Skip to main content

महिला दिन विशेषांक २०१७

जेनच्या नायिका

लेखक पिशी अबोली यांनी बुधवार, 08/03/2017 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
. .मी जिच्याशी सतत स्पर्धा करायचे, अशा एका मैत्रिणीकडून 'प्राइड अँड प्रिज्युडाइस'बद्दल ऐकलं, आणि त्या ईर्ष्येने तेव्हा ते वाचून काढलं होतं. ते वय ते कळण्याचं नव्हतंच, महान नाव असलेल्या अशा पुस्तकाबद्दल प्रामाणिक अभिप्राय देण्याचंही नव्हतं. तो देण्याइतपत शिंगं फुटली, तेव्हा हे बालपणीचंच इम्प्रेशन मनात कायम असल्याने 'जेन ऑस्टिन बकवासच' हे मांडायला सुरुवात झाली.

उपेक्षित स्त्रियांचे हक्काचे घर - माऊली

लेखक रुपी यांनी बुधवार, 08/03/2017 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
. 'पिंजर' चित्रपटातला एका प्रसंगात 'पगली'ला दिवस गेल्याचे कळते, तेव्हा पुरोला धक्काच बसतो. अगदी दु:खी होऊन ती विचार करते, "कैसा आदमी होगा वो, जिसने ..." फाळणीवर आधारीत ही कादंबरी १९५०मध्ये लिहिली गेलेली. पगलीसारख्याच स्त्रियांची परिस्थिती मात्र तेव्हाच्या भारतापासून आताच्या 'डिजिटल इंडिया'पर्यंत अजूनही तशीच आहे; खरं तर त्याहून वाईट म्हणावी अशी! रस्त्यावरच्या या निराधार वेड्या महिलांना स्वतःची खाजगी मालमत्ता समजणारे नराधम समाजात कमी नाहीत.

सायकलिंगच्या छंदातून समाजप्रबोधन करणार्‍या आनंदयात्री

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 08/03/2017 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
. पुणे शहरातल्या सायकलिंगचा छंद जोपासणार्‍या बर्‍याच लोकांना शीला परळीकर हे नाव ऐकून तरी माहीत असेल. आद्य मिपाकर सायकलपटू मोदक याच्याकडून त्यांचा फोन नंबरही अनायासे मिळाला, म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने या वेळी त्यांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं. कारणही तसंच होतं. दहावीनंतर सायकल सोडून देऊन आता सतत स्वयंचलित दुचाक्यांवर बुंगाट जाणार्‍या आमच्या पिढीसमोर वयाच्या ६७ व्या वर्षीही आपला सायकलिंगचा छंद यशस्वीपणे जोपासणार्‍या शीला परळीकर आहेत तरी कशा, ही उत्सुकता फार वाढली होती.

गंध हलके हलके - प्राजक्ता पटवर्धन

लेखक प्रीत-मोहर यांनी बुधवार, 08/03/2017 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी! अनाहितातर्फे आज आपण भेटणार आहोत प्राजुला. मिपाची लाडकी मुलगी, जिच्या नावावर 'गंध हलके हलके' आणि 'ये प्रिये' हे मराठी गाण्यांचे आल्बम, 'फुलांची आर्जवे' आणि 'मौनाची आर्जवे' हे दोन कवितासंग्रह, 'काच खड्यांची नक्षी' हा ललित लेखांचा संग्रह आणि 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सखी', 'बे दुणे दहा', 'प्रीती परी तुजवरती' आणि 'किती सांगायचंय मला' अशा पाच मराठी मालिकांचं पटकथा लेखन जमा झालं आहे. मराठीतली एक उगवती कवयित्री, जी मिपाच्या सुरुवातीपासून आपल्या सुरेख कवितांनी लक्ष वेधून घेत आली, त्या प्राजुला.

रसिका स्टिच वर्क्स - कल्पकतेचा उत्तुंग व्यावसायिक प्रवास

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 08/03/2017 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
. सौ. रेखा सोलापूरकर - बोरकर यांचा बुलडाण्यात स्वतःचा 'रसिका स्टिच वर्क्स' हा संगणकीकृत एम्ब्रॉयडरीचा (कशिदाकामाचा) व्यवसाय आहे. केवळ एक छंद म्हणून सुरू होऊन हळूहळू व्यवसायात त्याचं रूपांतर होऊन आता देशांतर्गत आणि देशाबाहेरही विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवलं आहे.

'स्टोरीवाली आंटी' - गायत्री आपटेकर

लेखक इनिगोय यांनी बुधवार, 08/03/2017 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
. गायत्री आपटेकर एक व्यावसायिक कथाकथनकार, थेरपिस्ट आणि लेखिकाही आहे. मोठ्या माणसांचं आणि लहान मुलांचं भावनिक आरोग्य राखणं हे तिच्या कामाचं क्षेत्र, तर गोष्टींच्या माध्यमातून समस्या सोडवायला मदत करणं हे त्याचं स्वरूप. मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधीची आव्हानं हा विषय लोकांपर्यंत नेण्याबद्दल ती आग्रही आहे. विशेष म्हणजे गायत्रीने स्वतः वैयक्तिक आयुष्यात नैराश्यावर बऱ्याच प्रयत्नान्ती मत केली आहे.

उद्याच्या करियर्स - A Curtain Raiser

लेखक इनिगोय यांनी बुधवार, 08/03/2017 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
. १२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय ....आणि फक्त एक आयुष्य! विद्यार्थ्यांसाठी आणि मिड करियर चेंजसाठी करियर प्लॅनिंग करत असताना असं लक्षात येत गेलं की 'अपुऱ्या माहितीवर बेतलेले निर्णय' हे व्यावसायिक असमाधानाचं, अपयशाचं मोठंच कारण आहे. करियरची निवड सहसा नेहमी ऐकल्या-बोलल्या जाणाऱ्या पर्यायांमधून होते. त्यात मुलाला, मुलीला काय आवडतंय, काय जमतंय आणि त्याचा-तिचा स्वभाव कसा आहे, याचा विचार अजूनही फारसा होत नाही.

मिनार - An Insight

लेखक चित्रा लेले यांनी बुधवार, 08/03/2017 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
. मिनार! माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत. चुणचुणीत, वर्गात शंका विचारणारी, "मिस, मला काय वाटतं..." म्हणत आपलं मत मांडणारी मिनार हळूहळू रुळत गेली, आमच्या वर्गाचा भाग बनली. तिचं दिव्यांग असणं कधी जाणवलं नाही.

समतेच्या वाटेवर.. प्रीती करमरकर

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 08/03/2017 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
. आपल्या मध्यमवर्गीयांच्या करियरच्या कल्पना काय असतात? सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, शिक्षकाची नोकरी किंवा अशीच एखादी साधी १० ते ५ नोकरी. कुणी जरा हुशार असेल, तर इंजीनिअरिंग, मेडिकल, सीए, फार तर आर्किटेक्चर असे काहीतरी करून 'सेटल' व्हायचे आणि मग काही काळाने सहज मनाला बरे वाटावे, म्हणून रोटरी किंवा लायन्स वगैरे माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी सोशल वर्क म्हणून करायच्या. जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांचे आयुष्य याच पाठडीतून निवांतपणे जाते. पण या कल्पनांना छेद देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती फार कमी.

आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 08/03/2017 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
. "ए राजा, ऊठ" "झोपू दे गं आई अजून थोडं..." "अरे, शाळेत जायला उशीर होईल." "होऊ दे. दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो." "एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला. मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे.....