मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....
वाचने
33497
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही आतली गोष्ट आहे....
In reply to मी संगटनेत येनार नाय ! by चौकटराजा
एकदम बरोब्बर...
मूळ काडी कोणी टाकली ते शोधतोय
मूळ काडी कोणी टाकली ते शोधतोय.. पण जंजाळात सापडेचना.
धागा रोचक वाटतोय.
धागा रोचकच
In reply to मूळ काडी कोणी टाकली ते शोधतोय by गवि
आहे
मस्त..
दिवाळीच्या आधी दोन्-चार दिवस सटकायचं कामानिमित्त बाहेर आणि दिवाळीत बरोब्बर टपकायचं.. 'तिकडून' अगदीच बोलाचाल झाली तर आउटसोर्स करुन टाक सांगून स्वतः ही मोकळं व्हावं, तिला पटलं तर करेल स्वतः नाहीतर करुन घेईल.. निदान सणासुदीच्या दिवसात दोन चार रिकाम्या हाताना काम असं वर समजाववं तिला!
हां पण पाडव्याला अंग रगडून घेतलं सकाळी की संध्याकाळी ओवाळणी क ड क झालीच पाहिजे नाहीतर धडगत नाही ;)
पण
मी काय म्हणतो, २१व्या शतकात दिवाळी फिवाळी सण साजरे करायचेच कशाला?
अर्रे! आमच्याकडे उजाडेपर्यंत
अर्रे! आमच्याकडे उजाडेपर्यंत (दोन्ही अर्थी) धाग्याने दंगा उडीवलाय राव!
बाबा पाटील यांनी अनेक पिपूंना मने मोकळी करायला संधी दिल्याबद्दल त्यांना बर्याच शुभेच्छा मिळाल्या असणार.
आयला मज्जा चालयीय राव.
दुपारचा बायकोच्या हातचा मटण रस्सा जरा आज अंमळ जास्तच झाला,त्यामुळे जागा होउन पाहतोय तर तिन तासात धागा शतकोत्तर गेला.विषय जरा जास्तच वादग्रस्त झाला राव.बाकी चालु द्या आज ढेकर जरा जास्तच येतायेत.
पाशवी धागा
पाशवी शक्ती लै दिवसांनी जागृतावस्थेत आल्याने धाग्यात मजा आली आहे.. मस्त एंजॉय झाला ..
दिवाळीच्या सुरुवातीलाच फुलबाज्या आणि फटाके !!
*********>>>>>.......
बरोब्बर बोललात बाबा.
बरोब्बर बोललात बाबा.
हे असेच आहे बघा.
पन सर्वात जलद शतक गाठणारा आनि जलद द्वीशतक गाठणारा धागा म्हणून रेकॉर्ड नोंद केल्या जाइल धाग्याची
काय उपेग ?
पण बाई शिवाय आयुक्षात मजा नाई ब्वा !
@पण बाई शिवाय>>> मंजे?????
In reply to काय उपेग ? by राजु भारतीय
@पण बाई शिवाय>>> =)) मंजे?????... लग्न नै करणार? :P
की लग्नानंतर,,, पश्चात् तापातले उद्गारआहेत हे? =))
झाली का साफसफाई?
सगळे पुरुषमुक्तीवाले साफसफाईत गुंतले वाट्टं? सगळं घरकाम मन लावून करा!!
पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन
In reply to झाली का साफसफाई? by पैसा
पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन देखील तृप्त नाहितच का? परत काड्या सारायला आल्याच ;)
नैतर काय? अहो पाशवी शक्ती
In reply to पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन by मृत्युन्जय
नैतर काय? अहो पाशवी शक्ती नैतर म्हणावे कशास ;)
घ्या!
In reply to पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन by मृत्युन्जय
मी आपली आपुलकीने चौकशी करत होते, तर म्हणे काड्या! खर्याचा जमाना नाही राहिला आजकाल!
खर्याचा जमाना नाही राहिला
In reply to घ्या! by पैसा
कैपण कै? डॉ.सुबोध खरे मला एरंडेल पाजतील हे वाचलं तर ;)
घे मुकाट्याने
In reply to खर्याचा जमाना नाही राहिला by बॅटमॅन
म्हणजे मग बाकी पुरुषवर्गासारखा तू पण गप बसशील घरी!
एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प
In reply to घे मुकाट्याने by पैसा
एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प ' बसु शकेल असे वाटत नाही.
हाहाहा!
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
उच्च!
खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे अवघड आहे. कसला तरी आवाज येणारच.
"सृजत्येरण्डतैलार्कः ध्वनिमपि विरेचने" (बॅटुश्रुताचार्य)
@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प ' बसु शकेल असे वाटत नाही>>> =)) ठ्ठो! ठ्ठो! ठ्ठो! =))
गप्प "बसू"तर शकणारच नाही,पण 'कळ' आली...तर गपकन~बसेल! त्याचे काय? =))
रोचक निष्कर्ष
In reply to घे मुकाट्याने by पैसा
वरील वाक्यावरोन बाकी पुरुषवर्गास एरंडेल पाजवल्या गेले असून 'नवर्या जा पळ रे' केल्या गेले आहे असे काहीसे चित्र डोळियांपुढे तरळोन क्षणमात्र अंधारी पसरली.
पाशवी शक्ती हे संबोधन अगदी खरेच आहे. इतके अत्याचार आणि तेसुद्धा गरीब बिचार्या पुरुषांवर?
याचसाठी का आम्ही *&^%%% ? (रिकाम्या जागा मगदुराप्रमाणे भरणे).
मग?
In reply to रोचक निष्कर्ष by बॅटमॅन
तरी स्वल्पहालप्राशनार्थ येम्मी पाहिजे?
आम्ही कधी म्हणालो
In reply to मग? by पैसा
आम्ही कधी म्हणालो अल्पहालासाठी येम्मी पाहिजे? पण येम्मीची मुख्य पर्पज लक्षात घेतली तर जष्टिफायेबल आहे हेवेसांनल =)) अल्पहालच पाहिजे असेल तर इतक्या डेअर्या आहेत तिकडे जावे ;)
(मरतंय आता)
मेल्या
In reply to आम्ही कधी म्हणालो by बॅटमॅन
घे आता हाल करून!
अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी
In reply to मेल्या by पैसा
अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी नव्हे. शांती शांती! (दिसत नैये सध्या ते एक सोडा)
आमचे ऐका, अहिंव्सा फ्वालो करा.
-वाग्बॅट ऊर्फ बॅटात्मा गांधी.
गप रे जरा !!
In reply to आम्ही कधी म्हणालो by बॅटमॅन
वश्शाड मेलो!! ह्या मिपाकरणी बोलायला ऐकणारेत का?? उगा हात दाखवून अवलक्षण!!
काय बे वश्शाडवाडीकरा
In reply to गप रे जरा !! by सूड
काय बे वश्शाडवाडीकरा ;)
बादवे या मिपाकरणींना मी हात दाखवला नाही, दाखवणारही नाही. ज्योतिषावर आपला विश्वास नाही ;)
पापक्षालनार्थं प्रतिसादः (की
पापक्षालनार्थं प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि!
द्विशतक प्राप्ती हेतु प्रतिसादः (की प्रतिसादं ?) समर्पयामि!
प्रतिसादा: सर्वे स्वीकृता:,
In reply to पापक्षालनार्थं प्रतिसादः (की by पिलीयन रायडर
प्रतिसादा: सर्वे स्वीकृता:, पापं अंशमात्रेण नष्टम् ;)
वाटा, प्रसाद वाटा!
वाटा, प्रसाद वाटा!
@ बाबा पाटील,
@ बाबा पाटील,
आभार प्रदर्शनाचं भाषण करा.
काम झालंय! ;)
१९९
१९९
२००
२००
डबल सेंच्युरी झाली की रे....
डबल सेंच्युरी झाली की रे....धन्यवाद बायका लोक्स.साला बायकांना चिडवुन देण्यात जी मजा आहे ना ती कश्यातच नाही.(स्वानुभव-चिडलेली बायको ड्याम सुंदर दिसते राव.)
मिसेस पाटीलांनी वाचला काय
In reply to डबल सेंच्युरी झाली की रे.... by बाबा पाटील
मिसेस पाटीलांनी वाचला काय धागा? (अचानक चिडलेली बायको सुंदर दिसते वगैरे वर आलात..!!)
पिराताई, त्यानं तरच आलेला हा प्रतिसाद आहे.
In reply to मिसेस पाटीलांनी वाचला काय by पिलीयन रायडर
बिचारा नवरा दुसर काय बोलु शकतो. सपशेल शरणागती.नशिब आमच दुसर काय....!
या धाग्याची निर्विवाद विजेती
या धाग्याची निर्विवाद विजेती : पिलियन रायडर! :ड
बिकांनी शिक्का मारल्यावर तर
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
बिकांनी शिक्का मारल्यावर तर आता पिलियन आता स्वतःच राईड करायला लागणार.
बाकी बिकांचं हे एक मला कधीच कळत नाही.
मागच्यांना पुढं आणायचं नि पुढंपुढं करणारांना हळूच शर्टाला धरुन लायनीत...
एक उपविजेतेपद पण जोडा हो
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
एक उपविजेतेपद पण जोडा हो प्लीज. :)
एक विजेतेपद तुमच्या पार्टीला
In reply to एक उपविजेतेपद पण जोडा हो by कवितानागेश
एक विजेतेपद तुमच्या पार्टीला दिलं तर बास नै का? खुश र्हावा की ;) सगळेच घेतल्यावर आम्ही काय करायचं?
(नाही-रे वाला) बॅटमॅन.
आहे की
In reply to एक विजेतेपद तुमच्या पार्टीला by बॅटमॅन
ते झाडू आणि जुनेरं तुमच्यासाठीच तर आहे उपविजेतेपदाचं बक्षीस! :-/
तपशिलात घोळ घातलासा बघा.
In reply to आहे की by पैसा
तपशिलात घोळ घातलासा बघा. किसनदेवांचा प्रतिसाद पहा, ते बक्षीस विजेत्यांसाठी आहे, उपविजेत्यांसाठी नै कै =))
कै घोळ नै
In reply to तपशिलात घोळ घातलासा बघा. by बॅटमॅन
विजेत्यांनी ते उदार मनाने तुम्हाला देऊ केलंय. वरनं इनो सुद्धा!
विजेत्यांची देणगी त्यांनाच
In reply to कै घोळ नै by पैसा
विजेत्यांची देणगी त्यांनाच साभार परत केल्या गेली आहे. शिवाय इनो देऊनही काही फरक पडेल असे वाटत नै तो भाग वेगळाच ;)
बिपिनदा, विजेत्यांसाठी
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
बिपिनदा, विजेत्यांसाठी घेतलेली खराट्याचा झाडू आणि जुनी पोतेरं हि घर साफ करण्यासाठीची बक्षिसे कुठायंत? ;-)
हा हा हा
In reply to बिपिनदा, विजेत्यांसाठी by किसन शिंदे
हा हा हा =))
आणि हरलेल्यांसाठी इनो आमच्या
In reply to बिपिनदा, विजेत्यांसाठी by किसन शिंदे
आणि हरलेल्यांसाठी इनो आमच्या कडुन सप्रेम भेट !!!
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी विचार..जन्मजात भांडकुदळ स्वभाव..अजुन काय!!
(अवांतर - ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठीच मला कंपनीत नेमण्यात आलं आहे असं वाटायला लागलय इतके प्रतिसाद मी हापिसात बसुन इथे दिलेत..)
वा वा ! असं कसं ??? स्वतःहून
In reply to कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी by पिलीयन रायडर
वा वा ! असं कसं ??? स्वतःहून कबुली ?! इतका प्रामाणिकपणा हल्ली औषधालाही सापडत नाही :) संमं द्याच ते बक्षीस लगेच ;)
(ह्घ्या... गैर्सम्जाने हल्ला स्रू होण्याआधी हे लिव्लेले बरे.)
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
In reply to कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी by पिलीयन रायडर
कंसातली आणि कंसाबाहेरची अशा दोन्ही कबुल्या पाहून अं.ह. झाल्या गेले आहे.
आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले.
आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. ;)...!!
बाकी लग्नं झालं नसलं तरी मातोश्री कामाला लावतातचं त्यामुळे ह्या पुरुष आघाडीस पाठींबा. ;) ;) ;)...!!!!
(घरगडी कम हमाल कम ए.टी.एम. मशिन कम सांगकाम्या कम ड्रायव्हर कम झाडुवाला कम हाडाचा गरीब) मन उधाण वार्याचे...
त्या रफाराचं काहीतरी करा !!
In reply to आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या रफाराचं काहीतरी करा !!
त्या रफाराचं काहीतरी करा !!
In reply to त्या रफाराचं काहीतरी करा !! by सूड
तेच म्हणालो होतो मी गेल्या वेळेल तर मला म्हणाले की नसलेल्या वेलांट्या वाचू नका...... ;)
विजुभौ...मी नव्हतो म्हणालो
In reply to त्या रफाराचं काहीतरी करा !! by विजुभाऊ
विजुभौ...मी नव्हतो म्हणालो असं काही...तो दुसर्याचा रीप्लाय होता... :)..
च्यामारी नवं अकाऊंट रगीस्टर करायला लागेलं :(..
अरे वा,
In reply to आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे वा,
एक चांगला नवरा बनण्याच्या सर्व qualities आहेत तुमच्या कडे.
(कृपया हलके घ्या)
(गरीब बापुडी)त्रिवेनी
सर्व
धागा आणि सर्व प्रतिसाद वाचले.पण माझे असे स्पष्ट मत आहे की बहुतांशी पुरुष,हे आळशी आणि कांगावखोर असतात.उदाहरणः- पुलंची, वार्यावरची वरात मधील 'रविवारची सकाळ'! तेंव्हा, समस्त मिपाकरणींनो, माझी तुम्हाला सहानुभूति आहे.
- तिरशिंग फितुरणे
हरकत नाही. फितुरांनाही उदार
In reply to सर्व by तिमा
हरकत नाही. फितुरांनाही उदार मनाने सामावून घेणारा पुरुषपक्ष आहे.
स्त्रियांकडे इतके औदार्य असते तर................हम्म, काकूचा ट्वापिक मिळाला की काय ;) =))
ही फितुरी ???!!! हा तर आपल्या
In reply to सर्व by तिमा
ही फितुरी ???!!! हा तर आपल्या भिडूला ३०० धावा पुरा करायला ताज्या दमाचा रनर पुरवलाय ;)
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही नवर्याला चकल्या करायला बसू देणार नाही. Wink
छान आईडिया , आता असेच करते.
ये हुई ना बात!
In reply to स्वच्छता झाल्याशिवाय मी काही by mbhosle
चकल्या झाल्या की हाताबरोबर लाडू पण वळायला बसव! ;)
यावेळी घरची कामे करुन आम्हाला
यावेळी घरची कामे करुन आम्हाला पदार्थ तळण्याचे कामही करावे लागले आहे.
नवा विषय मांडूयात.
नवा विषय मांडूयात.
"स्त्रीयांकडे औदार्य असते का ?"
@ ब्याटमन : अवांतर : औदार्य हा शब्द उदर या शब्दापासून तयार झाला अहे का?
नवीन धागा काढा की... थिसिसचा
In reply to नवा विषय मांडूयात. by विजुभाऊ
नवीन धागा काढा की... थिसिसचा विषय आहे, एका रिसर्च पेपरमधे संपवू नका...
अवांतर
In reply to नवा विषय मांडूयात. by विजुभाऊ
औदार्य=उदारपण, जसे कौमार्य=कुमारपण. त्यामुळे औदार्य चे कनेक्शन उदार या शब्दाशी आहे.
काय हे बट्टमना ?! असा सरळसोट
In reply to अवांतर by बॅटमॅन
काय हे बट्टमना ?! असा सरळसोट विरोधी प्रतिसाद अपेक्षित नव्हता... अश्याने धाग्याचा ट्यार्पी वाढवण्याचा छुपा पण स्तुत्य प्रयत्न उधळून लावल्याचे पाप माथी लागेल ना?
मनातल्यामनातः औदार्याची गोष्ट
In reply to काय हे बट्टमना ?! असा सरळसोट by डॉ सुहास म्हात्रे
मनातल्यामनातः औदार्याची गोष्ट वाच्ल्यावर आताच कुठे पोपकोर्ण घेऊन बसलो होतो :)
अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त
In reply to काय हे बट्टमना ?! असा सरळसोट by डॉ सुहास म्हात्रे
अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त शब्दार्थाची क्वेरी उत्तरिली आहे, मूळ विषयाकडे दुर्लक्ष नाहीये ;) =))
बाकी मूळ मुद्दा. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी उदार असतात असे हा वेष्टर्न ष्टडी म्हणतोय ;)
कारणे काही असली तरी स्त्रिया कमी उदार असतात हा निष्कर्ष बाकी रोचक आहे ;)
(उदारपणे पळालेला) बॅटमॅन.
विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....!
बायकांकडे औदार्य अजिबात नसले तरी लग्नानंतर २-३ वर्षातच उदर मात्र नक्की असते.( स्वतः अथेलेटीक असलेला बाबा.) (अती अवांतर-बायकोच्या शब्दात याला सोन्याचा घास भरवा ही सुधारणारी जमात नाही.)
->>>बायकोच्या शब्दात याला
In reply to विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....! by बाबा पाटील
->>>बायकोच्या शब्दात याला सोन्याचा घास भरवा ही सुधारणारी जमात नाही.>>>
ही ही ही. हा हा हा.
आता झाली दिवाळी बाबांच्या घरी! फटाक्याची गरजच नाही!!!
अजून एका स्फोटक मुद्द्याला
In reply to विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....! by बाबा पाटील
अजून एका स्फोटक मुद्द्याला हात घातल्या गेला आहे. इंचा-इंचाने हाही धागा उदंड वाढू दे!!!
(मिपावरच्या सर्वांत प्रतिसादखेचक धाग्यालाही ५०० पेक्षा कमी प्रतिक्रिया असल्याने हिरमुसलेला) बॅटमॅन.
२५० .. फक्तं?
मस्तं आतषबाजी चालू आहे ..
पण सगळी दिवाळीची कामे आटपली की नाही?
काही बाकी असेल तर लवकर लवकर आवरा आता.. :D
Happy Diwali !!
ऑ? अगदी सामसूम... सगळे
ऑ? अगदी सामसूम... सगळे पुरुषमुक्तीवाले फराळ खाऊन झोपा काढतायत का पत्ते खेळतायत?
बायका पंचर काढायल्यात गाडीचा
In reply to ऑ? अगदी सामसूम... सगळे by पिशी अबोली
बायका पंचर काढायल्यात गाडीचा म्हणून पुरुष फूटपाथवर बसलेत निवांत.
(संदर्भ कुणाकुणाला माहिती आहे? चेपु हे मिसळपावचंच एक्स्टेंन्शन आहे असं कोणीतरी कुणाला तरी सांगत असताना कुणीतरी ऐकलं! ;) )
हवा गेली
In reply to बायका पंचर काढायल्यात गाडीचा by प्यारे१
सगळ्यांचीच हवा गेली वाटतं!
हवा कुठूनतरी जाते आणि कुठेतरी
In reply to हवा गेली by पैसा
हवा कुठूनतरी जाते आणि कुठेतरी बसते. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी, आता हवा भरली की नको नकोशी होते =))
हव्याहव्याशा विषयावर ब्याटमॅन
In reply to हवा कुठूनतरी जाते आणि कुठेतरी by बॅटमॅन
हव्याहव्याशा विषयावर ब्याटमॅन सुरु झालेला आहे... ;)
हव्यास ..... हव्यास आहे ह्या
In reply to हव्याहव्याशा विषयावर ब्याटमॅन by पिशी अबोली
=)) हव्यास ..... हव्यास आहे ह्या विषयाचा,बट्टमण्ण शास्त्रींन्ना! =))
प्यारेकाका ते नुकतेच लग्न
In reply to बायका पंचर काढायल्यात गाडीचा by प्यारे१
प्यारेकाका ते नुकतेच लग्न झालेले पुरुष आहेत हो... हा धागा जुन्या बायकोमुळे पीडित पुरुषांचा आहे ना? ;)
(संदर्भ माहीत असल्याचा पुरावा... ;) )
काम करुन दमले.
बिचारे झोपले सगळे.