Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 19:48
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक. कहाणी: स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही. अभिनय: मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता. दिग्दर्शन: संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की. संगीत आणि गीतकार: मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे. मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
  • Log in or register to post comments
  • 19941 views

प्रतिक्रिया

Submitted by कविता१९७८ on गुरुवार, 10/01/2015 - 23:14

In reply to मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस by समीर_happy go lucky

Permalink

अच्छा

अच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/01/2015 - 23:11

Permalink

समीर भौ, आणखी कुठल्या मराठी

समीर भौ, आणखी कुठल्या मराठी संस्थळावर आहात काय? आपका कुंभ के मेले मे बिछडा हुआ एक भाई हमको दुसरे एक संस्थळ पे दिखा था. वहा पे हम कधी कधी फक्त 'गुड मॉर्निंग मॅडम' कहने जाते थे! -प्यार्टाकस.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:13

In reply to समीर भौ, आणखी कुठल्या मराठी by प्यारे१

Permalink

फेस्बुक

फेस्बुक
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/01/2015 - 23:20

In reply to फेस्बुक by समीर_happy go lucky

Permalink

नवीन मराठी संस्थळ

नवीन मराठी संस्थळ कळवल्याबद्दल आभारी आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on गुरुवार, 10/01/2015 - 23:24

In reply to नवीन मराठी संस्थळ by प्यारे१

Permalink

कुंभमेळ्यात बिछड्लेल्या

कुंभमेळ्यात बिछड्लेल्या भावांना मिळवणार्या स्पार्टाकस या ग्रीक महापुरुषासाठी एका मराठी संस्थळावर काही मदत करायला मिळणे हे माझ भाग्य हो, आभार कसले त्यात??
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Fri, 10/02/2015 - 11:34

Permalink

असहमत

मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो
हे फक्त Bollywood ला लागु होतं
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Fri, 10/02/2015 - 11:44

Permalink

चित्रपट मनोरंजनासाठी असतो

चित्रपट मनोरंजनासाठी असतो केवळ भाषा हा निकश डॉळ्यासमोर ठेवुन तो मी कधीच बघणार नाही, कुनेच बघत नाही त्यामुळे बेटर इट शुड बी अमेसिंग...
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 10/02/2015 - 12:02

Permalink

स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई

स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी तेजस्विनी पंडित आणि गिरीश ओक नवरा बायको दाखवले आहेत चित्रपटामध्ये??????????????????? गिरीश ओक म्हणजे गिरीजा ओक यांचे पिताश्री ना? गिरीजा ओक आणि तेजस्विनी पंडित यांच्या वयात फारसा फरक नसावा. जरठ - कुमारी विवाह दाखवला आहे का चित्रपटात?
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Fri, 10/02/2015 - 14:00

In reply to स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई by मृत्युन्जय

Permalink

बाप-मुलगी एक असंही नातअसते

बाप-मुलगी एक असंही नातअसते घराघरात, कदाचित माहीतही असेल
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 10/02/2015 - 14:05

In reply to बाप-मुलगी एक असंही नातअसते by समीर_happy go lucky

Permalink

वाक्य रचना योग्य असणं हेही

वाक्य रचना योग्य असणं हेही महत्त्वाचं असतं मालक. त्या दोघांची मुलगी म्हणजे कुणाची मुलगी? मृत्युंजय ने त्याबाबत विचारलं आहे. स्व जो स ता आणि त्या दोघांची मुलगी हवं ना? ते गिरिजा ओक आणि ज्येष्ठ कलाकार यांच्याबद्दल वाटतंय. वाक्य पुन्हा वाचून नंतर चावा आपलं लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 10/02/2015 - 14:06

In reply to वाक्य रचना योग्य असणं हेही by प्यारे१

Permalink

ते गिरीश ओक आणि तेजस्विनी

ते गिरीश ओक आणि तेजस्विनी पंडीत असं वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 10/03/2015 - 16:02

In reply to बाप-मुलगी एक असंही नातअसते by समीर_happy go lucky

Permalink

काय बोलता. नात्यांची थोडीथोडी

काय बोलता. नात्यांची थोडीथोडी जाण आहे म्हणता तुम्हाला मग. जरा वाक्यरचना नीट करा की मग.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/02/2015 - 12:06

Permalink

पकाऊ परिक्षण, खड्यासारखे

पकाऊ परिक्षण, खड्यासारखे लागणारे इंग्रजी शब्द, परिक्षणासाठी निवडलेला चुकीचा फॉर्म अन थोडी अकृत्रिम भाषा. नाही आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/02/2015 - 12:34

In reply to पकाऊ परिक्षण, खड्यासारखे by अभ्या..

Permalink

अभ्या शांत हो

शांत हो
काही जण पटाईतपणे उत्पादनांची जाहीरात करतात काही जण सराईतपणे.
जर सिनेमा खरंच चांगला असेल तर परिक्षणा-सुचविण्याची गरज भासाणार नाही आणि नाहीतर त्याचा टाईमपास-२ आप्सूकच होईल. अभामिपामांकासंचालीतभुस्काटसिनेमेलक्तरेलोळविण्संघाचे धोतरफेड्समीक्षण समीती सभासद.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Fri, 10/02/2015 - 14:01

In reply to पकाऊ परिक्षण, खड्यासारखे by अभ्या..

Permalink

असो, वाचल्याबद्दल (बारकाईने)

असो, वाचल्याबद्दल (बारकाईने) धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 10/02/2015 - 12:09

Permalink

तू ही रे पाहिला.

मला त्यात एकूण तीन गोष्टी आवडल्या - सई, तेजस्विनी आणि द एन्डची पाटी. संजय जाधव मूळचे कॅमेरामन असल्यामुळे प्रत्येक फ्रेम चकाचक आणि ग्लाॅसी आहे पण कथेच्या नावाने बोंब आहेे. रच्याकने माझ्या मनात आलेला विचार - स्वप्निलची बायको तेजस्विनी दाखवून नंतर जर सई त्याच्या आयुष्यात येते अशी कथा असती तर चित्रपट वेगळ्याच वळणावर गेला असता आणि इंटरेस्टिंग झाला असता. बायको सर्वसामान्य आणि गर्लफ्रेंड बेब हा आता चावून चोथा झालेला प्लाॅट आहे. पण बायको बेब आणि गर्लफ्रेंड सर्वसामान्य असं अजून कुणीच केलेलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Fri, 10/02/2015 - 12:31

Permalink

केविलवाणा प्रयत्न.

आपल्याच धाग्यावर प्रतिसादांची संख्या वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न. एकूण प्रतिसादातले निम्मे प्रतिसाद धागाकर्त्याचे आहेत. एरवी धागाकर्ता (गरज पडल्यास) एक-दोन वेळा प्रतिसाद देतो किंवा अनेक प्रतिक्रियांवर एकदाच सविस्तर प्रतिसाद देतो. इथे मात्र प्रत्येक प्रतिसादावर धागाकर्त्याची प्रतिक्रिया आहे. आता स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचा अभिनय(?) पहावत नसल्याने माझ्याकडुन पास. अगदी टिव्हीवर आला तरी पाहणार नाही. दोन तासांच्या चित्रपटासाठी त्या एक तास जाहिराती कोण सहन करणार?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/02/2015 - 12:39

In reply to केविलवाणा प्रयत्न. by भाते

Permalink

नाही रे भाते, ती ऑर्कुट

नाही रे भाते, ती ऑर्कुट लेखकूंची टिपिकल स्टाइल हाय, अशा प्रतिसादानी तिथे सुपरस्टार समजनारे पण रूपायाला तीन किलो आहेत. चेपूवर पण चालते तसे म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Fri, 10/02/2015 - 14:07

In reply to केविलवाणा प्रयत्न. by भाते

Permalink

एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब

एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब-प्रतिक्रिया दिली तर ती हि प्रतिक्रिया म्हणून धरल्या जाते टोटल मध्ये इथे हे माहित नव्हत आत्ता समजल
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/02/2015 - 14:12

In reply to एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब by समीर_happy go lucky

Permalink

आपण फक्त लेख अन त्यावर

आपण फक्त लेख अन त्यावर सबप्रतिक्रीया लिहिणे एवढेच करायचे नसते. इतर लोक पण लिहितात. त्यांना पण लेख वाचून प्रतिसाद द्यायचे असतात. इथे खूप जण खूप छान छान परिक्षणे लिहितात. त्यांची पण वाचने करावीत. फारेण्डरावांची किंवा समीरसूराची परिक्षणे समोर ठेवून इथे कुठल्याही परिक्षकाला जज केले जाईल इतकी चांगली असतात. नंतर म्हणू नका म्हैत नव्हते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 10/02/2015 - 12:57

Permalink

तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या

तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या परीक्षणाच्या धाग्यावर 'इथे कुणी मराठीत लिहित नाही का?' असे विचारले आणि त्यानंतर लगेच हा धागा आला. हा योगायोग आहे की लगेच 'आता लगेच लिहुयात मराठी चित्रपटाबद्दल पण' असे वाटुन हे लिहिले आहे? यापैकी दुसरे कारण असेल, तर इथे मिपावर उत्तमोत्तम चित्रपट परीक्षण आलेले आहेत, मराठी चित्रपटांचे सुद्धा. २-४ महिन्यात समजा आले नाहीच आणि, तर लगेच काही आभाळही कोसळत नाही. तेव्हा तुम्हाला मनापासुन जे वाटते ते लिहा, केवळ 'इथे हेही होते' असे दाखवायला म्हणुन नको. हे परीक्षण केवळ मराठी चित्रपट म्हणुन गोग्गोड, कौतुकास्पद लिहिल्यासारखे वाटले. मराठी चित्रपटावर लिहिताना सतत 'मी मराठी' असे झालेच पाहिजे असे नाही, सतत त्यात बॉलीवुड, दाक्षिणात्य सिनेमे यांच्याशी तुलनाही होऊ नये. आणि लिहिताना मराठी लोक आणि चित्रपट याबद्दल बरेच सरसकटीकरण वाटले. लिहिताना इंग्रजी शब्द शक्यतोवर टाळा. शिवाय या चित्रपटाला वाईट म्हटले म्हणुन ते लोक मराठीचे शत्रु आहेत असेही समजु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Fri, 10/02/2015 - 14:08

In reply to तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या by मधुरा देशपांडे

Permalink

ओके

ओके
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 10/02/2015 - 15:18

Permalink

कहाणी

कहाणी: स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
हे वाचून "परिच्छेदात कहाणी हुडका व मिसळपाव पार्टी जिंका" अशी नवी स्पर्धा सुचवतो. आदूबाळा, वाचतोयस ना?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 10/02/2015 - 20:00

In reply to कहाणी by अन्या दातार

Permalink

"कहाणी:

"कहाणी: स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही." एकच नव्हे पाच पाच "कहाणी" आहेत. द्या पार्टी. चला लवकर...!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 10/02/2015 - 17:08

Permalink

मराठी चित्रपटात कास्टिंग हि

मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
समीरजी - वरचा जो परिच्छेद आहे त्यात बराच गोंधळ झालाय.स्वप्निल जोशी हे अभिनेत्याचं नाव आहे आणि सिद्धार्थ हे त्याच्या व्यक्तिरेखेचं म्हणजे अभिनेत्याचं नाव कंसाबाहेर आणि व्यक्तिरेखेचं कंसात. पण लगेच पुढे तुम्ही भैरवी भानुशाली(तेजस्विनी पंडित) असं लिहिलंय. काय समजायचं वाचकांनी? बरं, हे सगळे आपापल्या भूमिकांमध्ये शोभून गेलेले आहेत - कसे? ते सांगा. का असं वाटतंय तुम्हाला? शेवटी जे तुम्हाला वाटतंय ते इतरांना सांगण्यासाठी लेख लिहिलाय ना तुम्ही? अजून - नंदिनी ही एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. खेडवळ लग्न? ते असं पाहिजे - लग्न झाल्यावर शहरात गेलेली खेडवळ स्त्री. अजून - अभिनयामुळे हा फरक manipulate होईल? establish हा शब्द तिथे बरोबर आहे असं वाटतं. चुकीचे शब्द आणि वाक्यरचना असेल तर आपला आशय तर सोडा, मूळ मुद्दाही वाचकांपर्यंत पोहोचत नाही. आशयाबद्दल तर आधीही बोललो आहे. नुसतं सांगणं आणि त्याच्यामागचं तुम्हाला वाटणारं कारण उलगडून दाखवणं यात सरकारी ट्रॅव्हल गाईड आणि प्रवासवर्णन यात असतो तेवढा फरक नसेल तर लोक गाईडच वाचतील.
  • Log in or register to post comments

Submitted by chetanlakhs on Sat, 10/03/2015 - 07:10

Permalink

तो स्वप्निल..

हे स्वप्निल जोशी साहेब ज्या दिवशी श्रीयुत शाहरुख़ खान साहेबांची नक्कल करणे बन्द करतील तो दिवस मराठी चित्रपटांसाठी एक सुन्दर दिवस असेल त्याने आणि मुक्ताने "मंगलाष्टक वन्स मोर" मधे जो धुमाकूळ घातलाय तो बघुन "डोक्याला शॉट" बसलाय..
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sat, 10/03/2015 - 16:44

Permalink

काय सांगता...

स्वप्नील जोशींचे चित्रपट लोक पाहतात ??? तेही थिएटरला जाऊन ?????
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 10/03/2015 - 17:19

In reply to काय सांगता... by नीलमोहर

Permalink

दुनियादारी ने कोटिंच्या उड्या

दुनियादारी ने कोटिंच्या उड्या मारल्या की. त्यात स्वजो होता की!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sat, 10/03/2015 - 17:38

In reply to दुनियादारी ने कोटिंच्या उड्या by प्यारे१

Permalink

दुनियादारी,

दुनियादारी.. स्टोरी, अंकुश चौधरी, जितू जोशी, उर्मिला कानेट्कर बाकी सर्वांमुळे चालला, हे सगळे नसते तर काय राहिलं असतं पाहण्यासारखं - सई आणि स्वजो ?? तो कोणत्या अँगलने कॉलेज कुमार वाटत होता त्यात, स्वजो होता म्हणून काहीच कोटींपर्यंत उड्या मारल्या, नाहीतर अजूनही कमवले असते.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 10/03/2015 - 18:08

In reply to दुनियादारी, by नीलमोहर

Permalink

मे-हु-ना सारखा 10 वर्षांनी

मे-हु-ना सारखा 10 वर्षांनी कॉलेज पूर्ण करायला आलेला तरुण असाच दिसतो. मूळ पेर्ना शारुख्खान ची असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर_happy go lucky on Sat, 10/03/2015 - 18:31

Permalink

असहमत, तो एक चांगला अभिनेता

असहमत, तो एक चांगला अभिनेता आहे, दुनियादारी मध्ये जे एक्स्प्रेशन तो फक्त डोळ्यांनी देतो ते बाकीच्यांना जमत नाही आणि शाहरूखशी त्याची बरोबरीच नाही !!!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 10/03/2015 - 23:55

In reply to असहमत, तो एक चांगला अभिनेता by समीर_happy go lucky

Permalink

हो पण

मग त्याने मुक्याचा रोल करावा. त्याने तोंड उघडलं की आम्हाला डोळे मिटावेसे वाटतात त्याचं काय?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 10/03/2015 - 23:59

In reply to हो पण by बोका-ए-आझम

Permalink

अअं आय अंआय ओआ ए आअअ

अअं आय अंआय ओआ ए आअअ
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 00:05

In reply to अअं आय अंआय ओआ ए आअअ by प्यारे१

Permalink

मांयया ओय =))

मांयया ओय =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 10/04/2015 - 00:23

In reply to मांयया ओय =)) by टवाळ कार्टा

Permalink

कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई

कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई टीव्ही वरच्या कारेक्रमात आशीष पवार ह ची भाषा बोलायचा. 'हाय रे हक्या हाय हरतोय???' असं! बाकी तुषार कपूर गोलमाल मध्येच बरा वाटतो...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 00:30

In reply to कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई by प्यारे१

Permalink

शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ.

शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ...समजेल मी काय लिहिले ते =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 10/04/2015 - 00:47

In reply to शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ. by टवाळ कार्टा

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 10/04/2015 - 00:12

Permalink

हल्ली जे मराठी चित्रपट

हल्ली जे मराठी चित्रपट धंद्याला-बसतात , त्यातलाच हा एक! नावानीच सुरवात होते अश्या सिनेमांची . "तू ही रे" हे नावच मुळात हिन्दाळलेल... साध्या सरळ मराठी गाण्यांमधे अचानक तीसरी लाइन हिन्दी येते तस....जातिवंत अभद्र!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 00:18

In reply to हल्ली जे मराठी चित्रपट by अत्रुप्त आत्मा

Permalink

चायला तुमी डायरेक धंद्यालाच

चायला तुमी डायरेक धंद्यालाच लाव्ले =)) मी तवा तू हिरे आता "ती कडे" असाही येईल कदाचित
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Sun, 10/04/2015 - 09:33

In reply to हल्ली जे मराठी चित्रपट by अत्रुप्त आत्मा

Permalink

धंद्याला-बसतात =]] =]]

धंद्याला-बसतात =]] =]]
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com