ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)
In reply to आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत. by धर्मराजमुटके
इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.क्लिंटन, समाजवाद्यांच्या एकत्र येणे दूर जाणे या स्वभावाबद्दल सर्वसाधारण माहिती होती पण हा इतका इतिहास माहीत नव्हता. हायला इथे माझी वाचताना दमछाक होते आहे तुम्हाला लिहायला किती वेळ लागला असेल! हा धागा वाचनखूण म्हणून साठवत आहे; संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.
In reply to इथे टाईमलाईनच्या मदतीने by वामन देशमुख
In reply to क्लिंटन, हा अत्यंत by गवि
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to क्लिंटन, हा अत्यंत by गवि
In reply to सहमत.. by तुषार काळभोर
In reply to क्लिंटन, हा अत्यंत by गवि
In reply to क्लिंटन, हा अत्यंत by गवि
भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.
१९७७ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मंडल आयोग नेमला. त्यांनी १९७९ मध्ये आपला अहवाल सादर केला ज्यात इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याची सूचना होती (त्याच अहवालात मराठा मागास नाहीत असाही निष्कर्ष होता जो निष्कर्ष त्यापूर्वीच्या १९५० च्या दशकातील कालेलकर अहवालात होता व नंतर २००० च्या दशकातील बापट अहवालातही होता. परंतु मराठा मागास आहेत असा आधीच ठरविलेवा निष्कर्ष फडणवीसांनी २०१६ मध्ये नेमलेल्या गायकवाड अहवालाने काढला होता.) परंतु काही महिन्यातच इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या व त्यांनी हा अहवाल बाटलीत बंद करून घट्ट झाकण लावून टाकले.
१९८९ मध्ये वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे देवीलाल व चंद्रशेखरांशी पटत नव्हते. वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्या नंतर मतभेदांमुळे ३ महिन्यातच देवीलालनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पाठिंबा म्हणून आताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांनीही राजीनामा दिला होता. देवीलालांची समजूत काढल्यानंतर त्यांनी व धनकरांनी राजीनामा मागे घेतला होता.
काही महिन्यांनतर एका मुलाखतीत देवीलालनी वि. प्र. सिंहांवर बरीच ठीका करून त्यांचा कणाहीन असा उल्लेख केल्याने वि. प्र. सिंह भडकले होते. त्यावेळी इंडिया टुडेत एक व्यंगचित्र आले होते ज्यात डोळ्यांवर टोपी आलेल्या वि. प्र. सिंहांनी पाठीमागे सदऱ्याच्या कॉलरमध्ये काठी घालून ती कंबरेपाशी बाहेर आली होती व त्यामुळे पाठीला म्हणजेच कण्याला मिळून कणा ताठ राहिला आहे असे दाखवून, कोण म्हणतो मी कणाहीन आहे, असे वि. प्र. सिंह विचारताना दाखविले होते व हे व्यंगचित्र खूप गाजले होते.
त्यामुळे वि. प्र. सिंहांनी देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले होते. त्याला उत्तर म्हणून देवीलालांनी दिल्लीत मोठा शेतकरी मेळावा घ्यायची घोषणा केली.
एकीकडे भाजपच्या श्रीरामजन्मभूमी शिलान्यासाची घोषणा व दुसरीकडे देवीलालांचे आव्हान आणि चंद्रशेखराची नाराजी या कात्रीत सापडलेल्या वि. प्र. सिंहांनी मंडल आयोग बाटलीतून बाहेर काढून इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याचे जाहीर करून सर्वांना एकाच चालीत शह देण्याचा प्रयत्न केला.
बाटलीतून मंडल आयोगाबरोबरीने मुलायम, लालू, काशीराम, सीताराम केसरी, शरद यादव ही इतर मागासवर्गीय जातीतील भुते सुद्धा बाहेर आली व राजकारणात त्यांना एकदम महत्त्व प्राप्त झाले. अन्यथा त्यापूर्वी त्यांना राजकारणात फारसे महत्त्व नव्हते.
पूर्वी लिहिल्याप्रमाणे जो सत्ताधारी पक्ष राज्यात किंवा केंद्रात जात्याधारीत राखीव जागा देतो तो पक्ष पुढील निवडणुकीत सत्तेत येत नाही या सिद्धांताचा प्रारंभ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून झाला. वि. प्र. सिंह पुढील निवडणुकीत सत्तेत आले नाहीत. त्यानंतर जयललिता, वसुंधरा राजे, गेहलोत, मनमोहन सिंग, पृथ्वीराज चव्हाण, फडणवीस यांनी तसाच निर्णय घेऊन पुढील निवडणुकीत सत्ता घालवून बसले. In reply to भारतीय राजकारणातील दोन by श्रीगुरुजी
१९८९ मध्ये वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे देवीलाल व चंद्रशेखरांशी पटत नव्हते. वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्या नंतर मतभेदांमुळे ३ महिन्यातच देवीलालनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पाठिंबा म्हणून आताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांनीही राजीनामा दिला होता. देवीलालांची समजूत काढल्यानंतर त्यांनी व धनकरांनी राजीनामा मागे घेतला होता.हो हे आठवत होते पण नक्की कोणत्या कारणामुळे देवीलालांनी राजीनामा दिला हे लक्षात नव्हते. आंतरजालावर शोधाशोध केल्यावर तेव्हाच्या इंडिया टुडेमधील देवीलालांची मुलाखत सापडली. त्यावरून समजते की सुरवातीला वि.प्र.सिंगांना पंतप्रधान बनवायला देवीलालांनीच मदत केली असली तरी लगेचच कुरबुरींना प्रारंभ झाला होता.
काही महिन्यांनतर एका मुलाखतीत देवीलालनी वि. प्र. सिंहांवर बरीच ठीका करून त्यांचा कणाहीन असा उल्लेख केल्याने वि. प्र. सिंह भडकले होते.ही मुलाखत इलस्ट्रेटेड विकलीला दिली होती आणि त्या मुलाखतीत मंत्रीमंडळातील मंत्री अरूण नेहरू आणि अजितसिंगांवरही टीका होती. त्यानंतर वि.प्र.सिंगांनी देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले होते.
एकीकडे भाजपच्या श्रीरामजन्मभूमी शिलान्यासाची घोषणा व दुसरीकडे देवीलालांचे आव्हान आणि चंद्रशेखराची नाराजी या कात्रीत सापडलेल्या वि. प्र. सिंहांनी मंडल आयोग बाटलीतून बाहेर काढून इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याचे जाहीर करून सर्वांना एकाच चालीत शह देण्याचा प्रयत्न केला.देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले २-३ ऑगस्टच्या सुमारास. त्याविरोधात त्यांनी ९ ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकरी मेळावा घ्यायचे जाहीर केले. देवीलालांना शेतकर्यांमध्ये बर्यापैकी पाठिंबा आहे असे वाटून वि.प्र.सिंगांनी ७ ऑगस्टला मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करायची घोषणा केली आणि त्यातून ओबीसी समाज आपल्याबरोबर येईल हे त्यांचे गणित होते. त्यावेळेस अडवाणींनी रथयात्रेची घोषणा केली नव्हती. समस्त सेक्युलर कॅम्पचा आक्षेप हाच असतो की वि.प्र.सिंगांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करायचे जाहीर केल्यानंतर मोठी व्होटबँक वि.प्र.सिंगांकडे जाईल ही शक्यता ध्यानात घेऊन मग त्याला उत्तर म्हणून अडवाणींनी हिंदुत्वाच्या नावावर सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा जाहीर केली. किमान टाईमलाईनचा विचार करता त्यात तथ्य वाटते. असो. गविंनी म्हटल्याप्रमाणे हा धागा ताज्या घडामोडींपेक्षा जुन्या घडामोडी असा बनत आहे.
In reply to शिवसंग्रामचे नेते by जेम्स वांड
In reply to विनायक मेटे by क्लिंटन
In reply to विनायक मेटे by क्लिंटन
In reply to अरे काय चाललंय काय ! by जेम्स वांड
Unapologetic Hindu #Rakeshjhunjhunwala Sahab pic.twitter.com/UGsFAYOcc9
— Professor Sahab (@ProfesorSahab) August 14, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to एक कायदाच मुळात घटनासंमत by आग्या१९९०
In reply to एक कायदाच मुळात घटनासंमत by सुबोध खरे
In reply to एक कायदाच मुळात घटनासंमत by सुबोध खरे
In reply to राकेश झुनझुनवाला गेले by क्लिंटन
गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंगर कपारी वर धडकली ....अजित पवार गाडी कंटेनरला मागून धडकली म्हणताहेत. एकंदरीत अपघातस्थळीची चित्रं पाहता पवारांची माहिती खरी वाटते. गाडीची पुढची डावी बाजू पार चेपली आहे. गाडीची उजवी बाजू तर आजिबात अपघातग्रस्त वाटंत नाही. पहाटे ०५०० वाजता अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका लगेच न येता तासाभराने आली हे कितपत संशयास्पद आहे ? असो. भक्ती बर्वे याच मार्गावर अशाच एका पहाटेच्या अपघातात गेल्या होत्या ते आठवलं. बाकी, विनायक मेटे म्हणजे कुमार केतकरांच्या ठाण्याच्या घरावर हल्ला करणारे तेच ना ? आ.न., -गा.पै.
In reply to मेटेंच्या अपघाताची चौकशी by श्रीगुरुजी
In reply to मेटेंची आई by जेम्स वांड
In reply to दिवसा २००+ किमी गाडी by श्रीगुरुजी
In reply to या बोलण्याला काहीच अर्थ नाही by जेम्स वांड
In reply to या बोलण्याला काहीच अर्थ नाही by जेम्स वांड
In reply to साधारणपणे राजकीय घातपात by श्रीगुरुजी
In reply to अहो by जेम्स वांड
In reply to जवळपास २४ तास जागा असलेला by श्रीगुरुजी
In reply to नक्कीच ! by जेम्स वांड
In reply to करा. by श्रीगुरुजी
In reply to ते by जेम्स वांड
In reply to दिवसा २००+ किमी गाडी by श्रीगुरुजी
In reply to ऊ प्रदेशातील कुशी नगर भागातील by डँबिस००७
In reply to ड्रायवरला आराम देणे गरजेचे आहे. by कंजूस
आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत.