Skip to main content

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

लेखक गवि यांनी शनिवार, 04/12/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस.. दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान.. भेंडी गव्वार ललिता पव्वार.. ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका... हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..? हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..? दाद्या दाद्या खच्चून पाद्या.. एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा.. रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो. राम मून पांडू कलर डू डाय डू.. फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड.. एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.. मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा.. कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..? चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा.. पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा.. गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
लेखनविषय:

वाचने 53604
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

अबो ढबोरे ... ढबोरे... माझी म्हैस तुझी म्हैस आली का ?...... आली ... दुध किती देती ? .......आद्शेर पावशेर ..... चारा किती खाती ? ........घम्मा घम्मा ..... तिचं नाव, तिचं नाव सांगू का ? .......सांग सांग ... तिचं नाव, तिचं नाव "कलावती" (ज्यांच्या घराच्या बाल्कनीत क्रिकेटचा ब्वोल गेला कि त्या जप्त करणाऱ्या खडूस बाई )

अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार , खालून दिसतोय चमत्कार आणि short form मध्ये खूप शिव्या द्यायच्या असतील तर यमुनाबाईचा गडू , यमुनाबाई आगाशे

In reply to by तुडतुडी

ठ्ठो =)) यमुनाबाई आगाशे म्हणजे एकदमच अस्सल आणि अतिप्राचीन स्मृती बघा....लैच हळवं केलंत =)) _/\_

In reply to by बॅटमॅन

अगदी अगदी.. यडपट, मूर्ख, नालायक, बावळट, इडियट आचरट, गाढव, शेळपट हे यमुनाबाई आगाशे पक्के तोंडपाठ आहे. पण गडू कसला ? पब्लिकली सांगण्यासारखे नसावे?

In reply to by गवि

आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल आणि शे = शेंबडा असे होते. बाकी गडू कधी ऐकला नाञ. आमचे एक मित्रवर्य हामुपा असे एक कष्टममेड शेपूट तिथे जोडीत. तीन मूळ क्रियांचा शॉर्टफॉर्म, दुसरे काही नाही. तदुपरि- यमुनाबाई आगाशे हा दक्षिण महाराष्ट्रीय प्रकार असावा काय? दक्षिण महाराष्ट्रावरून आठवलं, घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होता. =))

In reply to by बॅटमॅन

घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होता होता? अजुन आहे. राहील. :ड

In reply to by यसवायजी

हा हा हा, इंडीड ;) तेच रे. बाकी या विषयावर कही रोचक लेखन आलेले आहे.

अच्चीवर गच्ची .... गच्चीवर ( होता / सापडला / ठेवला )... ( तुटका पत्रा, लोचा, गोळा, सुचेल ते यमक ...) ज्यांनी कोणी ....केलं / केलं-नाही .....त्याच्या ऐका जवळच्या नातेवाईकाला उद्देशून ... वरच्या शब्दांना जुळणारे यमक वस्तू / प्राणी उदा कुत्रा / *चा / चोळा या संधार्भातील गधेगाळीय वाक्यरचना.

आओ बच्चों तुम्हें दिखाये झांकी हिंदुस्थान की... या गाण्याचे शुद्ध मांसाहारी विडंबन लै फेमस होते. लय हसलो होतो राव ते ऐकून. एकदोघांनाच यायचे ते एवढे सगळे पाठ.

In reply to by बॅटमॅन

झीनत अमान, देवानंद, प्राण असलेले विडंबन का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हा हा हा, नेमके =)) =)) =)) बादवे त्यात दारसिंगही होता असे स्मरते =))

In reply to by बॅटमॅन

मग पानपट्टीचे पण माहितेय का? पानपट्टी पानपट्टी गेली पान आणायला.. कसले पान xxxxxxxx लागली की बोंबलायला

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तीन कडवी आहेत त्यात. धर्मेंद्र, रेखा आणि पान, चुना व सुपारीचे उल्लेख आहेत, बरोबर?

In reply to by बॅटमॅन

करेक्ट दहावीत असताना एक वर्गमित्र अगदी हावभाव करुन बेंबीच्या देठापासुन कोकलायचा पानपट्टी पानपट्टी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिवाय ते नदीकिनार्‍याच्या काठी... ............... ग्यानबा तुकाराम हेही प्रसिद्ध होते. 'शाळा' कादंबरीत याची सोवळी व्हर्जन दिलेली आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मला व्यनीतून पाठवावे ही विणंती ;)

(चाल-पंझी बनू उडती फिरू मस्त गगन मी) गच्ची वरून खिडकी तुझी मस्त दिसते / आज मला तुला पाहावेसे वाटते // तुझ्या खिडकीला लाल लाल काचा / लाल काचाना हिरवे हिरवे पडदे / पडद्या मधून तुही किती मस्त दिसते// तुझ्या खिडकीवर ठेवल्या आहेत कुंड्या / वरच्या मजल्यावर उभा आहे बंड्या/ त्याची नजर तुझ्या वर सारखी असते// तुझ्या बापाचा माझ्यावर आहे डोळा/ ओरडून सगळ्यांना करतोय तो गोळा/ त्याला सांग तुझे माझे प्रेम असते //

आमच्याकडे ह. भ. प. चा लोन्ग्फोर्म हळूच भगिनींकडे पाहणारा किंवा हळूच भजी पळवणारा असा व्हायचा

पादानाम फुसकुली मध्ये टाराटूरी च मध्यमा उत्तमे ढमढमे पादे ठूसकुली अती विरळा अंतु म्हणे चिंतु ला हागतांना नको कुंथु चिंतु म्हणे अंतुला कुंथल्या विना न पडे जंतु

In reply to by नन्दु मुळे

रघु रघु राना पाची बोटे ताना रघु राना रुसला भिंतीवर जावून बसला

In reply to by नन्दु मुळे

पादानाम फुसकुली मध्ये टाराटूरी च मध्यमा उत्तमे ढमढमे पादे ठूसकुली अती विरळा
या श्लोकाचा हा पाठभेद प्रथमच ऐकतोय. आम्ही ऐकलेली व्हर्जनः उत्तमे ढमढमे पादे मध्यमे टुरटुराटुरी पादानां फुस्कुली राणी तस्य घाणी न जायते || बाकी ३ इडियट्स मधली व्हर्जनः उत्तमं धद्धधात् पादं मध्यं पादं थुचुक् थुचुक् | कनिष्ठं थुडथुडी पादं सुरसुरी प्राणघातकम् (चतुरच्या अ‍ॅक्सेंटमध्ये "प्राण-घटकम्") || बाकी दोन व्हर्जन अर्धवट आठवताहेत. डर्रबुर्रं महाघोरं टिस्सपिस्सश्च मध्यमम् | (व्हर्जन १.) ढर्रं बुर्रं भयं नास्ति कैयं कुय्यं मध्यमं अस्ति ठुस्साकारं प्राणसंकटम् || (व्हर्जन २.) दोन्ही व्हर्जन दक्षिण भारतीय आहेत. ३ इडियट्स मधील व्हर्जन बहुधा नॉर्थ इंड्यन असावी.

बाई.. बाई.. बाई.. वैतागले मी ह्या केसांना अगं मग बायरचं बेगॉन का घेत नाही त्याने केस गळायचे तर थांबतातच अन झोपही कायमची लागते. 'प्रकाश माका' तेलाच्या जाहिरातीचे तेव्हाचे विडंबन आठवले.

काय झालं? बाळ रडत होतं दोन धपाटे दे त्याला. ग्राइप वॉटर्सच्या जाहीरातीचे विडंबन.

In reply to by भिंगरी

"तू लहान असताना मीही तुला हेच देत होते" हे मेन वाक्य वगळल्याबद्दल खच्चून, कचकून, इ. णिषेढ.

एबी सीडी ईयेफ जी त्यातून निघाले गांधीजी गांधीजींनी खाल्ला पेरू त्यातून निघाले नेहरू नेहरूंनी खाल्ली काकडी त्यातून निघाला पतोडी पतोडीने मारली सिक्सर त्यातून निघाला गावस्कर गावस्करने मारली फोर त्यातून निघाले चोर चोरांनी पकडला क्याच संपली आमची म्याच बघा, केव्हढे बाळबोध होतो कोणे एके काळी आम्ही. -गा.पै.

कविवर्य रामदासजी आठ्वले यान्च्या समग्र कवितान्चा सन्ग्रह निघावा अशी या निमीत्ताने मागणी. कविवर्य रामदासजी आठ्वले फॅन क्लब

कचरे के डिब्बे में तुझको बिठाकर ऊपर से प्लास्टिक का ढक्कन लगाकर रखूँगा गटर के पास मत हो मेरी जान उदास

शाळेत असताना एखादीने म्हटले 'अय्या' की आम्ही म्हणायचो तुझा नवरा भय्या भय्याच्या हातात काठी तुझा नवरा घाटी.