मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....
वाचने
33497
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा आवडला.
ही सौंस्क्रुति म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे म्हणतात त्याचे अजून एक प्रत्यंतर आले.
तदुपरि पुरुषमुक्ती संघटनेच्या अस्तित्वाबद्दल यद्यपि माहिती नसली तरी पुरुष हक्क सौंरक्षण समिती नामक सौंस्था सांगलीत अस्तित्वात असल्याचे कळते. सदस्य होण्याचा विच्यार चालु आहे, निच्छितच जॉइन केले जाईल.
शुभेच्छा!
तुमच्या संघटणेला शुभेच्छा! संघटना स्थापनेसाठी गृहस्वामिनीची परवानगी घेतलीत का पण?
पण मग दुसरे कोण करणार ही सगळी
पण मग दुसरे कोण करणार ही सगळी कामं? :P
त्यात संघटना उभारुन काय होणार?
मस्त कल्पना आहे...
मी माझ्या बायकोचा अजिबात गुलाम नाही.( हे असे लिहायची आज्ञा तिनेच दिली आहे.)
माझे तुमच्या संघटनेला अनुमोदन आहे.
१०० फिक्स्!
१०० फिक्स्! ;-)
काय आत्मुराव तुम्ही?
In reply to १०० फिक्स्! by अत्रुप्त आत्मा
काय आत्मुराव तुम्ही?
अहो हल्ली १०० तर माझ्या धाग्याचे पण होतात! (कॉमन झालंय)
हा तर हुकमी क्राऊड पुलर आहे. (शाहरुख/ आमीर/ सलमानच्या चित्रपटासारखा)
१५०-१७५ तरी कुठंच गेले नाहीत.
जुनी जाणती माणसे हि कामे करू
जुनी जाणती माणसे हि कामे करू लागली तर बायको म्हणते '' तुम्ही जरा स्वस्थ बसता का म्हणजे मला हे नीट आवरता येईल ''
जुनी जाणती म्हणजे ४० वर्षे संसार केलेली माणसे असे ५० वर्षे संसार केलेले म्हणतात
मि पा मंडळी भुस्काट पडल असेल तर उतारा बघावा , संघटना काढण्याचे नसते उद्योग नको असं माझं मत
अहो बाबा! घरच्या कामासाठी
अहो बाबा! घरच्या कामासाठी चावडी कसली गाठता म्हणे? आम्ही जर ही साफसफाई केली नाही तर तुमच घर कस उजळणार? अन ते तुमच घर आहे ना? मग तुम्ही नाही करणार तर कोण करणार साफ? दिवाळी पाहिजे, झगमगाट पाहिजे, काम तेव्हढी नको.
(बघा मला वाक्यन वाक्य पाठ आहे)
(बघा मला वाक्यन वाक्य पाठ आहे)
In reply to अहो बाबा! घरच्या कामासाठी by स्पंदना
शुभमंगल सावधान झाले की, लगेच ह्याचा क्लास घेतला जातो.
यंदा
In reply to अहो बाबा! घरच्या कामासाठी by स्पंदना
अक्षयचं काही खरं नाही !
'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप
In reply to यंदा by इरसाल
'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप.
बाकी आम्ही पुरुष लोक बोलून वाईट होतो.
इतिहास गवाह है 'इस्त्रीयोंके' वजह से (आखिरे ज़मीं ;) भी तो इस्त्री ही हय) आजतक की सारी लडाईयां हुई हय!
(एवडं घासलेट बास्स का आग पेटवाय्ला? ;) )
नुस्तं तेच नै, तर लढाई न
In reply to 'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप by प्यारे१
नुस्तं तेच नै, तर लढाई न करणारे पुरुषही बैकांना आवडत नैत म्हणे ;)
हि हा हा हा....
In reply to अहो बाबा! घरच्या कामासाठी by स्पंदना
अपर्णाताई,शब्द आनी शब्द ,जसाचा तसाच....
अर्रर्रर्रर्र...
अर्रर्रर्रर्र...
काय अपेक्षेने धागा उघडला होता... फुसका बार निघाला...
चला कामाला लागा गुपुचुप.. इथे येऊन धागे काढायचे बरे त्राण राहीलेत अंगात..?? तेव्हढ्या वेळात जरा फॅन पुसले असते तर काय धाड भरली असती का? आणि गिळायच्या वेळेस नाही आठवत स्त्रीयांपासुन मुक्ती?? तेव्हा कुठे जाते ही संघटना? आता दिवाळीच्या दिवशी अंगाला तेल लावुन घेताना, अंघोळ घालुन घेताना, रांगोळी पहाताना, फराळाला खादडताना बघु बिचारं बिचारं वाटतं का ते...
चला उठा.. कामाला लागा.. हैक हैक हैक.. सॉरी सॉरी.. उठा उठा उठा..
(No subject)
In reply to अर्रर्रर्रर्र... by पिलीयन रायडर
:))
अगदी दणकेदार सुतळी बॉम्ब ते
In reply to अर्रर्रर्रर्र... by पिलीयन रायडर
अगदी दणकेदार सुतळी बॉम्ब ते आपलं प्रतिसाद टाकला पि.रा. तुम्ही तर *lol*
अगदी अगदी....
In reply to अगदी दणकेदार सुतळी बॉम्ब ते by क्रेझी
पिरा असुदे की परा
एक एक पर मोकळे करतात....
+१
In reply to अगदी अगदी.... by मुक्त विहारि
असच म्हणेन.
सही...
In reply to अर्रर्रर्रर्र... by पिलीयन रायडर
एकदम झाडू घेवून च मागे लागलीस की !
आत्ता काय बोलणार ते!
हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय.
In reply to सही... by पद्मश्री चित्रे
हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय.
आपण स्वतः होउन पुढाकार घेवून घर साफसुफीची मोहीम काढायची. बायको नामक मालकाला काही बोलण्याची संधीच द्यायची नाही.
फडताळातली , पोटमाळ्यावरची वापरात नसलेली भांडी मुद्दाम काढायची , गाद्या , पलंगाखालची रद्दी ,चपलांचे रॅक सगळे मोकळे करुन ठेवायचे. घरात जेणे करून एक इंचही जागा मोकळी उरणार नाही अशा तर्हेने पसारा करायचा.
आपण स्वतः मस्त जुनी लुंगी अन एखादा मळकट बनियन, जुनी स्लीपर अशा वेषात बसायचे.
हा पसारा पसरलेला असताना रद्दी चाळायला घ्यायची. महत्वाचे वाटणारे कागद एका गठ्ठ्यात वेगळे करायचे.
त्याच वेळेस पुस्तकाच्या रॅकमधली पुस्तके धूळ झटकायच्या निमित्ताने खाली घ्यायची.
हे काम चालू असताना मित्राला हळूच फोन करायला सांगायचे. किंवा टेलेफोनिक इंटर्व्यु कंडक्ट करायचे.( याची सेटिंग्ज एच आर कडून अगोदरच लावायची. रैवारी काम करायचा अलाउन्स अनायसे मिळतो) एक इंटर्व्यु किमान ४० मिनिटे असे ४ इन्टर्व्यू कन्डक्ट करायचे. तीन चार वेळ चहा ढोसायचा. अधूनमधून अरे बापरे कित्ती हा पसारा. असे सुस्कारे टाकायचे.
स्वैपाकघरातील मालकिणबाईंकडून काही डोळे वटारणे , अहो कित्ती पसारा केलाय असे उद्गार आले तर " अजिबात काळजी करु नकोस तु थोडावेळ थांब. कसे चकाचक करतो ते बघ असे म्हणायचे. अधूनमधून " मला आत्ता कळतय तुला कित्ती काम असते ते" असे म्हणायला मात्र विसरायचे नाही.
हे सगळे होईपर्यन्त दुपारचे पाच वाजतील असे बघायचे. त्यानंतर "उद्या आवरतो ग हे सगळॅ" असे म्हणून तो सगळा पसारा एका कोपर्यात लाथेने ढकलायचा. हे धोरण किमान दो तीन दिवस चालवायचे.
वरील उपाय करून बघा. पुन्हा कोणीच तुम्ही जरा मदतील या असे म्हणायचे धाडस करणार नाही.
सौ अनाहिता की, एक आहत की =))
In reply to हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय. by विजुभाऊ
सौ अनाहिता की, एक आहत की =)) =))
माण गये विजुभौ _/\_
आँ?
In reply to हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय. by विजुभाऊ
तुम्ही माझ्या नवर्याला कधी भेटला होतात? की लग्नाला बरीच वर्षं झाली की आपोआप येतं हे सगळं? अगदी येक्झॅक्ट हेच सगळं करतो तो!
कहर आहे विजूभौ. अशक्य हसतो
In reply to हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय. by विजुभाऊ
कहर आहे विजूभौ. अशक्य हसतो आहे. =)) =))
डिएम म्हणे ”असा खुळ्यासारखा का हसतो आहेस?"
शिंदे... जास्ती हसू नका..
In reply to कहर आहे विजूभौ. अशक्य हसतो by किसन शिंदे
शिंदे... जास्ती हसू नका.. नाहीतर इथल्या अथवा घरच्या बायका बांधतील तुमची छत्री.
तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही
In reply to हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय. by विजुभाऊ
तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही हो विजुभाऊ.. काहीतरी गुप्तता म्हणून प्रकार असतो की नाही आपल्याआपल्यात.
चालू द्या.
चालू द्या.
गॄहस्वामिनीने ही सगळी कामे
गॄहस्वामिनीने ही सगळी कामे नाही केली तर तुम्हीच म्हणाल द्धिम्म हलत नाही म्हणून.
एकदा माझ्या नवर्याने मी आसपास नाही असे बघून माझ्या बहिणीला सोफ्याच्या हॅंडल वरची धूळ दाखवली होती, पण मला किचन मधून सगळे दिसत होते.
त्या नंतर###**********
मी आता स्त्री मुक्ति संघटनेची सक्रिय कार्यकर्ती आहे.
सत्य खुपते म्हणतात ते असे
In reply to गॄहस्वामिनीने ही सगळी कामे by त्रिवेणी
सत्य खुपते म्हणतात ते असे ;)
अहो राहत असे चुकून कधी कधी.
अहो राहत असे चुकून कधी कधी.
कमाल आहे बाई तुझी.. लग्गेच
In reply to अहो राहत असे चुकून कधी कधी. by त्रिवेणी
कमाल आहे बाई तुझी.. लग्गेच "तुला दिसते ना धुळ, मग तु का नाही पुसली??" असं म्हणुन पुसायला फडकं द्यायचं.. आणि तेवढच बाकीच फर्निचर पण पुसुन घ्यायचं!
अग पिरा मलाही आवडलं अस्त तस
In reply to कमाल आहे बाई तुझी.. लग्गेच by पिलीयन रायडर
अग पिरा मलाही आवडलं अस्त तस करायला, पण 2 महीने झाले त्याचा हात प्लास्टर मध्ये आहे. आता अजून 1 ते दीड महिना पूर्ण बर होण्यासाठी. पण नंतर त्यालाच देईन म्हणते हे काम. हल्ली माझ्याच्याने पण नाही होत ग सगळी कामे.
फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते
In reply to अग पिरा मलाही आवडलं अस्त तस by त्रिवेणी
फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते ही हलक्या आवाजात्.हळुच्..घाबरुन..) सांगितलं म्हणुन हातच मोडणं जरा जास्त झालं नाही का ग त्रिवेणी? ;)
मलाही तेच म्हणायच आहे. जरा
In reply to फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते by पिलीयन रायडर
मलाही तेच म्हणायच आहे. जरा दया दाखवली असती तर सोफाच काय किचनही साफ करुन मिळाल असत. ;)
अह
In reply to मलाही तेच म्हणायच आहे. जरा by स्पंदना
अह
मी नाही मोडला हात. माझा सचिन तेंडुलकर सोसायटीच्या टेनिस कोर्टवर टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला गेला आणि खेळताना पडला. परिणामी हाड 2-3 ठिकाणी तुटले.
म्हणून मी नेहमी सगळ्यांना
In reply to अह by त्रिवेणी
म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असते टेनिस कोर्टवर टेनिस बॉलने क्रिकेट कध्धी खेळु नये :)
हा 'उच्च' होता!
In reply to फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते by पिलीयन रायडर
हा 'उच्च' होता!
बाकी हिंस्त्रपणा हा जास्त करुन माद्यांमध्येच जास्त असतो. का?/ किंवा असतो का?/ किंवा कसंही!
टैम्प्लीज!
In reply to हा 'उच्च' होता! by प्यारे१
इथे मला "स्त्रिया पाशवीच असतात" या धाग्याचा वास येतो आहे!
या बाफला अनाहता अॅप्रुव्हल
In reply to टैम्प्लीज! by पैसा
या बाफला अनाहता अॅप्रुव्हल आहे काय ?
बाफ म्हंजे काय?
In reply to या बाफला अनाहता अॅप्रुव्हल by खटासि खट
बाफ म्हंजे काय?
बातमीफळा. मायबोलीकडची संज्ञा
In reply to बाफ म्हंजे काय? by मृत्युन्जय
बातमीफळा. मायबोलीकडची संज्ञा आहे ती.
बाफ
In reply to बातमीफळा. मायबोलीकडची संज्ञा by बॅटमॅन
इथे बायकांचा फटकारा ह्या अर्थानेही घेता येईल :D
अरारारारारा लैच्च
In reply to बाफ by प्रसाद गोडबोले
अरारारारारा =)) लैच्च :D
अर्रर्र....
In reply to हा 'उच्च' होता! by प्यारे१
अंहं.
-दिलीप बिरुटे
एक मुद्दा राहिलाय असे अक्षय
एक मुद्दा राहिलाय असे अक्षय म्हणताहेत.
त्यांच्याच शब्दात, "अन शेवटी झोपायला गेलं अन जरा टीव्ही लावला की, लगेच वळुन हात दुखताहेत, पाय दुखताहेत करुन विव्हळायच. मग बसतो नवरा दाबत अन ह्या घोरायला लागतात."
(स्वतःच खातं काढाव ना मिपावर! मला कशाला भरीला पाडायच?)
पुरुषांनो आता तरी जागे व्हा.....
देवा रे देवा,मि.पा.करांनो,वरती काय धुळधान उडवली जातीय पहाताय ना ? आता तरी जागे व्हा.
शांत व्हा बाबा! मला माहिती
In reply to पुरुषांनो आता तरी जागे व्हा..... by बाबा पाटील
शांत व्हा बाबा! मला माहिती आहे, तुम्हाला वाटल होतं, समस्त पुरुष वर्ग तुम्हाला धाग्यावर धीर द्यायला अन स्वतःच दु:ख व्यक्त करायला येतील. पण काय आहे सगळे बीज्जी आहेत. तअन ते बिज्जी असल्याने आम्हाला वेळ आहे ;)
.......
In reply to शांत व्हा बाबा! मला माहिती by स्पंदना
.......
..... ....... .....
...... .... ........ ......
-'अनुभवी' प्यारे ;)
(बघा, कित्ती किती लिहून पण शब्दच उमटत नाहीत ;) )
त्याशिवाय
In reply to शांत व्हा बाबा! मला माहिती by स्पंदना
असे प्रयत्न पूर्वीही झालेत हो! आदि जोशीने एक उनक (म्हणजे उपेक्षित नवरे की उनाड नवरे ते आता विसरले) काढली होती. आजकाल त्यांची कैच हालचाल नै.
एखादा कुत्सित हास्याचा
In reply to त्याशिवाय by पैसा
एखादा कुत्सित हास्याचा स्मायली आहे काय ग?
अशीच ना?
In reply to एखादा कुत्सित हास्याचा by पिलीयन रायडर
*mosking* *JOKINGLY* 8P 8p
बरोब्बर..
In reply to अशीच ना? by पैसा
बरोब्बर..
बाकी कोण म्हणलं होतं ग की ह्या पुरुषांच्या धाग्यांना फारसं मनावर घ्यायचं नाही.. इथे धागे काढतील मग आयतं भरपेट गिळुन, ढेकर देत, बनियन ला हात पुसत प्रतिसाद बघत बसतील..!! (इथे तुझी स्मायली.. + ही ही ही)
स्त्रियांनीही साडीला हात
In reply to बरोब्बर.. by पिलीयन रायडर
स्त्रियांनीही साडीला हात पुसले तर आमची काही ना नाही हो! बाकी पुरुषांच्या भरपेट गिळण्यावरची जळजळ पोचली आहे ;) =))
ए गपे.. भरपेट कोण खाउ घालतं
In reply to स्त्रियांनीही साडीला हात by बॅटमॅन
ए गपे.. भरपेट कोण खाउ घालतं रे..?? खाऊ घालणारी कधी जळत नसते खाणार्यांवर..
आणि आक्षेप "भरपेट" वर नसुन "आयतं" वर आहे...
डोळे पाणावले, ग्लिसरीनचा
In reply to ए गपे.. भरपेट कोण खाउ घालतं by पिलीयन रायडर
डोळे पाणावले, ग्लिसरीनचा ओव्हरडोस झालाय बहुतेक....
हां तर काय म्हणत होतो? 'आयतं' पणाची आयते वाचू लागलो तर अख्खे कुराण होऊन जाईल, काय समजलेत ;)
पुस बाळा.. डोळे पुस..
In reply to डोळे पाणावले, ग्लिसरीनचा by बॅटमॅन
पुस बाळा.. डोळे पुस..
आणि आपला प्रत्येक प्रतिसाद फाऊल आहे हे लक्षात आहे ना.. तु कितीही काहीही बोल.. (किमान माझ्या लेखी तरी) तु अनुनभवि असल्याने तुझे चिमखडे बोल मी मनावर घेणार नाही..
आणि आपला प्रत्येक प्रतिसाद
In reply to पुस बाळा.. डोळे पुस.. by पिलीयन रायडर
राइट. तुझा प्रतिसाद फाऊल आहे हे मान्यच आहे =))
अले लब्बाड... चला अभ्याशाला
In reply to आणि आपला प्रत्येक प्रतिसाद by बॅटमॅन
अले लब्बाड... चला अभ्याशाला बशा..
गल्ली चुकली.
In reply to अले लब्बाड... चला अभ्याशाला by पिलीयन रायडर
गल्ली चुकली.
(कॅड पाहून मॅड होणारा) बॅटमॅन.
ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून
In reply to पुस बाळा.. डोळे पुस.. by पिलीयन रायडर
ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून टाक दिवाळीच्या मुहूर्तावर...मग पुढच्या वर्षीच्या धाग्यावर अनुभवाचे चार बोल टाकता येतील...
हेहेहे!
In reply to ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून by पिशी अबोली
मग त्याला इतर पुरुषांप्रमाणे घराची साफसफाई करावी लागेल आणि इथे वकिली करायला वेळ नाही मिळायचा!
घोडीमैदान लै लांब नैये. पाहूच
In reply to हेहेहे! by पैसा
घोडीमैदान लै लांब नैये. पाहूच! :D
मिपापुपाचा कर्ण धारातीर्थी
In reply to हेहेहे! by पैसा
मिपापुपाचा कर्ण धारातीर्थी पडेल म्हणजे... ;)
शोधायला कै हर्कत नै हो...पण
In reply to ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून by पिशी अबोली
शोधायला कै हर्कत नै हो...पण ते...आपलं हे ते..अनुभवाचे चार बोल टाकता यावेत म्हणून क्याटवुमन म्हणजे परत ते अल्पदुग्धप्राशनार्थ महिषीपालन =))
तुझ्याच भल्याची गोष्ट
In reply to शोधायला कै हर्कत नै हो...पण by बॅटमॅन
तुझ्याच भल्याची गोष्ट सांगितली, पण ऐकतं कोण?
एक तर क्याट्वुमनसारखी चपळ बायको शोधलीस की नुस्त्या मारामार्या करणे हेच काम उरेल(कुणाशी हा प्रश्न गैरलागू) साफसफाई वगैरे तुला करायला ती लावणार नाही आणि फुकटात मॅरीड असल्याचं प्रमाणपत्र पण मिळेल...
असो... चार भल्याच्या गोष्टी ऐकण्याची तयारी अगदी वाघूळमानवाकडेही नसते हे कळलं... :-/
हे बघा
In reply to तुझ्याच भल्याची गोष्ट by पिशी अबोली
बॅटमॅन भो,
उगा काळं चामडं पांघरलेली मांजरी मिळते आणी "चाबकाने" मारामारी करते यास्तव स्वतःचे स्वातंत्र्य धोक्यात घालु नका.
दुध हवं म्हणुन हेला खरेदी करणं प्रशस्त नव्हे.( इथे आजुबाजुचे संदर्भ घ्यावेत.)
फुकटातलं सर्फ- तिकीट तर कुठे ही मिळेल.
आपली जरा पडती....
In reply to पुरुषांनो आता तरी जागे व्हा..... by बाबा पाटील
बापा, आपली जरा पडती बाजू दिसतेय या धाग्यात :(
बाकी, आपल्या भावनेशी सहमत आहे. आपला आराम करायचा मूड आणि यांना पसारा मांडायची खवखव सुटते.
असो, पत्नीपिडित पुरुषांचा सिमला घोषणापत्र ;)
-दिलीप बिरुटे
[पिडित पुरुषांबद्दल सहानुभूती असलेला]
बाबासाहेब,
In reply to पुरुषांनो आता तरी जागे व्हा..... by बाबा पाटील
नाही जमत तर सांगावे बायकोला कि काही करू नकोस ग बाई? उगाच तुझ्या जीवाला हि त्रास नको आणि माझ्या हि. हाउसकिपिंगची सुविधा हल्ली महाराष्ट्रात हि आहे. त्यांना बोलवावे, सगळी साफसफाई करून घ्यावी, उगाच का एवढा त्रागा? असे हि जी हे काम आपलेपणाने करते ती काही मोबदला तर मागत नाही, हो पाडव्याला तिला सरळ म्हणावे कि बाई तुला त्रास नको म्हणुन हाउसकीपिंग वाल्यांना बोलावले कि नाही. मग आता काही भेटवस्तु मिळणार नाही. एका शब्दाने हि काही बोलणार नाही. चुक खरे तर बायकांचीच आहे, नाही आवडत समोरच्याला, नाही मन एखाद्याचे तर का म्हणुन आपले समजुन गोष्टी सांगाव्या. त्यापेक्षा चार पैसे देऊन एखाद्याकडून काम करून घ्यावे. समोरच्या माणसालाच दिवाळीसाठी तेवढी मदत. पण शेवटी पैसा पण घरासाठीच वाजवतात न, जाऊ द्या हो बाबासाहेब, आम्ही बायका अश्याच आहोत, स्वभावाला औषध नाही, राहिले उपायाचे तर हा धागा तुमच्या बायकोला वाचायला द्या, पुढच्या दिवाळी पासुन तुम्हाला गृहीत धरणे सोडले जाईल अगदी तुमच्या मनासारखे.
भावनाताई...!
In reply to बाबासाहेब, by भावना कल्लोळ
भावनाताई,माझ्या मनात आनी डोळ्यात भावनांचा अगदी कल्लोळ कल्लोळ दाटुन आलो हो.पण आमची जगदंबा तिला ह्याचा काहीच उपयोग होत नाही. माझ्या घरातली आनी हापिसात जितकी म्हणुन कामगार मानस हायती अगदी माझ्यासकट ती त्या सगळ्यांना कामाला लावती.आणी असही आम्हाला त्यांनी कधी गृहित धरल्याल मागच्या दहा वर्षात आठवतच नाही बघा.आखिर नाविलाज को क्या विलाज है बाबा !
एखादा कुत्सित हास्याचा
एखादा कुत्सित हास्याचा स्मायली आहे काय ग? >>>>> ही ही ही
पुरुषांच्या धाग्यावर
पुरुषांच्या धाग्यावर म्हैलांना गोंधळ घालताना पाहून एक पुरुष मिपाकर म्हणून शरम वाटली.
(शरमून रात्रीऐवजी दिवसा बाहेर पडणारा) बॅटमॅन.
ए!
In reply to पुरुषांच्या धाग्यावर by बॅटमॅन
ए!
जा जरा आईला मदत कर! नाहीतर फराळ देउ नको म्हणुन सांगते बघ!
ओ तुम्ही चकल्या तळा बघू आधी,
In reply to ए! by स्पंदना
ओ तुम्ही चकल्या तळा बघू आधी, नैतर त्या तव्यातल्या तेलात जळमटे टाकतो बघा!
आम्हाला थोडा तरी हक्क आहे..
In reply to पुरुषांच्या धाग्यावर by बॅटमॅन
आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. फिर्यादीची तक्रार आमच्या विरुद्ध असल्याने आम्हाला धिंगाणा घालायचा पुर्न हक्क आहे.
पण तुझा काय संबंध? तुला बायको नाही आणि सांभाळायला पोरं पण नाहीत!! आणि बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे..
(अवांतर - ह्याचं लग्न करुन द्या रे.. मग बघु या मज्जा...!! (परत एकदा पैतै ची स्मायली + ही ही ही)
सही.
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
>>>> बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे..
हाहाहा लंबर एक. फार्मात आहात. सच्यासारखी खत्रा फलंदाजी चालू आहे. मस्त.
समस्त पुरुषांना विनंती की इकडे या धाग्याकडे फिरकू नका. :)
-दिलीप बिरुटे
*JOKINGLY *
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
*mosking * *JOKINGLY * 8 P 8 p
ही घे पिरा स्मायली! JOKINGLY नंतर मी स्पेस टाकली आहे ती काढ अन स्टार चिटकव. झाली स्मायली.
mosking नंतर पण तेच अन एट पी मधलही अंतर काढ.
आता तर खुपच मज्जा येतेय!!!!
In reply to *JOKINGLY * by स्पंदना
*JOKINGLY* *mosking*
*JOKINGLY* *mosking*
*JOKINGLY* *mosking*
आता तर खुपच मज्जा येतेय!!!!
आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही
In reply to आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. by पिलीयन रायडर
आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही फिर्यादी आहोत.
पण तुला काय हक्क आहे? आरोपी ते आरोपी अन वर फिर्यादीच्या उलटी फिर्याद?
त्यामुळं राहूच दे.
(अवांतरः लग्न करूनही न सुधारणे हा स्त्रियांचा गुणविशेष म्हणावा काय?)
-एलियन स्पायडर.
ब्याट्या.....
In reply to आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही by बॅटमॅन
ब्याट्या.....
तुला माहीत आहे का एका सर्व्हे ने असे दाखवुन दिलय की स्त्रीया पुरुषांपेक्षा अधीक आनंदी असतात. त्या अधीक जगतात"
कारन सोप्पय रे. "स्त्रीयाना बायको नसते "
=))
In reply to ब्याट्या..... by विजुभाऊ
=)) =))
ऐकलेय खरे अशा सर्व्हे बद्दल. बाकी, ज्यांना स्त्रियांत रस असतो अशा स्त्रियांबद्दलचा सर्व्हे काय म्हणतो तेही वाचायला आवडेल ;)
+१
In reply to ब्याट्या..... by विजुभाऊ
+१ :D
दे धमाल.
अब आ रहा है मजा.मोगँबो खुश हुआ.....
समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू
समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू कळकळीने मांडताना पाहून ड्वाॅले पानावले. मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं. :-)
हंगं असं.
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
>>>> मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो.
शाब्बास. आत्ताशी कुठं बरं वाटलं. अजून येऊ दे....! :)
-दिलीप बिरुटे
हर हर!
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
अहो, कळकळीने बाजू मांडताहेत ते पुरुष. चला पळा लौकर घरी. तुमची सौ. फॅन पुसण्यासाठी वाट बघत असेल!
मिपा वरील सर्वात कमी वेळेत
In reply to हर हर! by पैसा
मिपा वरील सर्वात कमी वेळेत शतक करणारा धागा. रेकॉर्ड द इव्हेन्ट.... सम्पादक. नोंद घ्या.
तीन प्रश्न
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
तीन प्रश्न
१. कळकळ कुठे दिसली? (कडकड, कट कट दिसु शकेल.. कळकळ??)
२. तुमचं लग्न झालं आहे का? (नसल्यास हा प्रतिसाद फाऊल आहे..)
३. तुम्ही संपादक आहात ना? (इन दॅट केस.. कसं काय मालक? चला चहा पाणी करुन येऊ.. दमला असाल..!!)
येकच नंबर किसनद्येवा!!!
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
येकच नंबर किसनद्येवा!!!
"पुर्षांच्या धाग्यावरि म्हैलांचा घाला
आला आला सावध करा किसनद्येवाला
सद्गदिता पुर्षांच्या ओ दे हाकेला
करुणारव साचा तव कानी जो गेला"
वाह वाह...
In reply to येकच नंबर किसनद्येवा!!! by बॅटमॅन
वटवाघुळमानवा मानल रे तुला.किसनदेवा या गोपींना सदबुद्धी दे रे बाबा !
+१
In reply to वाह वाह... by बाबा पाटील
किसनद्येवा या गोपींना सद्बुद्धी दे रे बाबा!
किसनद्येवा या मावश्यांना
In reply to +१ by बॅटमॅन
किसनद्येवा या मावश्यांना सद्बुद्धी दे रे बाबा! ;-)