Skip to main content

रात्रीस खेळ चाले....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस खेळ चाले.... गूढं त्या महाली केस सोडून ती बसलेली काळा मिट्ट अंधार अन काजव्याने पण मान टाकलेली अचानक एक टिटवी ओरडली आढ्याशी भुते खदखदली वारा नव्हता तरी अचानक तावदानाची दारे खडखडली रात्र खूपं वाढलेली कोल्हे कुत्री केकाटली झरोक्यातून सावली उतरली मांजराने बाहुली पळवली.... राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 3290
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता ठीकच.... जरा शब्दक्रम वगैरे बदलून लयीत आणता आली तर पहा! Sandy

छान आहे.. अ वांतर~वाचताना पांडूलेखाची आठवण आली! स मांतर~ पांडूला आवडेल ही जिल्बी. ;)