ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
In reply to जामीन मिळविण्याचा प्रयत्न by आग्या१९९०
In reply to मला माहिती नाही. ते फक्त by श्रीगुरुजी
In reply to अमेरिकन नौदलाची युद्धनौका भारतीय बंदरात by निनाद
In reply to ते by प्रसाद_१९८२
भाजप हा एकमेव पर्याय असल्याचे मला तरी वाटते
संजय राठोड म्हणजे ते पुण्याची पूजा चव्हाण का कोण मुलगी होती तिच्या आत्महत्येला जबाबदार अन् कैक महिने फरार होऊन बसलेले नसतील ना ?? ते दुसरे कोणीतरी असतील ज्यांचे मंत्रिपद जावे म्हणून भाजपच्या चित्रा वाघ ह्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. ते कसं म्हणायचं असतं म्हणे अश्यावेळी हां!!!काय बोलावं ते सुचेना
In reply to महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार - ताज्या घडामोडी by जेम्स वांड
In reply to कित्ती बोलू नी कित्ती नको असं by आग्या१९९०
In reply to तुम्ही by जेम्स वांड
In reply to भाजपाने संजय राठोड व अब्दुल by प्रसाद_१९८२
In reply to नितीशकुमार by क्लिंटन
In reply to आताच बातम्यांमधे दाखवतायत की, by प्रसाद_१९८२
In reply to नितीशकुमार by क्लिंटन
In reply to क्लिंटन by जेम्स वांड
In reply to इन जनरल सहमत by क्लिंटन
In reply to मी पण इन जनरल सहमत सर :) by जेम्स वांड
मी थोडासा contemporary बोलतोय.पूर्ण contemporary असे काही नसतेच कारण पूर्वी घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी असतोच. बाबरी पडल्यानंतर एक वर्षाने नोव्हेंबर १९९३ मध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत विधानसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी 'आज पाच प्रदेश कल सारा देश' अशी भाजपची घोषणा होती. त्या निवडणुका भाजपने पूर्णपणे एकट्याने आणि हिंदुत्व या स्लोगनवर लढवल्या होत्या. झाले काय? तर उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती झाल्याने विरोधकांची मते विभागली गेली नाहीत आणि भाजपला सरकार बनवता आले नाही. तिथे मुलायमसिंग मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात तर सपशेल पराभव झाला. राजस्थानातही पूर्ण बहुमत मिळाले नाही तर २०० पैकी ९५ जागा मिळाल्या म्हणून शेखावत मुख्यमंत्री होऊ शकले. फक्त दिल्लीत भाजपला अपेक्षित होता तसा विजय झाला. तेव्हा भाजपच्या नेतृत्वाला बहुतेक एक गोष्ट समजली की नुसत्या हिंदुत्वाच्या जोरावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. आता भाजप बर्याच राज्यात आहे. त्यावेळी दक्षिणेत कर्नाटकात ४ खासदार आणि सिकंदराबाद मधून बंडारू दत्तात्रय हे एक खासदार एवढेच अस्तित्व होते. तेव्हा बाबरी पडल्यावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ वगैरे भाजप नेते बोलत असले तरी सत्य परिस्थिती तशी नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर १९९४ मध्ये अडवाणींनी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करेल असे म्हटले होते हे पेपरात वाचल्याचे माझ्या लक्षात आहे. म्हणजे जे १९९८ मध्ये प्रत्यक्षात झाले त्या दृष्टीने भाजपने आधीपासूनच पावले उचलली होती. तसेच वाजपेयी आणि अडवाणी यांचे वयही वाढत होते हा आणखी एक फॅक्टर असू शकेल. म्हणजे आपण असतानाच पक्षाची सत्ता दिल्लीत यायला पाहिजे असा काही विचार असावा. त्यातून मग भाजपने मित्र शोधले त्यात जॉर्ज फर्नांडिस- नितीशकुमार होते. ते १९९६ मध्ये भाजपबरोबर गेले. १९९८ मध्ये आणखी बरेच पक्ष बरोबर घेतले. तेव्हा 'ऑर्गॅनिक' वाढीपेक्षा मित्रपक्ष शोधून त्यांच्या मदतीने सत्तेत यायचा सोपा मार्ग भाजपने खेळला असे दिसते. त्या प्रकारात मग नितीशकुमार २०१३ पर्यंत भाजपबरोबर होते. २०१३ मध्ये नितीशकुमार आणि भाजपचे बिनसले. तरीही २०१७ मध्ये कोणत्या कारणांमुळे भाजपने नितीशना परत घेतले असावे याविषयी अन्य एका प्रतिसादात लिहिलेच आहे. ती युती कालपर्यंत होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर contemporary हे पूर्णपणे वेगळे कसे करणार?
In reply to contemporary by क्लिंटन
In reply to नितीशकुमार by क्लिंटन
In reply to तेजस्वी यादव बुद्धिमान असेल by श्रीगुरुजी
In reply to 75 बांग्लादेशी मुलींशी केलं लग्न by मुक्त विहारि
काय बोलावं ते सुचत नाहीये
In reply to मंत्रीमंडळात संजय राठोड व by श्रीगुरुजी
In reply to सिलेक्टीव विस्मरणावर by जेम्स वांड
In reply to महाराष्ट्र व बिहारमधील भाजपचे by श्रीगुरुजी
फक्त मोदी शहा ह्यांना ह्याच्यातली कसलीच कल्पना नाही इतके ते गरीब बिचारे लोक अंधारात आहेत
असे ज्याचे म्हणणे असेल त्याच्या अंधभक्तीभावासमोर काय बोलणे !In reply to केंद्र तितके सोवळे by जेम्स वांड
In reply to एकट्या फडणवीसांना दोष देऊन by रात्रीचे चांदणे
In reply to एकट्या फडणवीसांना दोष देऊन by रात्रीचे चांदणे
In reply to फडणवीसांसारख्या अपात्र, by श्रीगुरुजी
सत्तेसाठी अत्यंत शखवखलेल्या व्यक्तीला पूर्ण रान मोकळे देणारे मोदी^शहा तितकेच दोषी आहेत.आभारी आहे, मनमोकळेपणाने कबूल केल्यामुळे, आपल्याबद्दल आदर दुणावला....
In reply to फडणवीसांसारख्या अपात्र, by श्रीगुरुजी
In reply to सत्तेतला हावरटपणा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काहीतरीच काय प्रोफेसर by जेम्स वांड
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सत्तेतला हावरटपणा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली.
खोटे बोलणे थांबवा. मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर महाराष्ट्रात कोणालाही माहिती नसलेल्या सेनेला माजपने मोठे केले आहे ही वस्तुस्थिती आहे. याविषयी पूर्ण आकडेवारीनिशी अनेकदा लिहिले आहे. विश्वास बसत नसल्यास युती होण्यापूर्वी कोणाला किती मते होती, किती आमदार होते ते शोधा. In reply to महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट by श्रीगुरुजी
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. १९ जून १९६६ ला. जनसंघानंतर, भाजपाचं बारसं व्हायला १९८० उजाडलं. आता वयाने कोण मोठं ?समजा १९८० मध्ये भाजप हे नाव न घेता परत जनसंघ हे नाव घेतलं असतं तर मग जनसंघ मोठा झाला असता का? कारण जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली होती आणि १९७७ पूर्वीच्या जनसंघातले सगळे लोक १९८० च्या भाजपत होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कधी मिळाले याविषयीही लिहा की. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ विद्याधर गोखले हे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. निवडणुक आयोगाने बाकीच्या तीन- वामनराव महाडिक, अशोक देशमुख आणि मोरेश्वर सावे यांना अपक्ष उमेदवार म्हणून म्हणून धरले होते ते का हे पण सांगा की. https://ceomadhyapradesh.nic.in/Links/Books/89_Vol_II.pdf वर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांचे अधिकृत निकाल आहेत. त्यात निवडणुक लढविणार्या पक्षांची नावे दिली आहेत. शिवसेनेचे नाव तिथे राज्यस्तरीय पक्षांमध्येही दिसणार नाही तर ते REGISTERED(Unrecognised ) PARTIES मध्ये दिसेल. ते का हे पण लिहा की. बरं १९९० पूर्वी अगदी १९५७ मध्ये जनसंघाचे पूर्ण देशात चार खासदार होते त्यापैकी दोन महाराष्ट्रातून निवडून आले होते ते पण लिहा की. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघ-भाजपचे किती आमदार निवडून यायचे आणि शिवसेनेचे किती आमदार निवडून यायचे ते पण लिहा की. १९९० आणि नंतर नुसत्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या लिहिलीत. पण दोन पक्षांनी किती जागा लढवल्या होत्या ते पण लिहा की. मग स्ट्राईक रेट कोणाचा जास्त होता ते पण सगळ्यांना कळेल. असं काय करता सर? प्रा.डॉ. आहात ना? मग नुसती आपल्या म्हणण्याला अनुकूल आकडेवारी सिलेक्टिव्हली देऊन कशी चालेल? सगळी आकडेवारी नको का द्यायला?
जामीन मिळविण्याचा प्रयत्न