परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात
कैसे मी मग सावरावे आता देहभान
दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त
हरपली केव्हाच अवघी भूक तहान
मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण
अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना
तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन
तरीही का तुझा परीसस्पर्श होईना
सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी
काय तुला मी वेगळे असे आळवावे
दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला
तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !
काव्यरस
वाचने
7256
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप सुंदर!
खूप सुंदर!
सुरेख रचना!
खरीखुरी आळवणी!
सुंदर आणि सुरेख
+१.. फारच सुंदर..
In reply to सुंदर आणि सुरेख by नि३सोलपुरकर
देखणी रचना. खूप आवडली.
छान हो छान.
आहा!! काय सुंदर!! फार छान..
सुरेख!!
अप्रतिम !! भक्तीचा सुगंध