Skip to main content

एकदाच ओलांडून अंतर...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 12/02/2020 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8812
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मानलं तुम्हाला! खूप आवडली.

सुंदर, तरल, अप्रतिम ! नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर... हे तर खासच !

शृंगारिक कविता फार नाही वाचल्या, त्यामुळे फार आवडली.
मनात जे जे दडून होते नकळत आकळते कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते ही जाणीव अवघी जरतारी . . . हर श्वासातुन परिमळणारी . . . हर गात्रातुन तगमगणारी . . .

लै म्हणजे लैच आवडली, नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर हे भलते अवघड असते पण जमवावेच लागते नाहीतर मग वाट लागते..... पैजारबुवा,

आवडली. धीट कविता. -दिलीप बिरुटे

सुरेख

एकदा धीर करून अंतर ओलांडले की काहीच 'भलते' रहात नसते. कविता छानच.

उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. आहाहा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev