✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

ग
गंगाधर मुटे यांनी
Sat, 11/15/2014 - 21:48  ·  लेख
लेख
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!


        यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

        माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता;  पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

        आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

        शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

        हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

        या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

        यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

        विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

        मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

        ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्‍यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
85459 वाचन

💬 प्रतिसाद (246)

प्रतिक्रिया

शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 00:14 नवीन
शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ http://www.misalpav.com/node/17878 आपन आधी हा लेख वाचावा. बाकी उरलेली चर्चा नंतर करू.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सबसिडीबद्दल सर्वसाधारण मत

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/20/2014 - 00:52 नवीन
माझ्या मते मत पगारी/बिनपगारी अर्थतज्ञाचे आहे की अनुभवी शेतकर्‍याचे आहे यापेक्षा ते किती व्यवहार्य आहे आणि किती फायदेशीर आहे हे जास्त महत्वाचे. सबसिडीबद्दल सर्वसाधारण मत येथे अगोदरच दिले आहे, तेव्हा ते वाचून पहावे. या विषयाच्या अनेक पैलूंवर इथल्या प्रतिसादांत आतापर्यंत खूप खल झाला आहे तोही वाचणे योग्य होईल. "अवर्षण-सबसिडी-नुकसान भरपाई" या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी बांधव पाहणे विषादपूर्ण आहे. ते दुष्ट्चक्र दूर व्हावे अशी कळकळ आहे म्हणूनच केवळ माझ्या अल्पमतीला जे समजले त्यावरून या लेखांतील सर्व प्रतिसाद लिहिले आहेत. तेही वाचल्यास संर्वांगिण मत कळेल. अजून थोडे काही... विदर्भ-मराठवाड्यातला दुष्काळ ही काही फार अभावाने होणारी गोष्ट नाही. मग : १. दुष्काळी परिस्थिती जावी म्हणून दीर्घकालीन नियोजन (पाणी नियोजन / पाटबंधारे, इ) करण्यासाठी लोकप्रतिनिधींवर (यात त्या विभागांतून आजपर्यंत मुख्यमंत्री झालेले लोकप्रतिनिधीही आले आहेत) दबाव टाकण्यासाठी शेतकर्‍यांची किती आंदोलने झाली हे पहायला आवडेल. २. दुष्काळी / निमदुष्काळी परिस्थितीत कोणती पिके यशस्वीरित्या घेता येतील याबाबत किती संशोधन झाले हे पहायला आवडेल. ३. एखादे शेती उत्पन्न सबसिडीशिवाय चालणारच नाही असे अनेक दशके माहित असताना सरकारी सबसिडी आणि अवर्षणामुळे लागणारी मदत टाळू शकणारी इतर योग्य ती नविन पिके घेण्याचे किती प्रयत्न झाले ते माहित करून घ्यायला आवडेल. ४. इझ्रेलसारख्या वाळवंटी देशाच्या जागतीक स्तराच्या शेतकी अनुभवांची पाहणी करण्यास निर्वाचित नेते / शासकीय अधिकारी / शेतकरी यांची अनेक शिष्टमंडळे त्या देशाला दरवर्षी भेट देत असतात याच्या बातम्या सतत पहाण्यात येतात. पण त्यांचा परिणाम म्हणून दुष्काळप्रवण विभागांत काही यशस्वी प्रयोग झाले असल्यास त्यांची माहिती घ्यायला आवडेल. थोडक्यात, वर्षानुवर्षे डोक्यावर टांगणार्‍या "अवर्षण-सबसिडी-नुकसान भरपाई" या तलवारीपासून सुटका करण्यासाठी शेतकर्‍यांतर्फे काय प्रयत्न केले गेले ते समजून घ्यायला आवडेल. असो. "जो दुसर्‍यावरी (इथेतर सालोसाल) विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" असे आपलेच संतमहात्मे म्हणून गेले आहेत. याचा आपण विसर पडू न देणे आपल्याच हिताचे आहे.
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

काहिच कळत नाहि...

अर्धवटराव
Mon, 11/17/2014 - 21:57 नवीन
दोष कुणाचा, उपाय काय असावे, चुक कुणाची, काय ट/टाळायला हवं वगैरे समजेनासं झालय... पण आपल्या आजुबाजुचा माणुस फ्रस्टेट होऊन मरतोय हे बोचतं मनाला.

तुम्हाला बोचून काय उपयोग?

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 00:21 नवीन
तुम्हाला बोचून काय उपयोग? सांगा :( ज्यांना बोचायला हवे ते एतके निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे आहेत की...... न बोललेले बरे!
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्

सतिश गावडे
Mon, 11/17/2014 - 23:42 नवीन
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्‍यांची आत्महत्या ही साखळी कुणी व्यवस्थित समजावून सांगेल का? मी ही कोकणातल्या शेतकरी कुटुंबात लहानाचा मोठा झालो. कंबरडे मोडेपर्यंत भाताच्या खाचरांमध्ये वाकून लावणी, कापणी आणि बांधणी केली आहे. भाताचे दोन दोन भारे मान "आवटाळेपर्यंत" डोक्यावर दोन दोन किमीपर्यंत वाहून नेले आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहीपर्यंत भाताची "मळणी" केली आहे. त्यामुळे शेती हा प्रकार मला नविन नाही. पावसाच्या बाबतीत कोकण चांगला प्रदेश असला तरी पुराने लावलेला भात वाहून जाणे, अवकाळी पावसाने उभे पीक शेतात आडवं होऊन भाताच्या "लोंब्या" पाण्यात भिजून त्या पावसाला "मोड" येणे, कधी पिकाला "पीस" येणे म्हणजेच भातच्या लोंब्यांमध्ये दाणा न भरणे यासारख्या अनेक अनिश्चिततांना कोकणातल्या शेतकर्‍यालाही सामोरं जावे लागते. त्यात पुन्हा बागायती, जीरायती, कोरडवाहू असले प्रकार नाहीत. भात शेती एके भात शेती. घाटावर ट्रॅक्टर लावला की तो दुरपर्यंत शेत नांगरू शकतो. कोकणात पीढया न पीढया शेतीची वाटणी होऊन आताची भाताची खाचरे दहा बाय दहा पेक्षाही लहान आहेत. काही ठीकाणी तर बैलांचा नांगरही फीरू शकत नाही एव्हढं लहान शेत असतं. एव्हढं असूनही कोकणातील शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे ऐकण्यात नाही. अगदीच शेतीत भागेनासे झाले तर घरातील मुलं आठवी दहावी पर्यंत शिकतात आणि मुंबईची वाट धरतात. स्वतःचं भागवून गावी पैसा पाठवतात. आता भाताचा किलोला भाव काय आहे हे मला माहिती नाही. मात्र मी जेव्हा शाळा कॉलेजात होतो तेव्हाचा भाव मला स्वतःला कवडीमोल वाटायचा. शेतकरी त्याच्याशीही जुळवून घ्यायचे. विदर्भातील शेती मी वर सांगितलेल्या कोकणातील शेतीपेक्षा वेगळी कशी आहे? शेतकरी तसेच त्यांचे पुढारी "सरकारने काहीतरी करावे" अशी अपेक्षा का करतात? अगदी आत्महत्या करण्याची वेळ येईपर्यंत शेतकरी परिस्थितीवर, सरकारवर विसंबून का राहतात? जगण्याचे इतर पर्याय का चाचपडून पाहत नाहीत? माझ्या या प्रतिसादात विदर्भातील शेतकर्‍यांकडे बोट दाखवण्याचा माझा हेतू नाही. मात्र शेतातील चिखल तुडवत लहानाचा मोठा झालेला असल्यामुळे मला हे जाणून घ्यायची खरंच उत्सुकता आहे.

विदर्भात "कदाचित" पाऊस हा

टवाळ कार्टा
Tue, 11/18/2014 - 07:57 नवीन
विदर्भात "कदाचित" पाऊस हा मोठा प्रश्न असू शकेल...कोकणात नको तेव्हडा जास्त पाऊस पडतो
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/18/2014 - 10:43 नवीन
शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण हे दोन्हिही धोकेच आहेत. जर पाऊस हा प्रश्न आहे (तो आहेच याबद्दल सहमती आहेच) तर तेथील शेतकर्‍यांनी आपल्या संख्येचा आणि मताधिकाराचा उपयोग तेथे पाणीव्यवस्था सक्षम करायला करायला हवा होता आणि त्यायोग्य उमेदवारांना मतदान करायला हवा होता. शिवाय, त्याचबरोबर कोकणातल्या शेतकर्‍याने जसे इतर पर्याय वापरून सरकारी मदतीवर अवलंबून न राहण्याचे धोरण स्विकारले तसे करायला पाहिजे होते. सबसिडिच्या आणि सरकारी नुकसानभरपाईच्या उपकारावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः सक्षम बनण्यासाठी शक्य असलेल्या पर्यायांवर भर द्यायला हवा होता. कठीण आहे पण शक्य आहे हे कोकणातल्या शेतकर्‍ञांनी दाखवून दिले आहेच.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कठीण आहे पण शक्य आहे हे

टवाळ कार्टा
Tue, 11/18/2014 - 11:16 नवीन
कठीण आहे पण शक्य आहे हे कोकणातल्या शेतकर्‍ञांनी दाखवून दिले आहेच.
याबाबत शंका आहे...पण माझे कोकणात जास्त जाणे नाही त्यामुळे आत्ताची परिस्थिती माहित नाही
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कमीत कमी कोकणातल्या शेतकर्

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/18/2014 - 19:41 नवीन
कमीत कमी कोकणातल्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा सरकारकडे मदतीसाठी याचना केल्या आहेत याचे फार दाखले (असलेच तर) देता येतील असे माध्यमांतल्या बातम्यांवरून दिसत नाही.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

उत्तम मुद्दा!!

सूड
Tue, 11/18/2014 - 16:57 नवीन
उत्तम मुद्दा!!
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मी शेतकरी कुटुंबातली नाही. पण

मधुरा देशपांडे
Tue, 11/18/2014 - 19:32 नवीन
मी शेतकरी कुटुंबातली नाही. पण विदर्भातील सामान्य मध्यमवर्गीय नागरिक म्हणुन आणि शेती करणारे काही नातेवाईक्/स्नेही यांच्याकडे बघुन जे वाटते ते सांगते. फक्त दुष्काळ आणि निसर्गाचा लहरीपणा यांची तुलना करता विदर्भ तुलनेने खूप जास्त होरपळून निघतो हे सांगू शकते. कोकणातल्या मित्र मैत्रिणी यांच्याशी बोलताना जे काही ऐकले आहे ते बघता विदर्भातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी आणि आर्थिक दृष्ट्या अधिक चांगल्या घरात असूनही मी अनेक वर्ष पाहिलेला दुष्काळ भयंकर होता. मग विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती कठीण असेल याचा अंदाज करू शकते. पण केवळ हे एक कारण आहे म्हणून आत्महत्येपर्यंत सगळ्यांचीच परिस्थिती जावी हे मला पण पटत नाही. काय होईल इतरांपेक्षा (कोकण किंवा उर्वरीत महाराष्ट्र धरुयात) जास्त कष्ट घ्यावे लागतील, थोडी प्रतिकूल परिस्थिती असेल, पण मग ते कष्ट करून बाहेर पडायचे की सतत "दुसऱ्याला माझ्यापेक्षा अनुकूल परिस्थिती होती आणि मला नव्हती" म्हणून रडत बसायचे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आणि इथेच विदर्भातील शेतकरी (सामान्य लोक सुद्धा) कमी पडतात असे वाटते. माझ्या काही नातेवाईक किंवा ओळखीच्यांकडे शेती आहे. सगळ्यानीच दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवले आहे. पण काहींनी त्यातून मार्ग काढला आणि बाकीचे दे रे हरी म्हणत बसलेत, सतत सरकार हे करत नाही, ते करत नाही हे म्हणण्यात फारसे तथ्य नाही. सरकारचीही चूक असेलच पण फक्त सरकारची नक्कीच नाही. लोकांनीही त्यांच्याकडून दोन्ही मार्ग शोधावेत, एकीकडे सरकारकडून मदत मिळवण्यासाठी आणि त्याच वेळी ही मदत बाजूला ठेवून आपल्याला काय करता येईल यासाठी. आणि ओळखीतल्या फार कमी लोकांकडे मी हे प्रयत्न पाहिलेत त्यामुळे या परिस्थितीला दुर्दैवाने लोक स्वतः देखील तेवढेच जबाबदार आहेत असे वाटते.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 00:50 नवीन
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्‍यांची आत्महत्या ही साखळी कुणी व्यवस्थित समजावून सांगेल का? >>>> लेखात संक्शिप्तरुपात का होइना पण हा मुद्दा आला नाही? एव्हढं असूनही कोकणातील शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे ऐकण्यात नाही. अगदीच शेतीत भागेनासे झाले तर घरातील मुलं आठवी दहावी पर्यंत शिकतात आणि मुंबईची वाट धरतात. स्वतःचं भागवून गावी पैसा पाठवतात. म्हणजे कोकणातील शेतीत उत्पादन/उत्पन्न/बचत होत नाहीये. कोकणातील शेतीसुद्धा तोट्याचीच आहे. मुंबैत नोकरी करून गावी पैसा पाठवून कोकणातल्या शेतीतील तुटीची भरपावती केली जाते. विदर्भातील शेतीची तुट भरून काढायला आसपास मुंबई कुठे आहे? तुम्हाला माहीत असेल तर सांगावी! आता भाताचा किलोला भाव काय आहे हे मला माहिती नाही. मात्र मी जेव्हा शाळा कॉलेजात होतो तेव्हाचा भाव मला स्वतःला कवडीमोल वाटायचा. शेतकरी त्याच्याशीही जुळवून घ्यायचे.>>> आताचे भाव माहीत करून घ्या. तेव्हाचे भाताचे भाव, तेव्हाचा मास्तरचा पगार, तेव्हाचे सोन्याचे भाव, तेव्हाचे मुंबईतील जमीनीचे चौरस फुटाचे भाव... आताचे भाताचे भाव, आताचा मास्तरचा पगार, आताचे सोन्याचे भाव, आताचे मुंबईतील जमीनीचे चौरस फुटाचे भाव... तुलनात्मक तक्ता तयार करा. याच बाफवर टाका. माझे डोळे आधीच उघडून आहेत. त्या तक्त्याने तुमचे डोळे उघडतील. याची खात्री देतो. विदर्भातील शेती मी वर सांगितलेल्या कोकणातील शेतीपेक्षा वेगळी कशी आहे? शेतकरी तसेच त्यांचे पुढारी "सरकारने काहीतरी करावे" अशी अपेक्षा का करतात? अगदी आत्महत्या करण्याची वेळ येईपर्यंत शेतकरी परिस्थितीवर, सरकारवर विसंबून का राहतात? जगण्याचे इतर पर्याय का चाचपडून पाहत नाहीत? >>> याचे अस्पष्ट उत्तर लेखात आलेले आहे. न आलेला भाग एवढाच की मग.... इतर पर्याय चाचपडून पाहायचे म्हणजे शेती कशाला करायची, असा थेट अर्थ होतो. शिवाय दोन महिने शेती, दोन महिने मजूरी, दोन महिने नोकरी, दोन महिने हजामती, दोन महिने झकमारी, आणि भीक मागणे, चोर्‍या करणे, वाटमार्‍या करणे या पैकी एखादा पर्याय दोन महिने चाचपडून पाहणे असा काहिसा सल्ला मी सुद्धा शेतकर्‍यांना देऊ शकलो असतो पन तो व्यवहारिक आणि परवडणारा सुद्धा नाही. माझ्या या प्रतिसादात विदर्भातील शेतकर्‍यांकडे बोट दाखवण्याचा माझा हेतू नाही. मात्र शेतातील चिखल तुडवत लहानाचा मोठा झालेला असल्यामुळे मला हे जाणून घ्यायची खरंच उत्सुकता आहे.>>>>> इतरांकडून जाणून घेण्यापेक्शा किंवा वास्तवाशी संपूर्णतः सोडचिठ्ठी घेतलेले आभासी पुस्तकी ज्ञान जवळ बाळगण्यापेक्षा इकडच्या सुखसमाधानी आयुष्याला लाथ मारून परत एकदा दहा वर्षासाठी शेतातील चिखल तुडवायला जा. तुम्हाला स्वतःलाच सारी उत्तरे सापडतील.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

शेतकर्‍यांना निर्यात बंदी नको

प्रसाद१९७१
Tue, 11/18/2014 - 09:10 नवीन
शेतकर्‍यांना निर्यात बंदी नको असेल तर आयात बंदी पण हटवायला पाहीजे.

शेतकरी मुक्त आयात-निर्यात धोरणाचाच समर्थक आहे.

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 00:56 नवीन
शेतकरी मुक्त आयात-निर्यात धोरणाचाच समर्थक आहे. तसे नसणार अशा उग्याच भ्रामक कल्पना मनात बाळगून तुम्ही स्वतःच्या जीवाचे निष्कारण हाल करून घेत आहात. ;) शेतकरी प्रकाशनाचे शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत फायदा घ्या. :)
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

खरंखोटं ठाऊक नाही पण त्या

प्यारे१
Tue, 11/18/2014 - 17:35 नवीन
खरंखोटं ठाऊक नाही पण त्या मध्ये आलेल्या पीपली लाईव्ह सारखं मरणाचं मार्केटींग आणि मरणाची किंमत आकारली जात आहे असं चित्र दिसतंय. मध्ये कुठंतरी वाचलं की विहीरीत पाय घसरुन मृत झालेल्या एका शरीराला नंतर फासावर लटकावून ती 'शेतकर्‍याची आत्महत्या' घोषित केली गेली. उत्तम शिक्षण घेऊन नोकरीला लागून साहाय्यक अशा प्रकारची शेती केल्यास फायदेशीर ठरेल. दलाल खूपच त्रास देत असतील तर शेतकर्‍यांच्या प्रश्नां साठी संघटना उभी करणं आवश्यक आहे. पण महाराष्ट्रात फक्त विदर्भातच आडते, दलाल त्रास देतात काय? नेमका खरा काय घोळ आहे? बाकी सतीश गावडे चे प्रश्न नेहमीप्रमाणंच विचार करायला लावणारे आहेत.

विदर्भाचे सर्वात जास्त शोषण

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 01:05 नवीन
विदर्भाचे सर्वात जास्त शोषण होते म्हणून विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या आहेत. मागील वर्षी कांद्याचे भाव कोसळायला लागल्याबरोबर प.महाराष्ट्रातही आत्महत्त्या सुरू झाल्या होत्या. वेतन आयोगाच्या शिफारशी बासनात गुंडाळून शासकिय कर्मच्यार्‍यांना म. रा. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देने सुरू केले तर पुण्यामुंबईत सुद्धा दोन महिन्याच्या आत आत्महत्त्यांचे सत्र सुरू होऊ शकते.
↩ प्रतिसाद: प्यारे१

वेगळा विदर्भ झाल्यास हा

प्रकाश घाटपांडे
Tue, 11/25/2014 - 11:53 नवीन
वेगळा विदर्भ झाल्यास हा प्रश्न सुटु शकेल असे आपणास वाटते का?
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

काही अंशी

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:11 नवीन
वेगळा विदर्भ झाल्यास काही अंशी हा प्रश्न सुटु शकेल. पूर्णपणे नाहीच. कारण विदर्भ हे एक राज्य असेल, देश नव्हे.
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मुटेसाहेब !! सिरीयसली एक

खटपट्या
Sat, 11/29/2014 - 01:04 नवीन
मुटेसाहेब !! सिरीयसली एक प्रश्न विचारतो. तुम्हाला विदर्भ नावाचा देश हवाय का ?
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

प्रश्नच उद्भवत नाही.

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 13:54 नवीन
विदर्भ नावाचा देश झाल्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणार आहेत का? या प्रश्नाचे तुमचे आणि माझे उत्तर सारखेच आहे. :)
↩ प्रतिसाद: खटपट्या

एक लक्षात घ्या, शेतकर्‍याच्या

जयंत कुलकर्णी
Tue, 11/18/2014 - 18:01 नवीन
एक लक्षात घ्या, शेतकर्‍याच्या कुटुंबातील एकजण शेती करु शकतो व बाकीचे शहरात नोकरी करु शकतात. हे जे शहरात असतात हे शेतीवरील हक्क सोडत नाहीत. पण फक्त कामगार असलेल्या कुटुंबातील एकहीजण शेती करु शकत नाही. त्याला उपाशीच मरावे लागते....शहरात. थोडक्यात काय असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्या उत्तराने शेतकरी व त्यांचा कळवळा असणारे अडचणीत येऊ शकतात. उरला प्रश्न आमचे आम्ही बघून घेऊ या वृत्तीचे. जर शेतकरी त्यांचा माल साठवून ठेवणार असतील, जसे मधे त्यांनी कांद्याचे केले, तर व्यापारी व सामान्यजनांही तो शेतीमाल बाहेरुन आणण्यास परवानगी द्यावी लागेल. मला असे शेकड्याने शेतकरी माहीत आहेत जे चांगले पैसे मिळवतात व बंगले बांधतात तर काही आळशी व चैनीला चटावलेले शेती दुसर्‍याला करायला देतात तर काही गरीब आहेत ते मात्र मरतात. काही शेतकरी तर गरज नाही म्हणून जमीन ओसाड ठेवतात. कारण त्यांना त्या जमिनीच्या भावात रस असतो. एखाद्या कारखान्यात मशीन बंद ठेवलेले पाहिले आहे का ? थोडक्यात गरीबी, श्रीमंती सगळीकडे आहे. शहरात आहे, गावात आहे, उद्योगात आहे... शेतकर्‍यांचे विशेष काय आहे ? ज्यांची शेतीही नाही त्यांचे तर सगळ्यात जास्ती हाल आहेत....

एक लक्षात घ्या, शेतकर्‍याच्या

गंगाधर मुटे
गुरुवार, 11/20/2014 - 01:21 नवीन
एक लक्षात घ्या, शेतकर्‍याच्या कुटुंबातील एकजण शेती करु शकतो व बाकीचे शहरात नोकरी करु शकतात. हे जे शहरात असतात हे शेतीवरील हक्क सोडत नाहीत.>>>>>> का सोडावा? भारतीय कायद्याने वारसहक्काने त्यांना त्यांच्या हिस्स्याच्या जमीनीचे अधिकृत हक्क बहाल केले आहेत. पण फक्त कामगार असलेल्या कुटुंबातील एकहीजण शेती करु शकत नाही. त्याला उपाशीच मरावे लागते....शहरात >>>> म्हणजे काय बुवा? थोडक्यात काय असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्या उत्तराने शेतकरी व त्यांचा कळवळा असणारे अडचणीत येऊ शकतात.>>> छ्या! अशा ऐर्‍यागैर्‍याच्या प्रश्न-उत्तराने जर अडचणीत येईल ते तत्वज्ञान कसले? उगाच भ्रामक कल्पना उराशी बाळगू नका. उरला प्रश्न आमचे आम्ही बघून घेऊ या वृत्तीचे. जर शेतकरी त्यांचा माल साठवून ठेवणार असतील, जसे मधे त्यांनी कांद्याचे केले, कांदा साठवून ठेवला जाऊ शकतो किंवा कांद्याची बेमालूम साठेबाजी होऊ शकते, हा चक्क गैरसमज आहे. तर व्यापारी व सामान्यजनांही तो शेतीमाल बाहेरुन आणण्यास परवानगी द्यावी लागेल. >>>>> आणि आमचा कांदा बाहेर नेऊन विकण्यास कुणाच्या बापाला काय अडचण यावी. मग कशाला हवं निर्यातशुल्क? सारं काही तुमच्याच सोईने घ्यायच का? मला असे शेकड्याने शेतकरी माहीत आहेत जे चांगले पैसे मिळवतात व बंगले बांधतात तर काही आळशी व चैनीला चटावलेले शेती दुसर्‍याला करायला देतात तर काही गरीब आहेत ते मात्र मरतात. काही शेतकरी तर गरज नाही म्हणून जमीन ओसाड ठेवतात. कारण त्यांना त्या जमिनीच्या भावात रस असतो. एखाद्या कारखान्यात मशीन बंद ठेवलेले पाहिले आहे का ? थोडक्यात गरीबी, श्रीमंती सगळीकडे आहे. शहरात आहे, गावात आहे, उद्योगात आहे... शेतकर्‍यांचे विशेष काय आहे ? ज्यांची शेतीही नाही त्यांचे तर सगळ्यात जास्ती हाल आहेत.... >>>> हा तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे. तुम्ही पाहिलेला शेतकरीसुद्धा तुमच्याच कडबोळातला आणि विचारसरणीचा असू शकतो. शिवाय तुम्ही पाहिलेला शेतकरी म्हणजे संपूर्ण देशातील शेतकर्‍यांचे रोलमॉडेल असेल असेही नाही.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शिवाय श्री. मुटे यांनी एकदा

जयंत कुलकर्णी
Tue, 11/18/2014 - 18:05 नवीन
शिवाय श्री. मुटे यांनी एकदा शेतीची खोटी आकडेवारी सादर केली होती (का परवडत नाही याबद्दल) ती एका शेतकर्‍यानेच खोडून काढली होती ते विसरता येत नाही. कोणाला सापडला तर त्या ध्याग्याची लिंक द्यावी. त्याच्या प्रतिक्रियेत ते खोडून काढलेले दिसेल. त्याचे उत्तर कोणी दिलेले मला आठवत नाही. ते म्हणणे कोणी खूओन काढले असेल तर मी माझे शब्द माघे घेतले आहेत असे समजावे.

तुम्ही म्हणताय तो हा धागा

खेडूत
Tue, 11/18/2014 - 21:26 नवीन
तुम्ही म्हणताय तो हा धागा असावा .
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शिवाय सूत गिरण्या, साखरेचे

जयंत कुलकर्णी
Tue, 11/18/2014 - 18:15 नवीन
शिवाय सूत गिरण्या, साखरेचे कारखाने, सहकारी पोल्ट्री इ. ची या शेतकयांनी खाबूगिरी करुन कशी वाट लावली हे सांगायची गरज नाही. आत काहीजण म्हणतील ते राजकारणी आहेत पण तेही पहिले शेतकरीच होते. आजचे शेतकरी उद्याचे राजकारणीच आहेत व तेही तेच करणार आहेत. एक अत्याधुनिक शेतकरी विखे पाटीलांच्या प्रवरा विज वितरणेचे काय झाले याची आठवण अजूनही ताजी आहे.... यांना पाहिजे तेव्हा यांनी सरकारकडून भरपूर मदत उकळली आहे. आता सरकारने काही अटी लादल्या तर त्याचा विरोध कसा करणार. शिवाय कोणीतरी म्हणाले तसे.....गोव्यात, आंध्रमधे, कर्नाटक....सगळ्या आसपासच्या राज्यात शेती परवडते आणि आपल्या येथे नाही हेही समजणे अवघड आहे. एकदा टीव्ही वर एका शेतकर्‍याची मुलाखत मी स्वतः ऐकली होती. त्याने आंध्रप्रदेशातील शेतकर्‍यांना शेती कसायला भाड्याने दिली होती. जेव्हा त्याला साधा सरळ प्रश्र्न विचारण्यात आला, " त्यांना कशी परवडते आणि तेही तुम्हाला भाडे दएऊन तेव्हा त्याच्या तोंडातून खरे उत्तर बाहेर पडले." ते स्वतः शेती करतात'. आपल्या शेतकर्‍यांच्या मुलांना शहरात जायचे आहे....मी कित्येक खेडी अशी पाहिली आहेत जेथे फक्त म्हातारी माणसे उरली आहेत.... कशाला सरकारच्या नावाने गळे काढायचे ?

कोणीतरी म्हणाले तसे

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:20 नवीन
कोणीतरी म्हणाले तसे.....गोव्यात, आंध्रमधे, कर्नाटक....सगळ्या आसपासच्या राज्यात शेती परवडते आणि आपल्या येथे नाही हेही समजणे अवघड आहे. >>>>> कोणीतरी म्हणाले तसे तुम्हाला जर नक्की काहीच माहित नसेल तर एवढ्या संवेदनाक्षम विषयात कशाला हात घालता? तुमचे स्वतःचे अनुभव सांगण्यापूर्वी शेती विषयाचा आवाका किती मोठा आहे. त्याचे क्षेत्रफळ किती मोठे आहे आणि तुमचे शेतीसंबंधीत अनुभवविश्व किती मोठे आहे, याचाही तुलनात्मक अभ्यास करा. देशात जा कुठेही, भागात कोणत्याही सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी! अमेठीची शेती
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मला नक्की माहीत आहे. पण तसे

जयंत कुलकर्णी
Fri, 11/28/2014 - 07:30 नवीन
मला नक्की माहीत आहे. पण तसे बोलायची पद्धत असते. कारण त्यात उद्धटपण जरा कमी दिसतो. दुसरे आम्ही ही शेकरीच होतो. संवेदनाक्षम विषयात हात घालतो कारण नालायक पुढारी सामान्य शेतकर्‍यांच्या जिवावर उठले आहेत. आम्ही आमचा आभ्यास केला आहे. व शरद जोशींच्या आंदोलनातही भाग घेतला आहे. सांगूका एकेक अनुभव....... तुम्ही आम्हाला ज्याचा अभ्यास करायला सांगत आहात तो आपण केला आहे का ? याची आम्हालाच शंका आहे. कारण नाहीतर आपण अत्महत्येला खून इ अशी विशेसणे वापरली नसती व या वरील उपायांची अधिक चर्चा केली असती. या प्रश्नांवर अनेक उपाय आहेत पण प्रत्येक उपायांची शेतकर्‍यांच्या पुढार्‍यांनी वाट लावली आहे व या पुढेही वाट लावतील. (शेतकर्‍यांचे पुढारी हे शेतकर्‍यांमधूनच आले आहेत हे विसरता कामा नये). सहकार हा त्यतीलच एक उपाय आहे. त्याचे काय झाले ते आपणच बघतो आहोत...... या विषयाला हात घालायचे मुख्य कारण तुमचा प्रचारकी लेख व आमचे (टॅक्स पेअर) पैसे....ज्याचा फायदा मुठभर शेतकरी लाटत आहेत......
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

शिवाय तुम्हाला जी खोटी

जयंत कुलकर्णी
Fri, 11/28/2014 - 07:34 नवीन
शिवाय तुम्हाला जी खोटी आकडेवारी नक्की माहीत आहे त्यामुळे तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हाही एक मूलभूत प्रश्न आहे....
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

त्या आंदोलनाबद्दल व त्यातील

जयंत कुलकर्णी
Fri, 11/28/2014 - 07:53 नवीन
त्या आंदोलनाबद्दल व त्यातील पुढार्‍यांबद्दल नंतर अनेक तरुणांचा (खालच्या फळीतील) त्या काळी भ्रमनिरास झाला ते वेगळे......
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शेतकरी आंदोलन हे ऐर्‍यागईर्‍याचे कामच नव्हे!

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 08:01 नवीन
त्या आंदोलनाबद्दल व त्यातील पुढार्‍यांबद्दल नंतर अनेक तरुणांचा (खालच्या फळीतील) त्या काळी भ्रमनिरास झाला ते वेगळे शेतकरी आंदोलन हे ऐर्‍यागईर्‍याचे कामच नव्हे! गेली ३०-३५ वर्षे हे आंदोलन ज्यांनी जिवंत ठेवलं त्याम्च्याविषयी काही माहीती घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित डोळे उघडतील.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

निष्कारण वेळ दवडतो की काय?

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:58 नवीन
तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हाही एक मूलभूत प्रश्न आहे.... >>>> ही काय चर्चा झाली काय? तुम्ही विश्वास ठेवल्याने किंवा न ठेवल्याने एकंदरित शेतीसमस्यांवर काही प्रभाव पडणार आहे काय? @ जयंत कुलकर्णी, तुमच्या प्रतिसादांना उत्तर देवून मी स्वतःचा निष्कारण वेळ दवडतो की काय? असे वाटायला लागले आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मुटेसाहेब मलाही असेच वाटते

जयंत कुलकर्णी
Fri, 11/28/2014 - 08:45 नवीन
मुटेसाहेब मलाही असेच वाटते आहे...... तुम्ही तुमचा वेळ निष्कारण दवडत आहात.....माझ्या ब्लॉगवर "एका अस्सल शेतकर्‍याचा ब्लॉग" म्हणून मी एके काळी आपल्या ब्लॉगची लिंक दिली होती हे आपण विसरला असाल पण त्यावेळी तुम्ही राजकारणात आहात हे मला माहीत नव्हते......असो....खोट्या आकड्यावर विसंबून राहून जर अंदोलनाची दिशा ठरणार असेल तर एकंदरीत शेतीसमस्यावर काहीच प्रभाव पडणार नाही हे स्पष्ट आहे...... उरला प्रष्न चर्चेचा..... मीही आपल्या देशातील राजकारण्यांच्या उद्योगांना कंटाळलो आहे...... हा माझा शेवटचा प्रतिसाद....
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

गरीब बिच्चारा शेतकरी.

प्रभाकर पेठकर
Tue, 11/18/2014 - 18:57 नवीन
शेतकरी हा दुर्बल घटक आणि त्यांची बाजू घेणारा मसिहा. शेतकर्‍यांच्या विरुद्ध बोलणारा असंवेदनशील. त्यातून तो सुशिक्षित आणि शहरी असेल तर त्याच्यावर चिखलफेक करणे अधिक सोपे. करदात्याच्या पैशातून ६५ हजार कोटी उदार मनाने शेतकर्‍यांना देऊन मंत्री महोदय त्यांची राजकिय पोळी भाजून घेतात. ज्यांच्या पैशातून शेतकर्‍यांना ही मदत पोहोचते (पोहोचते असे गृहीत धरूया) त्या शहरी सुशिक्षितांना तोच शेतकरी असंवेदनशील मानतो हे कृतघ्नपणाचे आहे. पण तसे म्हंटले तर तुम्हाला शेतकर्‍यांच्या दीन परिस्थितीबद्दल कल्पना नाही आणि तुम्हाला झळ पोहोचत नाही म्हणून तुम्ही शेतकर्‍यांबाबत उदासीन आहात. असे आरोप करायला हे मसिहा लगेच सरसावतात. शहरी व्यवसायिक मिळकत कर भरतो. भरमसाठ दराने वीज बिलं भरतो. शेतकर्‍याला शेती मालावर/उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. (मी चुकत असेन तर सांगावे). शेतीसाठी वीज मोफत किंवा कमी दराने मिळते. शिक्षणात फि माफी मिळते. कांही जणांना रिझर्व्हड कोट्यातून नोकर्‍या मिळतात. शहरी सुशिक्षित माणसं, ज्यांना शेती हा पर्याय नसतो, ते शेतकर्‍यांच्या मुलांना आपल्यात सामावून घेतात. पण तरीही ते असंवेदनशील असतात. ज्या भावाने धान्य मिळेल ते त्यातील खड्यांसकट शहरी माणूस विकत घेत असतो. (जातो कुठे? घ्यावेच लागते) तरी पण तो शेतकर्‍यांचा विरोधक. सत्ताधारी आणि सत्ताधार्‍यांचे मंत्री महोदय (जे करदात्यांच्या पैशातून विविध पॅकेजेस वाटत असतात) ते सधन आणि समर्थ तर शेतकरी वर्ग सरसकट गरीब, भरडलेला आणि आत्महत्येच्या दारी (दूसर्‍या कोणीतरी) आणून सोडलेला म्हणून दयेस, सहानुभूतीस पात्र. बाकी राहिले शहरी, सुशिक्षित ते अर्थात ......असंवेदनशील. मिसळपाववर शेतकर्‍यांच्या समस्या मांडून काय फायदा? आणि नुसत्याच समस्या मांडायच्या? त्यावर उपाययोजना काय? मिसळपाव सदस्यांनी काय करावे म्हणजे शेतकरी बांधव आत्महत्या करणार नाही? शहरी सुशिक्षितांना असंवेदनशील म्हणा कांही हरकत नाही पण कांही उपाययोजना तरी सुचवा. ('राजकारण्यांवर दबाव निर्माण करा' असे गुळमुळीत उत्तर नको आहे). कांही ठोस आणि परिणामकारक कारवाई सुचविली आणि मिपाच्या ५% सदस्यांनी जरी साथ दिली तरी मुटे ह्यांच्या शेतकरी कळवळ्याला अर्थ असेल. नाहीतर आहेच...... अरण्यरुदन. दर गावागावात असणारे दारूचे अड्डे ह्या बद्दल कोणी बोलत नाही. शेतकरी वर्गाच्या जीवावरच चालतात हे. मुलांच्या लग्नाची धामधूम आणि खर्च पाहायचा नाही. शेतकर्‍यांची मुले शिकूनसवरून (चांगली गोष्ट आहे), घराण्यात चालत असलेल्या शेतीकडे पाठ फिरवून शहरात, परदेशात स्थायिक होतात. ते असंवेदनशील नसतात. दिल्लीत बलात्कारीत मुलीसाठी शहरी लोकं आंदोलनं करतात, शेतकरी वर्ग त्या बलात्काराची दखलही घेताना दिसत नाही. ते असंवेदनशील नसतात. शेतकरी वर्ग शेती मालाव्यतिरिक्त जे इतर प्रॉडक्ट्स वापरतो जसे, कपडे, साबण, भांडीकुंडी, विडीकाडी इ.इ.इ. त्या त्या इंडस्ट्री मध्ये अनेक कामगार कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. कित्येक व्यावसायिक व्यवसाय बुडाला म्हणून कुटुंबासहित आत्महत्या करतात त्यांच्या बद्दल शेतकरी वर्गाकडून किंवा त्यांच्या मसिहांकडून कधी सहानुभूती दर्शविली जात नाही. पण त्यांना असंवेदनशील म्हणायचं नाही. असो. लिहायला बसलं तर अनेक मुद्दे आहेत पण झापडबंद मसिहाला ते दिसणार नाहीत. त्याला दिसते फक्त शहरी आणि सुशिक्षित माणसांची ...... असंवेदनशिलता.

पेठकर काका आणि जयंत काका

सतिश गावडे
Tue, 11/18/2014 - 19:26 नवीन
पेठकर काका आणि जयंत काका यांच्याशी सहमत. कोकणातील शेतीचा माझा स्वतःचा अनुभव मी वर एका प्रतिसादात लिहिलाच आहे. श्री गंगाधर मुटे यांनी आजवर शेतकर्‍यांच्यां समस्यांवर आंदोलन करणं, त्या आंदोलनांचे फोटो पेपरात छापून आणून जनजागृती करणं, मराठी संकेतस्थळांवर शेतकरी प्रश्नांवर कविता आणि गझला लिहिणं, एखादं तत्सम संकेतस्थळ स्वतः चालवणं, शेतकरी प्रश्नांवर लिहिलेल्या कविता आणि गझला यांचं पुस्तक प्रकाशित करणं यांसारखे स्तुत्य उपक्रम राबवलेले आपल्याला माहिती आहे. याचा शेतकर्‍यांना नक्कीच फायदा झाला असेल. मात्र याच्या जोडीनेच शेतकर्‍याला त्याच्या दैनंदिन जीवनात, शेतीच्या कामात थेट उपयोगी पडेल, त्याच्या जीवनमानात फरक पडेल असा काही उपक्रम राबविला असल्यास त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मात्र याच्या जोडीनेच शेतकर्

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/18/2014 - 19:53 नवीन
मात्र याच्या जोडीनेच शेतकर्‍याला त्याच्या दैनंदिन जीवनात, शेतीच्या कामात थेट उपयोगी पडेल, त्याच्या जीवनमानात फरक पडेल असा काही उपक्रम राबविला असल्यास त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. +१०० वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर इतरांकडे (यात सरकारही येते) सतत मासे* मागत राहणार्‍यापेक्षा मासेमारी करणे शिकणारी अथवा मासेमारी करण्याच्या प्रशिक्षणासाठी आग्रही राहणारी माणसे जास्त विचारी वाटतात. * संदर्भ : "Give a man a fish and you feed him for a day. Teach a man to fish and you feed him for a lifetime." --- a Chinese proverb.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ही कल्पनाच निरुपयोगी आहे

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:36 नवीन
शेतकर्‍याला त्याच्या दैनंदिन जीवनात, शेतीच्या कामात थेट उपयोगी पडेल, त्याच्या जीवनमानात फरक पडेल असा काही उपक्रम राबविला असल्यास त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. >>>>> ६० टक्के लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यासाठी एकट-दुकट व्यक्तीगत पातळीवर उपक्रम राबविणे, ही कल्पनाच निरुपयोगी आहे. मी आजवर काय केले ते कथन करण्याचा प्रश्न उरला. त्याचे उत्तर कदाचित मी भविष्यात आत्मचरित्र लिहिले तर तुम्हाला घरबसल्या पाचपन्नास रुपये खर्च करून पुस्तकातून मिळू शकेल.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

६० टक्के लोकसंख्येच्या समस्या

सतिश गावडे
Fri, 11/28/2014 - 10:28 नवीन
६० टक्के लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यासाठी एकट-दुकट व्यक्तीगत पातळीवर उपक्रम राबविणे, ही कल्पनाच निरुपयोगी आहे.
म्हणजे तुम्ही तसलं काही करत नाही हे नक्की झालं. तुम्ही फक्त कविता लिहिता, गझला लिहिता, लेख लिहिता, पेपरात तुमचे लेख, बातम्या छापून आणता.
मी आजवर काय केले ते कथन करण्याचा प्रश्न उरला. त्याचे उत्तर कदाचित मी भविष्यात आत्मचरित्र लिहिले तर तुम्हाला घरबसल्या पाचपन्नास रुपये खर्च करून पुस्तकातून मिळू शकेल.
होय. तुम्ही फक्त आत्मचरीत्रच लिहायचं बाकी ठेवलंय. तीही शब्दांजली वाहा आता साहित्यदेवतेला. आणि हो, तुमचं आत्मचरीत्र विकतच काय, कुणी फुकट दिलं तरी मी वाचणार नाही. ज्याला काही करायचे असते तो आपल्या कुवतीला जमेल तसं करतच असतो. तुम्हाला फक्त शेतकर्‍यांचा मसिहा म्हणून मिरवायचं आहे. अर्थात ते मिपावर शक्य नाही. तुमचं पितळ उघडं पडलंय.
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

१०१% सहमत !!

खटपट्या
Sat, 11/29/2014 - 01:21 नवीन
१०१% सहमत !! मीही कोकणातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतीवर गुजराण होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर वडिलांनी कामे वाटून घेतली लहान भावाला शेतीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आणि मुंबईची वाट धरली. अपार मेहनत घेऊन सरकारी नोकरी मिळवली व गावी काकांना पैसे पाठवू लागले. अजून एका काकांचे मुंबईला आणून शिक्षण पूर्ण केले. त्यांना नोकरी लावली. दोघे भाऊ मिळून गावी लहान भावाला पैसे पाठवू लागले. सर्व व्यवस्थित झाले. तेव्हा जर शेतीवर अवलंबून राहिले असते तर संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या कराव्या लागली असती आम्हाला शिकवले मार्गाला लावले आता आमचे सुरळीत चालू आहे. मेहनतीला पर्याय नाही. जगायचेच म्हटले तर अनेक मार्ग आहेत. आज जी विदर्भाची अवस्था आहे तेवढीच किंबहुना त्याहून बिकट अवस्था कोकणातल्या शेतकऱ्याची आहे. मुटे साहेबांचे म्हणणे आहे की जवळ मुंबई नाही. पण मुंबई शहर जवळ असण्याची गरज काय. बाकीची शहरे नाहीत का? थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच कि आत्महत्या हा मार्ग नाहीच.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पेठकरकाकांच्या या प्रतिसादाशी

बाळ सप्रे
Wed, 11/19/2014 - 11:24 नवीन
पेठकरकाकांच्या या प्रतिसादाशी १००% सहमत.. सर्व जवाबदारी सरकारवर टाकून काहिही साध्य होणार नाही.. सरकारने फक्त निर्यातबंदी उठवावी मग आम्ही आमचे काय ते बघुन घेउ.. यात काय ते कसे बघुन घेणार यावर काहीतरी ठोस उत्तर द्यावे अशी मुटेंना विनंती.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भीक नकोच

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:40 नवीन
"भिक नको हवे घामाचे दाम" ही घोषणा गेल्या ३५ वर्षापासून शेतकरी देत आहेत. एखाद्या प्रतिसादामध्ये निर्यातबंदी सारख्याविषयावर ठोस परिपूर्ण उत्तर देणे, खरेच शक्य असू शकते का?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

चर्चेची ही कोणती पातळी आहे?

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:24 नवीन
शेतकर्‍यांची बाजू घेणारा मसिहा चर्चेची ही कोणती पातळी आहे?
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चर्चेची पातळी.....

प्रभाकर पेठकर
Fri, 11/28/2014 - 10:38 नवीन
>>>>चर्चेची ही कोणती पातळी आहे? ही चर्चा आहे? हे तर तुमचे, दूसर्‍यांना अज्ञानी ठरविण्यासाठी केलेले, एकतर्फी मतप्रदर्शन आहे. चर्चेत समोरच्याचे मुद्देही (अगदी आपल्याला पटत नसले तरीही) ऐकून घ्यायचे असतात. शेलकी विशेषणे टाळून मुद्यांवर भर देणारी आपली मते मांडायची असतात. समस्येचे सर्वंकष विश्लेषण करून, ज्या पातळीच्या लोकांसमोर (शहरी आणि असंवेदनशील....यू नो?) आपण समस्या मांडत आहोत आणि समस्येवर उपाय शोधत आहोत (असाल तर...) त्यांच्याच पातळीवर जाऊन आपल्या अभ्यासू अनुभवांचे कथन करून विषय मांडावा लागतो. एव्हढे सर्व आपल्या तथाकथीत 'चर्चेत' आपल्या बाजूने झालेले दिसत नाही. दिसते काय? तर, मला शेती विषयक परिपूर्ण ज्ञान आहे ही सतत वाजविलेली टिमकी. तुम्ही आयुष्यात शेती केलेली नाही त्यामुळे तुम्ही फक्त माझेच ऐकून घेऊन माझा उदो उदो करावा हा छुपा हेतू. अवघड प्रश्नांवरील, मुद्यांवरील भाष्य टाळून भलत्याच, स्वतःच्या सोयीच्या मुद्द्यांवर 'शब्दांवर' ओढलेले ताशेरे. शिवाय शहरी आणि असंवेदनशील वगैरे विशेषणे वापरून आपण स्वतःच चर्चेची पातळी ठरवून द्यायची नंतर पातळीवरच कांगावा करायचा हे कांही पचनी पडत नाही बुवा! 'मसिहा' हा शब्द वाईट नाही. पण खरोखरचे मसिहा बनण्यासाठी प्रचंड मेहनत, जनजागृतीचे कौशल्य, निस्वार्थ धडपड आणि सरकारशी झगडण्यासाठी आवश्यक तो सकारात्मक कणखरपणा लागतो. तो नसेल तर 'मसिहा' हा शब्द खुपतो. 'मसिहा' ह्या पदवीने तुम्हाला फारच उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. तसे त्या पदवीला पूरक असे वर्तन सातत्याने ठेवणे तुम्हाला जमणारे आहे का? हे तुम्हीच तपासावे म्हणजे चर्चेची पातळी न शोधता 'चर्चा योग्य पातळीवर ठेवणे किती आवश्यक आणि कौशल्याचे' आहे हे तुम्हालाच जाणवेल.
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

प्रत्येक धंदा / व्यवसाय

vikramaditya
Tue, 11/18/2014 - 22:46 नवीन
करण्याचे टेक्नीक दर काही वर्षाने बदलते. अगदी इंडस्ट्रियल व्यवसाय देखील बापाने ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने मुलगा करु शकत नाही , किंबहुना मार्केट फोर्सेस त्याला बदलायला भाग पाडतात. मग ह्याला शेती कसा अपवाद ठरेल? इतर देशांतील शेती तंत्र इज माइल्स अहेड. त्यामुळे पारंपारिक शेती तंत्राचा त्याग केल्याशिवाय आणि डायरेक्ट वितरण केल्याशिवाय शेतक-यांची दु:खे कमी होणार नाहीत असे वाटते.

साहेब, आपल्याला किती

हाडक्या
Tue, 11/18/2014 - 23:51 नवीन
साहेब, आपल्याला किती वस्तुस्थिती माहीत आहे याची कल्पना नाही पण शेती बद्दल एकंदरीतच सर्वच बाजूनी फार अज्ञानमूलक प्रतिसाद दिसतात तीच स्थिती आपल्याला बर्‍याच पातळ्यांवर दिसते (खासकरून ज्यांचे निर्णय परिणाम करु शकतात अशा). प्रथमतः हे लक्षात घेतले पाहिजे की ज्याना हे कळते ते करतात आणि नफा पण कमावतात. परंतु आपल्याकडे
पारंपारिक शेती तंत्राचा त्याग केल्याशिवाय आणि डायरेक्ट वितरण केल्याशिवाय
इतका सोपा उपाय असेल असे नाहीये हो.. सरसकट सर्वच शेतकर्‍यांना एकाच मापात तोलणं, कर्जमाफी-वीजमाफी असले प्रसिद्धीलोलुप आणि तात्पुरती मलम-पट्टी करणारे आणि लुटालुटीची संधी निर्माण करणारे पॅकेज जाहीर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती या व्यवसायात अति-हस्तक्षेप करण (सर्वांनीच) हे सगळे आणि असे प्रकार या व्यवसायावर आणि संबंधित लोकांवर परिणाम करतात. ही आपल्याकडची वस्तुस्थिती आहे. सरकार चांगले उपक्रम राबवते नाही असे नाही. पण असे झालेय की बाकी बाजार स्वतंत्र वाढतोय पण या व्यवसायावर मात्र समाजवादी नियंत्रणाचे जोखड ठेवायचे. बरं त्याबाहेरच्या व्यापार व्यवस्थेसाठी अंतर्गत मुक्त व्यापार व्यवस्था..! म्हणजे मी साखर कारखान्यासाठीचा ऊस कितीला विकायचा कुठे/कोणाला विकायचा हे सरकार ठरवणार (त्यात मला निर्णय अधिकार नाही), मात्र व्यापारी ही साखर कितीला विकायची ते मात्र बाजार ठरवणार. इथे गडबड आहे. आणि जरी मुटे यांचे आणि शेतकरी संघटनांचे आवाज हे अतिरंजित आणि भावनिक वाटले तरी मूळ मुद्दा इथे आहे. वर कोणीतरी म्हणाले की 'निर्यात बंदी सारखी आयात बंदी पण हटवा की मग..' अतिशय उथळ विधान आहे हे. त्याचा फक्त शेतकर्‍यावरच नव्हे तर अर्थव्यवस्थेवरच परिणाम होतो. आणि हटवायचीच असेल ( खरंतर सर्वच देशांनी हटवावी मग) तर हटवा आणि पहा. एकाच व्यवसायास याबद्दल इतके धमकावण्याची काही गरज नाही. कोणी म्हणाले की जा की मग मुंबईला अथवा इतर ठिकाणी, कोणी तिथे रहायला सांगितलेय. हे पण तसेच उथळ उत्तर नाही का ? एका बाजूला शहरात लोंढे येतायत म्हणून चिंता करायची आणि मुख्य मुद्दा सोडून असले शहाजोग सल्ले (ते पण उगीच) द्यायचे. त्यांचा एक मुद्दा आहे की त्यांच्याकडे एक उद्योग आहे. तो त्यांना फार बंधने न घालता करु द्यावा. जो मला मान्य आहे. उगी शेतकर्‍यांच्या नावाने काही लोक पोळी भाजतात, काही-बाही भावनिक कविता, लेख, चित्रपट पाडतात म्हणून मुद्दाच समजून घ्ययचा नाही किंवा चूक म्हणायचा, हे काही पटत नाही. परदेशात बहुतेक ठिकाणी शेतीस वस्तुनिष्ठ व्यवसाय म्हणून पाहिले जाते. (म्हणून मी पाहतोय की इथे शेतकरी म्हणजे श्रीमंत व्यक्ती हा समज आहे बर्‍यापकी) . इतर उद्योगांना जशा सवलती, कर आहेत आणि निर्णय स्वातंत्र्य आहे तसेच शेती या व्यवसायास अनुसरून आहे. आपल्याकडे उगी याला भावनिक मुद्दा (ग्राहक बर्‍यापकी), सरकार सर्वच बाजूंनी ) न बनवता विचार झाला तरी खूप झाले. (माझा कोणत्याही शेतकरी संघटनेशी संबंध नाही, फक्त घरची कोरडवाहू शेती असल्याने समोर आलेल्या गोष्टी मांडल्यात)
↩ प्रतिसाद: vikramaditya

शेतकर्‍यांनी संघटीत व्हावे.

प्रभाकर पेठकर
Wed, 11/19/2014 - 01:49 नवीन
शेतकर्‍यांनी संघटीत व्हावे. आपल्या मागण्यांसाठी संप (उत्पादन बंद) करावेत. उस नाही पिकविला तर व्यापारी साखर कुठून विकेल? संघटीत मार्गाने राजकारण्यांवर दबाव टाकावा. शेतमाल विकण्याचे (कुठे आणि कितीला) निर्णय शेतकर्‍यांच्या हाती असावेत. शहरी सुशिक्षित समाज आपला विरोधक नाही तर आपल्यासारखाच अन्य मार्गाने भरडला जाणारा भाऊबंद आहे हे जाणून असावे. आपापसात दुफळी माजवून सत्ताधार्‍यांशी कशी झुंज देणार? भाव वाढले म्हणून इतर जनता कुरकुर करेलही पण शेवटी आहे त्या दराशी जुळवून घेतेच. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, भाज्या, डाळी ह्यांचे भावही गगनाला भिडतात तेंव्हा जनता जुळवून घेतेच. फारातफार सरकारला दोष देते, शेतकर्‍यांना नाही. शेतकर्‍यांच्या असंवेदनशीलतेवर ताशेरे ओढत बसत नाही. वरिल वस्तूंचे भाव कडाडले म्हणून इतर करांमध्ये (विक्रिकर, मिळकत कर, रस्त्याचे टोल वगैरे वगैरे) कुठे सवलती मागत बसत नाही आणि सरकार देणारही नाही. म्हणजेच शहरी सुशिक्षित जनतेला डाळी, धान्य, भाज्या ह्यांचे कडाडलेले भावही द्यावे लागतात शिवाय इतर कर, विजेची भरमसाठ बिलेही भरावी लागतात. त्यांच्यासाठी सरकार कुठली पॅकेजीस जाहिर करते? (अगदी लुटालुटीच्या कारणास्तवही). शेतकरी आणि बिगर शेतकरी अशी समाजात वर्गवारी करून एकाच्या दुरावस्थेला दूसर्‍या वर्गाला जबाबदार समजणं ह्याने समाजात दुफळी माजण्याव्यतिरिक्त दुसरे कांही साध्य होणार नाही. आपली फरपट थांबवायची असेल तर शेतकर्‍यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. स्वार्थी नेत्यांना खड्यासारखे दूर करून तळमळीच्या कार्यकर्त्यांना पुढे आणून उपाययोजना केली पाहिजे.
↩ प्रतिसाद: हाडक्या

///म्हणजे मी साखर

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 09:39 नवीन
///म्हणजे मी साखर कारखान्यासाठीचा ऊस कितीला विकायचा कुठे/कोणाला विकायचा हे सरकार ठरवणार (त्यात मला निर्णय अधिकार नाही), मात्र व्यापारी ही साखर कितीला विकायची ते मात्र बाजार ठरवणार. इथे गडबड आ///// साखर कारखान्यासाठी सरकारकडून पैसे घेतल्यावर ते काही अटी घालणारच. शिवाय साखर कारखाना शेतकरीच उभा करतो (नंतर मातीत मिळवतो) हे आपल्याला माहीत असेल. म्हणजे बघा मी साखर कारखाना काढणार, त्यासाठी सरकारकडून सीड कॅपिटल घेणार....मग सरकार तो बंद पडू नये म्हणून माझ्या कारखान्याच्या मेंबरांना तेथेच उस घालण्याचे बंधन घालणार. हे बंधन आहे, मग पैसे कुठे खाणार ? मग हे कारखान बुडविण्यासाठी भ्रष्टाचार करणार...हे काही समजले नाही बुवा... //वर कोणीतरी म्हणाले की 'निर्यात बंदी सारखी आयात बंदी पण हटवा की मग..' अतिशय उथळ विधान आहे हे. त्याचा फक्त शेतकर्‍यावरच नव्हे तर अर्थव्यवस्थेवरच परिणाम होतो. आणि हटवायचीच असेल ( खरंतर सर्वच देशांनी हटवावी मग) तर हटवा आणि पहा. एकाच व्यवसायास याबद्दल इतके धमकावण्याची काही गरज नाही.// नैसर्गिक न्यायाला सामोरे जायची शेतकर्‍याची तयारी आहे का ? अहो इथे श्रीमंत शेतकरी सगळ्या सोई सुविधा लाटतो. त्यांनी खरे तर स्वतःहून सगळ्या सबसिडी नाकारुन त्या गरीब शेतकर्‍याला द्यायला पाहिजेत. आणि कोणीही शेतकर्‍यांना धमकावत नाही. तेच उठसउट सामान्य जनतेला धमकावत असतात.... शेतकरी आत्मपरिक्षण कधी करणार हा खरा प्रश्न आहे... तुमचे उदाहरण घ्यायचे तर तुम्ही शहरात आला आहात की तेथेच आहात हे कळले तर त्याअनुशंगाने अधिक चर्चा करता येईल.....आणि कोरडवाहू भूधारकांची जमीन ओलिताखाली आल्यावर ते धरणाखाली ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचेही उपकार विसरतात....त्यामुळे इतर सर्व जनतेप्रमाणे शेतकरीही अत्यंत स्वार्थी आहे हे नाकारण्यात अर्थ नाही....त्यामुळे त्यांची विशेष टिमकी बडविण्यात अर्थ नाही......
↩ प्रतिसाद: हाडक्या

वर कोणीतरी म्हणाले की

प्रसाद१९७१
Wed, 11/19/2014 - 09:54 नवीन
वर कोणीतरी म्हणाले की 'निर्यात बंदी सारखी आयात बंदी पण हटवा की मग..' अतिशय उथळ विधान आहे हे. त्याचा फक्त शेतकर्‍यावरच नव्हे तर अर्थव्यवस्थेवरच परिणाम होतो. >>>>>>>> @ जयंत हे अजिबात उथळ विधान नाहीये. भारता सारखी आयात बंदी जर युरोप अमेरिकेनी IT BPO वर घातली तर ८० टक्के मिपाकर बेकार होतील ( माझ्यासकट ). मग अर्थव्यवस्थे वर काय परीणाम होइल तो बघा. जी वस्तू , सेवा जिथे स्वस्तात तयार होते तिथे ती तयार करावी असे सध्याचे अर्थकारण आहे. त्याचे सर्वात जास्त फायदे भारताला होत आहेत. स्वस्त मनुष्यबळ, सुपिक जमीन आणि खात्रीचा पाउस ( मान्सुन कधीही ७५-८० टक्क्या पेक्षा कमी पडत नाही ) असे असताना भारतापेक्षा जगात शेती उत्पादन स्वस्तात का तयार होते ?
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अहो ते वाक्य माझे नाही.

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 10:03 नवीन
अहो ते वाक्य माझे नाही. त्यांचे आहे आणि मी त्याच्यावर त्याखालील टिप्पणी केली आहे....:-)
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 10:07 नवीन
पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... शेतकर्‍यांची कशालाच तयारी नाही. मी शेतकरी फार जवळून पाहिले आहेत. पूर्वीचेही आणि आत्ताचेही. फार फरक आहे दोन्हीत....
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

पेठकर काका आणि जयंत काका

हाडक्या
Wed, 11/19/2014 - 17:36 नवीन
पेठकर काका आणि जयंत काका एकत्र प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतोय. प्रथमतः मी शहरी सुशिक्षित मध्ये गणला जाईन, अनिवासी भारतीय म्हणून देखील पण माझे वडील अजूनही शेती करतात तेव्हा माझी माझ्या मातीशी नाळ चांगलीच जुळलेली आहे. त्याचबरोबर शहरी असण्याचे फायदे-तोटे हे देखील चांगलेच माहीत आहेत. गावी आता मी 'गावचा राहिलो नाही' म्हणून मित्रांत चेष्टादेखील होते. इतर लोक शेतकर्‍याना कसे बघतात आणि शेतकरी अथवा गावकरी इतरांकडे कसे बघतात हे देखील आता तटस्थपणे पाहू शकतो म्हणून इथे एवढे लिहायला बघतोय. प्रथमतः शहरी वि. शेतकरी ही मांडणी मला मान्य नाही,
शहरी सुशिक्षित समाज आपला विरोधक नाही तर आपल्यासारखाच अन्य मार्गाने भरडला जाणारा भाऊबंद आहे हे जाणून असावे.
हे अगदी मान्य. त्याचबरोबर,
शेतकरी आत्मपरिक्षण कधी करणार हा खरा प्रश्न आहे... तुमचे उदाहरण घ्यायचे तर तुम्ही शहरात आला आहात की तेथेच आहात हे कळले तर त्याअनुशंगाने अधिक चर्चा करता येईल.....आणि कोरडवाहू भूधारकांची जमीन ओलिताखाली आल्यावर ते धरणाखाली ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचेही उपकार विसरतात....त्यामुळे इतर सर्व जनतेप्रमाणे शेतकरीही अत्यंत स्वार्थी आहे हे नाकारण्यात अर्थ नाही....त्यामुळे त्यांची विशेष टिमकी बडविण्यात अर्थ नाही.....
ही वाक्ये खूपच वेदनादायी आणि सरसकटीकरण करणारी आहेत. या अशा भुमिकांमुळेच कदाचित मग तथाकथित शहरी समाज स्वतःला या प्रश्नांना एका 'इतर समाजाचे प्रश्न' अशा भावनेतून बघतोय असे ध्वनित होते. (अगदी आरक्षणाच्या प्रश्नावरही अशाच प्रकारच्या सरसकट आणि अलिप्त प्रतिक्रिया पहयला मिळतात बर्‍याचदा आणि मग मूळ मुद्दी भरकटतात.) तुम्ही धरणग्रस्तांचे म्हणालात, आता तुम्ही सांगा पुण्या-मुंबईला, उद्योगांना त्याच धरणातून पाणी मिळते म्हणून कोणी धरणग्रस्तांना उद्योगांत हिस्सा वाटून देता का ? रहायला तुमच्या सोसायटीत सरकार भावाने का होईना फ्लॅट देता का ? हो, शेतकरी देतो. सरकार-भावाने जमिनी ताब्यात घेऊन गावे वसवली जातात, त्यांना सामाजिकदृष्ट्या सामावून घ्यायचा प्रयत्न होतो, तो कुठे नोंद होत नाही. त्याची बातमी होत नाही. (बरेच धरणग्रस्त अजून आहेत पण तो वेगळा प्रश्), इथे अवांतर होईल) परत सांगतो, एक उद्योग म्हणून शेतीकडे सरकार आणि समाजाने पहावे आणि तसेच deal करावे हा मुद्दा मी मांडला होता.
नैसर्गिक न्यायाला सामोरे जायची शेतकर्‍याची तयारी आहे का ? अहो इथे श्रीमंत शेतकरी सगळ्या सोई सुविधा लाटतो. त्यांनी खरे तर स्वतःहून सगळ्या सबसिडी नाकारुन त्या गरीब शेतकर्‍याला द्यायला पाहिजेत. आणि कोणीही शेतकर्‍यांना धमकावत नाही. तेच उठसउट सामान्य जनतेला धमकावत असतात....
उत्तर असेल हो, नैसर्गिक न्यायाला सामोरे जायची शेतकर्‍याची तयारी आहे पण इतरांची त्यांना मुक्त व्यापर करु द्यायची तयारी आहे का ? म्हणजे उ.दा. समजा, उद्या जर ज्वारीच्या (अथवा इतर तत्सम धान्याच्या) व्हिस्कीची निर्मिती सुरु झाली आणि शेतकरी तिथे ज्वारी घालू लागला आणि बाजारात ज्वारीची किंमत खूपच वाढू लागली तर इतरांनी त्याबद्दल शेतकर्‍यास दोष देता कामा नये. ( हे उदाहरण आहे भावार्थ समजून घ्यावा. ज्वारीची दारु काढायला बसू नये. ;)) शेतकरी नैसर्गिक न्याय निसर्गाकडून आधीच झेलत असतो तसा पण इतर लोक सुद्धा त्याला तयार असावेत म्हणजे झाले. श्रीमंत शेतकरी सगळ्या सुविधा लाटतो वगैरे खरे असले तरी ही आपली सामाजिक उणीव आहे (जसे आरक्षण, जातीतले श्रीमंत लोकच फायदा घेत राहतात).,त्या सर्वच ठिकाणी ही गोष्ट लागू होते. शेतकरी म्हणजे संत-समुदाय नव्हे. माझा मुद्दा आहे की कशाला हव्यात या सबसिड्या ? मग हा वरील प्रश्नच उद्भवणार नाही. पण हा व्यापक प्रश्न आहे आणि धोरणात्मकरित्या सबसिड्या हटवण्याच्या दिशेने वाटचाल हवी असे माझे ठाम मत आहे. "तेच उठसउट सामान्य जनतेला धमकावत असतात...." इथेच तुम्ही त्यांना सामान्य जनतेपेक्षा 'इतर कोणी' असे गृहित धरून चूक करत आहात. बहुसंख्य शेतकरी सामान्य अतिसामान्य असाच आहे, त्याचे थोडे प्रश्न आपल्या समाजातले प्रश्न म्हणून लक्षात घेतलेत तरी फार झाले. कदाचित या अशा उत्तरामुळेच मुटेंसारखे शेतकरी संघटनेचे लोक अति-भावनिक आणि चिडून असल्यासारखे लिहित असतील (अर्थात ते ही चूकच).
शेतकर्‍यांनी संघटीत व्हावे. आपल्या मागण्यांसाठी संप (उत्पादन बंद) करावेत. उस नाही पिकविला तर व्यापारी साखर कुठून विकेल? संघटीत मार्गाने राजकारण्यांवर दबाव टाकावा. शेतमाल विकण्याचे (कुठे आणि कितीला) निर्णय शेतकर्‍यांच्या हाती असावेत.
हे अगदी मान्य. पण प्रयत्न या आधीच सुरु आहेत की काका. दर वर्षी चालणारी दरासाठीची आंदोलने काय आहेत ? मुळात याची गरज कशाला पडावी. कशाला सरकारने उपकार केल्यासारखे दर ठरवावेत?
त्यांच्यासाठी सरकार कुठली पॅकेजीस जाहिर करते? (अगदी लुटालुटीच्या कारणास्तवही). शेतकरी आणि बिगर शेतकरी अशी समाजात वर्गवारी करून एकाच्या दुरावस्थेला दूसर्‍या वर्गाला जबाबदार समजणं ह्याने समाजात दुफळी माजण्याव्यतिरिक्त दुसरे कांही साध्य होणार नाही.
हे देखील बिनशर्त मान्य. पॅकेज पद्धत तर पार वाईट. त्याने रास्त मागण्या पण दाबून टाकल्या जातात. उर्वरित जनता आणि पॅकेज जाहीर झालेली जनता (मिळालेली नव्हे) यात फूट पाडली जाते. नंतर इतर लोक ही विचारतातच की 'दिले ना पॅकेज सरकारने, अजून काय हवे ?' आणि मुद्दा बाजूलाच राहतो.
साखर कारखान्यासाठी सरकारकडून पैसे घेतल्यावर ते काही अटी घालणारच. शिवाय साखर कारखाना शेतकरीच उभा करतो (नंतर मातीत मिळवतो) हे आपल्याला माहीत असेल. म्हणजे बघा मी साखर कारखाना काढणार, त्यासाठी सरकारकडून सीड कॅपिटल घेणार....मग सरकार तो बंद पडू नये म्हणून माझ्या कारखान्याच्या मेंबरांना तेथेच उस घालण्याचे बंधन घालणार. हे बंधन आहे, मग पैसे कुठे खाणार ? मग हे कारखान बुडविण्यासाठी भ्रष्टाचार करणार...हे काही समजले नाही बुवा...
तुम्ही फारच एकांगीपणे बोलताय जयंत काका. तसेच आजच्या वस्तुस्थितीची माहिती नसल्यासारखे हे झाले बरेचसे. सहकार चळवळ आणि त्यातला भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा आहे आणि तो कोणी अमान्य करणार नाही. पण ज्यानी भ्रष्टाचार केलाय त्यांना शिक्षा द्या ना. अगदी सगळ्या मेंबर्सना पण द्या. (वरून फार वाटत असेल तर करा खाजगीकरण या कारखान्यांचे.) सहकारी साखर कारखाने आणि त्यांच्या मेंबर्सना फक्त ही बंधने असतील तर कशाला काय म्हणायचे आहे..? प्रश्न असा आहे की मी उद्या ऊस करायला गेलो तरी पण मला ऊस मला हवा तिथे विकता येत नाही. हा मूळ मुद्दा आहे. मी कुठलाही मेंबर नसलो तरी ही नाही. आता तुम्ही यावर उपाय म्हणून स्वतःचा खाजगी कारखाना काढा असे म्हणणार असाल तर काय बोलावे ?
मुळे त्यांची विशेष टिमकी बडविण्यात अर्थ नाही......
माझ्या आधीच्या (आणि या प्रतिसादात ही) तुम्हाला टिमकी कुठे दिसली ? एखादी बाजू वस्तुनिष्ठपणे मांडणे देखील टिमकी म्हणवले जात असेल तर अवघड आहे. पेठकर काका म्हणाले ते 'शहरी सुशिक्षित समाज आपला विरोधक नाही तर आपल्यासारखाच अन्य मार्गाने भरडला जाणारा भाऊबंद आहे हे जाणून असावे' हे परत परत सांगायला का लागते ते कळतेय या टिमकी भाष्यावरून.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा