाही. आणि तसेही आपण संदर्भासाठी मुळ परवाण्याचा दूवा तेथे कायम ठेवणारच आहोत. नीलकांत

आता पर्यत धनंजय, ऋषिकेश, यशोधरा. यांनी अनुवाद पाठवलेले आहेत.

मराठी प्रतिशब्द हवे आहेत: Copyright a नाही to Copy (प्रत/प्रती बनवणे?) warranty

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Copyright - प्रताधिकार warranty - पोकळ हमी

आतापर्यंत धनंजय, ऋषिकेश, यशोधरा, १_६ विक्षिप्त अदिती यांनी अनुवाद पाठवले आहेत. बाकी लोकांच्या अनुवादाची वाट पाहत आहे. हे अनुवाद लवकरच प्रकाशित करतो. नीलकांत

अनुवाद प्रकल्प खुप रेंगाळला आहे. अद्याप तीन लोकांनी अनुवाद पाठवलेला नाहीये. त्या लोकांना काही कामामुळे शक्य नसेल तर आपण ह्या वेळी ते काम इतर लोकांना देऊ शकतो. कारण हे एकत्र केलेले अनुवाद एकत्र जोडतांना सुध्दा त्यात एकवाक्यता येण्यासाठी काही काम करावे लागेल. हा दुसरा टप्पा आहे . तो आता लवकरच करावा आणि हे भाषांतर प्रकाशित करावं अशी मागणी होत आहे. नीलकांत

In reply to by नीलकांत

कार्यबाहुल्यामुळे कुणाला अनुवाद देणे शक्य नसल्यास तसे सांगावे म्हणजे इतर स्वयंसेवकांकडुन ते करवुन घेता येईल.

अरेच्च्या.... हे माहितच नव्हते.... लोकायत वर पाहिल्यावर इथे खोदकाम करून पाहिले... मी काही मदत करू शकतो का?