Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुधीर काळे on Mon, 11/16/2009 - 22:38
  • Log in or register to post comments
  • 20661 views

प्रतिक्रिया

Submitted by JAGOMOHANPYARE on Tue, 11/17/2009 - 16:45

Permalink

प्रेषित

प्रेषित उपजावा म्हणून पोरे वाढवणे, तेही मुसलमानानी? काही तरी घोळ! कारण (बहुतेक) पैगंबरानी स्वतःला शेवटचा प्रेषित म्हटलेले आहे! 'जाणकार' सांगू शकतील याबाबत. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 11/17/2009 - 20:07

In reply to प्रेषित by JAGOMOHANPYARE

Permalink

जरा विस्ताराने!

त्यानं सांगितलेलं जे मला समजलं ते असं: संततिनियमनाची साधने वापरून गर्भ राहूच नये याविरुद्ध तो बोलत होता. म्हणजे स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक असावेत व गर्भ राहातो कीं नाहीं हे "देवाजीच्या मना" असावे असे त्याचे म्हणणं होतं! कारण अशा तर्‍हेने गर्भ रहाण्याच्या विरुद्ध केलेल्या कृतीने जो एरवी राहिला असता तो गर्भ कदाचित थोर माणसाचा असता व त्याच्या/तिच्या जन्माला आपण रोखले. अर्थातच मी याच्याशी सहमत व्हायचा संबधच नाहीं. मी फक्त त्याचा मुद्दा समजावून सांगितला. त्याने "नबी" हा शब्द वापरला होता. आता प्रेषित शेवटचा की आणखी येणार आहेत हे मलाही माहीत नाही, त्यालाही कदाचित माहीत नसेल किंवा त्याने तो शब्द चुकीचाही वापरला असेल. कोण जन्माला यायला मुकला हा महत्वाचा मुद्दा नसून त्या माणसाचे विचार काय होते ते महत्वाचे व ते ऐकून मी तर थक्कच झालो. १९९५च्या सुमाराला कुणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो हेच किती आश्चर्य! असो. प्रेषिताबद्दल जाणकार लोक मत देतील, पण तो नबी म्हणाला होता. गर्भधारणा होऊ न दिल्याने जग कुणा थोर व्यक्तीच्या जन्माला मुकू शकते (!) हा त्याच्या बोलण्याचा रोख होता. असो. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 11/17/2009 - 20:41

In reply to जरा विस्ताराने! by सुधीर काळे

Permalink

सुधारणेला बंदी!

इस्लाममध्ये सुधारणेला....नवीन विचारांना बंदी आहे. प्रेषित जे काही त्यावेळी सांगून गेला तेवढेच सत्य...बाकी सगळे झूठ अशीच त्यांची श्रद्धा आहे. तेव्हा त्यावर आपण काय बोलणार? थोडक्यात काय तर...म्हणतात ना..बाबा वाक्यम् प्रमाणम्!...तेच. त्यामुळे तो तरूण जे काही बोलला ते काहीही नवीन नाही. कुणीही मुसलमान असेच बोलेल. आपल्याकडे जसे सुधारक आहेत तसे त्यांच्यात नाहीत....नाहीत म्हणजे असे कुणी बोलायला लागले तर त्याचा आवाज परस्पर बंद केला जातो. नाही म्हणायला एकेकाळी महाराष्ट्रात हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ स्थापन केली होती. त्यांनाही त्यांच्या जातभाईंशी असाच मुकाबला करावा लागला होता. शेवटी त्यातच त्यांचे निधन झाले. आज त्यांचे काही मोजके अनुयायी ती चळवळ पुढे नेत आहेत..मात्र ती खूपच क्षीण आहे. काळेसाहेब,कोणताही मुसलमान लोकसंख्यावाढीबद्दल चिंता,कुटुंबनियोजन वगैरेवर बोलणार नाही...कारण वर तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या धर्मात ह्या गोष्टींना मुळी स्थानच नाहीये. काळे साहेब, आपण कोणत्याही व्यक्तीशी त्याचा जात,धर्म,दर्जा वगैरे न पाहता बोलता...हा गुण मात्र आवडला. मी देखिल जमेल तिथे समोरच्या व्यक्तीशी त्याचे वय,अनुभव,हुद्दा,जात-पात,धर्म वगैरे न पाहता संवाद साधत असतो. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन आपल्याला येतो असे मला वाटते. असेच अनुभव अजूनही येऊ देत. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 09:06

In reply to सुधारणेला बंदी! by प्रमोद देव

Permalink

देवसाहेब! अ

देवसाहेब! अगदी देवासारखे बोललात आणि हमीद दलवाईंची आठवण काढून मला कॉलेजच्या दिवसात (१९६०) नेलंत. हो, मीही कॉलेजात असताना हमीद दलवाईंच्या सकाळमधल्या लेखांनी प्रभावित झालो होतो. ते या दोन धर्मांना जोडण्याचे (integrate) फार चांगलं काम करत होते व लिहीतही मस्त व पटण्यासारखं. आज त्यांची आठवण काढून मी एकदम १९६० सालात गेलो! मी खरंच man-on-the-street शी आवडीने बोलतो. हे तुम्ही spot केलंत याबद्दल धन्यवाद. खरं तर "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी" या म्हणीवर माझा विश्वास आहे. मुस्लिम स्त्रिया जेंव्हा शिकायला लागतील तेंव्हाच तो समाज बदलेल. आज भारतात तरी ते होत आहे. महाराष्ट्रात तर १२वी पर्यंत सर्व मुलींना शिक्षण मोफत आहे. धर्मांध लोक मधे आले नाहींत व हे मुस्लिम स्त्रीशिक्षण चालू राहिलं तर २५ वर्षांनी चित्र खूप बदललेले दिसेल असे वाटते. ज्या मुलाबरोबरच्या संभाषणाने हा धागा सुरू झाला त्याची आई शिकलेली असती तर त्याचा असा मूर्ख समज झाला नसता! भुपत्नीकत्वएकपत्नी (झाले डिस्टॉर्शन)! हे गमभन वापरतानापहोते. Help. Help. कूळ कायदा, एकपत्नित्व, स्त्रीशिक्षण अशा ज्या गोष्टी भारतात झाल्या त्या पकिस्तानात व्हायला हव्या. तिथेही महात्मा फुले, (महर्षमहकर्वे-पुन्हा डिस्टॉर्शन) महर्षी कर्वे जन्मायला हवे होते. पण "उस माटीमे जन्मे डिक्टेटर (तू छुपी है कहाँ-नवरंग)"! ए.आर.रहमानच्या ऑस्करनंतर एक लेख पाकिस्तानी वृत्तपत्रात आला होता. तो मी इथे टाकला होता. आपण वाचला असेल. नाहीं तर पुन्हा टाकेन. जमीनदारी, जी भारतात बर्‍याच प्रमाणात नष्ट झाली, तिच पाकिस्तानात सुळसुळाट आहे. खूप गरीबी आहे. म्हणून आत्मघाती दहशतवादी मिळतात! असो. आपल्या उत्तेजनात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Tue, 11/17/2009 - 17:16

Permalink

काका

काका, लेखा वरच्या प्रतिक्रीया वाचून नक्कीच तुमची अवस्था ~X( अशी झाली असेल नाही का? मला वाटतं त्या पाकिस्तानी व्यक्तीचा मुद्दा थोडा चुकीचा, थोडा बरोबर होता :) थोडा चुकीचा कारण सायंटिस्ट होण्याकरीता त्याच्या तुटपुंज्या मिळकतीत तो मुलांना काय मदत करू शकणार होता? थोडा बरोबर कारण लीडर किंवा बाबा व्हायला नक्कीच जास्त साधनांची गरज पडणार नाही. फक्त तल्लख डोक हवं(विचारा आमच्या देशातल्या कित्येक नेत्यांना, बाबांना) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 13:18

In reply to काका by समंजस

Permalink

चांगले

चांगले निरीक्षण! (At wit's end) पण असे कांहीं झाले नाहीं. अशी वादळं येतात नि जातात. चलता है| आपल्याला पटलेलं लिहायचं, बस्स! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 11/17/2009 - 18:23

Permalink

इतकेच

वाटले की आता काही माणसे शहाणी झाली आहेत. 'देवाने दिलेले कसे आपण नाकारायचे' ह्या जुनाट युक्तिवादाहून ह्या आपण ऐकलेल्या 'हे येणारे मूल ..आईन्स्टाईन' वगैरे युक्तिवादापर्यंत त्यांची वाटचाल झालीय. चला, काहीतरी प्रगति आहे म्हणायची!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 11/18/2009 - 10:05

In reply to इतकेच by प्रदीप

Permalink

मुलामा

बरोबर! हल्ली अंधश्रद्ध लोकांना सुद्धा वैज्ञानिक मुलामा लागतो. आपण अंधश्रद्ध आहोत असे म्हणवुन घेणे कुणालाच आवडत नाही. जिथे विज्ञान संपत तिथ अध्यात्म चालु होते अस म्हणणारे आता अध्यात्म व विज्ञान हे परस्पर विरोधी नसुन पुरक आहेत असे म्हणु लागले आहेत ही पण प्रगतीच आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 11/18/2009 - 10:45

In reply to मुलामा by प्रकाश घाटपांडे

Permalink

सहमत

.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 11/17/2009 - 19:06

Permalink

पाकिस्तान

पाकिस्तानी बिचारे थर्ड वर्ल्ड मधले अडाणी पण इथल्या अमेरिकन लोकांचेही हेच चालते. कट्टर कॅथॉलिक संतती नियमन करत नाहीत. माझ्या मुलाचे मित्र आहेत. एकाला सात भावंड, एकाला पाच. घरात १० तोंडं खाणारी आणि एक माणूस कमावता. आज अमेरिकेत रहात असुनही इंटरनेट कनेक्शन परवडत नाही. या लोकांच्या दबावामुळे शाळेत इवोल्युशन शिकवत नाहीत कारण यांच्या देवाने ७ दिवसात सृष्टी निर्माण केली. गेल्या वर्षी माझ्या मुलाला बायो(१) ऑनर्स ला राज्याच्या अभ्यासक्रमानुसार इवोल्युशन शिकवणे आवश्यक होते पण स्थानिक स्कूल बोर्डाने शिकवायचे नाही असे ठरवले. स्टेटच्या परीक्षेत मुलांना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली नाहीत. हेल्थ च्या तासाला ते अ‍ॅबस्टिनन्सवाले येतात प्रेझेंटेशन द्यायला. प्लॅन्ड पॅरेटहूडवाले आलेले चालत नाहीत. याचे टोक म्हणजे धर्माच्या आड येते म्हणुन डॉक्टर इमरजन्सी काँट्रासेप्टीव प्रिस्क्राइब करायला नकार देतात. किंवा फार्मसीतला माणूस ते फिल करायला नकार देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 11/17/2009 - 22:19

In reply to पाकिस्तान by स्वाती२

Permalink

ज्याला अ‍ॅबरेशन म्हणता येईल ते फक्त मॉर्मॉन धर्माबद्दल ऐकलं होतं

मला कॅथॉलिक लोक संततिनियमनाच्या विरुद्ध असतात हे माहीत होते, पण आजही व तेही इतके कडवे हे मात्र माहीत नव्हतं. आपण लिहिलेला प्रकार खरंच भयंकर वाटला. मला वाटतं अशाच लोकांच्यामुळेच "डुब्या" दोनदा राष्ट्रपती झाला! जय बायबल बेल्ट! तसे केनेडी कुटुंब मोठे होते. बॉबी केनेडीला ८-१० मुलं होती. पण या विरुद्ध बेनझीरला एकच मुलगा आहे ना? थोडासा शहरी व ग्रामीण विचारसरणीतही फरक आहे. पण आपण लिहिलेले मी ऐकलं नव्हतं. ज्याला "अ‍ॅबरेशन" म्हणता येईल ते फक्त मॉर्मॉन या धर्माबद्दल ऐकलं/वाचलं होतं. सांगितल्याबद्दल धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Wed, 11/18/2009 - 10:02

In reply to पाकिस्तान by स्वाती२

Permalink

>>>>पाकिस्ता

>>>>पाकिस्तानी बिचारे थर्ड वर्ल्ड मधले अडाणी .... तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण एक कच्चा दुवा आहे तो असा- भारतात काही मुख्य शहरं सोडली तर पाकिस्तानात ज्या-ज्या गोष्टींना तुम्ही "थर्ड वल्र्ड" म्हणाल, त्याच गोष्टी जशाच्या-तशा दिसतील- काही अपवाद वगळता; उदा- हिंसक टोक. नशीबाने रशियाचे एक टोक - सीमा भारताला चिकटून नाही. नाही तर जो भस्मासूर तेथे दिसतो तो भारतात दिसला नसता से म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Wed, 11/18/2009 - 01:31

Permalink

काळे काका,

काळे काका, लेख / अनुभव चांगला लिहीला आहात. मलाही कमी मिळकतीच्या वर्गातील लोकांचे आजूबाजूला घडणार्‍या घटना , राजकारण , समाज , चाली रीती वगैरे विषयांवर काय म्हणणे असते, ते या बाबतीत कसा विचार करतात हे ऐकायला, जाणून घ्यायला आवडते. इथे बहुतेक वाचकांना तुम्ही काय म्हणताय ते समजले नाही. मला ही पहिला प्रतिसाद वाचताच जरा आश्चर्यच वाटले. आंणि पहिला प्रतिसाद तसा आल्यावर बाकीचे त्याच वळणाचे येत रहातात. चालायचेच. - जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 11/18/2009 - 10:19

In reply to काळे काका, by पक्या

Permalink

चालायचेच

पहिला प्रतिसाद तसा आल्यावर बाकीचे त्याच वळणाचे येत रहातात. चालायचेच.
समुहमानसिकता( खर तर समुहशरणागतता) व गतानुगतिकता यातुन विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. अनेक अंधश्रद्धा कालबाह्य असल्या तरी उपद्रवी नाही यातुन 'गतानुगतिक' पद्धतीने संक्रमीत होतात. तरी माणुस अनुभवातुन आपले विचार तपासतो. लहानपणी रेडिओत छोटी माणसे बसलेली असतात अशी माझी समजुत होती. वयानुसार ज्ञानात भर पडल्यावर ती बदलली. अनेक परिकथात लहानपणी आपण रमुन जायचो. ते केवळ मनोरंजक आहे याचे भान हळु हळु आपल्याला येउ लागले. आपण जे करतो ते आपल्याला पुर्णपणे पटतच असत असे नव्हे. अथवा जे पटत ते पुर्णपणे करतोच असेही नव्हे. त्यामुळे चालायचच प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 10:34

In reply to काळे काका, by पक्या

Permalink

प्रकाश-जी

प्रकाश-जी, धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Wed, 11/18/2009 - 07:05

Permalink

सुधीरजी,लेख--------

सुधीरजी,ज्या सहजतेने आपण हा लेख लिहीला आहे तितक्या सहजपणे वाचकांनी तो घेतलेला दिसत नाही.विषयाला उगीचच फाटे फोडत आहेत्,दुसरे काय!असो.आपण जे वाटते ते बिनधास्तपणे लिहावे.'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 08:29

In reply to सुधीरजी,लेख-------- by वैशाली हसमनीस

Permalink

वैशालीताई,

वैशालीताई, आपण म्हणता ते खरे आहे, पण मीही माझा लेख लिहिल्यावर पुन्हा एकदा-दोनदा वाचायला पाहिजे होता. मी साधारणपणे असा वाचून पहातोच, पण काल असं करायचं राहिलं व त्यातल्या तृटी राहून गेल्या. त्यासाठीच मी म्हणालो होतो कीं मला काय म्हणायचे आहे ते वाचकांपर्यंत पोचविण्यात मी कमी पडलो. पण हे झाले खर्‍या-खुर्‍या टीकात्मक प्रतिसादाबद्दल. असं होऊ नये, पण कांहींच्या बाबतीत ते होताना दिसतंच कीं "काय लिहिले आहे" यापेक्षा "कुणी लिहिले आहे" या तत्वावर प्रतिसाद लिहिले जातात. व असं जेंव्हा होतं, तेंव्हा बर्‍याचदा ते असभ्यतेच्या सीमांना ओलांडत जरी नसले तरी त्या सीमांना जरूर स्पर्शतात. 'कॉर्पोरेट' जंगलात तर हा अनुभव खूपदा येतोच, पण वैयक्तिक जीवनातही येतो. तिकडे मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याचदा तो यशस्वी होतो, तर कधी-कधी अयशस्वीही होतो. 'मिपा'त सामील झाल्यावर माझ्या लक्षात आले आहे कीं इथे कांहीं सभासद "more equal than others" आहेत व साधारणपणे इतर सामान्य सभासद त्यांच्या वाटेला जात नाहींत. मीही शक्य तो हेच धोरण ठेवतो. आपल्या पसंतीदर्शक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Wed, 11/18/2009 - 13:02

Permalink

हे प्रासंगिक लेखन

आपण कुठे कमी पडला असे वाटले नाही. हे प्रासंगिक लेखन आहे. प्रकाश घाटपांडे
सुधीरजी व मित्र हो, प्रकाशजींचे आकलन योग्य आहे. हा मंच असा आहे की त्यात आपल्याला भावलेले लिखाण वा विचार टाकणे महत्त्वाचे. स्वतः लिहायचे नाही व इतरांनी काही लिहिलेल्यात काड्या घालायच्या - 'हे वागणं बरं न्हव'! प्रश्नाची पाकिस्तानी माणसाने उकल केल्यामुळे आपणाला जरा तिखट प्रतिक्रिया द्याव्याशा वाटतात. पण त्याचा खरा कळीचा मुद्दा हा की मुले निर्मिती कऱ्ण्यात कसूर करता कामा नये. पण गेला बाजार अद्याप निर्मिलेल्या बालकांचे जे पीक बाहेर पडतेय त्यावरून "आईनस्टाईनची वा अन्य जगतमान्य व्यक्तिमत्वाची निर्मिती करण्याच्या खटाटोपासाठी अनेक विवाह वा अपत्य निर्मिती करणे चालू ठेवतोय" हे निवेदन फक्त पाकी करू जाणोत. शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Wed, 11/18/2009 - 18:56

In reply to हे प्रासंगिक लेखन by शशिकांत ओक

Permalink

नाड्या ओढता ओढता एकमत...

प्रकाशजी आणि ओकसाहेब या दोघांचे या लेखाच्या निमित्ताने कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल एकमत झाले. याबद्दल दोघांचे अभिनंदन. काळेकाका तुमच्या लेखातून काय काय साध्य होते पहा. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 20:24

In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक

Permalink

अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?

हो, अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी? आजचे खरडायच्या फळ्यावरचे मी चढवलेले (कांहींना भयप्रद वाटलेले) व्यंगचित्र पहा.....! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/18/2009 - 20:31

In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक

Permalink

अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?

हो, अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी? आजचे खरडायच्या फळ्यावरचे मी चढवलेले (कांहींना भयप्रद वाटलेले) व्यंगचित्र पहा.....! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 11/18/2009 - 21:28

In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक

Permalink

नाड्या

नाड्या ओढता ओढता ...
=)) =)) =)) अगदी नाव सार्थ झालं ना आज! ;-) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Wed, 11/18/2009 - 18:56

In reply to हे प्रासंगिक लेखन by शशिकांत ओक

Permalink

नाड्या ओढता ओढता एकमत...

प्रकाशजी आणि ओकसाहेब या दोघांचे या लेखाच्या निमित्ताने कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल एकमत झाले. याबद्दल दोघांचे अभिनंदन. काळेकाका तुमच्या लेखातून काय काय साध्य होते पहा. ह. घ्या. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com