Skip to main content

घराला मनांचा उबारा करु!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 27/06/2017 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु! खुले केस पाठीवरी सोड ना खुळ्या मोगऱ्याचा पिसारा करु! तुझ्या पाउली चंद्र उतरेल तो कसा मी मला सांग तारा करु! सखे लाट अनिवार होवून,ये अता थेंब-थेंबा किनारा करु! शमावी क्षणातच जिथे वादळे घराला मनांचा उबारा करु! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 3523
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सौरा,पद्मावति,रुपी...प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!