Skip to main content

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

लेखक गवि यांनी शनिवार, 04/12/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस.. दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान.. भेंडी गव्वार ललिता पव्वार.. ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका... हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..? हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..? दाद्या दाद्या खच्चून पाद्या.. एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा.. रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो. राम मून पांडू कलर डू डाय डू.. फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड.. एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.. मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा.. कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..? चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा.. पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा.. गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
लेखनविषय:

वाचने 53469
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

बिस्कीट बिस्कीट एन्ना बिस्कीट जाम बिस्कीट एन्ना जाम? रो' जाम एन्ना रो'? को रो एन्ना को? टिक्क को एन्ना टी? रो' टी एन्ना रोटी? बन रोटी एन्ना बन? रिब्बन एन्ना रिब्बन? पच्चा रिब्बन एन्न पच्चा? मा पच्चा एन्ना मा? उप्पमा एन्ना उप्प? कल उप्प एन्ना कल? रास्कल एन्ना रास? मद रास !!!!!

जाणे जिगर जानेमन मुझको लगि नंबर वन तू जो मुझे ना मिली चड्डी मे करुंगा सनम

टीपी टीपी टीप टोपं व्हाट कलर यु आर माझा रंग सांगू का ? सांग सांग .... माझ्झा रंग .....

माझ्या रंगात रंगणारी परी आहेस का तू पर्यांची राणी का आहेस माझी प्रेमकहाणी .... माझ्या प्रश्नांचे उत्तर ....दे ना ...

बालभारतीच्या पुस्तकात ऐक कविता होती तिला आम्ही तत्कालीन हिंदी गाण्याची चाल लावून म्हणायचा वात्रटपणा करायचो. लवलव हिरवी sss गार sss … (तम्मा तम्मा sss दोगे sss … ) लवलव हिरवीगार पालवी (तम्मातम्मा दोगे तम्मा ) का ट्यां ची sss वर sss … काट्यांचीवर मोहकजाळी

In reply to by अत्रुप्त आत्मा

विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे स्मायल्या कशा ओसंडून भरून वाहू लागल्यात =)) =)) =)) आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))

In reply to by बॅटमॅन

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))
नायतर काय, हवालदाराचं नाव सकारादि केलं की झालं!! =))

गावाकडून आलेल्या मुलीने साइसुट्ट्यो करताना म्हटलेल्या ओळी आणि त्यावरून आम्ही ओरडा खाल्ला होता. आदुकली पादुकली ढम्माढूस का गं म्हातारे पादली तूच.

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आहे. खूप छान धागा. आमच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्ही नेहमी दर्जेदार शेरोशायरी मधे रमायचो. जसे की दूर से देखा तो अंडे उबल रहे थे. पास जा कर देखा तो गंजे उछल रहे थे.....दूर से देखा तो सुंदर गुड्डा था पास आके देखा तो ख़ूसट बुड्ढ़ा था....इत्यादि... अज़ून एक म्हणजे आमची सुंदर क्रियेटिविटी वापरुन हॉरर फिल्म्स ची नावं बनवायचो.... मैं भुतनी तेरे कब्र्स्तान की..., तू मेरा ड्रॅक्यूला मैं तेरी चुडैल.....कटोरी मे लाश....वगैरे, वगैरे... अजूनही काही कविता... मेरे सामने वाली खिडकी मे एक दूध-वाला भैय्या रहता है. वो चोर है वो डाकु है वो दूध मे पानी मिलाता है... गोदरेज की अलमारी लेती जा, जा तुझको साडीयोंकी दूकान मिले.... कचरे के डब्बे मे तुझको बिठाकर, उपर से उसका ढक्कन लगाकर फेक दूँगा नाले के पास.....( ऑल टाइम फवरेट)

"एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.." हे आम्हाला आमच्या विज्ञानाच्या सरांनी असे सांगितले होते. "एक दिन, वन डे, फॉक्स कोल्हा, लेक तळ्यावर, वॉटर पाणी, ड्रिंक पिऊनी, वेंट गेला".

"सांग सांग सांग दाढी मिशा लांब दाढी गेली वाया पड माझ्या पाया पायाखाली बत्ता तुझं लग्न आत्ता पायाखाली सुपारी तुझा लग्न दुपारी दुपारी आले पाहुणे तेच तुझे मेहुणे मेहुण्यांनी आणला भोवरा तोच तुझा नवरा." असे होते.

आणखी एक.. 'पांड्या रे पांड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हारपली पांड्यानं बायको झोडपली.. पांड्याच्या बायकोनं केला भात पांड्या म्हन्ते मी नाही खात पांडयाच्या बायकोनं मारली लात पांड्या पडला संडासात संडासात निंगला साप पांड्या म्हन्ते बाप रे बाप..'

सुकर.. जरा लवकर.. तुझ्या नंतर.. माझा नंबर.. बद्ला ए चड्डी.. झाली ओली आता ती तर...!! (चालः छुकर मेरे मनको, किया तुने क्या इशारा..)

१) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पकड गच्च पकड ड शब्द येत नाहि मदत करा नया हे हम

In reply to by kalash

) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पक गच्च पक
'ड' येत नाही? नक्की?

जास्तीची मेजॉ.......र्टी कमीची मेजॉ...........र्टी मामाचं पत्र हरवलं..... ते मला सापडलं....... हेच वेगळ्या टोन मधे मामाचं पत्र 'हरवलं' टोन लिहिणं कठीण ते; मला 'सापडलं' ! . . . . . .

माझीही थोडी भर भट्ट जेवूनी तत्त फुगले घरी जाऊनि स्वस्थ झोपले बायकोने विचारले का हो झोपले? अगो xxचे पोट फुगले. तू तू तू तू तारा डबा बाटली भंगरावला तू तू तू तारा तूने मेरा पाकीट मारा आणि एक अकरा म्हण अकरा भाजून खा बकरा

In reply to by पगला गजोधर

सोळा- रॉकेलचा बोळा. सतरा- गंजलेला पत्रा. - या वस्तू कुठे घालायच्या याच्या जागा ठरलेल्याच. ;)

In reply to by मालविका

गाण्याच्या एका ओळीचे पुढे अनेक विडंबन करण्याचा प्रधात ओये ओये ने केला होता ओये ओये कांदा पोहे बच्चा रोये मम्मी सोये अजून एक गाण्याचे विडंबन आमच्या शालेय जीवनात करायचो जुली जुली जुलीचा बाप आप माझ्या घरी त्याला मी खायला दिली पाणी पुरी त्याने मला दिली काना खाली खाली मस्त चाली मध्ये गाता यायचे वरच्या एका प्रतिसादात सोने तुला सोन्याची माळ घे हे गाणे वाचले त्याची थोडी सुधारीत आवृत्ती सोनू तुला सोन्याची माळ घे सोन्यापरी लेडीस घड्याळ घे , घड्याळ घे मोनिका ची साडी घे तू गोल गोल आता तरी माझ्या संगे गोड बोल सायो नारा सायो नारा चे विडंबन सायन आया सायन आया दादर माटुंगा सायन आया

नूरी नूरी भाजी पूरी शेव पूरी

देखा है पहिली बार ... टकलेपे खिले दो बाल टाक्क तोडून टाक्क तोडून . . देखा है पहली बार...म्हातारा हा*ला हिरवागार टाक्क *** टाक्क *** .

पुंडलिकान् मारली इटकर.. .ती लागली तुकारामाला.. ....पुंडलिकवरदे हरी इट्टलच्या चालीवर..हे एक विसरलं वाटतं. ..बाकी त्याज्य ते योग्यमार्गे त्यागावे याविषयी बालपणी प्रचंड ओढ असल्याचे अनेक काव्यांत दिसत आहे. ;)

In reply to by भिंगरी

असा आहे पुंडलीकानी वरती हाणली विट्कर अरे जावूदेव आता तु खा मार खिरित नान्द्येव बुडाला पार्वती पळाली धरधर महादेव.

होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या ...त बंदुकीची गोळी

दिड दमडिचं तेल आणलं मामाजींची शेंडि झाली भावोजींची दाढी झाली सासुबाईंची न्हाणी झली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला

धिशीज १००थ प्रतिसाद्वा !

In reply to by बॅटमॅन

माझा १००वा झाला म्हणुन आनंद व्यक्त करु की तुझा उडवला म्हणुन निषेध. तुम अपना समस्या काँस्टंट रखोरे बाबा- बाबुसाल ;)

अय्या गडे...इश्या गडे आम्ही गेलो मामाकडे मामाने केले दहीवडे दह्यात पडली लाकडे मामाला झाली माकडे (मामेभावंडांना चिडवण्याचे खास गाणे)

टर्रदिशी टर्रदिशी प्यान्ट फाटली कशी? (ऑन डी चाल ऑफ़ पर्रदेशी पर्रदेशी जाणा नहीं) -- एक बेड़की को देखा तोह ऐसा लगा... (पुढे काहीही रटाळ) --

आरं आरं पांड्या कारे धोंड्या तुझी म्हस कोणची ? काळी दुध किती देते ? शेरभर तू किती पितो ? पावशेर . . . ., एवढेच आठवतंय … पुढचे कोणाला माहित आहे का ?

In reply to by कहर

हायला हे अडम तडम कसं विसरलं होतं- हा घोडा कुणाचा? - राजाचा इथं कशाला आलाय? - चरायला. चारा किती खातो? - गाडीभर पाणी किती पितो? - तळंभर तळ्यात काय? - हंडा हंड्यात काय? - चंबू चंबूत काय? - लिंबू लिंबूत काय? - मिठाचा खडा उच्चल तुझ्या राजाचा घोडा.

पुढून सपाट मागुन सपाट दिसतंय कसं गोदरेजचं कपाट!!

शाळेमध्ये असताना सर्व शिक्षा अभियानचे खूप छान गाणे लागायचे. मूळ गाणे हिंदी असले तरी मराठीत भाषांतर उत्तम जमले होते. 'सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला तयार होऊन निघालो आम्ही' यात आम्ही काही बदल करून म्हणायचो, "सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला ओढ्यावर चाललो आम्ही, थांबवले तरी ना थांबतो आम्ही प्रेशरनी चाललो आम्ही मेघांसारखे गरजू आम्ही पावसासारखे बरसू आम्ही सूर्यासारखे तळपू आम्ही, ओढ्यावर चाललो आम्ही!!" ( बाकीची मुलं: ओ हो हो हो ) :D मूळ गाण्याचा दुवा: School chale hum!

कुणी सातारचं असेल इथे तर कृपया ते "अगडबंब बगडबंब बोले म्यांव म्यांव" पूर्ण सांगू शकतील का?

मी जानेवारी कुड खातो! मी फेब्रुवारी कुड खातो! कळलं? आता पुढचं तू पूर्ण कर- मी मार्च? कुड खातो मी एप्रिल? कुड खातो बरोबर! पुढे? आणि हे एक- दे गुलाम चारा कडू

मछली जलकी राणी है जीवन उसका पाणी है हाथ लागो तो डर जायेगी बाहर निकालो तो मर जायेगी पुढे काही 12 वर्षांनी कॉलेजात गेल्यावार ऐका सुबक ठेंगण्या बॉन्गकन्येच्या डोळ्याच्या पिटपीटीकडे पाहून बालपणातील हि कविता मोठ्याने म्हणून, तारस्वरात 5 वी ओळ सुद्धा जोडायाचो ..... मछली जलकी राणी है जीवन उसका पाणी है हाथ लागो तो डर जायेगी बाहर निकालो तो मर जायेगी ओर बंगालनको दो तो खा जायेगी.....

विडंबन घालीन लोटांगन वरती ढुंगन डोळ्याने पाहिन ** तुझे. एखाद्याच्या नावापुढे दादा लावून ***दादा ***दादा पेटी वाजव दोन पैसे देतो माझा बोचा खाजव असे चिडवायचो.

In reply to by ऋतुराज चित्रे

बोचा म्हणजे काय रे भाउ? (निरागस)पैजारबुवा,

In reply to by ऋतुराज चित्रे

डोकं खाजवल्याने विस्मृतीत गेलेल्या आठवणी जाग्या होतात. बोचा खाजवल्याने नक्की काय होते ?

ऐक हात उलटा, दुसरा हात सुलटा, स्टाइलने आणि सामोरासमोर च्या ऐवजी वरखाली झिम्मा सारखा ऐक प्रकार बहिणीला तिच्या मैत्रिणी बरोबर खेळताना आठवतंय. त्या असा काहीतरी म्हणायच्या आयी बिना ( 3 वेळा टाळया) सुपरसीना डिंग डॉंग लेझी गर्ल .... आयी बिना सुपरसीना डिंग डॉंग लेझी गर्ल स्त्याच्यु गो ......

जीभ बोटाच्या पकडीत धरून बोलायला सांगायचे, 'मी वाण्याच्या पोत्यातला गुळ खाल्ला.'

मी पण मी पण " अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, नाप था मेरा सिया मेरे बाप का =)) और एक गंगू बाई पाण्याला जाती.... जाऊं दया चने फूटा ने खाती खाऊन दया =)) अजुन एक एह तेरे करम कभी चाकू कभी गन =) चन्द्रकान्ता च फेमस टाइटल सांग च पण इडम्बन बनवाल होत सिनिअर्सेनि आता आठवेना क्रुरसिंग यक्क् "म्हणयचो ते आठवताय

In reply to by पियुशा

@ अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, नाप था मेरा सिया मेरे बाप का>> ह्ही ह्ही ह्हा! :-D जिल्बुषा हे पांडुनि ठेवलेलं नाव सार्थ आहे! :-D

In reply to by पियुशा

गप्पे पिवशे. ते ओरिजिनल गाने आहे. चाल मात्र ढापल्ली आहे. क्या रे टेलर बोर्ड लगाया टिपटॉप का. नाप मेरा लिया शर्ट सिया बापका. दख्खनी हिंदी भाषेतली ती क्यासेट आहे.

In reply to by सदस्यनाम

बर्रररर सदस्य भाऊ जौंदे और एक " जान ने जिगर जानेमन तेरा वजन २०० टन गर जो तू मुज़पे गिरी मर जाऊंगा में सनम

In reply to by यसवायजी

हां हां हां __^__ और एक तुम तो ठैरे परदेसी साथ क्या निभाओगे अंडे मिले तुमको पेपेर्मे अब डंडे खाके जाओगे ओ। ओ। ओ। मरतेय मई आज हसून हसून ~~~~