Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 19/11/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार? पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल? कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस? चला बघूयात गेम ८.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20029
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

आमचा लाडका सांऽबर बाऽत आला. :)

आर्रर्र आलो तोपर्यंत संपलीपण मॅच . बायदहायवे , धन्यवाद समालोचनासाठी .

In reply to by भडकमकर मास्तर

ऑलिंपिक संघटनेशी सलग्न आहे त्यामुळे बुद्धीबळातही उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य झाली आहे. आज आनंद आणि मॅग्नुस दोघांचे युरीन सँपल घेतले गेले. अर्थात हे आजच नाही तर २००६ पासूनच्या सग़ळ्या मोठ्या सामन्यात केले जाते आहे.

नी सेकंड्स ची नावं डिस्क्लोज केल्यामूळं कार्ल्सन ला थोडा अंदाज आला असेल तो काय खेळु शकतो ते. त्याचाही त्याला थोडा फायदा झाला असेल असं वाटतं. पण आता जर २ गेम्स हरलेतच तर थोडीशी रिस्क घेउन खेळायला काय हरकत आहे ? कि या लेवलला काउंटर प्ले जनरेट करणं तेव्हढं सोपं नाही आहे अँड दॅट वीन लॉस इक्वेशन कॅन अफेक्ट द प्राइज मनी अ‍ॅज वेल ?

इट इज कॉल्ड एटिट्युड एण्ड प्रोफेश्नलिज्म. मी आधीच म्हणालो होतो की पटाबाहेरच्या ह्या खेळात कार्लसनने आधीच बाजी मारली आहे. कार्लसनला सुरुवातीपासूनच आनंदची टिम ओळखू शकली नाही. हा असा अभ्यास असतो आपला आपल्या विरोधी पक्षाचा, ह्याच नाही तर इतर साऱ्याच खेळांमध्ये. आपल्या भारतीयांना आपल्या शत्रूविषयी देखील खूप काळजी असते आणि तीच नडते आपल्याला. जेव्हा आपण आपले पत्ते बाहेर काढले तेव्हा तो आपले पत्ते शो ऑफ करणार की नाही हे देखील कळले नाही. त्याने पूर्ण टूर्नामेंट पोकर फेसने काढली. समोरच्याला आपल्या खेळाचा थांगपत्ताच लागू दिला नाही. माझा आनंदच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. जरी तो अडचणीत आला असला तरी फाईटर आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट.

In reply to by सुहासदवन

त्यात फारसे गुपित राखण्याजोगे काही नव्हते. त्यामुळे कार्लसनला त्याचा वेगळा फायदा झाला असे वाटत नाही. मॅग्नुसचा खेळ हा आनंद टीमने जोखला त्याहीपेक्षा वेगळा निघाला हे मात्र खरे.

In reply to by चतुरंग

आनंद ने डिक्लेअर केली टीम तेव्हा कार्ल्सनचा चेहरा बघण्यासारखा होता. (आनंदनी पीटर लेकोचं नाव घेतलं तेव्हा पाहा) त्यानी एक्स्पेक्ट नव्हतं केलं की आनंद उत्तर देइल म्हणून. ही वॉज टोटली सरप्राइज्ड. तेव्हा त्याला अंदाज आला असेल व्हॉट टू एक्स्पेक्ट.

जेव्हा आनंदने टीम डिक्लेअर केली तेव्हा अगदी आनंदने डावाच्या आधीच "सायकोलॉजीकल बॅटल" सुरु केलंय वगैरे रिपोर्ट्स ! झालं उलटच. सगळे म्हणत होते कार्ल्सन ला मॅच प्ले चा एक्स्पीरीअन्स नाही त्यामुळे त्याला अवघड जाइल वगैरे वगैरे. तो झोप आल्यासारखा चेहरा करुन बसतो अगदी आरामात. कळत देखील नाही त्याला टेन्शन आहे की नाही ते :)

माझ्या मते कार्लसननं 25. Qxe8+ या जबरदस्त चालीनं, आनंदला निर्विवादपणे ड्रॉ करायला भाग पाडलं. याविषयी तुम्हाला काय वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये! बघुया आज काय होतय. बाकी तुमच्या विरुध्द एक बुध्दिबळाचा डाव खेळायची तीव्र इच्छा आहे येताय का ऑनलाइन ? कारण तुम्हाला सगले फक्त ऑनलाइन पसंत असते म्हणून विचारले

In reply to by संजय क्षीरसागर

ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये!
कार्लसन त्याला ड्रो करायला भाग पाडत नाही कारण आनंद कार्लसनला मुळात धोक्यातच आणत नाही.... तर तो आनंदला ड्रो करायला भाग पाडायच्या फंदात पडेल कशाला ?

In reply to by अग्निकोल्हा

तुम्ही म्हणता त्यावर ऑलरेडी बोलणं झालंय. या डावातल्या त्या सेट ऑफ मूव्हजबद्दल बोला.

In reply to by संजय क्षीरसागर

इज ऑर्डिनरी मोव! साहेब , मला आपल्या सोबत खरोखर चेस खेळायचे आहे रूम सुधा क्रिएट केली आहे जॉइन होता काय url देतो ?

In reply to by अग्निकोल्हा

नाय लागत आहे किल्ली अजून. एक मिनिट थांबा. वाय फाय कनेक्शन गंडलय जरा. परत लॉगिन करतो.

In reply to by प्रचेतस

मी ओपनिंगला महत्व देतो व् एकुण वेळेच्या50% वेळही मी यात दडवला पण कार्लसन नेमकं ह्याचा विरुध्द करतो तरीही जिंकतो :)

In reply to by प्रचेतस

[Event "Cloudroid Chess Online"] [Site "Android Device"] [Date "2013.11.20"] [Time "18:51:54"] [White "FireFox"] [Black "Sagar"] [Result "*"] 1. e2e4 e7e5 2. Ng1e2 Nb8c6 3. Nb1c3 Bf8c5 4. Nc3a4 Bc5b6 5. b2b3 Ng8f6 6. Na4xb6 c7xb6 7. d2d3 O-O 8. Qd1d2 d7d6 9. h2h4 Bc8g4 10. f2f3 Bg4h5 11. g2g4 Bh5g6 12. Bf1h3 Nc6d4 13. h4h5 Nd4xe2 14. Qd2xe2 Qd8e7 15. Bc1d2 Rf8b8 16. O-O-O Nf6d7 17. Kc1b2 f7f6 18. Qe2e3 Bg6f7 19. Rh1g1 Rb8c8 20. h5h6 g7xh6 21. Qe3xh6 Qe7e8 22. g4g5 Bf7g6 23. Qh6h4 Nd7c5 24. g5xf6 Qe8e6 25. Bh3xe6 Nc5xe6 26. Rg1xg6 Kg8f7 27. Qh4xh7 Ne6g7 28. Qh7xg7

In reply to by संजय क्षीरसागर

कारण 24. Qe5 असा वजीर पुढे काढल्यानंतर मॅग्नुसची घोडा एफ ६ शह अशी धमकी आहे आणि राजा-हत्ती यांना बसलेल्या फोर्कमुळे हत्ती पडेल! बरं हत्ती वाचवावा म्हणून आनंद हत्ती राजाच्या जवळ घेऊ शकत नाही कारण मग घोडा एच ६ शह आणि मात!! त्यामुळे आनंदने घोडा मागे घेऊन Ng7 मॅग्नुसच्या वजिरावर हल्ला केला. शिवाय राजाला बचावासाठी एच स्तंभात सुरक्षित घर निर्माण झाले. आता पांढरा वजीर एफ स्तंभ सोडून कुठेच जाऊ शकत नाही कारण मग हत्तीने हत्ती मारुन आनंद शेवटच्या पट्टीतली मात करेल! शिवाय आता आनंदचा घोडा मधून निघाल्यामुळे आधीची घोडा एफ ६ शह अशी धमकी होती ती कुचकामी झाली कारण आनंद त्याच्या वजिराने एफ ६ वरचा घोडा मारेल. कारण मग मॅग्नुस आनंदचा वजीर घेऊ शकत नाही पुन्हा बॅकरँक मेट आहेच!! त्यामुळे पुढच्या 25. Qxe8+ Nxe8 26. Rxe8+ Qxe8 27. Nf6+ Kf8 28. Nxe8 Kxe8 इथप र्यंत खेळ्या अनिवार्य होत्या.

काही गोष्टी लक्षात आल्या. एकतर ५ आणि ६ डाव हारल्यामुळे जो आत्मविश्वास गमावला होता तो थोडातरी ७ व्या डावातल्या बरोबरीने भरुन निघायला मदत झाली. आठव्या डावात आनंदकडे काळी मोहोरी होती त्यामुळे काळ्याकडून बर्लिन खेळताना पांढर्‍याकडून काय चाली होतात हे जोखण्याची ही नामी संधी होती. कारण आधीच्या दोन्ही वेळेला बर्लिन झाला त्यावेळी मॅग्नुस काळ्या मोहोर्‍यांनी खेळत होता. त्यातल्या एका वेळेला आनंद हारला होता! ते समजल्यामुळे आता पुढच्या डावात बर्लिनवर सणसणीत तोडगा काढणे किंवा ज्यात बर्लिन डिफेन्स होत नाही असे ओपनिंग करणे असे दोन स्पष्ट पर्याय समोर आहेत. शिवाय मधे एक सुट्टीचा दिवसही आहे आणि आनंदची पांढरी मोहोरी सुद्धा आहेत! अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नववा डाव मात्र महत्त्वाचा आहेच आहे. कारण यानंतर फक्त ११ वा डाव पांढर्‍याचा आनंदला मिळेल. जे काय करायचे आहे ते आता नवव्या डावातच सुरु करावे लागणार हे निश्चित! त्यामुळे माझ्यालेखी अजूनही आशा सोडायला नको, काम भलतेच कठिण आहे परंतु अशक्य नाहीये! घरची तयारी आणि नैसर्गिक खेळ यांची सांगड जर आनंदला घालता आली तर परवाचा डाव त्याचाच असेल. गुडलक आनंद!! :)

आता पुढच्या ४ डावात आनंदला जिंकायला ३.५ आणि टाय ब्रेकर मधे जायला ३ पॉईंट पाहिजेत ...अवघड आहे