Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 19:48
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक. कहाणी: स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही. अभिनय: मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता. दिग्दर्शन: संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की. संगीत आणि गीतकार: मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे. मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
  • Log in or register to post comments
  • 19941 views

प्रतिक्रिया

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 19:59

Permalink

परीक्षण छान छान मला मुळात सई

परीक्षण छान छान मला मुळात सई आणि स्वप्निलजोशी हे कपल म्हणूनच आवडत नही तुमच परीक्षण वाचुन बघ्नेब्ल वाटतोय टीवी वर येईल तेव्हां बघू :)
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:01

Permalink

^^^^^^^^^^^^

^^^^^^^^^^^^ हीच मानसिकता आहे मराठी "फुकटात" बघण्याची, म्हणून मराठी चित्रपट टिकत नाही आणि सरकारला कायदा करावा लागतो कि "प्राइम टाईम" द्या म्हणून
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 10/01/2015 - 23:18

In reply to ^^^^^^^^^^^^ by समीर_happy go lucky

Permalink

चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो

चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो असं कुणी सांगितलं काका? कानाकोपर्‍यात घुसनारे टूथ्ब्रश, तिखटमिठापासून मिर्ची-कोथींबीरीपर्यंत कचकून भरलेल्या टूथ्पेस्ट, चार बाय चार चं बाथरूम हजार स्वेफूट राजेशाही बनव्ण्याचा दावा करणारी साबणं, कसले तरी वाय-झेड नावाचे अनाकलनीय व सायन्सच्या तिन्ही शाखांच्या हाती अजूनही न लागलेले विटामिन्स भरलेले शाम्पू, पोरांना युरिआ घातलेल्या रोपांसारखे दुप्पट वेगाने वाढवणारी बोर्न्विटा-कॉम्प्लॅन, आधीच घाण मिस्ळलेली सफेदीकिचम्कारवाली पावडरी, स्वस्त पेन, म्हाग पेन, पेन्सिल, दफ्तर, खायचं तेल, लावायचं तेल, दोनचाकी, चारचाकी, त्यांच्यात टाकायचे पेट्रोल-डीजेल,ऑईल, ते घ्यायल्या पैसे पुरवणार्‍या बँका, घोळात घेणारे इन्सुरन्सप्लान, टी.वी, फ्रीज, बॉडीस्प्रे नावाची बिन्कामाची धुराडं, वीजेच्या बीलानीच गार करणारा एसी, सतत हे विकत घ्या ते विकत घ्या करणार्‍या वेबसाईट्स, माण्साला कम्प्लीट येडा बनवणारी कापडं, दाढ्यांचे केस काढनारे निरनिराळ्या आकारचे फावडे, त्यासाठी भरपूर फेस आणणर्‍या क्रिमा, काळ्याम्हशीला लावाल तर तीचा कॉन्फीडन्स वाढून दहापट दूध देइल असा दावा करणार्‍या पांढर्‍या-प्रेमळ क्रिम्स, फर्निचर, घरं, ते (किंवा तुम्हाला) बनवनारी माणसं, त्याचे पेंट्स, त्याखाली पुट्टी, त्यावर फिनिशींग करणारे सेलेब्रिटी, त्यांची कमोडं, विमानं, परदेशी लोकांची चित्रात सुंदर दिसणारी अनाकलनीय पर्यटनस्थळं, ते फिरवून आनन्याचा दावा करणारी कित्येक हिम्द्केसरी, हे सर्व बघून डोकेदुखी होइल म्हणून काळजी करणारे औषध-उत्पादक, टीवी-बघुन-बघुन तुमचे कंबर-पाठ दुखून्ये म्हणुन लोशनं, लादीपुसायची लिक्वीडं, भांडीघासायची साबणं, फक्त ९५ हजारात गरज नसलेले गुडघे बदलून देणारी मानसाची ग्यारेजं, पोरांना डोक्याने आणि आइबापांना खिशाने हलकी करणारे गोळ्या-बिस्किटं-वेफरे, वायूभरलेली पेयं, स्टेट्स वाढल्याचा फील देनारी अमेरिकन वडापाव-भुर्जीपावची दुकानं, फुंकर मारली की धारावीचं स्वित्झर्लंड बनवणार्‍या गोळ्या, सनीताइच्याअनुभवानेसिद्ध छ्त्र्या............................... इतकं सगळं घ्यायला लागतं तेव्हा कुठे तो तुमचा 'आयुष्यात दुसरं आता काहीच बघण्यासारखं राहीलं नाही'चा फील देणारा चित्रपट बघायला मिळतो. तुम्हाला आम्हास फुक्टे म्हणुन हिणवण्यचा काहीच अधिकार नाही. थेटरात जाऊन तुम्ही फक्त मराठी चित्रपटवाल्यांना जगवता, आम्ही घरी बसून अक्ख्या देशाला जगवतो. आहात कुठं? आले मोठे आम्हाला फुकटे म्हणणारे..... (अवांतरः ते तुमचं प्री़क्षन मधे कहानी मदे काहीच लिवलं नाय, अभ्यास वाडवा, शुभेच्हआ..)
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Fri, 10/02/2015 - 00:42

In reply to चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो by तर्राट जोकर

Permalink

हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत

हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत" जाहिरातींबद्दल,ते सिद्ध करते कि चित्रपटामध्ये (ब्रेकमध्ये) येणाऱ्या जाहिराती या तुम्ही फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बघता आणि कपोलकल्पि "हे घेतलं तर असं ते घेतलं तर तसं" असली मनोराज्ये रचून आपल्याच मनाशी आपल्यात विचारसरणीचे समर्थन करून त्यातच रममाण होत राहता विषयानुरूप: फुकटात बसून सगळी कहाणी वाचून सिनेमाबद्दल आपले जगमान्य मत (!!) काही लोकांना इतरांना सांगण्याची संधी देणे हा परीक्षणाचा हेतू कधीच नसतो तुम्हाला आधी परीक्षण म्हणजे काय या बेसिक अभ्यासाची गरज दिसते आहे त्यामुळे अभ्यास कमीत कमी थोडातरी सुरु करा
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Fri, 10/02/2015 - 11:38

In reply to ^^^^^^^^^^^^ by समीर_happy go lucky

Permalink

चांगले मराठी चित्रपट टिकतात

"तू ही रे" चांगला नसेल तर टी वी वर सुध्दा पाहणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:04

Permalink

सई ताम्हणकरला "बिकिनीवाली

सई ताम्हणकरला "बिकिनीवाली मराठी मुलगी" न समजता मराठी चित्रपट "सौ शशी देवधर" नक्की बघा, कदाचित एक अभिनेत्री म्हणून तुमचे मत बदलेल
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 20:04

Permalink

धन्यवाद लगेच धावून आलात ,आता

धन्यवाद लगेच धावून आलात ,आता मल्टीप्लेक्स मध्य जाउन्न च पाहींन म्हणते माझ्यामुळे उगाच मराठी चित्रपटाच् नुक्सान नको
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 20:08

In reply to धन्यवाद लगेच धावून आलात ,आता by पियुशा

Permalink

तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन

तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन ग्राह्य धरले जातील. तसचं पॉपकॉर्नांचे बादली दिल्यास एखाद्या धाग्यावर मोफत बाजु घेउन मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:10

In reply to तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

च्यायला नाव नाव कुठून

च्यायला नाव नाव कुठून बदलायचं राव मी पा वर??
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 20:16

In reply to च्यायला नाव नाव कुठून by समीर_happy go lucky

Permalink

पैसा किंवा प्रचेतस ह्या

पैसा किंवा प्रचेतस ह्या आयडींना व्यनि करुन काय नावं हवं आहे ते कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 20:23

In reply to तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;

टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;)ही गत आहे तू का म्हनुन्नी बाजू घेणार हम हम है बाकी पानी कम हैँ :प
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 20:25

In reply to टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ; by पियुशा

Permalink

महाभारतामधे साक्षात

महाभारतामधे साक्षात युधिष्टिराधी पांडवांना कृष्णाची आणि दुर्योधनाला मृत्युंजय कर्णाची गरज पडलेली. तुम किस झाड की पत्ती पे बैठा हुआ सुरवंट है?
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 20:30

In reply to महाभारतामधे साक्षात by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

तू कोण म्हणायचा नक्की पांडव

तू कोण म्हणायचा नक्की पांडव का दुर्योधन? आता संपादक काठी घेऊन येतील त्या आधी पळते मी =)
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:07

Permalink

हा टोमणा नसावा अशी आशा आहे

हा टोमणा नसावा अशी आशा आहे आणि चित्रपट बघण्यासाठी हे कारण नको कारण एका तिकिटमुळे "न काही फायदा न काही नुकसान" मी फक्त खर काय ते मत सांगितल राग आला असेल तर सॉरी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 20:25

In reply to हा टोमणा नसावा अशी आशा आहे by समीर_happy go lucky

Permalink

समीर जी मला राग नै आला ओपन

समीर जी मला राग नै आला ओपन फोरम हाय म्हणुन शान आपुन आपल् मत मांडल इतकंच
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 10/01/2015 - 20:12

Permalink

असंय होय! नावावरून मला

असंय होय! नावावरून मला ट्रान्सजेण्डर लोकांवर काढलेला सिनेमा वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:15

In reply to असंय होय! नावावरून मला by आदूबाळ

Permalink

"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??

"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 20:17

In reply to असंय होय! नावावरून मला by आदूबाळ

Permalink

ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! _/\_ तो घोडा, ती शाळा ते मास्तर वाला विनोद आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:19

In reply to ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कस आहे ना "आरश्यासमोर" बसून

कस आहे ना "आरश्यासमोर" बसून कीबोर्ड बडवायची सवय नसल कि होते असं
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/01/2015 - 20:17

Permalink

मला आडनाव वाटलेलं...

मला आडनाव वाटलेलं... तू हिरे.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:20

In reply to मला आडनाव वाटलेलं... by प्यारे१

Permalink

^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव

^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव वाटलं???? मुजरा !!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/01/2015 - 20:22

In reply to ^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव by समीर_happy go lucky

Permalink

तुकाराम हिरे.

तुकाराम हिरे. जयश्री टी चालतंय, व्ही शांताराम चालतंय आणि तू हिरे चालत नाही होय?
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:24

In reply to तुकाराम हिरे. by प्यारे१

Permalink

हा हा हा हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:24

In reply to तुकाराम हिरे. by प्यारे१

Permalink

हा हा हा हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 10/01/2015 - 20:43

Permalink

च्यायला

च्यायला लग्न नवरा बायको पोरं सासु सासरा इतर नातेवाईक विवाहबाह्यप्रकरणं मुळूमुळु प्रेमकहाण्या इन जनरल मानवी नाते संबंधांची गुंतवणुक ह्या सार्‍यातुन मराठी चित्रपट सृष्टी कधी बाहेर पडणार ? म्हणजे मानवी नाते संबंध हा एक पैलु असायला हरकत नाही पण त्या पलीकडेही जग आहे की हो ! एखादा मस्त युध्दपट बनवा की पानिपतावर किंव्वा नारळीकरांच्या अन इतरांच्याही इतक्या विज्ञान कथा आहेत त्यावर सायन्स फिक्स्न बनवा , नारायण धारपांच्या कथांवर भयपट बनवा किंव्वा गेलाबाजार चांगल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे चांगले रीमेक करा , किंवा जरा जुने मराठी चित्रपट सिंहासन वगैरे सारखे काही तरी बनवा , ग्यँग्स ओफ वासएपुर सारखा एखादा गुन्हेगारीवरील चित्रपट बनवा , हॉलीवुड सारखे गॉडफादर , पल्प फिक्श्न , मेमेंटो , शॉश्यँक रीडेंम्पशन सारखे काही बनवायचा प्रयत्न तरी करा राव !!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 10/02/2015 - 17:37

In reply to च्यायला by प्रसाद गोडबोले

Permalink

+१

नॉशिया आलाय लग्न आणि प्रेम याबद्दलच्या नाटकांचा.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 20:47

Permalink

^^^^^^^^^^^^

^^^^^^^^^^^^ चायला घरी बसून टीव्हीवर कोणताही चित्रपट बघता बघता "चिंता करितो विश्वाची" हे एकमेव काम जमणार्या मराठी मानसिकतेला थेटरात आणणार कोण?? कि त्यासाठीही कायदा करायला पाहिजे तुमच्या मते??
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on गुरुवार, 10/01/2015 - 21:28

Permalink

अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा

अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा.. सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंच काम अगदी अत्युत्कृष्टच झालेलं दिसतंय.. उगाच बुवा कोर्टला ऑस्कर साठी पाठवायची घाई केली.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 21:50

In reply to अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा by पिशी अबोली

Permalink

ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट

ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट का?? excellency चे ठोकताळे कोणते?? इंग्रजी सग्गळ सग्गळ उत्तम ही मानसिकता कधी सुटणार काय माहित!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 22:09

In reply to ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट by समीर_happy go lucky

Permalink

अलका कुबलने ज्या मराठीमधे

अलका कुबलने ज्या मराठीमधे थोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिच्चर बनवले त्या भाषेतल्या चित्रपटांवरुन माझा विश्वास कधीचं उडालेला आहे. ए रताळ्या म्हणणारे अनासपुरे साहेब, गलगले निघाले वाला भरत, पती सगळे उचापतीपासुन एकचं एक अ‍ॅक्टिंग करणारे चेतन दळवीसाहेब ह्यांचे चित्रपट पहायचं महान कार्य आम्ही चुकवलं त्याबद्दल क्षमा करा.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 22:37

In reply to अलका कुबलने ज्या मराठीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी

शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी असे मराठीचे दोन प्रकार पडतात (practically हि शहरी लोकांनी यथेच्छ उडवलेली "ए रताळ्या" म्हणण्याची मकरंद अनासपुरेची पद्धत गरमीन भागात मी लोकपिय बघितलेली आहे, साधी सरळ विचार करण्यासारखी गोष्ट आहे, प्रतिसादाचा महापूर असणार्या मराठी चित्रपट दुनियेत, हा गाडी इतका टिकला कसा?? उत्तरापर्यंत पोचलात तर कदाचित विचार बदलतील. आणि हो अलका कुबलचा एक काळ होता त्या काळात इतर कुणी ताकदीच नव्हत म्हणून ती चालून गेली. त्या ७-८ चित्रपटानमुळे सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीवर टीका करणे हे चुकीचे आहे. आणखी एक "गलगले" हि भारत जाधवच्या सही रे सही नाटका मधल्या चार मधली एक व्यक्तिरेखा. त्याबद्दल "उडवणे" या अनुषंगाने मतप्रदर्शित करण्याआधी फक्त एकदा " पुन्हा सही रे सही" बघाच......
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/01/2015 - 22:43

In reply to शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी by समीर_happy go lucky

Permalink

समीर सर ते नाटक जवळपास पाठ

समीर सर ते नाटक जवळपास पाठ आहे माझं. =)) मला मकरंद अनासपुरे किंवा इतर कोणावरही टिका करायची नाहिये. जो तोच तोचपणा नव्या लेबलाखाली मारायचा प्रयत्न चालु आहे त्याबद्दल आक्षेप आहे. केवळ अनुदान मिळतं म्हणुण चित्रपटातला चि पहिला का दुसरा हे माहित नसणारे लोकही यायला लागलेत त्याबद्दल आहे. कलावंत म्हणुन हे सगळे लोकं खंग्री आहेत ह्यात शंका नाही. =))
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 22:49

In reply to समीर सर ते नाटक जवळपास पाठ by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

चुकीची समजूत आहे, मराठी

चुकीची समजूत आहे, मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान- एकूण खर्च - वितरण -प्रतिसाद - निर्मात्याचा फायदा/नुकसान या सगळ्या समजुतीवर आधारित कल्पना आहेत, त्याची खात्री नाही असती तर आज दर पंधरवड्याला एक चित्रपट झळकला असता. आज जी काही थोडी थोडकी मराठी चित्रपट सृष्टी टिकून आहे त्यात उल्लेखलेले लोक हे प्रमुख आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on गुरुवार, 10/01/2015 - 22:16

In reply to ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट by समीर_happy go lucky

Permalink

काही कळेना बुवा तुमच्या

काही कळेना बुवा तुमच्या प्रतिसादातलं विंग्रजी..
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 22:38

In reply to काही कळेना बुवा तुमच्या by पिशी अबोली

Permalink

बर...........

बर...........
  • Log in or register to post comments

Submitted by Sanjay Uwach on गुरुवार, 10/01/2015 - 22:07

Permalink

आयला, तु ही रे वरून आ ss रे !

आयला, तु ही रे वरून आ ss रे ! तु ss रे ! झाले नाही म्हणजे मिळवले
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 22:40

In reply to आयला, तु ही रे वरून आ ss रे ! by Sanjay Uwach

Permalink

विनोद?? काहीही जमला नाही !!!!

विनोद?? काहीही जमला नाही !!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 10/01/2015 - 22:30

Permalink

स्वप्नील जोशीसारख्या

स्वप्नील जोशीसारख्या अभिनेत्यासाठी चित्रपटगृहात जाण्याचा प्रश्न येतच नाही. जालावर येईल तेंव्हाच फुकट बघितला तर बघेन. तुम्ही पाच पैकी पाच चांदण्या देताय म्हणजे निदान झोप तरी येणार नाही अशी ग्यारेंटी आहे असे मानते. आत्ता त्याचा ट्रेलर बघितला व गांव की गोरी सई शहरात येऊन झक्क दिसतिये असे नोटीस केल्या गेले आहे. ;) ती अभिनेत्री म्हणून मला बरी वाटते. दुसर्‍या मुलीचे काम फक्त नांदीमध्येच बघितलेय.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 22:40

In reply to स्वप्नील जोशीसारख्या by रेवती

Permalink

मी स्वप्नील जोशी किंवा सी

मी स्वप्नील जोशी किंवा सी ताम्हणकरचा आक्रमक चाहता वगेरे नाही, त्यामुळे तुमचे वैयक्तिक मत पटले
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 22:54

In reply to मी स्वप्नील जोशी किंवा सी by समीर_happy go lucky

Permalink

अस बघा काहिना काहीही आवाडु

अस बघा काहिना काहीही आवाडु शकत आपल्याला रटाळ वाटनारे पिक्चर एखाद्याला सुप्पर वाटू शकतात किना सिचुएशन उलटी पण होते ज्याची त्याची आवड इत्यादि त्यामुळे लेख लिखनेका और मिपाको अर्पण करनेका ज्यादा सोचनेका नै खानेका पीनेका मस्त मस्त पिक्चर देखनेका और इधर कुछ दिलपे मत लेनेका वोक्के =)
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:01

In reply to अस बघा काहिना काहीही आवाडु by पियुशा

Permalink

बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय

बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय आणि इथे आल्यावर मला ऑर्कुटवर परतल्यासारख वाटते आहे नथिन्ग ब्ट्बट्फिक बट आय लाइक्ड धिस ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 10/03/2015 - 17:38

In reply to बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय by समीर_happy go lucky

Permalink

ऑर्कुट म्हटल्यावर मला

ऑर्कुट म्हटल्यावर मला मायबोलीवरच्या एका दे दणादण धागे पाड आयडीची आठवण झालेय! कहीं, आप वोही तो नहीं? अवांतरः नसूदेत, नसूदेत, नसूदेत रे बाप्पा!
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 10/01/2015 - 23:03

Permalink

ब्ट्बट्फिक हे काय होत?

ब्ट्बट्फिक हे काय होत?
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:06

In reply to ब्ट्बट्फिक हे काय होत? by पियुशा

Permalink

"स्पेसिफिक" इट वास टायपो

"स्पेसिफिक" इट वास टायपो
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 10/01/2015 - 23:30

In reply to ब्ट्बट्फिक हे काय होत? by पियुशा

Permalink

बटबटीत + स्पेसिफिक चा

बटबटीत + स्पेसिफिक चा मध्यमपदलोपी समास.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 10/02/2015 - 17:51

In reply to बटबटीत + स्पेसिफिक चा by आदूबाळ

Permalink

महा लोल =))

महा लोल =))
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on गुरुवार, 10/01/2015 - 23:04

Permalink

मुळात सई ताम्हणकर आणि

मुळात सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी दोघेही आवडत नसल्याने चिञपट पाहीला जाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:08

In reply to मुळात सई ताम्हणकर आणि by कविता१९७८

Permalink

आपण बघत नाही म्हणजे कुणीच

आपण बघत नाही म्हणजे कुणीच बघणार नाही या समजुती मागे तर्क कोणता??
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on गुरुवार, 10/01/2015 - 23:10

In reply to आपण बघत नाही म्हणजे कुणीच by समीर_happy go lucky

Permalink

अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन

अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन पाहीला जाणार नाही , बाकीच्यानी पाहायला हवा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्नय
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:12

In reply to अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन by कविता१९७८

Permalink

मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस

मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस काय?? हे निखळ सत्य आहे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com