Skip to main content

महिला दिन विशेषांक २०१७

चला, डेकोपेज शिकू या!

लेखक मूनशाईन यांनी बुधवार, 08/03/2017 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
. डेकोपेज म्हणजे हस्तकौशल्याच्या दुनियेतली एक अभिनव कला. चित्र काढता येत नसेल, तरी सौंदर्याची, रंगसंगतीची जाण असलेल्यांना सहज जमू शकेल अशी कला. जणू एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटलेले चित्र वाटावे ते प्रत्यक्षात एक साधे कागदाचे कात्रण असते. वॉर्निश, रेझिनसारखी लकाकी एका साध्या डिंकाच्या थरांनी येते. एकाहून जास्त हस्तकौशल्याच्या आणि कल्पक दृष्टीच्या बळावर साकारलेली रम्य अशी कलाकारी. कोणत्याही जागेचे सुशोभीकरण करताना एकमेकास पूरक गोष्टी आणि त्यात एक केंद्रबिंदू यावर भर असतो.

स्वयंसिद्धा

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 08/03/2017 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
. 'सामान्यातले असामान्य' हा विषय महिला दिनानिमित्त मिळाला नि खूप साऱ्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. कोणाची बरे मुलाखत घेऊ या? या विचारात असतानाच महालक्ष्मी सरस २०१७च्या तारखा जाहीर झाल्या. महिला बचत गटाचे शासनातर्फे भरणारे हे प्रदर्शन सामान्यातून असामान्यत्वाचेच दर्शन घडवीत असते. सरससाठी एखादा दिवस पुरात नाही. किमान तीनचार फेऱ्या तर कराव्याच लागतात. त्यातून २००७पासून या प्रदर्शनात भेटणाऱ्या सख्या आठवल्या.

साथ

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 08/03/2017 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
. आज सकाळपासूनच मधुराची खूप धावपळ चालली होती. कसेबसे घरचे सगळे काम आटपून ती ऑफिसला निघाली. आज पटवर्धन फूड कंपनीबरोबर तिची महत्त्वाची मीटिंग होती. काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मधुरा तशी खूपच साधी, सरळ, अत्यंत हुशार, शिस्तबद्ध, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी होती. एम.बी.ए. करून ती सामंत ब्रदर्समध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर अनेक वर्षे काम करत होती. अतिशय मेहनती आणि कर्तबगार अशी ही मधुरा लगबगीने ऑफिसला पोहोचली, तोच ऑफिसच्या मुख्य दरवाज़ात तिला एक चेहरा ओळखीचा दिसला.

वज्रासारखी कणखर, सामान्यांमधील असामान्य स्वाती

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 08/03/2017 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
. आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी कुणीतरी खासम खास व्यक्ती मला हवी होती. अहो, का म्हणून काय विचारताय? इथे अनाहितावर हा धुरळा उठलेला. कोण काय करतंय, कोण काय लिहितंय असा. आणि आम्हाला आपलं कुण्णी कुण्णी म्हणून सापडेचना. लिहायचं तरी काय हो? आणि अचानकच एक दिवस लायटिंग झाली ना डोक्यात. मस्त प्रकाशच प्रकाश. अगदी आजि सोनियाचा दिनु म्हणत उठलेच. अहो, एक मैत्रीण सापडली ना मला. हे म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा झालं हो. पण देर आये, दुरुस्त आये म्हणत ताबडतोब तुळशीबागेत कूच केलं. (नाय वो, शॉपिंग नाय.

साडी आणि बरंच काही

लेखक अजया यांनी बुधवार, 08/03/2017 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
. सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत? तर उत्तर येते 'साडी'! बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले, लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असेही हेच वस्त्र! आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच.. साडी! हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे, चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वसन. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे.

आकाशाशी जडले नाते - रचना भाटवडेकर

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 08/03/2017 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
. .

--(मुलाखत भाषांतरः अजया)

. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी काही स्वप्ने बघितलेली असतात. मोठे झाल्यावर अमुक क्षेत्रात करिअर करायचे किंवा मी तमुक होईन. पण सगळ्यांनाच आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. काही वेळेला परिस्थिती साथ देत नाही, तर काही वेळेला आपल्या आवडी बदललेल्या असतात, तर काही वेळेला काळाची गरज आणि त्यानुसार आपल्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग बदललेला असतो. फार कमी लोक त्या पूर्ण करतात. खरेच, सामान्यातील असामान्य असे ते लोक असतात.

काSssहे लायेssss परदेssssस

लेखक पलाश यांनी बुधवार, 08/03/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
. बदली बदली दुनिया है मेरी। जादू है ये क्या तेरे नैनन का? आपलं जग बदलत जातं, हे अगदी खरं!! या बदलाचंं तरुण वयात असणारंं 'नैनका जादू' हे एक कारण भलतंच गोड!! बदलांसाठीची इतर कडू-गोड व्यावहारिक कारणं मात्र अनेक. वाढणारं वय व अनुभव हे या कारणांपैकीचे दोन मानकरी. नवर्‍याच्या नोकरीत बदली चालू झाल्याने गेली १६ वर्षं घरं आणि गावंही बदलली. अशी एकूण ६ घरं बदलली. घर बदललं की परिसर बदलतो आणि शेजारही. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव आणि शहाणपण मिळालं. याचंच एक उदाहरण म्हणजे माझी मुंबईतली एक शेजारीण.

मला भावलेल्या नायिका

लेखक सपे-पुणे-३० यांनी बुधवार, 08/03/2017 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
. कोकण ही माझी जन्मभूमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात माझं बालपण गेलं. नंतरचं शिक्षण पुण्यात, काही काळ होस्टेलवर आणि मग लग्नानंतर आता पुण्यात स्थायिक झाले. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप वेगवेगळ्या स्वभावाचे, पार्श्वभूमी असलेले लोक भेटले. त्यांपैकी विशेषकरून स्त्रिया माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या. अगदी चारचौघींसारख्या असलेल्या ह्या बायका त्यांच्या स्वभावातील एखाद्या विशेष चांगल्या पैलूमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या त्यांच्या धडाडीमुळे आजही माझ्या मनात घर करून आहेत.

फॅशनची दुनिया -अमला काळे

लेखक स्वप्नांची राणी यांनी बुधवार, 08/03/2017 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
. दोह्याच्या सोशल सर्किटमध्ये उंच, देखण्या अमलाचा सहज वावर डोळ्यात भरण्यासारखा असतो. प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करताना दिसायची. 'किती सुंदर आहे ही, एखाद्या मॉडेलसारखीच!!' असाच विचार नेहमी मनात यायचा आणि कळलं की अमला खरंच त्या ग्लॅमर विश्वामधलीच आहे. फॅशनच्या जगात मराठी नावं तशी अपवादानेच दिसतात. मग अमलाचा हा प्रवास कसा होता, हे तिलाच विचारायचं ठरवलं.