पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली.
पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला.
तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा.
अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे?
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं
--मुनव्वर राना
वाचने
28202
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्णपणे सहमत
२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात
विवेकसाहेब निर्मीती पारेषण व
In reply to २ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात by विवेकपटाईत
विज नियामक आयोग एक संस्था आहे.
In reply to विवेकसाहेब निर्मीती पारेषण व by मितभाषी
एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव
In reply to विवेकसाहेब निर्मीती पारेषण व by मितभाषी
विश्वासाचा प्रशन नाही साहेब.
In reply to एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव by विवेकपटाईत
विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड
In reply to २ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात by विवेकपटाईत
सहमत!
लेखकाने
In reply to सहमत! by DEADPOOL
शुद्धिपत्रक
In reply to लेखकाने by नाना स्कॉच
हम्म या न्यायाने
Nation ही संकल्पना लक्षात
In reply to हम्म या न्यायाने by भाऊंचे भाऊ
काय भाऊ राज्य अन देश ह्यात
In reply to हम्म या न्यायाने by भाऊंचे भाऊ
लेखकाला इतकेच म्हणायचे आहे की
In reply to काय भाऊ राज्य अन देश ह्यात by नाना स्कॉच
आराररा
In reply to लेखकाला इतकेच म्हणायचे आहे की by भाऊंचे भाऊ
भाऊ की गोली अपना निशाना खुद ढूंड लेती है
In reply to आराररा by नाना स्कॉच
लेख आवडला
पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै
In reply to लेख आवडला by पैसा
ओके
In reply to पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै by स्वामी संकेतानंद
म्हणूनच मी कंसात पश्चिम
In reply to पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै by स्वामी संकेतानंद
तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे
हाहा!
In reply to तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे by सतिश पाटील
घेऊन टाका
In reply to हाहा! by पैसा
कोकण गोव्यात समाविष्ट करा
In reply to हाहा! by पैसा
नाका रे! गोयां आसा तितलें
In reply to कोकण गोव्यात समाविष्ट करा by निनाद मुक्काम …
लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची
लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची पश्चिम महाराष्ट्रियन जनतेत जबरी चुरस !
बरोबर राजेहो! तुमी बी
In reply to लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची by नाना स्कॉच
नाही मी प्रॉपर पश्चिम
In reply to बरोबर राजेहो! तुमी बी by स्वामी संकेतानंद
नाही मी प्रॉपर पश्चिम
In reply to नाही मी प्रॉपर पश्चिम by नाना स्कॉच
नाही मी प्रॉपर पश्चिम
In reply to नाही मी प्रॉपर पश्चिम by नाना स्कॉच
नाही मी प्रॉपर पश्चिम
In reply to नाही मी प्रॉपर पश्चिम by नाना स्कॉच
नाही मी प्रॉपर पश्चिम
In reply to नाही मी प्रॉपर पश्चिम by नाना स्कॉच
पुढं बोला की देवा !!
In reply to नाही मी प्रॉपर पश्चिम by विशाल कुलकर्णी
च्यायला , आता मिपाला माझे
In reply to पुढं बोला की देवा !! by नाना स्कॉच
ऑ, आम्हालातर कुंपणावरही
In reply to च्यायला , आता मिपाला माझे by विशाल कुलकर्णी
तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा
In reply to बरोबर राजेहो! तुमी बी by स्वामी संकेतानंद
खाज
मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर
In reply to खाज by सातारकर
कर्णाटक च्या
In reply to मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर by नाना स्कॉच
कर्नाटक महाराष्ट्र जो
In reply to कर्णाटक च्या by सातारकर
खरा इतिहास - नानांचा
In reply to कर्नाटक महाराष्ट्र जो by नाना स्कॉच
तुमच्या म्हणन्यानुसार
In reply to खरा इतिहास - नानांचा by सातारकर
अहो सातारकर
In reply to कर्णाटक च्या by सातारकर
मग आपण एकाच पार्टीचे की
In reply to अहो सातारकर by सतिश पाटील
इतर कोणत्याही
असहमत
In reply to इतर कोणत्याही by धर्मराजमुटके
त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.
In reply to असहमत by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे. by धर्मराजमुटके
चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच.
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
श्री गजू तायडे यांच्या शब्दांत
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा
तुमच्या लक्षात नाही आले. घेणे
In reply to या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा by भाऊंचे भाऊ
आहे खरी
In reply to तुमच्या लक्षात नाही आले. घेणे by स्वामी संकेतानंद
सर्व पश्चिम महाराष्ट्रीय
In reply to तुमच्या लक्षात नाही आले. घेणे by स्वामी संकेतानंद
चर्चा करा, भावनिक आवाहने करू
In reply to सर्व पश्चिम महाराष्ट्रीय by DEADPOOL
कोण मारायला धावले?
इथे नाही, बाहेर जे अनुभव आले
In reply to कोण मारायला धावले? by DEADPOOL
वेस्ट महाराष्ट नाही पण पुणे
विदर्भ आणि मराठवाडा वेगळा
धागालेखकाचा मुद्दा काय आणी
एक लक्षात आलंय का? कुठलाही
चला
In reply to एक लक्षात आलंय का? कुठलाही by काळा पहाड
स्कॉचनाना,
In reply to चला by नाना स्कॉच
असं म्हणताय...
In reply to स्कॉचनाना, by काळा पहाड
एवढा द्वेष बरा नव्हे
In reply to चला by नाना स्कॉच
...
In reply to एक लक्षात आलंय का? कुठलाही by काळा पहाड
पुन्हा तेच..
In reply to एक लक्षात आलंय का? कुठलाही by काळा पहाड
हान तिज्यायला.
In reply to पुन्हा तेच.. by चिगो
एक्कीच मारा, सॉल्लिड मारा. __
In reply to पुन्हा तेच.. by चिगो
कडक प्रतिसाद!!
In reply to पुन्हा तेच.. by चिगो
त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या
In reply to पुन्हा तेच.. by चिगो
हम्म..
In reply to त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या by भाऊंचे भाऊ
पण तरीही ह्या प्रतिसादात
In reply to पुन्हा तेच.. by चिगो
नक्कीच..
In reply to पण तरीही ह्या प्रतिसादात by काळा पहाड
माज...
In reply to पण तरीही ह्या प्रतिसादात by काळा पहाड
त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स.हा तुमचा निव्वळ माज आहे साहेब. पुण्यात २००५ पर्यंत काय दशा होती रियल एस्टेट ची ते आठवा जरा.. चार कंपन्या आल्या म्हणून तुमच्या जागेला सोन्याचा भाव तरी आलाय..या परराज्यातून आलेल्या लोकांच्या भरवश्यावरच कमवताहेत इथले , नाही तर बसले होते पेन्श्नर सिटी चा वांझोटा बोर्ड घेऊन... एव्हढा माज करू नका.. एकदा बजाज गेल्यावर औरंगाबादची व कंपन्या गेल्यावर मिशिगनची झालेली वाताहत बघा.. आयटी को आते और जाते देर नाही लागती दोस्त.. और शायद शुरुवात का शंखनाद हो चुका है :) http://www.mh-31.com/nagpur/about-nagpur/nagpur-mihan-real-estate-land/…महाराष्ट्रियन????? कि मराठी??
अहो
In reply to महाराष्ट्रियन????? कि मराठी?? by टवाळ कार्टा
=))
In reply to अहो by नाना स्कॉच
भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर
In reply to =)) by तर्राट जोकर
डोके उठल्यावर ही निमुट मुग गिळून बसणे अन सौजन्य पाळणे हेच बहुदा गृहस्थाश्रमाचे वैश्विक सार असावे असे वाटते आहे आम्हांस आजकाल!
त्या बबल्याला सांगा बॉयल सिंग आण म्हणा एक कंप्लीमेंट्री!!!लाईट क्यू... खंबा लेके बैठा ना यार इदर. =))
In reply to भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर by नाना स्कॉच
मोगांचे नावही घेऊ नका!! ;)
In reply to लाईट क्यू... खंबा लेके बैठा ना यार इदर. =)) by तर्राट जोकर
प्रतिक्रियावादी भद्रजन =))
In reply to मोगांचे नावही घेऊ नका!! ;) by नाना स्कॉच
असे चुकीचे शब्द आपणच परत परत
In reply to अहो by नाना स्कॉच
असे चुकीचे शब्द आपणच परत परत
In reply to असे चुकीचे शब्द आपणच परत परत by टवाळ कार्टा
श्रीयुत नाना
In reply to असे चुकीचे शब्द आपणच परत परत by नाना स्कॉच
लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे
In reply to श्रीयुत नाना by सातारकर
परत एकदा
In reply to लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे by नाना स्कॉच
परत एकदा
In reply to लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे by नाना स्कॉच
नमस्कार सातारकर साहेब
In reply to परत एकदा by सातारकर
'ही रूपकात्मक उदाहरणे आहेत बरंका ! नाहीतर शब्दप्रमाणिक अर्थ शोधत वरडत हिंडसाला!!'
मालक पश्चिम महाराष्ट्र हाच प्रमाणित महाराष्ट्र आहे असा गोड गैरसमज तुम्हाला असलेला जाणवतो आहे, पण त्यांची संस्कृती वेगळी आहे!एनी आहे का? आता नका म्हणू झेपले नाही! सार्वजनिक संस्थळावर अजुन स्पष्ट बोलणे शक्य नाही आम्हाला! झेपले नाही तर आम्ही यड़े म्हणून सोडुन द्या ! टिप :- आपण आमचे आवड़ते शब्द हुड़कत बसा आम्हाला हरकत नाही फ़क्त उद्या त्याचा रोजमुरा मागु नका ही विनंती!!'अभिनिवेश' शब्दावर नाना स्कॉच
In reply to परत एकदा by सातारकर