हा हा हा
प्रश्न मस्त आहेत... परा किंवा डान्राव कॉलिंग !!
अजुनही काही निरर्थक वाक्ये ऐकुन फस्सकन हसु येते.. इथे देत नाही... उगाच प्रतिसादाला पंख लागायचे... ! =))
कारण सोप्पंय.. दीडशे रूपयांची इंग्लिश डीव्हीडी विकत आणून घरात खर्चिक कचरा का साठवायचा?
इंग्लिश मुव्हीज डाऊनलोड करून इंटरनेट का जाळायचं?
तीस रूपयांच्या डीव्हीडीत सहा सिनेमे !!!!!
मूळ इंग्लिशमधलेही मिळतात.
पायरसी वगैरे *********
हिंदी डबिंग ऐकून मूळ भिकार पिच्चरमधेही मज्जा येऊ शकते.
इंग्लिश शब्दांशी जुळवून घेण्यासाठी दोन हिंदी शब्दांत वेडेवाकडे अंतर सारून बोलतात ते ऐकायला मजा येते.
(डल् अति घोगर्या आवाजात..)
वो..अम्..एक किस्म का... अम् विस्फोट अ (लांब पॉज..) था..!!
अरे वाह बेकी.. तुम तो आज का आ आ आ फी अ अ अ खूब्सुरत (फास्ट) लग रही हो.
असो.
सर्व शंका रास्त..
झकास!!!
मागे एका इंग्रजी चित्रपटाच्या डब्ड आवृत्तीत शि-शब्द किंवा फ-शब्द आला तर 'हे भगवान' असे वापरले होते. ओठांच्या हालचालीवरून कळत होते म्हणा... ;) ... लै हसलो होतो.
मस्त परिक्षण लिहिलय.
जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?>>
मलापण अगदी हाच प्रश्न पडतो नेहमी.
बहुतेक 'अटलांटिस' बद्दल वाचून त्याच्यातल्या गोष्टी चोरतात सगळे!
वैज्ञानिक शोधांच्या नावाखाली काहितरी 'चांगले' दाखवले तर सिनेमा बघताना जरा तरी बरे वाटेल,
उदा: काहितरी स्फोट/ रासायनिक प्रक्रिया करुन अख्खा हिन्दी महासागर गोड्या पाण्याचा केला, वगरै....
(बावळट, मागासलेली) माउ
प्रश्न आवडले आणि हिंदी डबिंगवरची टिप्पणीपण फस्क्लास आहे.
जुरासिक पार्कच्या पहिल्या भागात नावाड्यांची वेगळी भाषा दाखवायला मराठी वापरली होती ते आठवलं.
असंच अचाट हिंदी त्या टेलिमार्केटिंगच्या जाहिरातींमध्ये एका विशिष्ट हेलात बोलणं चालू असतं.
"मैं बहोSSत परेशान थाSSSS. मुझे समझ नही आ रहा था क्या करूSSS. फिर मैने अमुक तमुक अपनायाSSSSS" वगैरे वगैरे..
>>जुरासिक पार्कच्या पहिल्या भागात नावाड्यांची वेगळी भाषा दाखवायला मराठी वापरली होती ते आठवलं.
च्यायला, हे असे होते काय ?
ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे.
>>इंग्रजीतल्या मा.चो. ला हिंदीत वाह्यात इन्सान म्हणतात.
???
म्हणजे काय ?
इंग्रजीतले मा.चो. म्हणजे आपले इंगरजीतले म.फ. काय ? ( व्यनी केला तरी हरकत नाय )
काही का असेना, हे 'वाह्यात इन्सान' लै भारी, आपण आजपासुन हीच शिवी देणार.
:-) वाह्यात इन्सान
=)) =))
वाहियात इन्सान असा उच्चार करत असतात ते लोक. या हिंदी बोलणार्यांना 'या' जोडून बोलायला पण जमत नाही.
जाड्याला जाडिया म्हणतात. दीडफुट्या ला डेढफुटिया म्हणतात. भाडिया म्हणताना मात्र कधी ऐकलं नाही.
काही का असेना, हे 'वाह्यात इन्सान' लै भारी, आपण आजपासुन हीच शिवी देणार.
आपण पण !
म.फ. = वाह्यात इन्सान
बिच = दुष्ट औरत
स.ऑ.बि. = गंदी नाली का किडा
श.फ.ऑ. = अपना मुह बंद करो / वाह्यात बाते बंद करो
ब्लडी बिच = घटिया औरत
फ* = लोचा हो गया
अॅस = पिछवाडा
स्क्र्यु यु = हालत खराब कर दुंगा
हे अजुन काही ऐकलेले सुंदर शब्द.
हॅ हॅ हॅ.. झकास..
शेवटी विचारलेले प्रश्न ही झकास..
त्यातल्या त्यात गंमत मला वाटते ती "ग्राउंड स्टाफ" ची.. broken arrow, underseige १ & २, Excecutive Decision असले चित्रपट पाऊन त्यात काम करणार्या "ग्राउंड स्टाफ" ची मला नेहमी गंमत वाटत आली आहे. ही लोकं चित्रपटाच्या सुरूवातीला थोडी मग्रूर असतात. नंतर कोणा व्हिलनने विमान/रेल्वे किंवा बिल्डिग ताब्यात घेतली की यांची चांगली फाटते. त्यावेळी नुसते याला फोन कर, या सॅटेलाअॅट वर लक्ष टेव नाहीतर कोठेतरी विमान पाठव असले थातूर मातूर अयशस्वी प्रयोग करून स्वत:ची आणखी वाट लावून घेतात. चित्रपटाच्या शेवटी हिरोने मारधाड करून सर्व व्हिलन लोकांना यमसदनी धाडल्यावर विमान/रेल्वे सुरक्षित केली आणि "सर्व पॅसेंजर सुरक्षित" किंवा "अणुबॉम्ब निकामी झाला" असला काही संदेश पाठवला की तिच लोक जणू स्वतःच पराक्रम केल्यासारखी खुश होऊन एकमेकांना मिठया मारतात. चित्रपट वेगवेगळा असला तरी "ग्राउंड स्टाफ" चे काम एकच.. माझ्यामते हॉलिवूड मध्ये हे काम करणारी एकच टिम आणि एकच सेट असावा..
देवाशप्पथ मी परीक्षण पूर्ण वाचलं नाही पण डायरेक्ट प्रश्नांवर उडी मारली. वेळ झाला की परीक्षण पूर्ण वाचेन. ;)
हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष)
कारण ते आपल्या भारतीयांसारखे अघळपघळ "मनुष्य" असतात. गोर्यांसारखे यांत्रिक रोबोट नाहीत. असो. पण प्रत्यक्षात डॅन्झेल वॉशिंग्टन वगैरे जाम स्मार्ट आहेत आणि दिसतात.
हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही.
बॉस! हिरो आणि हिरोईन हे दोघेही "हुशार" असले तर एकमेकांना सोडून जाणेच योग्य आहे ना. दोन हुशार माणसे फार कमीवेळा एक दुसर्यांच्या संगतीत राहतात. दोघांपैकी एक "ढ" असेल तरच एकमेकांना चिकटून राहतील.
जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?
अमेरिकेची उडी नेहमीच मोठी होती. अफगाणिस्तान, इराक वगैरे त्यांचे शत्रू नव्हतेच कधी. कःपदार्थ एकदम सगळे जग तेव्हा अमेरिका फक्त "बाहेरच्यांवर" लक्ष ठेवून. गेले कित्येक वर्षे ती एलियन्सपासून जगाचे संरक्षण करते आहे नै का? ;)
हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो?
त्यांना त्यांची मां गाजर का हलवा आणि आलू के पराठे खिलवत नाही ना म्हणून.
हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात?
त्या त्यांच्या खर्या आया असाव्यात. आम्ही अफ्रिकन नसूनही आमच्या पोरांवर ओरडत असतो. ज्या ओरडत नाहीत त्या माता जाम "फिल्मी" असतात असे स्पष्ट मत आहे.
हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय?
या प्रश्नातच उत्तर आहे.
हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते?
एक वोडका-मार्टिनी शेकन नॉट स्टर्ड मिळाले की उत्तर देईन म्हणते.
स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात?
चाइल्ड सपोर्टचा अमेरिकन कायदा. दुसरे काही नाही. हे असे दाखवले नाही तर तिकडचे सेन्सर बोर्ड नडत असावे. ;)
आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो?
अहो त्याला आपण त्या पोराचे खरे "बाप" आहोत की नाही इथपासूनच शंका असते तेव्हा म्हणणारच तो.
उत्तम परीक्षण
हॉलीवूड सिनेमे व ह्या सिनेमातून आपली स्वताची एक काल्पनिक अमेरिकन जीवनशैली तमाम जगतावर लादत असतात .(जगाला वाचवायचा ठेका आमच्याकडे असा गर्भित इशारा ह्या पद्धतीच्या हे लोक देतात .मुळात जगाची व्याख्या म्हणजे अमेरिका .अशी ह्याची समजूत असते .युरोपात फ्रेंच जर्मन किंवा इंग्लिश ह्याच्या तडाख्यात एखादा अमेरिकन सापडलं तर त्याला मजबूत टोमणे बसतात (मंदीच्या काळात हे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत ) अफगाण इराक युध्साठी अमेरिकेच्या नादी उगाच लागलो अशी समस्त इंग्लिश लोकांची भावना आहे .म्हणून टोनी ब्लेअर खलनायक ठरले व त्याच्या पुस्तकाचा सर्व निधी इराक युध्ध्च्या सैनिकांसाठी दिला असता ब्लड मनी अशी संभावना समस्त इंग्लिश पुस्तकांनी केली .अजूनही ह्यांचे सिनेमे तांत्रिक दृष्ट्या चांगले असतात .अप्रतिम असतात .ग्रीन डे त्याच्या लोकप्रिय अमेरिकन इडीयात ह्या अल्बम मधून शिव्याची लाखोली वाहत अमेरिकन ड्रीम ची हुर्य उडवतो
.ह्यांचे हिंदी डबिंग जाम हसवतात . जर्मनीत सर्व सिनेमे हे जर्मन डब असतात .आमचे कुटुंब जेव्हा लंडनला आल्यावर हॉलीवूड सिनेमे जेव्हा इंग्लिश मध्ये पाहू लागली .
तेव्हा खुपश्या अभिनेत्रीचे खरे आवाज एकूण निराश झाली . कारण जर्मनीत प्रत्येक नटी साठी डबिंग करणारा जर्मन आवज नेहमीच चांगला असतो .
(येथे राष्ट्रीय वाहिनीवर दर शुक्रवारी बॉलीवूड सिनेमे जर्मन भाषेत दाखवतात ( बहुतेक ते शाहरुख चे असतात .)त्याचा मात्र बकरी आवज बरोबर जमलाय
ता क एक प्रसारमाध्यमाचा प्रोडुसर आमच्या पंचाताराकीत हॉटेलात कामानिम्मित आला होता .माझ्याशी बोलल्यावर त्याला कळले मी मुंबईचा आहे वर एक दोन आवज मिमिक्री पद्धतीची ( हलक्या दर्जाची पण त्याला काय कळतंय ) पाहून खुश झाला म्हंटला बर्लिनला मला येऊन भेट .बॉलीवूड सिनेमाची डबिंग करायला देतो मात्र जर्मन भाषेवर प्रभुत्व हव .
मी म्हटले शाहरुख काही अजून १ वर्ष म्हातारा होत नाही .तो पर्यत घेतो शिकून .
प्रतिक्रिया
हा हा हा प्रश्न मस्त आहेत...
माझा प्रश्न
कारण सोप्पंय.. दीडशे रूपयांची
हिंदी डबिंग ऐकून मूळ भिकार
हो.हो. भलती मजा येते. सौ
यशवंता ! या सौ. प्रतिशत कोण
ह्या: ह्या: ह्या:
पुनरूक्ती
झकास लिहिलेय!
हॅ हॅ हॅ. परीक्षण छान.
झकास!!! मागे एका इंग्रजी
फ* यू... जमत नसेल तर " हे
अच्छा ! आणि आम्ही समजलो की
मस्त
प्रश्न आवडले आणि हिंदी
काय सांगता ?
इंग्रजीतल्या मा.चो. ला हिंदीत
समजला नाय ...
वाह्यात इन्सान=))
हे भगवान
होय ... तेच ते .. म.फ. !! 'फ'
+१
आणि एक राहिलंच. गो टू
एक कळले नाही...
एक कळले नाही...
आम्ही तर
झकास..
काही उत्तरे
आवरा !! अहो त्याला आपण त्या
म्हणुन मी अमेरिकन बायको णको
भारी प्रतिसाद... =))
भार्री उत्तरं !!!
जबरी
उत्तम परीक्षण हॉलीवूड सिनेमे