मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....
वाचने
33497
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
किसनद्येवा या मावश्यांना
In reply to +१ by बॅटमॅन
किसनद्येवा या मावश्यांना सद्बुद्धी दे रे बाबा! ;-)
काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता
In reply to येकच नंबर किसनद्येवा!!! by बॅटमॅन
काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता जळमटपण शिघ्र निघुदेत! :\
हाहाहा बाकी तुमची स्मायली
In reply to काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता by स्पंदना
हाहाहा बाकी तुमची स्मायली त्या जळमटनिर्मात्या स्पायडरम्यानसारखी वाटू लागलेय =)) तिथे हाताची अॅक्शन तर इथे जिभेची इतकाच काय तो फरक.
म्यॅनेजर नावाचा शब्द ठाउक आहे
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
म्यॅनेजर नावाचा शब्द ठाउक आहे ना किसनद्येवा?
आयला....
मला कामाला लावून ही मस्त घोरत पडली आहे, म्हणून इकडे आलो तर....
ह्या भगिनींनी उच्छाद मांडला आहे.
अशा वेळी मात्र ह्या सगळ्या नणंदा-वन्स एकत्र होतात.
एकदम बराबर बोल्ला किसनदेवा.
मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं.
बरं, मग?
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
बरं, मग? :D
त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम
In reply to बरं, मग? by यशोधरा
त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम फोल आहेत =))
अविवाहित महाजनांना बोलण्यास
In reply to त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम by बॅटमॅन
अविवाहित महाजनांना बोलण्यास मनाई अस्से. बोलले तर लक्षात घेतले जाणार नाही. :P
वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी मारिलिया गेली ऐसाजे =))
काबोआपबोना
In reply to वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी by बॅटमॅन
काबोआपबोना :D
?
In reply to काबोआपबोना by यशोधरा
?
(विस्कटून सांगण्याच्या प्रतीक्षेत) बॅटमॅन.
इतके कळत नाय? अरेरे! फुक्कट
In reply to ? by बॅटमॅन
इतके कळत नाय? अरेरे! फुक्कट हो इतकी बडबड (तुमची) :P
व्वा!!!!
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
हे बरे आहे.
आम्ही जात्यात तर ते सुपांत आहेत.
आहाहाहा! काय तरी निरीक्षण
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
आहाहाहा! काय तरी निरीक्षण केलंय! मुळात घरामधे ढीगभर पसारा करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त पुरूषमंडळींचाच असतो.सणवार कशाला रोजचंच बघा ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात घेतलेली वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही आणि दुस-या दिवशी मात्र ती वस्तू सापडली नाही की बोंबाबोंब सुरूच!
हा हा हा!
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
तुम्ही माझा डु आय डी तर नाही ना? ;)
वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही >मी हीच तक्रार करत असते सारखी.
पसारा आवरुन घेण्यातच वेळ जातोय. आता पन्खे कधी पुसुन घेउ?
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही नवर्याला चकल्या करायला बसू देणार नाही. ;)
नीट वाचलं का? पसारा करण्याची
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
नीट वाचलं का? पसारा करण्याची बायकांना सवय असते असं लिहलंय अनं ते ही काम करताना. बाकी तुम्ही म्हणत असलेल्या पुरूषांच्या पसारा करण्याच्या सवयीविषयी तर तो वेगळा मुद्दा आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्यातला प्रकार!! :-)
१००
In reply to नीट वाचलं का? पसारा करण्याची by किसन शिंदे
और इसी किसन चौके के साथ इस धागे की शंभरी पार हो गयी है!
धागा पीडीत
पुरुषांचा पण सगळ्या "अबोल्याच" जास्त बोलत आहेत.
बोलणे हा(च) जन्मसिद्ध हक्क
In reply to धागा पीडीत by इरसाल
बोलणे हा(च) जन्मसिद्ध हक्क आहे हो त्यांचा, बजावूदेत ;) =))
(समञ्जस) बॅटमॅन.
एक तर "अबोल्या" च्या काळात
In reply to धागा पीडीत by इरसाल
एक तर "अबोल्या" च्या काळात आहात म्हणजे खुप जुनी न्युज आहे तुअम्च्या कडे.. अबोल्या अनाहीता झाल्यात..
दुसरं म्हणजे.. मज येतेय.. तुम्ही पण सामील व्ह्या!! दिवाळी पेश्शल.. !!
अबोल्या
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
आमी पुरोगामी हाहोत.
अनाहीता कि अनाहता ?
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
अनाहीता कि अनाहता ?
अनाहीता चा क्रम चुकल्यास आता नाही असं होतय.
"अबोल्याच" जास्त बोलत आहेत.
In reply to धागा पीडीत by इरसाल
आत्ता कुठे मी आलेय! नसलेल्यांवर आरोप करणं शोभतं का?
नै तर काय!
In reply to "अबोल्याच" जास्त बोलत आहेत. by पिशी अबोली
बोल बोल तू बिनधास्त!
मग काय पैतै... ही पुरुषजमात
In reply to नै तर काय! by पैसा
मग काय पैतै... ही पुरुषजमात अशीच दिस्तेय सगळी... नुस्ते पाठीमागे कुचुकुचु आरोप...
नरेंद्र मोदी आणि राहुल
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना संघटनेत प्रवेश मिळेल का ?
हे दोघे महापुरुष आहेत.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना संघटनेत प्रवेश मिळेल का ? संघटना स्थापन करण्याधीच बुडवायची आहे का ?
देश बद्लायला निघालेत, आधी
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.
=))
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
=)) =)) =))
हे म्हणजे हैदराबादी बिर्यानी फ्यान क्लबात जैन मेंबर घेण्यापैकी =))
खट महाराज एक नंबर
देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.ही गोष्ट यांच्या बापाच्यान शक्य नाही.
आमचे
In reply to खट महाराज एक नंबर by बाबा पाटील
प्रतिपक्षाला आव्हान आहे की त्या बिनडोक सीरियल्सच्या विळख्यातून अगोदर बाहेर पडून दाखवावे आणि मग आव्हाने द्यावीत. काय म्हणता?
पै तै..
In reply to आमचे by बॅटमॅन
पै तै..
ह्याला जरा अनाहिता मधले विषय दाखवुन "गपगार" करायचं का ग!!!
त्याला तेच पाहिजे आहे!
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
सगळ्यांना येऊन जाऊन उत्सुकता काय तर अनाहितामधे काय चाललय?
करेक्शन
In reply to त्याला तेच पाहिजे आहे! by पैसा
कुणी आपणहूण दाखवलं तर टेण्षण णाही, पण स्वत:हूण आजिबात जाणार णाही. आमचा पुरुष विभाग समर्थ आहे ;)
अय्या अनाहिता दाखवणार?
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
अय्या अनाहिता दाखवणार?
(शत्रुपक्षाचे दफ्तर पाहण्याचा चानस मिळाल्याने हरिखलेला) ब्याटपिष्टनसाहेब.
त्यासाठी लग्न कर की लेका.
In reply to अय्या अनाहिता दाखवणार? by बॅटमॅन
त्यासाठी लग्न कर की लेका. :-D
आपोआप दिसते अनाहिता. ;-)
.
.
अप्पुतई कडून मुरलेला असे सर्टिफ़िक्याट मिळालेला.
अभ्या
आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं
In reply to त्यासाठी लग्न कर की लेका. by अभ्या..
आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं म्हणजे.....जौदे. पण तुला उपमा माहितीच आहे म्हणा- अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन =))
Hahaha !!!
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
Hahaha !!!
(अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन)
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
(अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन)
हांSS तेज्या.. *new_russian*
अता नाही ते शक्य !
अता नाही ते शक्य !
येस्स
वर क्रेझी ने जे लिहिलय त्याच्याशी पूर्णपणे सहमत. आमच्याकडे सेम आहे. आणि वरती जाणार कुठे गं जाऊन जाउन? असा छानसा डायलॉग पण असतो. आणि दुसर्या दिवशी मोहरम.;)
>> मोहरम
In reply to येस्स by सविता००१
>> मोहरम
मोहरम नि ना-मोहरम सुद्धा! ;)
काय पण
धागा पीडित पुरुषांचा आणि त्यांची वकिली करतोय अविवाहित बॅटमन आणि गोष्टी चालल्यात २ बॅचलरांना संघटनेत घ्यायच्या! असोच!!
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं
In reply to काय पण by पैसा
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं ना चिमखडे बोल.. कौतुकाने वाचायचे..!!
तो अविवाहीत आहे म्हणौनच तर बोलतोय.. बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..
बाकीचे उगं आपलं इथे जोर
In reply to अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं by पिलीयन रायडर
स्वतःचा दिनक्रम इथे सांगितल्याबद्दल आभार :P
अन पैसातै, पीडित पुरुषांबद्दल बोलायला विवाहितच असावे लागते काय? तसे तर मग प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झालेच पाहिजे =))
मी तुला म्हन्ल ना.. की
In reply to बाकीचे उगं आपलं इथे जोर by बॅटमॅन
मी तुला म्हन्ल ना.. की "अभ्याशाला बशा"
तु नवला हायेस का?
वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध
In reply to मी तुला म्हन्ल ना.. की by पिलीयन रायडर
वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध पाहणे.
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
In reply to वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध by बॅटमॅन
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही.
बाकी पुरुष म्हणुन बायकांबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या दुसर्या धाग्यात मांडाव्यात..
इथे शिरेस चर्चा चालु हाये.. मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!
या धाग्यावर फिर्यादींना आपले
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by पिलीयन रायडर
या धाग्यावर फिर्यादींना आपले म्हणणे मांडण्याची मुभा न देता आरोपींचीच बडबड चालूये. कुणाला तरी फिर्यादींची बाजू घेणे भागच आहे.
वेलांटी राहिली बहुधा.
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by पिलीयन रायडर
आरोपींनी आरोप स्वतःच कबूल केला आहे रे बॅट्या! :-)
ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by किसन शिंदे
ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे लक्षातच आलं नव्हतं किसनद्येवा, तुमच्या पायांची हाय रेझोल्यूशन स्क्यान करून ईमेलवा, प्रिंटून फटू फ्रेममध्ये लावतो ;)
शेवटी आरोपीने गुन्हा कबूल केलाच म्हणायचा तर =))
अरे पण
In reply to बाकीचे उगं आपलं इथे जोर by बॅटमॅन
जेव्हा घरी काम करायची वेळ येईल तेव्हा काय करशील मग?
हा अवांतर प्रश्न आहे.
In reply to अरे पण by पैसा
हा अवांतर प्रश्न आहे. त्याबद्दल धागा काढला तर तिथे मत नोंदवेन ;) तूर्तास बायकोशाहीबद्दल बोलणे चालू आहे, नही चलेगी नही चलेगी!!
समस्त स्त्री जातीच्या
In reply to अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं by पिलीयन रायडर
समस्त स्त्री जातीच्या वर्चस्वाचं प्रदर्शनच चाललंय जणू....
बघा बघा, नवर्यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे.
हा सरळ सरळ पुरुष जातीवर अन्याय आहे.
कसलं कोमल हृदय नि कसलं काय! बसाल्ट (सह्याद्रीचा कातळ) बरा च्यामारी.
पाषाणहृदय हा शब्दप्रयोग
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
पाषाणहृदय हा शब्दप्रयोग पाषाणाचा अपमान करणारा असल्याची तक्रार या निमित्ताने नोंदवीत आहे ;)
डॉ. खरे जे लहन मुलांविषयी
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
डॉ. खरे जे लहन मुलांविषयी बोलतात तेच नवर्यालाही लागु झाहे. इथे हळवेणा उपयोगाचा नाही !! चांगलं बदडलं पाहीजे..!! सुतळ्या, दोरखंड घेऊन यायला पहिजेत!!
आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..)
(अवांतरः- बॅट्याच्या लग्नात काही कथांच्या प्रिंटाऔट देणारे मी त्याच्या बायकोला. "ह्याला खुप खुप आवडली आहे ही कथा" म्हणुन!!)
ह.घे रे बॅट्या..
आणि त्या दृष्टीने कथा पण येत
In reply to डॉ. खरे जे लहन मुलांविषयी by पिलीयन रायडर
चला, उलट्या दिशेच्या काही कथांचे भाषांतर पाडीन म्हणतो ;)
बाकी मी ह.घे.प. (हलके घेण्यात पटाईत) आहे, कल्जि नसावी.
नवर्यांना असं फडकं घेऊन घर
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
नवर्यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे
आयला प्यारे फडकं घेउन नाही पुसायचे तर कसे पुसायचे रे मग? आता अंगातला बनियान काढुन पुसायचं की काय?
मेले..मेले...मेले..!!!!
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
मेले..मेले...मेले..!!!!
+१
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
+१
या प्रश्नाचा विचार केला जावा.
(खमंग चिवडा झाल्याने समाधानी अपर्णा)
काय राव मृत्यूंजय तू पण?
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
काय राव मृत्यूंजय तू पण?
प्रश्न फडकं अथवा बनियनचा आहे का? प्रश्न घर पुसण्याचा आहे!
बाकी फडक्याचं डिटेलिंग करण्याचा मान पिलीयन रायडरचा. आम्हाला कुठलं रे एवढं सुचायला?
आम्ही एकदा एका कपड्यानं बूट पुसले.
नंतर ४ दिवस डोळे पुसावे लागले.
आधी बायकोचे पुसण्याचा प्रयत्न केला, नंतर स्वतःचे पुसत बसलो.
'तिकडून' आलेलं काही होतं म्हणे!
बाकी तुझी पुरुष पार्टीच ना? का हल्लीचा हुच्चभ्रू पुरुष आहेस? ;)
ह. घ्या.
-लग्नापूर्वी वेळेला पुरणयंत्रातून पुरण काढून दिलेला प्यारे
_/\_
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
_/\_
वकिली करायची तर लॉजिक पाहिजे.
In reply to काय पण by पैसा
वकिली करायची तर लॉजिक पाहिजे. माणसामधले लॉजिक मेले म्हणजे तो लग्न करतो. मग फारतर तो पोराला वकील बनवण्याची स्वप्ने पाहु शकतो. स्वतः वकिली नाय करु शकत. त्यामुळे लॉजिक जिवंत असलेला अविवाहित ब्याट्याच योग्य ते प्रतिनिधित्व करु शकतो.
सपोर्टबद्दल धन्यवाद
In reply to वकिली करायची तर लॉजिक पाहिजे. by मृत्युन्जय
सपोर्टबद्दल धन्यवाद मृत्युञ्जयजी!! आपल्या सारख्यांच्या सपोर्टनेच वकिली होवू शकते ;)
बाप रे ! गडाबडा लोळ्णारी
बाप रे ! गडाबडा लोळ्णारी स्माइली आहे कुणाकडे ;)
एक से एक प्रति. पाउस नुसता ,
मी काय म्हणते सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता मग दिवळीला थोडा हातभार लावला कामात तर लगेच पोटात दुखायला लागले ;) लगेच पुरुष मुक्ती धागा ? बाबा पाटील कीती आळशी ओ तुम्ही :p काकुला नाव सांगु का तुमचे ? ऑ ;)
बघा, बघा.........अविवाहित
In reply to बाप रे ! गडाबडा लोळ्णारी by पियुशा
बघा, बघा.........अविवाहित म्हैलांनी प्रतिक्रिया दिलेली चालते तर अविवाहित पुरुषांनी काय झुरळ मारलंय हो आँ? ;)
ब्याट्या ......अविवाहीत "
In reply to बघा, बघा.........अविवाहित by बॅटमॅन
ब्याट्या ......अविवाहीत " महिला " कुणाला म्हणालास रे ? कन्या म्हण हव तर ;)
हा हा हा, जेनेरिक संबोधन
In reply to ब्याट्या ......अविवाहीत " by पियुशा
हा हा हा, जेनेरिक संबोधन म्हैलाच आहे की :)
म्हैला नको रे म्हणु. ते एक तर
In reply to हा हा हा, जेनेरिक संबोधन by बॅटमॅन
म्हैला नको रे म्हणु. ते एक तर म्हैस म्हटल्यासारखे वाटते किंवा मैला म्हटल्यासारखे वाटते.
पण
In reply to म्हैला नको रे म्हणु. ते एक तर by मृत्युन्जय
उच्चार तसाच आहे ना? आपल्यापैकी कितीजण महिला हा शब्द उच्चारताना म आणि हि एकदम शेप्रेट उच्चारतात? ते रूप शुद्ध लिहिलेले पाहून विचित्र वाटते, इतकेच. :) बाकी खेळ मनाचे ;)
एक्स क्युज्मी तुम्ही विषय
In reply to पण by बॅटमॅन
एक्स क्युज्मी तुम्ही विषय भरकट्वु नका ;)
ओके, विषय काय होता
In reply to एक्स क्युज्मी तुम्ही विषय by पियुशा
ओके, विषय काय होता ;)
(विषय जाणण्यास उत्सुक-साला कोण रे तो समास बनव म्हणतोय) बॅटमॅन.
तसे माझ्या पाहण्यात बरेच जण
In reply to पण by बॅटमॅन
तसे माझ्या पाहण्यात बरेच जण आहेत जे आपल्या कुटुंबाबद्दल म्हैला आणि म्हैस हे शब्द आलटुन पालटुन वापरतात.
हम्म (हा महिषोद्गार नाही याची
In reply to तसे माझ्या पाहण्यात बरेच जण by मृत्युन्जय
हम्म (हा महिषोद्गार नाही याची नोंद घेणे) ते स्वतःचे कुल भार्येवर आरोपित करीत असतील.
बाप्रे ! " कुणाची म्हैस अन
In reply to तसे माझ्या पाहण्यात बरेच जण by मृत्युन्जय
बाप्रे ! " कुणाची म्हैस अन कुणाला उठबैस " ;)
म्हैस
In reply to बाप्रे ! " कुणाची म्हैस अन by पियुशा
म्हैस वरून एक किस्सा आठवला. आमचा मेहुणा सिंगापूर हून मुंबईत येत होता. त्याने दिल्लीला विमान बदलले आणि एअर इंडिया चे विमान घेतले. त्यात आपल्याबरोबर कप्तान अमुक तमुक आणि हवाई सुंदरी मिस अमुक तमुक अशी घोषणा झाली. मेहुणा तिच्या आकाराकडे बघून हळूच पुटपुटला कि मिस नव्हे म्हैस म्हणा. तर अर्धे विमान हसले. मग त्याच्या लक्षात आले कि आपण आता आंतर राष्ट्रीय नव्हे तर अंतर्देशीय आणि मुंबईला जाणार्या विमानात अहोत.
जब्राट किस्सा
In reply to म्हैस by सुबोध खरे
जब्राट किस्सा =))
@म्हैला नको रे म्हणु. ते एक
In reply to म्हैला नको रे म्हणु. ते एक तर by मृत्युन्जय
@म्हैला नको रे म्हणु. ते एक तर म्हैस म्हटल्यासारखे वाटते किंवा मैला म्हटल्यासारखे वाटते.>>> =)) अगागागागागागा.....! =))
दिवंगत झालो आहे. =))
सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता
In reply to बाप रे ! गडाबडा लोळ्णारी by पियुशा
सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता
आँ? आँ?? आँआँ??????
च्यामारी मी समजत होतो इथे दिवसभर पडीक असतात त्या अर्थी सगळे लोक कामधंदा करणारे असतील. हापिसातले फुकट नेट वापरणारे असतील. स्वतःच्या (पक्षी: बायकोच्या असणार कारण स्वतः तर आयतच खातात) पैशाने नेट वापरुन लोक इतका वेळ मिपावर येतात म्हंजे भारतात क्रांती झाली म्हनायची.
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
आरोपींनी आरोप स्वतःच कबूल केला आहे रे बॅट्या! :-)
आत्ता शोध लागला..? वरचे
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by किसन शिंदे
आत्ता शोध लागला..? वरचे प्रतिसाद पहा की..
राबवुन तर घेणारच.. नो डाऊट..
झालं? मग आता या धाग्यावर
In reply to आत्ता शोध लागला..? वरचे by पिलीयन रायडर
झालं? मग आता या धाग्यावर आळीमिळी गुप चिळी!!
काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस.
In reply to झालं? मग आता या धाग्यावर by बॅटमॅन
काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस.. तु बायको कडुन पीडित नाहीस तरी एवढी बडबड करत सुटलाएस.. मी किमान आरोपी तरी आहे. शिवाय बोलणे हा माझा(च) जन्मसिद्ध(च्)...वगैरे वगैरे तर आहे (च)..
फिर्यादींची वकिली करण्याला
In reply to काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस. by पिलीयन रायडर
फिर्यादींची वकिली करण्याला स्वतः फिर्यादीच असावे लागते असा नियम नाही.
तदुपरि, प्रतिसादातून चिडचीड स्पष्ट जाणवतेय =)) इतकं नका हो चिडू, मौस फेकून मारशिला कुणालातरी ;)
च च च ची बाराखडीही उत्तमच.
तुझं लग्न झाला की ह्या
In reply to फिर्यादींची वकिली करण्याला by बॅटमॅन
तुझं लग्न झाला की ह्या सगळ्याचा कडता बरोब्बर काढला जाईल..
(समर्पणच्या प्रिंटाऔटचा गठ्ठा आणि त्यावर तुझे प्रतिसाद हाय लाईट केलेले, असा गिफ्ट बॉक्स रेडी आहे!)
'कडता' लै दिवसांनी हा शब्द
In reply to तुझं लग्न झाला की ह्या by पिलीयन रायडर
'कडता' लै दिवसांनी हा शब्द ऐकला. धारवाडास चकावची खेळलेले इसवी सनपूर्व दिवस आठवले.
कडता काढणे म्हंजे
In reply to तुझं लग्न झाला की ह्या by पिलीयन रायडर
कडता काढणे म्हंजे उट्टं काढणे का??
रोचक चर्चा!!
रोचक चर्चा!!
मी संगटनेत येनार नाय !
काय सांगू पीपू लोक्स ( पीडीत पुरूष ) .कल्पनेत नाही तर सत्यात ते भांडी घासणे विसळणे,किचन साफ करणे सगळे करून आता कुठे मिपावर येतोय. पण मी पीपू नाय बा ! कारण कुटुंबाला कामाला लावायची आयडियाच माझी. अरे ८० टक्के त्याना करायला लावायचं २० टक्क्केच आपण करायचं आसली आपुनकी पोळीशी असते राव !