आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
बिनपाण्याने हजामत
राजा! ही तुझी बदमाषी आहे
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.
आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!
शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.
हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.
बिनपाण्याने हजामत
या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.
यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.
राजा! ही तुझी बदमाषी आहे
विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.
मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
85788
वाचनखूण
प्रतिक्रिया
246
शेतकर्यांना कुणीही वाली
अजून काही माहिती हवी आहे.....
In reply to अजून काही माहिती हवी आहे..... by आयुर्हित
७०००/- प्रति क्विंटल भाव
लेख वाचला...
In reply to लेख वाचला... by मुक्त विहारि
करण्यासारखे काहीच नाही हे खरे आहे.
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by बोका-ए-आझम
बोक्या, दक्षिणेतील
In reply to बोक्या, दक्षिणेतील by पिंगू
धन्यवाद पिंगूजी
हे कोणी केलं यापेक्षा कशाला
In reply to हे कोणी केलं यापेक्षा कशाला by हाडक्या
हाडकोराव
In reply to हाडकोराव by गंगाधर मुटे
अमच्या नव्हे आपल्या.. आमीपण
दुष्काळात नेंत्याना भलताच
In reply to दुष्काळात नेंत्याना भलताच by जेपी
दयावानांना दया
उत्तम लेख. थोडक्यात, सरकार
In reply to उत्तम लेख. थोडक्यात, सरकार by विशाखा पाटील
शतप्रतिशत सत्य.
सरकारने शेतकऱ्यांसाठी काही न
In reply to सरकारने शेतकऱ्यांसाठी काही न by विवेकपटाईत
सहमत
देशोन्नती-१६/११/१४
खूपच वाईट बातमी आहे. किंबहुना
In reply to खूपच वाईट बातमी आहे. किंबहुना by एस
इतका विचार करतोय कोण?
जागतीक व्यापार संदर्भाने होऊ
In reply to जागतीक व्यापार संदर्भाने होऊ by माहितगार
आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक
In reply to जागतीक व्यापार संदर्भाने होऊ by माहितगार
शासनाचे धोरण दुटप्पीपणाचे
In reply to शासनाचे धोरण दुटप्पीपणाचे by गंगाधर मुटे
साहेब, आंतरराष्ट्रीय
In reply to साहेब, आंतरराष्ट्रीय by माहितगार
संकुचित धोरन
In reply to संकुचित धोरन by गंगाधर मुटे
आम्ही मुक्तार्थव्यवस्थेचे
In reply to आम्ही मुक्तार्थव्यवस्थेचे by माहितगार
सबसिडी कुठाय?
(No subject)
मला जरा वेगळे मत मांडायचे आहे
In reply to मला जरा वेगळे मत मांडायचे आहे by प्रसाद१९७१
नाविण्यपुर्ण मत नाही
In reply to नाविण्यपुर्ण मत नाही by गंगाधर मुटे
योग्य प्रतिसाद. स्मायल्या
एका मुलीच्या हत्त्येवर आकाश
In reply to एका मुलीच्या हत्त्येवर आकाश by प्रसाद१९७१
समाजाची संवेदनाशीलता मेली काय
In reply to एका मुलीच्या हत्त्येवर आकाश by प्रसाद१९७१
जबरदस्ती आणि स्वताचा चॉइस
In reply to जबरदस्ती आणि स्वताचा चॉइस by गंगाधर मुटे
बलात्काराला देखील त्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to बलात्काराला देखील त्या by मदनबाण
असे "नग" आहेत
In reply to असे "नग" आहेत by टवाळ कार्टा
नग एखादाच असतो "हजारो" नाही..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to नग एखादाच असतो "हजारो" नाही.. by मदनबाण
आपल्या समोर असे लोक येत नाहीत
In reply to आपल्या समोर असे लोक येत नाहीत by टवाळ कार्टा
आपल्या समोर असे लोक येत नाहीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }In reply to आपल्या समोर असे लोक येत नाहीत by मदनबाण
मदनबानजी
एकतर्फी...
In reply to एकतर्फी... by प्रभाकर पेठकर
एकतर्फी कळवळा
In reply to एकतर्फी कळवळा by गंगाधर मुटे
खोबरं...
In reply to खोबरं... by प्रभाकर पेठकर
>>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे
In reply to >>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे by सूड
खोबरं
In reply to खोबरं by प्रसाद गोडबोले
त्यासाठी पॅकेज बनलं की कळेल.
In reply to >>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे by सूड
हे 'खोबरं'च आहे
शेतकरी बंधूंनी डोळे उघडे
In reply to शेतकरी बंधूंनी डोळे उघडे by डॉ सुहास म्हात्रे
एक्कासाहेब,
In reply to एक्कासाहेब, by एस
'दारिद्र्य हे एक दुष्टचक्र
'दारिद्र्य हे एक दुष्टचक्र आहे...'हे दुष्टचक्र का व कसे निर्माण होते याच्या कार्यकारणभावाचा विचार केला तर मला काय म्हणायचे हे बरेच स्पष्ट होईल. यात इतरांबरोबर शेतकर्यांचे स्वतःचे काय बरे वाईट योगदान आहे याचाही प्रामाणिकपणे विचार करण्याची जरूरी आहे... म्हणजे शेतकर्यांनी आपले हितसंबंद्ध सुरक्षित रहावे म्हणून काय केले अथवा केले नाही याचीही मिमांसा करणे जरूर आहे. या जगात आपले हितसंबंद्ध दुसर्या कोणी राखावे अश्या कल्पनेने त्यांची जबाबदारी दुसर्यावर डोळे मिटून सोपवल्यास फसवणू़कीचीच जास्त शक्यता आहे, शिवाय त्याचे मिंधेपण येते ते वेगळेच. यासंदर्भात सतिश गावडे यांचा हा प्रतिसाद काही पैलूंबद्दल बरेच सांगून जातो.In reply to शेतकरी बंधूंनी डोळे उघडे by डॉ सुहास म्हात्रे
शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ
In reply to शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ by गंगाधर मुटे
सबसिडीबद्दल सर्वसाधारण मत
काहिच कळत नाहि...
In reply to काहिच कळत नाहि... by अर्धवटराव
तुम्हाला बोचून काय उपयोग?
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
विदर्भात "कदाचित" पाऊस हा
In reply to विदर्भात "कदाचित" पाऊस हा by टवाळ कार्टा
शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण
In reply to शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण by डॉ सुहास म्हात्रे
कठीण आहे पण शक्य आहे हे
In reply to कठीण आहे पण शक्य आहे हे by टवाळ कार्टा
कमीत कमी कोकणातल्या शेतकर्
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
उत्तम मुद्दा!!
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
मी शेतकरी कुटुंबातली नाही. पण
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्
शेतकर्यांना निर्यात बंदी नको
In reply to शेतकर्यांना निर्यात बंदी नको by प्रसाद१९७१
शेतकरी मुक्त आयात-निर्यात धोरणाचाच समर्थक आहे.
खरंखोटं ठाऊक नाही पण त्या
In reply to खरंखोटं ठाऊक नाही पण त्या by प्यारे१
विदर्भाचे सर्वात जास्त शोषण
In reply to विदर्भाचे सर्वात जास्त शोषण by गंगाधर मुटे
वेगळा विदर्भ झाल्यास हा
In reply to वेगळा विदर्भ झाल्यास हा by प्रकाश घाटपांडे
काही अंशी
In reply to काही अंशी by गंगाधर मुटे
मुटेसाहेब !! सिरीयसली एक
In reply to मुटेसाहेब !! सिरीयसली एक by खटपट्या
प्रश्नच उद्भवत नाही.
एक लक्षात घ्या, शेतकर्याच्या
In reply to एक लक्षात घ्या, शेतकर्याच्या by जयंत कुलकर्णी
एक लक्षात घ्या, शेतकर्याच्या
शिवाय श्री. मुटे यांनी एकदा
In reply to शिवाय श्री. मुटे यांनी एकदा by जयंत कुलकर्णी
तुम्ही म्हणताय तो हा धागा
शिवाय सूत गिरण्या, साखरेचे
In reply to शिवाय सूत गिरण्या, साखरेचे by जयंत कुलकर्णी
कोणीतरी म्हणाले तसे
In reply to कोणीतरी म्हणाले तसे by गंगाधर मुटे
मला नक्की माहीत आहे. पण तसे
In reply to मला नक्की माहीत आहे. पण तसे by जयंत कुलकर्णी
शिवाय तुम्हाला जी खोटी
In reply to शिवाय तुम्हाला जी खोटी by जयंत कुलकर्णी
त्या आंदोलनाबद्दल व त्यातील
In reply to त्या आंदोलनाबद्दल व त्यातील by जयंत कुलकर्णी
शेतकरी आंदोलन हे ऐर्यागईर्याचे कामच नव्हे!
In reply to शिवाय तुम्हाला जी खोटी by जयंत कुलकर्णी
निष्कारण वेळ दवडतो की काय?
In reply to निष्कारण वेळ दवडतो की काय? by गंगाधर मुटे
मुटेसाहेब मलाही असेच वाटते
गरीब बिच्चारा शेतकरी.
In reply to गरीब बिच्चारा शेतकरी. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका आणि जयंत काका
In reply to पेठकर काका आणि जयंत काका by सतिश गावडे
मात्र याच्या जोडीनेच शेतकर्
मात्र याच्या जोडीनेच शेतकर्याला त्याच्या दैनंदिन जीवनात, शेतीच्या कामात थेट उपयोगी पडेल, त्याच्या जीवनमानात फरक पडेल असा काही उपक्रम राबविला असल्यास त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.+१०० वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर इतरांकडे (यात सरकारही येते) सतत मासे* मागत राहणार्यापेक्षा मासेमारी करणे शिकणारी अथवा मासेमारी करण्याच्या प्रशिक्षणासाठी आग्रही राहणारी माणसे जास्त विचारी वाटतात. * संदर्भ : "Give a man a fish and you feed him for a day. Teach a man to fish and you feed him for a lifetime." --- a Chinese proverb.In reply to पेठकर काका आणि जयंत काका by सतिश गावडे
ही कल्पनाच निरुपयोगी आहे
In reply to ही कल्पनाच निरुपयोगी आहे by गंगाधर मुटे
६० टक्के लोकसंख्येच्या समस्या
In reply to ६० टक्के लोकसंख्येच्या समस्या by सतिश गावडे
१०१% सहमत !!
In reply to गरीब बिच्चारा शेतकरी. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाकांच्या या प्रतिसादाशी
In reply to पेठकरकाकांच्या या प्रतिसादाशी by बाळ सप्रे
भीक नकोच