डावाच्या मध्यात मॅग्नुसचा हत्ती आणि प्यादे आलेय. आता बी ६ प्यादे घेऊन कर्णात उंट काढणार का आनंद? का काळा उंट लगेच हाकलून लावेल? तसेच झाले, हत्ती मागे गेला.
तो आक्रमकपणा दिसत नाहीये जो आता खरंतर दिसायला हवा, कारण आता नाही तर तो कधी आक्रमक होणार?
तसाही तो दोन गुण मागे आहे, हीच संधी आहे आक्रमणाची. अन्यथा सामना गेल्यासारखाच म्हणावा लागेल!
जितकी मोहोरी पटावरुन जातील तितका डाव मॅग्नुसला सोपा हे समीकरण आहेच.
घोडा ई१ म्हणजे आता डी५ असे प्यादे टाकायचा विचार आहे. उंट एफ ४ आलाय. मॅग्नुस चटाचट खेळतोय.
आणि आनंदचे प्रेशर वाढवतोय. दोघांसाठी ही स्थिती पहिल्यांदाच आलीये बोर्डावर.
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)
डबल करणार काय मॅग्नुस वजिराच्या पट्टीत? आनंद आज वेळ घेतोय खेळ्यांना. त्याच्या चेहेर्याकडे बघून डाव त्याला हवा तसा डेवलप झालाय की नाही हे समजत नाहीये. पोकर फेस!
हत्ती + वजीर मॅग्नुसने. पहिली वेगळी खेळी. आनंदच्या पांढर्या उंटाला आता चांगली जागा हुडकावी लागेल कारण बी एफ ५ झाले तर थेट मारामारी करणार कार्लसन असे दिसते.
मला वाटतंय की २ पॉईंट लीड हा तसा खूप मोठा आहे. मॅग्नस अजून एक दोन ड्रॉ घेईन फटाफट आणि नंतर शेवटचे दोन तीन डाव एकदम आक्रमक खेळून आनंदला पुरता भुईसपाट करण्याचा प्रयत्न करेल. आनंदला नव्या खेळ्या शोधण्यात सातत्याने अपयश येते आहे. मॅग्नस अगदी आरामात आणि ताबडतोब प्रत्युत्तर देतो आहे.
खरंतर सांदीपन चंदा हा बराचसा मॅग्नुससारखा खेळतो असं म्हणतात म्हणून आनंदने त्याला टीममधे घेतला.
परंतु टीम कार्लसनने आत्तापर्यंत आनंदचे सगळे प्लॅन्स हाणून पाडलेत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये!
प्रतिक्रिया
ई ४ मॅग्नुसची पहिली खेळी
इकडं 'बर्लिन वॉल' अजून
किल्लेकोट झालाय!
पहिल्या ५-७ डावातच दोघांचे
आज बहुतेकझटपट बुध्दीबळ
आनंदमधे अजूनही
ह्त्तींची मारामारी झाली.
च्यामारी
च्यामारी
हो ना!
कार्लसनची डिवेलपमंट उत्तम झालीये
जी ६ प्यादे
नाही
हं!
त्यात आनंद तेरा मिनीटं मागे पडलाय!
हत्ती आणि वजीर
मी तर आधीच म्हटलं की कार्लसनचा डाव मस्त ओपन झालाय
हं बरोबर आहे.
केला डबल
आनंद घोड्याच्या आधारे कालुचा f4ऊंट का टारगेट करत नाही?
कारण वजीर हत्तीच्या
पण पाण्ढ्रा ऊंट सपोर्ट देऊ शकतोय ना?
नाही
चतुरंग, तुम्ही बोर्ड फ्लिप करुन पाहा
झाले उंट एक्सचेंज झाले!
केलि घोड़ा f3 कालुने पहिली डिफेंसिव मूव केलि :)
परत घोडा मागे?
थोडा वेळ द्या आन्द्याला ,
मॅग्नुसचा उंट ई५ वर आला.
+१
शक्य आहे!
आज काहीतरी कर रे बाबा ..
छे हो!
वॉट अ मूव्ह! Be5!
आता आनंदने उंट मारला
असं नाही हो!
हो ते तर
याहू कालुचा ऊंट जबरा खाल्ला आनंद इज बैक इन फॉर्म टुडे
आनंदन गेम घालवली आहे!
आता आनंद घोडा एफ ४ खेळणार का?
आनंद सरळ घोड़ा अन वजीर वापरून कालुच्या राज्याकड़े मुसंडी रचनार
पण कालू g3 डिफेन्स करणार त्याला आनंद कड़े काय पर्याय असेल
हा गेम आनंद जिंकेलसं वाटत
मी वर म्हटलं होतं कार्लसन जस्ट वाँट्स अॅन ओपनिंग अॅट f6
टीम आनंद यावेळेला कमी पडली हे नक्की!
प्लिज कौमेन्त्रि चालु ठेवा
साला
आयचा घो!
चतुरंग,
आनंदने घोडयाचा वापर करून कालुचा वजीर तरी हलवावा