✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी चित्रपट - "तू ही रे"

स
समीर_happy go lucky यांनी
गुरुवार, 10/01/2015 - 19:48  ·  लेख
लेख
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक. कहाणी: स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही. अभिनय: मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता. दिग्दर्शन: संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की. संगीत आणि गीतकार: मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे. मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
19941 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

परीक्षण छान छान मला मुळात सई

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 19:59 नवीन
परीक्षण छान छान मला मुळात सई आणि स्वप्निलजोशी हे कपल म्हणूनच आवडत नही तुमच परीक्षण वाचुन बघ्नेब्ल वाटतोय टीवी वर येईल तेव्हां बघू :)
  • Log in or register to post comments

^^^^^^^^^^^^

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:01 नवीन
^^^^^^^^^^^^ हीच मानसिकता आहे मराठी "फुकटात" बघण्याची, म्हणून मराठी चित्रपट टिकत नाही आणि सरकारला कायदा करावा लागतो कि "प्राइम टाईम" द्या म्हणून
  • Log in or register to post comments

चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो

तर्राट जोकर
गुरुवार, 10/01/2015 - 23:18 नवीन
चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो असं कुणी सांगितलं काका? कानाकोपर्‍यात घुसनारे टूथ्ब्रश, तिखटमिठापासून मिर्ची-कोथींबीरीपर्यंत कचकून भरलेल्या टूथ्पेस्ट, चार बाय चार चं बाथरूम हजार स्वेफूट राजेशाही बनव्ण्याचा दावा करणारी साबणं, कसले तरी वाय-झेड नावाचे अनाकलनीय व सायन्सच्या तिन्ही शाखांच्या हाती अजूनही न लागलेले विटामिन्स भरलेले शाम्पू, पोरांना युरिआ घातलेल्या रोपांसारखे दुप्पट वेगाने वाढवणारी बोर्न्विटा-कॉम्प्लॅन, आधीच घाण मिस्ळलेली सफेदीकिचम्कारवाली पावडरी, स्वस्त पेन, म्हाग पेन, पेन्सिल, दफ्तर, खायचं तेल, लावायचं तेल, दोनचाकी, चारचाकी, त्यांच्यात टाकायचे पेट्रोल-डीजेल,ऑईल, ते घ्यायल्या पैसे पुरवणार्‍या बँका, घोळात घेणारे इन्सुरन्सप्लान, टी.वी, फ्रीज, बॉडीस्प्रे नावाची बिन्कामाची धुराडं, वीजेच्या बीलानीच गार करणारा एसी, सतत हे विकत घ्या ते विकत घ्या करणार्‍या वेबसाईट्स, माण्साला कम्प्लीट येडा बनवणारी कापडं, दाढ्यांचे केस काढनारे निरनिराळ्या आकारचे फावडे, त्यासाठी भरपूर फेस आणणर्‍या क्रिमा, काळ्याम्हशीला लावाल तर तीचा कॉन्फीडन्स वाढून दहापट दूध देइल असा दावा करणार्‍या पांढर्‍या-प्रेमळ क्रिम्स, फर्निचर, घरं, ते (किंवा तुम्हाला) बनवनारी माणसं, त्याचे पेंट्स, त्याखाली पुट्टी, त्यावर फिनिशींग करणारे सेलेब्रिटी, त्यांची कमोडं, विमानं, परदेशी लोकांची चित्रात सुंदर दिसणारी अनाकलनीय पर्यटनस्थळं, ते फिरवून आनन्याचा दावा करणारी कित्येक हिम्द्केसरी, हे सर्व बघून डोकेदुखी होइल म्हणून काळजी करणारे औषध-उत्पादक, टीवी-बघुन-बघुन तुमचे कंबर-पाठ दुखून्ये म्हणुन लोशनं, लादीपुसायची लिक्वीडं, भांडीघासायची साबणं, फक्त ९५ हजारात गरज नसलेले गुडघे बदलून देणारी मानसाची ग्यारेजं, पोरांना डोक्याने आणि आइबापांना खिशाने हलकी करणारे गोळ्या-बिस्किटं-वेफरे, वायूभरलेली पेयं, स्टेट्स वाढल्याचा फील देनारी अमेरिकन वडापाव-भुर्जीपावची दुकानं, फुंकर मारली की धारावीचं स्वित्झर्लंड बनवणार्‍या गोळ्या, सनीताइच्याअनुभवानेसिद्ध छ्त्र्या............................... इतकं सगळं घ्यायला लागतं तेव्हा कुठे तो तुमचा 'आयुष्यात दुसरं आता काहीच बघण्यासारखं राहीलं नाही'चा फील देणारा चित्रपट बघायला मिळतो. तुम्हाला आम्हास फुक्टे म्हणुन हिणवण्यचा काहीच अधिकार नाही. थेटरात जाऊन तुम्ही फक्त मराठी चित्रपटवाल्यांना जगवता, आम्ही घरी बसून अक्ख्या देशाला जगवतो. आहात कुठं? आले मोठे आम्हाला फुकटे म्हणणारे..... (अवांतरः ते तुमचं प्री़क्षन मधे कहानी मदे काहीच लिवलं नाय, अभ्यास वाडवा, शुभेच्हआ..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत

समीर_happy go lucky
Fri, 10/02/2015 - 00:42 नवीन
हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत" जाहिरातींबद्दल,ते सिद्ध करते कि चित्रपटामध्ये (ब्रेकमध्ये) येणाऱ्या जाहिराती या तुम्ही फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बघता आणि कपोलकल्पि "हे घेतलं तर असं ते घेतलं तर तसं" असली मनोराज्ये रचून आपल्याच मनाशी आपल्यात विचारसरणीचे समर्थन करून त्यातच रममाण होत राहता विषयानुरूप: फुकटात बसून सगळी कहाणी वाचून सिनेमाबद्दल आपले जगमान्य मत (!!) काही लोकांना इतरांना सांगण्याची संधी देणे हा परीक्षणाचा हेतू कधीच नसतो तुम्हाला आधी परीक्षण म्हणजे काय या बेसिक अभ्यासाची गरज दिसते आहे त्यामुळे अभ्यास कमीत कमी थोडातरी सुरु करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चांगले मराठी चित्रपट टिकतात

नया है वह
Fri, 10/02/2015 - 11:38 नवीन
"तू ही रे" चांगला नसेल तर टी वी वर सुध्दा पाहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

सई ताम्हणकरला "बिकिनीवाली

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:04 नवीन
सई ताम्हणकरला "बिकिनीवाली मराठी मुलगी" न समजता मराठी चित्रपट "सौ शशी देवधर" नक्की बघा, कदाचित एक अभिनेत्री म्हणून तुमचे मत बदलेल
  • Log in or register to post comments

धन्यवाद लगेच धावून आलात ,आता

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 20:04 नवीन
धन्यवाद लगेच धावून आलात ,आता मल्टीप्लेक्स मध्य जाउन्न च पाहींन म्हणते माझ्यामुळे उगाच मराठी चित्रपटाच् नुक्सान नको
  • Log in or register to post comments

तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 20:08 नवीन
तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन ग्राह्य धरले जातील. तसचं पॉपकॉर्नांचे बादली दिल्यास एखाद्या धाग्यावर मोफत बाजु घेउन मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

च्यायला नाव नाव कुठून

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:10 नवीन
च्यायला नाव नाव कुठून बदलायचं राव मी पा वर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा किंवा प्रचेतस ह्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 20:16 नवीन
पैसा किंवा प्रचेतस ह्या आयडींना व्यनि करुन काय नावं हवं आहे ते कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 20:23 नवीन
टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;)ही गत आहे तू का म्हनुन्नी बाजू घेणार हम हम है बाकी पानी कम हैँ :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

महाभारतामधे साक्षात

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 20:25 नवीन
महाभारतामधे साक्षात युधिष्टिराधी पांडवांना कृष्णाची आणि दुर्योधनाला मृत्युंजय कर्णाची गरज पडलेली. तुम किस झाड की पत्ती पे बैठा हुआ सुरवंट है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

तू कोण म्हणायचा नक्की पांडव

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 20:30 नवीन
तू कोण म्हणायचा नक्की पांडव का दुर्योधन? आता संपादक काठी घेऊन येतील त्या आधी पळते मी =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हा टोमणा नसावा अशी आशा आहे

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:07 नवीन
हा टोमणा नसावा अशी आशा आहे आणि चित्रपट बघण्यासाठी हे कारण नको कारण एका तिकिटमुळे "न काही फायदा न काही नुकसान" मी फक्त खर काय ते मत सांगितल राग आला असेल तर सॉरी!!!
  • Log in or register to post comments

समीर जी मला राग नै आला ओपन

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 20:25 नवीन
समीर जी मला राग नै आला ओपन फोरम हाय म्हणुन शान आपुन आपल् मत मांडल इतकंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

असंय होय! नावावरून मला

आदूबाळ
गुरुवार, 10/01/2015 - 20:12 नवीन
असंय होय! नावावरून मला ट्रान्सजेण्डर लोकांवर काढलेला सिनेमा वाटला.
  • Log in or register to post comments

"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:15 नवीन
"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 20:17 नवीन
ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! _/\_ तो घोडा, ती शाळा ते मास्तर वाला विनोद आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कस आहे ना "आरश्यासमोर" बसून

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:19 नवीन
कस आहे ना "आरश्यासमोर" बसून कीबोर्ड बडवायची सवय नसल कि होते असं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मला आडनाव वाटलेलं...

प्यारे१
गुरुवार, 10/01/2015 - 20:17 नवीन
मला आडनाव वाटलेलं... तू हिरे.
  • Log in or register to post comments

^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:20 नवीन
^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव वाटलं???? मुजरा !!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुकाराम हिरे.

प्यारे१
गुरुवार, 10/01/2015 - 20:22 नवीन
तुकाराम हिरे. जयश्री टी चालतंय, व्ही शांताराम चालतंय आणि तू हिरे चालत नाही होय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

हा हा हा हा हा हा हा हा हा

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:24 नवीन
हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा हा हा हा हा हा हा हा हा

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:24 नवीन
हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

च्यायला

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 10/01/2015 - 20:43 नवीन
च्यायला लग्न नवरा बायको पोरं सासु सासरा इतर नातेवाईक विवाहबाह्यप्रकरणं मुळूमुळु प्रेमकहाण्या इन जनरल मानवी नाते संबंधांची गुंतवणुक ह्या सार्‍यातुन मराठी चित्रपट सृष्टी कधी बाहेर पडणार ? म्हणजे मानवी नाते संबंध हा एक पैलु असायला हरकत नाही पण त्या पलीकडेही जग आहे की हो ! एखादा मस्त युध्दपट बनवा की पानिपतावर किंव्वा नारळीकरांच्या अन इतरांच्याही इतक्या विज्ञान कथा आहेत त्यावर सायन्स फिक्स्न बनवा , नारायण धारपांच्या कथांवर भयपट बनवा किंव्वा गेलाबाजार चांगल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे चांगले रीमेक करा , किंवा जरा जुने मराठी चित्रपट सिंहासन वगैरे सारखे काही तरी बनवा , ग्यँग्स ओफ वासएपुर सारखा एखादा गुन्हेगारीवरील चित्रपट बनवा , हॉलीवुड सारखे गॉडफादर , पल्प फिक्श्न , मेमेंटो , शॉश्यँक रीडेंम्पशन सारखे काही बनवायचा प्रयत्न तरी करा राव !!
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Fri, 10/02/2015 - 17:37 नवीन
नॉशिया आलाय लग्न आणि प्रेम याबद्दलच्या नाटकांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

^^^^^^^^^^^^

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 20:47 नवीन
^^^^^^^^^^^^ चायला घरी बसून टीव्हीवर कोणताही चित्रपट बघता बघता "चिंता करितो विश्वाची" हे एकमेव काम जमणार्या मराठी मानसिकतेला थेटरात आणणार कोण?? कि त्यासाठीही कायदा करायला पाहिजे तुमच्या मते??
  • Log in or register to post comments

अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा

पिशी अबोली
गुरुवार, 10/01/2015 - 21:28 नवीन
अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा.. सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंच काम अगदी अत्युत्कृष्टच झालेलं दिसतंय.. उगाच बुवा कोर्टला ऑस्कर साठी पाठवायची घाई केली.. ;-)
  • Log in or register to post comments

ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 21:50 नवीन
ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट का?? excellency चे ठोकताळे कोणते?? इंग्रजी सग्गळ सग्गळ उत्तम ही मानसिकता कधी सुटणार काय माहित!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

अलका कुबलने ज्या मराठीमधे

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 22:09 नवीन
अलका कुबलने ज्या मराठीमधे थोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिच्चर बनवले त्या भाषेतल्या चित्रपटांवरुन माझा विश्वास कधीचं उडालेला आहे. ए रताळ्या म्हणणारे अनासपुरे साहेब, गलगले निघाले वाला भरत, पती सगळे उचापतीपासुन एकचं एक अ‍ॅक्टिंग करणारे चेतन दळवीसाहेब ह्यांचे चित्रपट पहायचं महान कार्य आम्ही चुकवलं त्याबद्दल क्षमा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 22:37 नवीन
शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी असे मराठीचे दोन प्रकार पडतात (practically हि शहरी लोकांनी यथेच्छ उडवलेली "ए रताळ्या" म्हणण्याची मकरंद अनासपुरेची पद्धत गरमीन भागात मी लोकपिय बघितलेली आहे, साधी सरळ विचार करण्यासारखी गोष्ट आहे, प्रतिसादाचा महापूर असणार्या मराठी चित्रपट दुनियेत, हा गाडी इतका टिकला कसा?? उत्तरापर्यंत पोचलात तर कदाचित विचार बदलतील. आणि हो अलका कुबलचा एक काळ होता त्या काळात इतर कुणी ताकदीच नव्हत म्हणून ती चालून गेली. त्या ७-८ चित्रपटानमुळे सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीवर टीका करणे हे चुकीचे आहे. आणखी एक "गलगले" हि भारत जाधवच्या सही रे सही नाटका मधल्या चार मधली एक व्यक्तिरेखा. त्याबद्दल "उडवणे" या अनुषंगाने मतप्रदर्शित करण्याआधी फक्त एकदा " पुन्हा सही रे सही" बघाच......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

समीर सर ते नाटक जवळपास पाठ

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 22:43 नवीन
समीर सर ते नाटक जवळपास पाठ आहे माझं. =)) मला मकरंद अनासपुरे किंवा इतर कोणावरही टिका करायची नाहिये. जो तोच तोचपणा नव्या लेबलाखाली मारायचा प्रयत्न चालु आहे त्याबद्दल आक्षेप आहे. केवळ अनुदान मिळतं म्हणुण चित्रपटातला चि पहिला का दुसरा हे माहित नसणारे लोकही यायला लागलेत त्याबद्दल आहे. कलावंत म्हणुन हे सगळे लोकं खंग्री आहेत ह्यात शंका नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

चुकीची समजूत आहे, मराठी

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 22:49 नवीन
चुकीची समजूत आहे, मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान- एकूण खर्च - वितरण -प्रतिसाद - निर्मात्याचा फायदा/नुकसान या सगळ्या समजुतीवर आधारित कल्पना आहेत, त्याची खात्री नाही असती तर आज दर पंधरवड्याला एक चित्रपट झळकला असता. आज जी काही थोडी थोडकी मराठी चित्रपट सृष्टी टिकून आहे त्यात उल्लेखलेले लोक हे प्रमुख आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काही कळेना बुवा तुमच्या

पिशी अबोली
गुरुवार, 10/01/2015 - 22:16 नवीन
काही कळेना बुवा तुमच्या प्रतिसादातलं विंग्रजी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

बर...........

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 22:38 नवीन
बर...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

आयला, तु ही रे वरून आ ss रे !

Sanjay Uwach
गुरुवार, 10/01/2015 - 22:07 नवीन
आयला, तु ही रे वरून आ ss रे ! तु ss रे ! झाले नाही म्हणजे मिळवले
  • Log in or register to post comments

विनोद?? काहीही जमला नाही !!!!

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 22:40 नवीन
विनोद?? काहीही जमला नाही !!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

स्वप्नील जोशीसारख्या

रेवती
गुरुवार, 10/01/2015 - 22:30 नवीन
स्वप्नील जोशीसारख्या अभिनेत्यासाठी चित्रपटगृहात जाण्याचा प्रश्न येतच नाही. जालावर येईल तेंव्हाच फुकट बघितला तर बघेन. तुम्ही पाच पैकी पाच चांदण्या देताय म्हणजे निदान झोप तरी येणार नाही अशी ग्यारेंटी आहे असे मानते. आत्ता त्याचा ट्रेलर बघितला व गांव की गोरी सई शहरात येऊन झक्क दिसतिये असे नोटीस केल्या गेले आहे. ;) ती अभिनेत्री म्हणून मला बरी वाटते. दुसर्‍या मुलीचे काम फक्त नांदीमध्येच बघितलेय.
  • Log in or register to post comments

मी स्वप्नील जोशी किंवा सी

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 22:40 नवीन
मी स्वप्नील जोशी किंवा सी ताम्हणकरचा आक्रमक चाहता वगेरे नाही, त्यामुळे तुमचे वैयक्तिक मत पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अस बघा काहिना काहीही आवाडु

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 22:54 नवीन
अस बघा काहिना काहीही आवाडु शकत आपल्याला रटाळ वाटनारे पिक्चर एखाद्याला सुप्पर वाटू शकतात किना सिचुएशन उलटी पण होते ज्याची त्याची आवड इत्यादि त्यामुळे लेख लिखनेका और मिपाको अर्पण करनेका ज्यादा सोचनेका नै खानेका पीनेका मस्त मस्त पिक्चर देखनेका और इधर कुछ दिलपे मत लेनेका वोक्के =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 23:01 नवीन
बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय आणि इथे आल्यावर मला ऑर्कुटवर परतल्यासारख वाटते आहे नथिन्ग ब्ट्बट्फिक बट आय लाइक्ड धिस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

ऑर्कुट म्हटल्यावर मला

यशोधरा
Sat, 10/03/2015 - 17:38 नवीन
ऑर्कुट म्हटल्यावर मला मायबोलीवरच्या एका दे दणादण धागे पाड आयडीची आठवण झालेय! कहीं, आप वोही तो नहीं? अवांतरः नसूदेत, नसूदेत, नसूदेत रे बाप्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

ब्ट्बट्फिक हे काय होत?

पियुशा
गुरुवार, 10/01/2015 - 23:03 नवीन
ब्ट्बट्फिक हे काय होत?
  • Log in or register to post comments

"स्पेसिफिक" इट वास टायपो

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 23:06 नवीन
"स्पेसिफिक" इट वास टायपो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

बटबटीत + स्पेसिफिक चा

आदूबाळ
गुरुवार, 10/01/2015 - 23:30 नवीन
बटबटीत + स्पेसिफिक चा मध्यमपदलोपी समास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

महा लोल =))

अजया
Fri, 10/02/2015 - 17:51 नवीन
महा लोल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मुळात सई ताम्हणकर आणि

कविता१९७८
गुरुवार, 10/01/2015 - 23:04 नवीन
मुळात सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी दोघेही आवडत नसल्याने चिञपट पाहीला जाणार नाही.
  • Log in or register to post comments

आपण बघत नाही म्हणजे कुणीच

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 23:08 नवीन
आपण बघत नाही म्हणजे कुणीच बघणार नाही या समजुती मागे तर्क कोणता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन

कविता१९७८
गुरुवार, 10/01/2015 - 23:10 नवीन
अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन पाहीला जाणार नाही , बाकीच्यानी पाहायला हवा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्नय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस

समीर_happy go lucky
गुरुवार, 10/01/2015 - 23:12 नवीन
मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस काय?? हे निखळ सत्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा