Skip to main content

महिला दिन विशेषांक २०१७

होरपळ

लेखक पैसा यांनी बुधवार, 08/03/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
. "आई, मनीकडे जाते गं खेळायला." "ये जाऊन. जेवायच्या वेळेपर्यंत ये, म्हणजे झालं." "हो, येते गं" म्हणत आमची स्वारी निघाली रस्त्याकडे. वाटेत रहाटाच्या पाळीवरून विहिरीत डोकावलं नाही, तर पाप लागलं असतं. जरा टाचा उंचावतेय, तोच शेजारचे काका पंप सुरू करायला आले. "काय बघतेस गं?" मी फक्त मान उंचावून डोळे विस्फारून हसले. बेड्यातून बाहेर. रस्त्यावर. गोंद्या बैलगाडी घेऊन तरीकडे निघालेला. त्याला वाट दिली. हो, बैलांनी मला शिंग मारलं तर काय घ्या! काही मुलं सायकलचे टायर काठीने पळवत होती.

कोकणची धाकड गर्ल - अश्विनी वास्कर

लेखक पूर्वाविवेक यांनी बुधवार, 08/03/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
. आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच कुस्ती आणि 'बॉडी बिल्डिंग' म्हणजेच 'शरीरसौष्ठव' या मर्दानी खेळांची परंपरा आहे. मुंबई श्री ते महाराष्ट्र श्री हा टप्पा पार पाडून सुहास खामकर, प्रशांत साळुंखे, संग्राम चौगुले यासारखे महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर विजयाचा झेंडा फडकवत आहेत. आता त्यांच्या जोडीने कोकणातील एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी पराक्रम गाजवू लागली आहे. ती आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथील अश्विनी भालचंद्र वास्कर.

शर्ली टेंपल

लेखक जुइ यांनी बुधवार, 08/03/2017 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
.

नमस्कार, आपल्याला वाटत असेल की महिला दिन विशेषांकाचा आणि या बालकलाकाराचा काय संबंध? ही बालकलाकार दुसरी तिसरी कोणी नसून शर्ली टेंपल आहे. कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा मोनिका येथे २३ एप्रिल १९२८ रोजी शर्ली टेंपलचा जन्म झाला. गरट्रुड आणि जॉर्ज टेंपल या दांपत्याचे हे तिसरे अपत्य. कालांतराने हे कुटुंब लॉस एंजिल्स येथे स्थलांतरित झाले.

कृतज्ञ मी

लेखक शामसुता यांनी बुधवार, 08/03/2017 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
. महिला दिनाच्या अंकात आपल्याला कसं सहभागी होता येईल हा विचार डोक्यात सुरू होता. रेडिओवर मस्त गाणी सुरू होती.. एक गाणं कानावर पडलं.. 'बहोत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आये..' आणि मनात असा विचार आला की माझ्या आयुष्यात अशा कोण कोण व्यक्ती आहेत, ज्यांना मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात..... हल्ली वर्तमानपत्रात, टी.व्ही.-रेडिओवर सगळीकडे मुलींवर, महिलांवर होणारे अन्याय, विनयभंग, बलात्कार अशा बातम्या नेहमी वाचायला-ऐकायला मिळतात. खूप त्रास होतो हे सगळं ऐकून. पण मग हल्लीच हे सगळं वाढलंय का?

मुंबईची सुपरगर्ल - अनिता मोकाशी

लेखक रुपी यांनी बुधवार, 08/03/2017 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
1 अटकेपार झेंडा लावणार्‍या मराठ्यांची परंपरा आजचीही मराठी पिढी राखत आहे. काळाबरोबर पुढे जाऊन, परदेशांत वास्तव्यास जाणारे तरुण-तरुणी बरेच असतात. पण अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करणे कमी जणांना जमते. नव्या देशात, नव्या जागेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे ती "आमची मुंबई"ची मुलगी अनिता मोकाशी हिने! तुमच्या-आमच्यासारख्याच सामान्य कुटुंबात वाढलेल्या अनिताने अमिरिकेतल्या बे-एरियामध्ये आणि एकूणच पाककला-विश्वात असामान्य वाटावी अशीच वाटचाल केली आहे.

प्रेरणादायी युवा उद्योजिका - नीलिमा देशपांडे

लेखक प्रीत-मोहर यांनी बुधवार, 08/03/2017 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
. अनाहिताच्या महिला दिन विशेषांकाचं आवाहन आलं, तेव्हा मी बर्‍याच इतर गोष्टींमध्ये बिझी होते. त्यामुळे विचारही केला नव्हता; कमिट केलं आणि मग जमलं नाही तर मग ते मनाला खात बसतं, म्हणून आधी काहीच कमिट करायचं नाही असं ठरवलं होत. मग गोव्यातल्या मतदानाला आठ-एक दिवस असताना काम थोडंसं कमी झालं, म्हणून असंच धाग्यावर नजर मारली, तर तेव्हा वाटलं मला नाही जमणार. काही दिवसांनी आमच्या एका मित्राशी बोलत असताना लक्षात आलं की सामान्यातले असामान्य म्हणजे काही मंगळावरची माणसं नाहीयेत.

एक होती क्रिस्टीना…

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 08/03/2017 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
. सन १९३९च्या सप्टेंबरमध्ये एक ब्रिटिश जहाज केपटाउनहून इंग्लंडला यायला निघाले होते. त्या जहाजावर हरवलेल्या गोष्टींची यादी रोज एका फळ्यावर लावली जाई. २८ सप्टेंबरला सकाळी त्या फळ्यावर दोन गोष्टींची नोंद झाली…. १. लॉस्ट- वन शर्ट २. लॉस्ट- वॉर्सा अगदी टिपिकल ब्रिटिश ड्राय ह्यूमर! सन १९३९पर्यंत हिटलरने युरोपमध्ये धूमाकूळ घालायला सुरुवात केली होती.

र.धों.

लेखक पुष्करिणी यांनी बुधवार, 08/03/2017 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
. 'The story is lady-oriented, their fantasy above life. There are contentious sexual scenes, abusive words, and a bit sensitive touch about one particular section of society' --- 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची कारणं, भारतीय सेंसॉर बोर्ड, फेब्रु. २०१७. या पार्श्वभूमीवर जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी तथाकथित अश्लीलतेविरुद्ध लढा देणार्‍या, स्त्री-पुरुष समानतेचा खंदा पुरस्कर्ता असणार्‍या रघुनाथ कर्व्यांच्या कामाचं महत्त्व फार फार उठून दिसतं.