Skip to main content

अशीहि एक धर्म निरपेक्शता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 03/10/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
लेखनविषय:

वाचने 30318
प्रतिक्रिया 208

प्रतिक्रिया

माझ्या गावात मंदिरातही मुस्लिम बांधव येतात. दिवाळीही मोठ्या ऊत्साहाने साजरी करतात. रमजानला अख्खे गाव त्यांच्या वस्त्यांत शिरखुरमा वरपायला हक्काने जाते. हे लहानपणापासुन पाहत आलोय. त्यामुळे मला वरील उदाहरण विशेष वाटले नाही. पण तुमचा पहीलाच लेख आहे. प्रयत्न आवडला. 'ळ' काढायला शिका. :) येऊ द्या अजुन .:)

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,

"हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?" मुद्दा मान्य आहे पण काही मुस्लिम जन्माने महाराष्ट्रीय असले, महाराष्ट्रात वाढले आणि शिकले असले तरी उर्दुच (!) बोलतात. तुम्ही मराठी बोललात तरी ते त्यांचीच भाषा रेटत राहतात हा अनुभव आहे. हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे. ) ते जाणून बुजून हिंदी बोलत राहतात. कधी कधी या सगळ्याची चीड येते.(पुन्हा: सगळेच मुस्लिम आणि परप्रांतीय तसे नाहीत. त्यांची माफी मागून ) पण असा विचार केला कि आमच्यावर शिवसेना, मनसे शिक्का बसलाच. महाराष्ट्रात जन्मलेला, लुंगी नेसून आणि कपाळाला गंध लावलेला मोडकीतोडकी का होईना मराठी बोलताना क्वचित पाहायला मिळतो. दिवाकर साहेब, दुर्दैवाने, नेमके हेच चित्र लावण्यावरून सांगली, मिरज सारख्या संवेदनशील भागात अनेक हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या आहेत.

छान स्फूट रे दिवाकरा.'ये सबसे जादा खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत.
हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे.
असाच अनुभव बेळगाव्,धारवाड भागात्,चेन्नईत राहणार्या मराठी माणसांबद्दल येतो असे ह्यांचे तेथे राहणारे मित्र म्हणायचे रे दत्ता. म्हणजे गणेशोत्सव जोरात साजरा करतील पण पोंगल्,ओनमच्या दिवशी मात्र कामावर जातील.

In reply to by टवाळ कार्टा

>>> खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =)) +१ माई गाजरपारखी आहेत. उगाच नाही त्यांनी नानासाहेबांना गटवलं!

In reply to by श्रीगुरुजी

मी म्हटलंच होतं की माईसाहेब गाजरपारखी आहेत म्हणून. या धाग्यावरचे नानासाहेबांचे अर्थपूर्ण आणि समर्पक प्रतिसाद वाचले की याची प्रचिती येईल

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत तुमच्या आधीच्या प्रतिसादांवरून मला वाटायचं तुम्ही ह्यांचं मत मोठमोठे सामाजिक विषय, समस्या ह्यावरंच घेता. इथल्या प्रत्येक वाक्यावर / शब्दावर मत म्हणजे भारीच ना ! बाकी लई दिसांनी ? बर चाललंय ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बाप जन्मात कधी बेळगाव / धारवाड , चेन्नई भागात आलाय का ? कि आपलं उगा बडवला कळफलक . . गणेशोत्सव मुळात मराठी सण . पोंगल ला आपल्या कडे "संक्रांत " म्हणतात . . बाकी ओणम च म्हणाल तर श्रावणात येतो . पण असो . तुमचे "हे" जर अति शहाणे दिसतात . .त्यामुळे . .असोच

जन्माने, आणि शिक्षणाने महाराष्ट्रीयन म्हटलं मी. माझे अनेक मित्र आणि नातेवाईक जे गेले अनेक वर्षे किंवा पिढ्या न पिढ्या वेगवेगळ्या राज्यात राहत आहेत ते तिथल्या संस्कृतीशी आणि भाषेशी एकरूप झाले आहेत. ( उदा. केरळ, कर्नाटक, गुजरात). कामासाठी बदली निमित्ताने वगैरे काही काळ पार प्रांतात राहणाऱ्या न विषयी नाही लिहील मी. तामिळ लोकांविषयी काय लिहावे?

अफजलखानांचा कोथळा शिवाजींनी बाहेर काढला याला कोणताही समकालीन पुरावा नाही, हिंदुत्ववाद्यांनी मारलेली ती लोणकढी थाप आहे.शिवाजी व अफजल खान यांचे शामियाण्यात वाद झाले , शिवाजींनी अफजलखान यांना हिसका दाखवल्यानंतर ते पळुन गेले, पुढे मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करुन वाईजवळ पाचवड इथे त्यांची हत्या केली, असे खरे प्रकरण आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अरे वा. महाराजांच्या नुसत्या हिसक्याला घाबरला अन पळाला. मर्द मावळ्यांनी गाठून मारला. लैच चिल्लर होता म्हणा की. ब्येस्ट ब्येस्ट.

In reply to by टवाळ कार्टा

खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्य ते... "अफझलखानाचे हृदयपरीवर्तन झाल्यावर त्याने स्वतःच आपल्या हाताने आपाला कोथळा बाहेर काढला" आसे खानमामाकी (की खानसामाकी) बखर मध्ये पान ४८६ वर खुद्द खानाने स्वतःच्या रक्ताने लिहून मगच प्राण सोडला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ क सर आम्ही वाचला तो इतीहास असा होता: राजे अफझलखानासमीप बसले,त्यांचा लॅपटॉप उघडून मिपा लॉग इन केले आणी मिपावरील साहीत्य खजीना खानापुढे रिता केला. आता खानाची पडली उर्दु भाषा आणि भाषांतरकार ही पाहिजे तोडीचा (इथे ताडीचा काडीचाही उपयोग नाही म्हणून दादुमियांचे नाव आपसूक गळाले) बॅट्या संदर्भ भेंडोळी घेऊन तयारीत होताच (साथील एकाला दोन असावेत म्हणून मालोजीराव आणि अद्द्या होतेच) नेम्का जेपी काही कारणाने शामियान्याचे बाहेर गेला होता म्हणून या ऐतीहासीक प्रसंगात उपस्थीत नव्हता. (इतीहासच काय भूगोलही त्याला माफ करणार नाही,ऐनवेळी दांडी मारायची वाईट्ट खोड त्याला तेव्हा पासून आहे याची नम्र नोंद) राजेंनी एक एक धागा दाखवावा आणि त्याचा समजेल अश्या उर्दुत बॅट्याने अनुवादावा असा सुमारे २-३ तास संवाद चालला. आता ता राजेंनी धूर्तपणे आणि चाणाक्षपणे मिपा ऐतीहासीक मैलाचे दगड (शब्द नीट वाचा आणि अनर्थ करू नका) ठरलेल्या कलाकृती निवडल्या आणि त्याचे रसाळ निरूपणं अनुवाद बॅट्याने केले. त्या कलाकृती येन प्रकारे. मोकलाया दाही दिशा ऐ तू चल नं लाटकरांनी लाटलेले पण नीट न भाजलेले पापड जीवनभाऊंचे सुरस जीवन सार अकुंच्या बोधकथा निसोंच्या शोधकथा यानंतर सदर साहीत्या मेजवानीची सांगता स्नेहांकीता ताईच्या मिपाकर लक्षणे या सारांरुपाने झाली आणि परीणाम व्हायचा तोच झाला. खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले. इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार अज्ञ बालक नाखु

In reply to by नाखु

ख्या ख्या ख्या खि खि खि खु खु खु

In reply to by नाखु

=)) =)) =)) खानाने स्वहस्ते स्वरक्ते बखरीत लिहीलेल्या एकवाक्यी लिखाणावर त्याला शेवटचे पाजायला म्हणून आणलेले पाणी सांडल्यावर रक्त पानभर पसरले. त्या पानावर आता वरील मजकूर आहे... निदान नव(व्हं)इतिहासकारांचा तरी तसा दावा आहे. (असे त्या बखरीच्या संशोधनलेखनाच्या तळटीपेत नमूद आहे.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकोळी लिखाण कसे ठेवले? संपादक काय करत होते? =))

In reply to by नाखु

काहीही हां नाखुकाका !

In reply to by नाखु

काका _/\_ :)

In reply to by नाखु

इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार
╰_╯ इसका बदला लिया जाएगा, बराब्बर लीया जाएगा! दू दू दू ना\^o^/खून!!! :-/

In reply to by नाखु

=))

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

कहाँ थे इत्ते साल से मियाँ???? हिन्दुस्थान की अवाम आप के न होने के कारण दुनिया से पीछे रह गयी| खैर, देर आये दुरुस्त आये|

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

@फुलथ्रॉटल जिनियस अहो तसे झालेलं नाही. शिवाजी महाराजांनी धमकी दिल्याने अफझल खानाने घाबरून आत्महत्या केली असे खानसाम्याची बखर मध्ये वाचल्याचे आठवते. वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७ जाता जाता -- उद्या हे इतिहास लिहिला तर मिसळपाव हे संस्थळ नव्हतेच ते तर खिमा पाव असे होते पण काही नतद्रष्ट उजव्या( किंवा भगव्या) लोकांनी त्याला शाकाहारी करायचे म्हणून मिसळ पाव केले म्हणतील. ह. घ्या.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर माझ्या कमेंटमध्ये मी जे लिहिले आहे ते खरे आहे, वाई पाचवड कडच्या कुणालाही विचारा ते सांगतील....

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

जन्म गेला आमचा पाचगणी, वाई मध्ये. शेंड्या लावायची कामं बंद करा फुलथ्रॉटल. आधी खानाचा तळ वाईमध्ये होता त्याला त्या भागाची माहिती होती म्हणून तो वाई भागात आला नि महाराजांना तिकडे बोलावू लागला. महाराजांनी न जाता खानाला प्रतापगडावर बोलावलं नि तिकडेच मारला. कोथळा लिटरली काढला नसेलही कदाचित पण मारला तिकडेच असणार. अन्यथा प्रतापगडाच्या पायथ्याला खानाची कबर कशी आली असती?

In reply to by प्यारे१

मी लहानपणी ऐकलेली कथा वेगळीच आहे अफजल खान हा अत्यंत कनवाळू, दयाळू आणि दानशूर म्हणून प्रसीध्द होता. गरीबांच्या बद्द्ल त्याला विशेष आदर होता. तो शिवाजी महारांजाच्या वडीलांना जुनियर असल्यामुळे शिवाजी महाराजांवर त्याचा विलक्षण लोभ होता. शिवाजी महाराज करत असलेल्या समाजसेवेबद्द्ल महाराजांना एकदा प्रत्यक्ष भेटून गळाभेट घ्यावी अशी त्याची फारा दीवसापासूनची ईच्छा होती. भेट ठरली. बरेच दीवसांची आपली ईच्छा पूर्ण होणार म्हणून खान नर्व्हस होता. भेटीचा दीवस उजाडला. आपल्या लहान भावाला भेटावे तशा ओढीने खान राजांना भेटला. या भेटीत महाराजांनी मावळ भागातल्या शेतकर्‍यांची दुर्दशा खानास ऐकवली. ती ऐकून खानास गहीवरुन आले. ईतके गहीवरुन आले की त्याचे काळीज पिळवटून मग आतडी पिळवटून ती बाहेर आली. आणि त्यातच खानसाहेबांचा अंत झाला.

In reply to by खटपट्या

ही सर्व घटना ऐकून जिजाउ प्रचंड संतापल्या आणि त्यांनी महाराजांना यास जबाबदार धरले. आणि मग प्रायश्चित्त्त म्हणून महाराजांना त्याची कबर बांधायला सांगीतली. मात्रुभक्त महाराजांनी ही आज्ञा मानून लगेच आलिशान कबर प्रतापगडावर बांधली,,,

In reply to by खटपट्या

काय एक एक नवीन इतिहास कळतोय. मी इमॅजीन करतोय की शामियान्यात महाराज आणि अफजलखानात वादावादी काय झाली असेल. आणि महाराजांचा शेवटचा डायलॉग काय असेल की खान पाय लावून सैन्यासकट पळाला. "कसम भवानी की, मैं तुम्हारे टुकडे टुकडे कर दूंगा? " :-)

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अस मी पण काही ऐकल नाही कधी आता तुम्ही म्हणताय तर दसऱ्याला गावी गेलो कि ऐकेन स्वगत: वाई आणि कमळगडाच्या परिसरात आयुष्याची २५ वर्षे वायाच गेली म्हणायची.

In reply to by सुबोध खरे

ओ काय पन सांगू नका डागतर... शामियानात झुरळ घुसल्यालं बंगून हाफजलखानास हार्टटेक आलाय असं म्हंते. झुरलं घुसल्याचा आळ आपल्यावर येऊ नये म्हून 'खान्सामा खोटं बोलला' असं इंग्रजांच्या कोक्रोचीय डायारीज्मधे लिवलं हे.

In reply to by सुबोध खरे

>>> वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७ चुकलात तुम्ही डॉक्टरसाहेब. तुम्ही नानाखाँची बखर (शव्वाल) हिजरी १३०५ -१३०६ यातील रूमाल क्रमांक ७८६ वाचा. हे वाचल्यानंतर नानासाहेबांचा दावा खरा असल्याचे ध्यानात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

त्याचं रुमालाला वेगवेगळ्या वस्तु पुसल्या गेल्याने नीटसा संदर्भ लागत नाही. बादवे अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटल्यावर पापांचं परिमार्जन म्हणुन "सेप्पुकु" केलेलं म्हणे. थोर तो अफजुल्ला आणि थोर त्या त्याच्या अनौरस विचारसुंतक पिल्लावळी.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

शिवाजी राजांना ते करत असलेल्या थोर कार्यासाठी शाबासकी द्यायला खान दिल्लीहून आला होता. खान मराठी रयतेला भेट द्यावी म्हणून प्रचंड खजिना घेवून आला होता आणि येता येता मराठी मुलुखात आणि हिंदू देवळांवर उधळत उधळत येत होता. मी तर ऐकलय कि महाराजांनी खानाचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला होता. काय तरीच हे हिंदुत्ववादी! या लोण कढी लोकांनीच त्याची खोटी समाधी प्रतापगडावर बांधली. आणि त्याला पीर ठरवून पूजा अर्चा सुरु केली.

In reply to by dadadarekar

दादा खान असे कृष्णाजी प्रभाकर त्याच काळात नव्हे तर आजच्या काळातही आहेतच कि (चार दमडयानसाठी स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसणारे.) ओळखा पाहू. एक हिंट -- सारखे डू आय डी घेत/ बदलत असतात.

In reply to by सुबोध खरे

कृष्णाजी प्रभाकर की भास्कर ? बहुतेक कृष्णाजी भास्कर

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?
रोजचा स्वतःचा अनुभव आणि निरीक्षण आहे . तुम्ही मुस्लिमांशी (अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता ) कितीही मराठी बोलायचा प्रयत्न केलात तरी ते कधीही मराठीत बोलत नाहीत .उर्दू मिश्रित हिंदीतच बोलतात मग अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही . त्यांना मराठी समजत असतं आणि बोलताही येत असतं पण ते प्रतिसाद मात्र मराठीत देत नाहीत .त्यांचीच भाषा पुढे रेटतात . आपणही मग त्यांच्याशी त्याच भाषेतून बोलू लागतो .भाषा आणि पोशाख ह्या कुठल्याही धर्माच्या , संस्कृतीच्या महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे आपणही त्यांच्याशी हटकून मराठीतच बोलायला हवं . अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजी महाराजांचं खेळणं विकलं जातं हे त्या बाईने सांगितलं . आता ह्यात धर्मनिरपेक्षता कसली आलीय ?

In reply to by तुडतुडी

अडवाणी,अमित शहा,राजनाथ्,अशोक सिंघल मुंबईत्,महाराष्ट्रात आले की मराठी कार्यकत्यांशी कुठच्या भाषेत बोलतात गे तुडतुडे?

सर्व प्रतिसादकांचे आभार मे जे लिहीलंय ती एक सत्य घटना आहे, तसा मी कधीच लेखक नव्हतो व नाही,पण जे मनाला भिडलं कि, एका मुस्लिम बाईचं ब्रेड आणि बटर अफझल खानाच्च्या वधाचं खेलणं असावं ,ते उतरवलंय इतकंच, हा विरोधाभास मला धर्म निरपेक्शता वा सहिष्णुता वाटली , इतकंच माझा खरं तर शशक लिहायचा विचार होता त्यामुलं अधिक तपशील मी टालले, त्यामुलं ती मुस्लीम असल्याचा संदर्भ नीट येऊ शकला नाही, हे मान्य, प्रश्न राहिला ळ बद्दल ल लिहीलं जाण्याचा, अयोग्य की बोर्ड मुलं हे घडतंय, आपल्याला हे सहन करावं याबद्दल क्शमस्व ! मिपाच्या पंगतीत ,येणं अंत्यत आनंदाचं आहे याची प्रचिती मी घेतली आहे.

घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या सार्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा ।।१।।झुलवूनको हिंदोळा सांज वेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे कालिंदीच्या तटी खेळती गोपसुतांचा मेळा ।२। झुलवू.......... गदिंमांच्या या गीतात १४ वेळा ळ आलाय माणिक वर्मांच हे गाणं तू नळी वर ऐका,भरून पावल्याचा आंनंद मिळेल ़़शुभा खोटे वर हे गाणं चित्रीत झालंय, त्या वेळची शुभा खोटे किती मार्दव़ माझ्या कथेतील ल ,ळ ,च्या चुकार पणाची भरपाई करू इच्छितो

कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ रे दिवाकरा, ळ विषयीची कळकळ तळमळ कळ्ळ्ळ कळ्ळालि

आमचा लाडका अफजुल्या ६२ बायका , सरदारकी उपभोगुन ६० वर्षे तृप्तपणे जगुन मग मेला . शाइस्त्याचेही तसेच आहे. २२ की किती वर्षे बंगालचे की कुठले राजेपण भोगून मग मेला. बोटं तुटलॅ म्हणून कुठलं सुख कमी नाही पडले. (संपादित)

In reply to by dadadarekar

बघा, असं आमचा लाडका, आमचा लाडका असं एका धाग्यावर म्हणता, आणि दुसर्‍या धाग्यावर कसा काय आमचा लाडका असं विचारता! ह्ये वागनं बरं नव्हं!

In reply to by टवाळ कार्टा

टक्या, इस हात दे और उस हात ले. समझे? :D अवांतरः इतकं बोलून दादासैब काय दौद त्यांचा लाडका नाही म्हणले नैत, मग काय बरं समजावं?

In reply to by टवाळ कार्टा

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी बोलण्याला विरोध हे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कधीपासुन झाली टक्कुमक्कुशोनु?

In reply to by dadadarekar

ओ हितेस भाऊ तुम्ही तुमची सर्व स्थावर जंगम इष्टेट आम्हाला देऊन हाजला जाणार होतात ना ? पुण्य मिळवायला. आम्ही ष्टाम्प पेपर घेऊन वाट बघून र्हायलो ना? मग कायले हिकडे काथ्याकुट करून र्हायले? तिकडे काबा ला ष्टाम्पिड साठी तुमची वाट बघून राह्यलेना!

लेखासंबंधी: वपुस्टाइल मांडणी चांगली आहे. लेखनशैलीही चांगली आहे. काय चुकले? धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरून. ती बाई मुस्लिम होती-नव्हती हा भाग वेगळा. इथे लेखकाच्या मनातच धर्म किती रुतून बसला आहे याचे प्रत्यंतर आले. ऐकीव माहितींवरून व सतत एकतर्फी प्रचारावरून सुशिक्षितांचीही मते कशी मातकट होतात याचे हे उदाहरण. अफझलखानाचा वध करणारे शिवाजी हे हिंदू-विरुद्ध-मुस्लिम चे प्रतिक म्हणून प्रचार करून शिवाजींची प्रतिमा/इतिहास बदलण्याचे पातक काही विशिष्ट लोकांनी केले. खरे काय? शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या. कथेचं काय? इथे ती बाई व्यवसायहेतू हे पुतळे विकते, तीचे शिक्षण-विचारसरणी-मूल्ये लेखकांइतकी उच्च नक्कीच नसतील. ती अर्थव्यवस्थेच्या गरजेअनुरूप वागत आहे. त्यात तिला स्वतः न जाणवणारी धार्मिक बाब लेखकांना जाणवते व लेखकराव त्यांनीच शोधलेल्या तिच्या (गरजेपोटी आलेल्या) धर्मनिरपेक्षपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतात. अफझलखानास मुस्लिम धर्म चिकटवतात व शिवाजींस हिंदू धर्म चिकटवतात. स्वतःचीच धर्मांध प्रतिमा या कथेतून उभं राहतांना त्यांना जाणवत नाही पण ते अशिक्षित गरीब बाईंच्या धार्मिक मूल्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न करतात. प्रतिसादकांचं काय? नेहमीचे यशस्वी लोक आपआपली नेहमीची आयुधे घेऊन नेहमीचे तीर सोडतायत. कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून? कथेवर चर्चा सोडून भलतेच विषय घेऊन एकमेकांवर फुटकळ शरसंधान करण्यात काय मिळतं? खरंच ही कथा शिवाजी-अफझलखान भेटीवर आहे? असो. प्रत्येकाच्या मनोरंजनाचे आपआपले फंडे असतात. कुठल्या दुखर्‍या नसा कोण कुठं कुरवाळीत बसेल ज्याचे त्याला ठवुक. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

असाच काहीसा आपल्यासारखा सूर मी माझ्या "शिवजयंती हायजँक ????" या धाग्यात लावलेला. त्यामुळे आपल्या या सुज्ञ प्रतिक्रियेला माझे अनुमोदन.

" कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून?" तेही बरचसं धडधडीत खोटं.. अगदी असंच मला नेहमी वाटत या सेक्युलर लोकांच्या बाबतीत. यांच्या म्हणण्याप्रमाणे अफजलखान विजापूरहून निघून वाई ला येईपर्यंत काय शांतीचा संदेश पेरत आला होता असंच असं असतांना करंटे लोक आफ्जुल्याची दाढी बघतात म्हणजे काय? !!! बरं मग मग जर अफजलखानाचा वधाचे चित्र लावून खाली "दहशतवाद असाच संपवावा लागतो" असं चित्र दिसला तरी या सेक्युलर आणि शांती प्रिय लोकांना का मिरची लागते हे मात्र न कळलेले कोडे आहे !! मग ते शांतीप्रिय लोक चित्रे फाडतात, दगडफेक करतात अगदी मग हिंदू दैवतांच्या मूर्तींची विटम्बना होते, जाळपोळ आणि दंगल होते. त्यांना हेच ज्ञानामृत पाजण्याचे शानपन ( पक्षी: धारिष्ट्य) हे सेक्युलर विचारवंत लोक का दाखवत नाहीत असं विचारणे म्हणजे विचारणारे अजून धर्मांध. असो. लोकशाही है. चल्नेकाच . .

In reply to by दत्ता जोशी

दत्ताजी, काही प्रश्न आहेत. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?

In reply to by तर्राट जोकर

अफजलखान केवळ सरदार होता. पण गनिम शहेनशहा जर वाइइट होते तर त्यांच्या दारात रांग लावायला जाणे , माझ्या मुलाला जहागिरी द्या अशी पत्रे लिहिणे , असे प्रकार बाकीच्चे राजे का करत होते ?