कधी किनारा लिहितो,किंवा...
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!
कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!
तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!
कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!
अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!
तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!
तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते
उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो!
—सत्यजित
तुझी प्रार्थना बहुधा त्याला
+१
सुंदर!
भारी !
धन्यवाद!
?
एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या
सत्यजित !
तुमचा नेमका शब्द चुकला '
धन्स!
.
गुस्ताख़ी माफ़ .... पण हे चालतंय का पाहा
मला स्वतःला नीट नाही समजली ही
होय
शेवटचे कडवे विशेष आवडले.
सुंदर लिहिलंय
सहमत !
धन्यवाद!
अतिशय छान!!
धन्यवाद!