Skip to main content

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो . मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्‍या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे----- कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33067
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. फिर्यादीची तक्रार आमच्या विरुद्ध असल्याने आम्हाला धिंगाणा घालायचा पुर्न हक्क आहे. पण तुझा काय संबंध? तुला बायको नाही आणि सांभाळायला पोरं पण नाहीत!! आणि बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. (अवांतर - ह्याचं लग्न करुन द्या रे.. मग बघु या मज्जा...!! (परत एकदा पैतै ची स्मायली + ही ही ही)

In reply to by पिलीयन रायडर

>>>> बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. हाहाहा लंबर एक. फार्मात आहात. सच्यासारखी खत्रा फलंदाजी चालू आहे. मस्त. समस्त पुरुषांना विनंती की इकडे या धाग्याकडे फिरकू नका. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

*mosking * *JOKINGLY * 8 P 8 p ही घे पिरा स्मायली! JOKINGLY नंतर मी स्पेस टाकली आहे ती काढ अन स्टार चिटकव. झाली स्मायली. mosking नंतर पण तेच अन एट पी मधलही अंतर काढ.

In reply to by पिलीयन रायडर

आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही फिर्यादी आहोत. पण तुला काय हक्क आहे? आरोपी ते आरोपी अन वर फिर्यादीच्या उलटी फिर्याद? त्यामुळं राहूच दे. (अवांतरः लग्न करूनही न सुधारणे हा स्त्रियांचा गुणविशेष म्हणावा काय?) -एलियन स्पायडर.

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या..... तुला माहीत आहे का एका सर्व्हे ने असे दाखवुन दिलय की स्त्रीया पुरुषांपेक्षा अधीक आनंदी असतात. त्या अधीक जगतात" कारन सोप्पय रे. "स्त्रीयाना बायको नसते "

In reply to by विजुभाऊ

=)) =)) ऐकलेय खरे अशा सर्व्हे बद्दल. बाकी, ज्यांना स्त्रियांत रस असतो अशा स्त्रियांबद्दलचा सर्व्हे काय म्हणतो तेही वाचायला आवडेल ;)

अब आ रहा है मजा.मोगँबो खुश हुआ.....

समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू कळकळीने मांडताना पाहून ड्वाॅले पानावले. मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं. :-)

In reply to by किसन शिंदे

>>>> मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. शाब्बास. आत्ताशी कुठं बरं वाटलं. अजून येऊ दे....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by किसन शिंदे

तीन प्रश्न १. कळकळ कुठे दिसली? (कडकड, कट कट दिसु शकेल.. कळकळ??) २. तुमचं लग्न झालं आहे का? (नसल्यास हा प्रतिसाद फाऊल आहे..) ३. तुम्ही संपादक आहात ना? (इन दॅट केस.. कसं काय मालक? चला चहा पाणी करुन येऊ.. दमला असाल..!!)

In reply to by किसन शिंदे

येकच नंबर किसनद्येवा!!! "पुर्षांच्या धाग्यावरि म्हैलांचा घाला आला आला सावध करा किसनद्येवाला सद्गदिता पुर्षांच्या ओ दे हाकेला करुणारव साचा तव कानी जो गेला"

In reply to by बाबा पाटील

किसनद्येवा या गोपींना सद्बुद्धी दे रे बाबा!

In reply to by स्पंदना

हाहाहा बाकी तुमची स्मायली त्या जळमटनिर्मात्या स्पायडरम्यानसारखी वाटू लागलेय =)) तिथे हाताची अ‍ॅक्शन तर इथे जिभेची इतकाच काय तो फरक.

मला कामाला लावून ही मस्त घोरत पडली आहे, म्हणून इकडे आलो तर.... ह्या भगिनींनी उच्छाद मांडला आहे. अशा वेळी मात्र ह्या सगळ्या नणंदा-वन्स एकत्र होतात.

मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं.

In reply to by यशोधरा

? (विस्कटून सांगण्याच्या प्रतीक्षेत) बॅटमॅन.

In reply to by बाबा पाटील

आहाहाहा! काय तरी निरीक्षण केलंय! मुळात घरामधे ढीगभर पसारा करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त पुरूषमंडळींचाच असतो.सणवार कशाला रोजचंच बघा ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात घेतलेली वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही आणि दुस-या दिवशी मात्र ती वस्तू सापडली नाही की बोंबाबोंब सुरूच!

In reply to by क्रेझी

तुम्ही माझा डु आय डी तर नाही ना? ;) वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही >मी हीच तक्रार करत असते सारखी. पसारा आवरुन घेण्यातच वेळ जातोय. आता पन्खे कधी पुसुन घेउ? स्वच्छता झाल्याशिवाय मी काही नवर्‍याला चकल्या करायला बसू देणार नाही. ;)

In reply to by क्रेझी

नीट वाचलं का? पसारा करण्याची बायकांना सवय असते असं लिहलंय अनं ते ही काम करताना. बाकी तुम्ही म्हणत असलेल्या पुरूषांच्या पसारा करण्याच्या सवयीविषयी तर तो वेगळा मुद्दा आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्यातला प्रकार!! :-)

पुरुषांचा पण सगळ्या "अबोल्याच" जास्त बोलत आहेत.

In reply to by इरसाल

एक तर "अबोल्या" च्या काळात आहात म्हणजे खुप जुनी न्युज आहे तुअम्च्या कडे.. अबोल्या अनाहीता झाल्यात.. दुसरं म्हणजे.. मज येतेय.. तुम्ही पण सामील व्ह्या!! दिवाळी पेश्शल.. !!

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना संघटनेत प्रवेश मिळेल का ? संघटना स्थापन करण्याधीच बुडवायची आहे का ?

In reply to by बाबा पाटील

देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.

In reply to by बाबा पाटील

=)) =)) =)) हे म्हणजे हैदराबादी बिर्यानी फ्यान क्लबात जैन मेंबर घेण्यापैकी =))

देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.ही गोष्ट यांच्या बापाच्यान शक्य नाही.

In reply to by बाबा पाटील

प्रतिपक्षाला आव्हान आहे की त्या बिनडोक सीरियल्सच्या विळख्यातून अगोदर बाहेर पडून दाखवावे आणि मग आव्हाने द्यावीत. काय म्हणता?

In reply to by बॅटमॅन

पै तै.. ह्याला जरा अनाहिता मधले विषय दाखवुन "गपगार" करायचं का ग!!!

In reply to by पिलीयन रायडर

अय्या अनाहिता दाखवणार? (शत्रुपक्षाचे दफ्तर पाहण्याचा चानस मिळाल्याने हरिखलेला) ब्याटपिष्टनसाहेब.

In reply to by बॅटमॅन

त्यासाठी लग्न कर की लेका. :-D आपोआप दिसते अनाहिता. ;-) . . अप्पुतई कडून मुरलेला असे सर्टिफ़िक्याट मिळालेला. अभ्या

In reply to by अभ्या..

आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं म्हणजे.....जौदे. पण तुला उपमा माहितीच आहे म्हणा- अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन =))

वर क्रेझी ने जे लिहिलय त्याच्याशी पूर्णपणे सहमत. आमच्याकडे सेम आहे. आणि वरती जाणार कुठे गं जाऊन जाउन? असा छानसा डायलॉग पण असतो. आणि दुसर्या दिवशी मोहरम.;)

In reply to by सविता००१

>> मोहरम मोहरम नि ना-मोहरम सुद्धा! ;)

धागा पीडित पुरुषांचा आणि त्यांची वकिली करतोय अविवाहित बॅटमन आणि गोष्टी चालल्यात २ बॅचलरांना संघटनेत घ्यायच्या! असोच!!

In reply to by पैसा

अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं ना चिमखडे बोल.. कौतुकाने वाचायचे..!! तो अविवाहीत आहे म्हणौनच तर बोलतोय.. बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..

In reply to by पिलीयन रायडर

बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..
स्वतःचा दिनक्रम इथे सांगितल्याबद्दल आभार :P अन पैसातै, पीडित पुरुषांबद्दल बोलायला विवाहितच असावे लागते काय? तसे तर मग प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झालेच पाहिजे =))

In reply to by बॅटमॅन

मी तुला म्हन्ल ना.. की "अभ्याशाला बशा"
यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने
तु नवला हायेस का?

In reply to by बॅटमॅन

तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही. बाकी पुरुष म्हणुन बायकांबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या दुसर्‍या धाग्यात मांडाव्यात.. इथे शिरेस चर्चा चालु हाये.. मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!

In reply to by पिलीयन रायडर

या धाग्यावर फिर्यादींना आपले म्हणणे मांडण्याची मुभा न देता आरोपींचीच बडबड चालूये. कुणाला तरी फिर्यादींची बाजू घेणे भागच आहे.
मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!
वेलांटी राहिली बहुधा.