Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 19/11/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार? पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल? कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस? चला बघूयात गेम ८.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20094
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

डावाच्या मध्यात मॅग्नुसचा हत्ती आणि प्यादे आलेय. आता बी ६ प्यादे घेऊन कर्णात उंट काढणार का आनंद? का काळा उंट लगेच हाकलून लावेल? तसेच झाले, हत्ती मागे गेला.

तो आक्रमकपणा दिसत नाहीये जो आता खरंतर दिसायला हवा, कारण आता नाही तर तो कधी आक्रमक होणार? तसाही तो दोन गुण मागे आहे, हीच संधी आहे आक्रमणाची. अन्यथा सामना गेल्यासारखाच म्हणावा लागेल!

जितकी मोहोरी पटावरुन जातील तितका डाव मॅग्नुसला सोपा हे समीकरण आहेच. घोडा ई१ म्हणजे आता डी५ असे प्यादे टाकायचा विचार आहे. उंट एफ ४ आलाय. मॅग्नुस चटाचट खेळतोय. आणि आनंदचे प्रेशर वाढवतोय. दोघांसाठी ही स्थिती पहिल्यांदाच आलीये बोर्डावर.

या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

आता पुढच्या खेळीत पांढरे उंट एक्सचेंज होणार का? घोडा डी२. मॅग्नुसने १५ खेळ्यांना फक्त ३ मिनिटे घेतलीत आणि आनंदने १५.

डबल करणार काय मॅग्नुस वजिराच्या पट्टीत? आनंद आज वेळ घेतोय खेळ्यांना. त्याच्या चेहेर्‍याकडे बघून डाव त्याला हवा तसा डेवलप झालाय की नाही हे समजत नाहीये. पोकर फेस!

In reply to by चतुरंग

ही हॅज अनलिमीटेड ऑप्शन्स टू अ‍ॅटॅक

हत्ती + वजीर मॅग्नुसने. पहिली वेगळी खेळी. आनंदच्या पांढर्‍या उंटाला आता चांगली जागा हुडकावी लागेल कारण बी एफ ५ झाले तर थेट मारामारी करणार कार्लसन असे दिसते.

In reply to by अग्निकोल्हा

कॉम्बिनेशनने बॅकरँक मेट आहे!!

कार्लसनची सगळी मोहोरी आनंदच्या राज्याकडे रोखलीयेत आणि आनंदची मात्र अडकून पडलीयेत किंवा दिशाहिन दिसतायंत

आता घोडी डावाच्य मधे आलीत. मॅग्नुसची घरची तयारी जोरात झालीये. तो खेळायला अजिबात वेळ घेत नाहीये. फक्त ६ मिनिटात त्याने १९ खेळ्या केल्यात! अमेझिंग!

अपेक्षित होतीच खेळी. कारण आता तो अजून एक उंट डावातून काढून टाकायला बघतोय. सरळ आहे ड्रॉ चालतोय त्याला.

In reply to by चतुरंग

मला वाटतंय की २ पॉईंट लीड हा तसा खूप मोठा आहे. मॅग्नस अजून एक दोन ड्रॉ घेईन फटाफट आणि नंतर शेवटचे दोन तीन डाव एकदम आक्रमक खेळून आनंदला पुरता भुईसपाट करण्याचा प्रयत्न करेल. आनंदला नव्या खेळ्या शोधण्यात सातत्याने अपयश येते आहे. मॅग्नस अगदी आरामात आणि ताबडतोब प्रत्युत्तर देतो आहे.

In reply to by रमताराम

तो भलताच अनप्रेडिक्टेबल आहे हे नक्की! संपूर्णपणे गेम ऑफ इंट्यूशन आहे.

तर मॅग्नुसचा घोडा मस्त डावाच्या मधे ठाण मांडून बसतोय! त्याला उंट कुठेच हलवता येत नाहीये आहे तिथेच ठेवयचा नाहीतर एक्सचेंज.

सरळ आहे ड्रॉ चालतोय त्याला.
नेव्हर! आतापर्यंतच्या अनुभवावरनं ही ऑलवेज हेडस फॉर अ वीन.

In reply to by संजय क्षीरसागर

आहेच. झाले उंट गेले. आनंदचा वजीर आणि घोडा डावाच्या मधे आलेत. आणि कालूचा घोडा ई५ असा मस्त येऊन बसलाय.

मग वजीर एफ ५ आणि एफ ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे रेटायला हवा! अन्यथा ते घोडं नुइसन्स ठरणार.

खरंतर सांदीपन चंदा हा बराचसा मॅग्नुससारखा खेळतो असं म्हणतात म्हणून आनंदने त्याला टीममधे घेतला. परंतु टीम कार्लसनने आत्तापर्यंत आनंदचे सगळे प्लॅन्स हाणून पाडलेत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये!

कार्ल्या असा काही तंगड्या पसरून बसतो की असं वाटतं आत्ता म्हणेल 'अरे काय टाईमपास लावलाय, जरा पटपट खेळ की.'

टीम आत्तापर्यंतरई पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. कोणताही थरारक काउंटरप्ले ते जनरेट करु शकले नाहीत! वी अलमोस्ट हॅव अ न्यू चँपिअन!!

In reply to by चतुरंग

त्याची बॉडी-लॅंग्वेज आणि खेळातील रिस्क घेण्याबाबत अनिच्छा पाहता पुढे फार फरक पडेल असे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.

In reply to by रमताराम

खरंच :( आता इथुन पुढे जर आनंदने कम्बॅक केले अन च्यॅम्पीयनशीप राखली तर ते एक ग्रेट मिरअ‍ॅकल असेल !!

In reply to by चतुरंग

येस! बॉबी फिशरनं म्हटलंय चेस इज नॉट अ लाँग ड्रॉन डिप थॉट गेम. यू जस्ट नीड टू हॅव अ थ्री-फोर मूव्हज शॉर्ट अँड फ्लॉलेस प्लान. विन दिज स्मॉल फाईटस अँड दॅट अल्टिमेटली विन्स द बॅटल!

In reply to by चतुरंग

व्ही व्ही एस लक्ष्मण -राहुल द्रविड ह्यांच्या भागीदारीसारखं काहीतरी होउन फॉलोऑन मिळालेला सामनाही आनंदनं जिंकून घ्यावा असं अजूनही वाटतय. काही तरी चमत्कार व्हावा राव आता.

चेन्नैत सामना घेणे हे आनंदच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकणारे ठरले!! आनंद त्याच्या शेलमधून बाहेर येऊ शकत नाहीये. ही इज टू डिफेन्सिव, वेरी अननॅचरल ऑफ हिम! :(

चला .. नव्या जगज्जेत्याचं स्वागत करायच्या तयारीला लागायला हवं :( >>वेरी अननॅचरल ऑफ आनंद >> +१०००००००