Skip to main content

महिला दिन विशेषांक २०१७

स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे

लेखक मंजूताई यांनी बुधवार, 08/03/2017 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
. भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय! स्त्रियांनी, स्त्रियांसाठी तर आहेच पण फक्त स्त्रियांसाठी नाही, तर दर्दी, रसिक, संगीतप्रेमी श्रोत्या व कानसेनांना तृप्त करण्याचा ध्यास घेतलेली संस्था म्हणजे ‘स्वराली’!

महाराणी गायत्रीदेवी

लेखक इशा१२३ यांनी बुधवार, 08/03/2017 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
. ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवतीच. आंतरराष्ट्रीय 'वोग' मासिकात जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांत तिची गणना झाली होती. ती उच्चशिक्षित होती. ती त्या काळात सफाईने कार चालवायची. ती पडदा पाळत नव्हती. तिने बाराव्या वर्षी वाघाची शिकार केली होती. तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही. खरे तर विलासी सुखासीन आयुष्य जगली असती, तशी ती जगलीही, पण समाजासाठी, स्त्रीशिक्षणासाठी तिने स्वतःला गुंतवून घेतले. आपले प्रयत्न यशस्वी करून दाखवले.

तरुणाईची स्पंदना - तेजस्विनी लेले

लेखक पूर्वाविवेक यांनी बुधवार, 08/03/2017 06:04 या दिवशी प्रकाशित केले.

. आंतरजालावर लिहिण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आणि अनेक जण लिहिते झाले. अनेक तरुण ब्लॉग लिहिता लिहिता व्यावसायिक लेखन करू लागले. आज आपण अशाच एका उदयोन्मुख, होतकरू लेखिकेला भेटणार आहोत. तिचे ब्लॉग जास्वंदाची फुलंTangents आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या शब्दांतलं ताजेपण, तिची खुमासदार लेखनशैली मनाला भावते.