Skip to main content
लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रविवारचे 'स्केड्यूल्' आणि पुष्कराजांना हवा असलेला एकांत

वाचने 2498
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

पेटला आहात!! एका मागोमाग एक विडंबने करता आहात आणि ती पण व्होडका वगैरे घेऊन? तात्या हाणतील एकटेच प्यालात तर!!! - नाटक्या

भर शुक्रवार दुपारी, पुढचा मोठा वीकांत अडीच-तीन महिने दूर असताना हे विडंबन वाचायला मिळाले :). पापड, टकीला, श्रिम्प, वोडका आणि पोकर - उत्तम कॉम्बो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

दारू मांसाहार आणि जुगार! उत्तम कॉम्बो !! मस्त विडंबन.

अरे बेला... जरा धीर धर. शनिवारी (उद्याच) माझ्या घरी आपली पार्टी आहेच. नाटक्या काही innovative कॉकटेल्स करणार आहे. ....बबलु

आजकाल भलतेच जोरात आहात बेलाशेट ... :) --अवलिया

अतिशय म्हणजे अतिशयच सुरेख काव्य..! मनापासून केलेलं! जियो...! तात्या.